Gênesis 50
marc (MARC) vs NVI
1 योसेफ आपल्या पित्याल्या आलिंगन देऊन खूप रडला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले.
1 José atirou-se sobre seu pai, chorou sobre ele e o beijou.
2 नंतर योसेफाने वैद्यास त्याचा पिता इस्राएल याच्या मृतदेहात मसाला भरण्याची आज्ञा दिली. मग वैद्यांनी मृतदेहात सुगंधी द्रव्याचा मसाला भरला.
2 Em seguida deu ordens aos médicos, que estavam ao seu serviço, que embalsamassem seu pai Israel. E eles o embalsamaram.
3 मसाला भरण्याच्या क्रियेला चाळीस दिवस लागले, मृतदेहात मसाला भरण्यास इतके दिवस लागत असत. इजिप्तच्या लोकांनी त्याच्यासाठी सत्तर दिवस शोक केला.
3 Levaram quarenta dias completos, pois esse era o tempo para o embalsamamento. E os egípcios choraram sua morte setenta dias.
4 शोक करण्याचे दिवस संपल्यानंतर योसेफ फारोहच्या राजदरबारी गेला आणि म्हणाला, “जर माझ्यावर तुमची कृपादृष्टी असेल तर तुम्ही माझ्यावतीने फारोहशी बोलावे” अशी त्याने त्यांना विनंती केली.
4 Passados os dias de luto, José disse à corte do faraó: "Se posso contar com a bondade de vocês, falem com o faraó em meu favor. Digam-lhe que
5 “माझ्या वडिलांनी मला शपथ घ्यायला लावली आणि म्हणाले, मी मरणार आहे; कनान देशात मी स्वतःसाठी खोदलेल्या थडग्यात मला मूठमाती दे. आता मला वर जाऊन माझ्या वडिलांना मूठमाती देऊ दे. मग मी परत येईन.”
5 meu pai fez-me prestar-lhe o seguinte juramento: ‘Estou à beira da morte; sepulte-me no túmulo que preparei para mim na terra de Canaã’. Agora, pois, peçam-lhe que me permita partir e sepultar meu pai; logo depois voltarei".
6 फारोहने म्हटले, “तू वर जा आणि शपथ दिल्याप्रमाणे आपल्या वडिलांना मूठमाती दे.”
6 Respondeu o faraó: "Vá e faça o sepultamento de seu pai como este o fez jurar".
7 मग योसेफ आपल्या पित्याला पुरण्यास निघाला. फारोहचे सर्व अधिकारी त्याच्याबरोबर होते—त्याचे मान्यवर आणि इजिप्तचे सर्व प्रतिष्ठित—
7 Então José partiu para sepultar seu pai. Com ele foram todos os conselheiros do faraó, as autoridades da sua corte e todas as autoridades do Egito,
8 तसेच योसेफाचे पूर्ण कुटुंब म्हणजे त्याचे भाऊ आणि त्यांचे कुटुंब, या सर्वांसह गेला. परंतु त्यांनी त्यांची मुलेबाळे, गुरे, शेरडेमेंढरे गोशेन प्रांतातच मागे ठेवली.
8 e, além deles, todos os da família de José, os seus irmãos e todos os da casa de seu pai. Somente as crianças, as ovelhas e os bois foram deixados em Gósen.
9 अशाप्रकारे योसेफाबरोबर रथ, घोडेस्वार गेले. तो मोठा समुदाय होता.
9 Carruagens e cavaleiros também o acompanharam. A comitiva era imensa.
10 जेव्हा ते यार्देन नदीच्या पश्चिम तीरावर यरीहोजवळ अटाद या ठिकाणी आले; तेव्हा त्यांनी तिथे फार आकांत करून मोठा विलाप केला; योसेफाच्या वडिलांसाठी त्यांनी सात दिवस तिथे शोक केला.
10 Chegando à eira de Atade, perto do Jordão, lamentaram em alta voz, com grande amargura; e ali José guardou sete dias de pranto pela morte do seu pai.
11 जेव्हा तिथे राहणाऱ्या कनानी लोकांनी अटादच्या खळ्यावर शोक करताना पाहिले, यार्देनजवळच्या त्या जागेला आबेल-मिस्राईम असे नाव ठेवले. कारण ते म्हणाले, “इजिप्तच्या लोकांची ही मोठा शोक करण्याची जागा आहे.”
11 Quando os cananeus que lá habitavam viram aquele pranto na eira de Atade, disseram: "Os egípcios estão celebrando uma cerimônia de luto solene". Por essa razão, aquele lugar, próximo ao Jordão, foi chamado Abel Mizraim.
12 इस्राएलने आज्ञा केल्याप्रमाणे त्याच्या पुत्रांनी सर्वकाही केले:
12 Assim fizeram os filhos de Jacó o que este lhes havia ordenado:
13 त्याचा मृतदेह कनान देशामध्ये आणला आणि अब्राहामाने एफ्रोन हिथी याच्यापासून मम्रेजवळील मकपेला नावाच्या शेतातील गुहेत त्यांनी त्याला मूठमाती दिली.
13 Levaram-no à terra de Canaã e o sepultaram na caverna do campo de Macpela, perto de Manre, que Abraão havia comprado de Efrom, o hitita, para que lhe servisse de propriedade para sepultura, juntamente com o campo.
14 आपल्या वडिलांना मूठमाती दिल्यानंतर, योसेफ आपले भाऊ आणि आपल्या वडिलांच्या मूठमातीसाठी त्याच्याबरोबर गेलेले लोक यासह इजिप्त देशास परत आला.
14 Depois de sepultar seu pai, José voltou ao Egito, com os seus irmãos e com todos os demais que o tinham acompanhado.
15 जेव्हा योसेफाच्या भावांनी पाहिले की त्यांचे वडील मरण पावले, ते म्हणाले, “आपण योसेफाला जी वाईट वागणूक दिली होती, त्याची जर त्याने वाईटाने आपल्याला परतफेड केली तर?”
15 Vendo os irmãos de José que seu pai havia morrido, disseram: "E se José guardar rancor contra nós e resolver retribuir todo o mal que lhe causamos? "
16 म्हणून त्यांनी योसेफाला निरोप पाठविला, “मरण्यापूर्वी तुझ्या वडिलांनी अशी सूचना दिली होती:
16 Então mandaram um recado a José, dizendo: "Antes de morrer, teu pai nos ordenou
17 ‘तुम्हाला हे योसेफाला बोलायचे आहे: आम्ही तुझ्याशी जे अतिदुष्टाईचे वर्तन केले त्याबद्दल आम्ही तुझी क्षमा मागावी.’ त्याप्रमाणे आम्ही तुझ्या पित्याच्या परमेश्वराचे सेवक तुझी क्षमा मागत आहोत.” जेव्हा हा संदेश योसेफाकडे आला, तेव्हा योसेफ रडला.
17 que te disséssemos o seguinte: ‘Peço-lhe que perdoe os erros e pecados de seus irmãos que o trataram com tanta maldade! ’ Agora, pois, perdoa os pecados dos servos do Deus do teu pai". Quando recebeu o recado, José chorou.
18 नंतर त्याचे भाऊ त्याच्याकडे आले आणि त्याच्यापुढे पालथे पडून त्याला म्हणाले, “आम्ही तुझे गुलाम आहोत.”
18 Depois vieram seus irmãos, prostraram-se diante dele e disseram: "Aqui estamos. Somos teus escravos! "
19 पण योसेफ त्यांना म्हणाला, “भीती बाळगू नका. मी काय परमेश्वराच्या ठिकाणी आहे?
19 José, porém, lhes disse: "Não tenham medo. Estaria eu no lugar de Deus?
20 तुम्ही जे वाईट योजिले होते, त्यातून परमेश्वराने चांगलेच निर्माण केले; कारण आज मला त्याने या पदावर यासाठी आणले की, मला पुष्कळ लोकांचे प्राण वाचविता यावेत.
20 Vocês planejaram o mal contra mim, mas Deus o tornou em bem, para que hoje fosse preservada a vida de muitos.
21 म्हणून तुम्ही घाबरू नका; मी स्वतः तुमचा आणि तुमच्या मुलाबाळांचा पुरवठा करेन.” अशाप्रकारे त्यांच्याशी अतिशय ममतेने बोलून त्याने त्यांचे समाधान केले.
21 Por isso, não tenham medo. Eu sustentarei vocês e seus filhos". E assim os tranqüilizou e lhes falou amavelmente.
22 योसेफ, इजिप्त देशात आपल्या पित्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत राहिला. तो एकशे दहा वर्ष जगला
22 José permaneceu no Egito, com toda a família de seu pai. Viveu cento e dez anos
23 आणि योसेफाने त्याचा पुत्र एफ्राईमच्या मुलांची तिसरी पिढी पाहिली. तसेच मनश्शेहचा पुत्र माखीरला जन्मतः त्याच्या मांडीवर ठेवण्यात आले.
23 e viu a terceira geração dos filhos de Efraim. Além disso, recebeu como seus os filhos de Maquir, filho de Manassés.
24 नंतर योसेफ आपल्या भावांस म्हणाला, “लवकरच माझा अंत होईल, पण खात्रीने परमेश्वर तुमची भेट घेतील आणि तुम्हाला इजिप्त देशाबाहेर अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना वचन दिलेल्या देशात घेऊन जातील,”
24 Antes de morrer José disse a seus irmãos: "Estou à beira da morte. Mas Deus certamente virá em auxílio de vocês e os tirará desta terra, levando-os para a terra que prometeu com juramento a Abraão, a Isaque e a Jacó".
25 नंतर योसेफाने इस्राएली लोकांना शपथ देऊन म्हटले, “परमेश्वर तुमच्या मदतीला येतील आणि मग तुम्ही निश्चितच माझ्या अस्थी या जागेवरून घेऊन जाल.”
25 E José fez que os filhos de Israel lhe prestassem um juramento, dizendo-lhes: "Quando Deus intervier em favor de vocês, levem os meus ossos daqui".
26 अशा रीतीने योसेफ एकशे दहा वर्षांचा होऊन मृत्यू पावला. मग त्याच्या प्रेतात मसाला भरण्यात आला आणि ते एका शवपेटीत घालून इजिप्तमध्ये ठेवण्यात आले.
26 Morreu José com a idade de cento e dez anos. E, depois de embalsamado, foi colocado num sarcófago no Egito.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Gênesis 50, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.