Gênesis 47

marc (MARC) vs ARIB

Sair da comparação
ARIB Almeida Revisada Imprensa Bíblica
1 योसेफाने जाऊन फारोहला सांगितले, “माझे वडील आणि माझे भाऊ कनान देशातून आपली सर्व गुरे, शेरडेमेंढरे आणि सर्व संपत्ती घेऊन इकडे आले आहेत आणि आता ते गोशेन प्रांतात आहेत.”
1 Então veio José, e informou a Faraó, dizendo: Meu pai e meus irmãos, com seus rebanhos e seu gado, e tudo o que têm, chegaram da terra de Canaã e estão na terra de Gósen.
2 त्याने आपल्या भावांपैकी पाच जणांना निवडले आणि फारोहपुढे उपस्थित केले.
2 E tomou dentre seus irmãos cinco homens e os apresentou a Faraó.
3 फारोहने त्यांना विचारले, “तुमचा व्यवसाय कोणता आहे?”
3 Então perguntou Faraó a esses irmãos de José: Que ocupação é a vossa; Responderam-lhe: Nós, teus servos, somos pastores de ovelhas, tanto nós como nossos pais.
4 ते फारोहला आणखी म्हणाले, “आम्ही इथे काही काळ राहण्यास आलो आहोत, कारण कनान देशात अतितीव्र दुष्काळ पडला आहे आणि तुमच्या सेवकांच्या गुरांसाठी तिथे चारा नाही. तुम्ही आम्हाला गोशेन प्रांतात राहू द्यावे अशी विनंती आम्ही करीत आहोत.”
4 Disseram mais a Faraó: Viemos para peregrinar nesta terra; porque não há pasto para os rebanhos de teus servos, porquanto a fome é grave na terra de Canaã; agora, pois, rogamos-te permitas que teus servos habitem na terra de Gósen.
5 फारोह योसेफाला म्हणाला, “तुझे वडील व भाऊ तुझ्याकडे आले आहेत,
5 Então falou Faraó a José, dizendo: Teu pai e teus irmãos vieram a ti;
6 आणि संपूर्ण इजिप्त देश तुझ्यासमोर आहे; या देशातील उत्तम भागात तुझ्या पित्याला आणि भावांना राहण्यास दे. त्यांना गोशेन येथे राहू दे. आणि त्यांच्यापैकी कोणी विशेष क्षमता असणारे असतील तर त्यांच्यावर माझ्याही गुरांची जबाबदारी सोपवून दे.”
6 a terra do Egito está diante de ti; no melhor da terra faze habitar teu pai e teus irmãos; habitem na terra de Gósen. E se sabes que entre eles há homens capazes, põe-nos sobre os pastores do meu gado.
7 मग योसेफाने आपला पिता याकोब याला फारोहकडे उपस्थित केले आणि याकोबाने फारोहला आशीर्वाद दिला.
7 Também José introduziu a Jacó, seu pai, e o apresentou a Faraó; e Jacó abençoou a Faraó.
8 फारोहने त्याला विचारले, “तुमचे किती वय आहे?”
8 Então perguntou Faraó a Jacó: Quantos são os dias dos anos da tua vida?
9 आणि याकोबाने फारोहला उत्तर दिले, “माझी जीवनयात्रा एकशे तीस वर्षाची आहे. माझी ही वर्षे अत्यंत कष्टाची आणि दुःखाची अशी होती; तरीपण माझ्या पूर्वजांइतके माझे वय अजून झालेले नाही.”
9 Respondeu-lhe Jacó: Os dias dos anos das minhas peregrinações são cento e trinta anos; poucos e maus têm sido os dias dos anos da minha vida, e não chegaram aos dias dos anos da vida de meus pais nos dias das suas peregrinações.
10 नंतर याकोबाने फारोहला आशीर्वाद दिला आणि त्याच्या उपस्थितीतून निघाला.
10 E Jacó abençoou a Faraó, e saiu da sua presença.
11 याप्रमाणे योसेफाने आपले वडील आणि भाऊ यांना फारोहच्या आज्ञेप्रमाणे इजिप्तमधील रामसेस नगरामधील सर्वोत्तम जागा वतन म्हणून दिली.
11 José, pois, estabeleceu a seu pai e seus irmãos, dando-lhes possessão na terra do Egito, no melhor da terra, na terra de Ramessés, como Faraó ordenara.
12 योसेफाने आपला पिता, आपले भाऊ आणि आपल्या पित्याच्या कुटुंबातील प्रत्येकाला त्यांच्या मुलाबाळांच्या संख्येनुसार अन्नधान्य पुरविले.
12 E José sustentou de pão seu pai, seus irmãos e toda a casa de seu pai, segundo o número de seus filhos.
13 मात्र, दुष्काळ उग्र असल्याने संपूर्ण प्रदेशात अन्न नव्हते; दुष्काळामुळे इजिप्त आणि कनान दोन्ही देश कष्टमय झाले.
13 Ora, não havia pão em toda a terra, porque a fome era mui grave; de modo que a terra do Egito e a terra de Canaã desfaleciam por causa da fome.
14 योसेफाने धान्य विकून इजिप्त आणि कनानमधील सर्व पैसा गोळा केला आणि त्याने तो पैसा फारोहच्या महालात आणला.
14 Então José recolheu todo o dinheiro que se achou na terra do Egito, e na terra de Canaã, pelo trigo que compravam; e José trouxe o dinheiro à casa de Faraó.
15 जेव्हा इजिप्त आणि कनानी लोकांजवळचा सर्व पैसा संपला तेव्हा इजिप्तमधील लोक योसेफाकडे आले आणि म्हणाले, “आमचा सर्व पैसा संपला आहे तरी आम्हाला अन्न द्या. आम्ही तुमच्या नजरेसमोर अन्नावाचून मरावे का?”
15 Quando se acabou o dinheiro na terra do Egito, e na terra de Canaã, vieram todos os egípcios a José, dizendo: Dá-nos pão; por que morreremos na tua presença? porquanto o dinheiro nos falta.
16 यावर योसेफाने उत्तर दिले, “तुमचे पैसे संपले आहेत, तर मग तुमची गुरे मला द्या आणि त्यांच्या मोबदल्यात मी तुम्हाला अन्नधान्य देतो.”
16 Respondeu José: Trazei o vosso gado, e vo-lo darei por vosso gado, se falta o dinheiro.
17 त्याप्रमाणे अन्नधान्यासाठी लोकांनी आपले सर्व घोडे, गुरे, शेरडेमेंढरे आणि गाढवे योसेफाकडे आणली आणि त्याने त्याच्या मोबदल्यात त्यांना वर्षभर पुरेल इतके धान्य दिले.
17 Então trouxeram o seu gado a José; e José deu-lhes pão em troca dos cavalos, e das ovelhas, e dos bois, e dos jumentos; e os sustentou de pão aquele ano em troca de todo o seu gado.
18 ते वर्ष संपल्यावर, पुढच्या वर्षी ते त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “आम्ही धन्यापासून हे सत्य लपवू शकत नाही की आमचा पैसा संपला आणि आमची गुरे तुमची झाली आहेत आणि आता आमच्याजवळ आमच्या धन्यासाठी फक्त आमची शरीरे व आमच्या जमिनी राहिल्या आहेत.
18 Findo aquele ano, vieram a José no ano seguinte e disseram-lhe: Não ocultaremos ao meu senhor que o nosso dinheiro está todo gasto; as manadas de gado já pertencem a meu senhor; e nada resta diante de meu senhor, senão o nosso corpo e a nossa terra;
19 आम्ही तुमच्या नजरेसमोर अन्नावाचून मरावे का? आता आम्हाला आमच्या जमिनीसह विकत घ्या म्हणजे आम्ही फारोहचे गुलाम होऊ. अन्नासाठी आम्ही स्वतःचा विक्रय केला तरच आम्ही जगू आणि जमिनीही मोकळ्या राहणार नाहीत.”
19 por que morreremos diante dos teus olhos, tanto nós como a nossa terra? Compra-nos a nós e a nossa terra em troca de pão, e nós e a nossa terra seremos servos de Faraó; dá-nos também semente, para que vivamos e não morramos, e para que a terra não fique desolada.
20 याप्रमाणे योसेफाने इजिप्त देशातील सर्व जमीन फारोहसाठी विकत घेतली. दुष्काळ महाभयंकर असल्यामुळे सर्व इजिप्त देशातील लोकांनी त्याला आपआपली शेते विकली आणि इजिप्त देशातील सर्व जमीन फारोहची झाली,
20 Assim José comprou toda a terra do Egito para Faraó; porque os egípcios venderam cada um o seu campo, porquanto a fome lhes era grave em extremo; e a terra ficou sendo de Faraó.
21 तसेच योसेफाने इजिप्त देशातील एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंतच्या शहरातील सर्व लोकांना गुलाम बनविले.
21 Quanto ao povo, José fê-lo passar às cidades, desde uma até a outra extremidade dos confins do Egito.
22 याजकांच्या जमिनी मात्र योसेफाने विकत घेतल्या नाहीत, कारण फारोहकडून त्यांना निर्धारित अन्नधान्य पुरविले जात असे आणि त्यामुळे त्यांनी जमिनी विकल्या नाही.
22 Somente a terra dos sacerdotes não a comprou, porquanto os sacerdotes tinham rações de Faraó, e eles comiam as suas rações que Faraó lhes havia dado; por isso não venderam a sua terra.
23 मग योसेफ लोकांना म्हणाला, “पाहा, मी फारोहसाठी तुम्हाला तुमच्या जमिनींसह विकत घेतले आहे. आता हे बियाणे घ्या आणि जमिनीत पेरा.
23 Então disse José ao povo: Hoje vos tenho comprado a vós e a vossa terra para Faraó; eis aí tendes semente para vós, para que semeeis a terra.
24 ज्यावेळी तुम्ही कापणी कराल. त्यावेळी तुमच्या उत्पन्नाचा पाचवा हिस्सा फारोहला द्यावा. राहिलेले चार हिस्से पुढील वर्षाच्या बियाण्यांसाठी आणि तुम्हासाठी, तुमचे कुटुंब व मुलाबाळांच्या खाण्यासाठी ठेवा.”
24 Há de ser, porém, que no tempo as colheitas dareis a quinta parte a Faraó, e quatro partes serão vossas, para semente do campo, e para o vosso mantimento e dos que estão nas vossas casas, e para o mantimento de vossos filhinho.
25 लोक म्हणाले, “तुम्ही आमचे प्राण वाचविले आहेत, आमच्या धन्याच्या दृष्टीत आम्हाला दया प्राप्त होवो; आम्ही फारोहच्या गुलामगिरीत राहू.”
25 Responderam eles: Tu nos tens conservado a vida! achemos graça aos olhos de meu senhor, e seremos servos de Faraó.
26 म्हणून योसेफाने याजकांच्या मालकीच्या जमिनी शिवाय इतर सर्व जमिनीतील पिकांचा पाचवा हिस्सा फारोहला देण्यात यावा, असा इजिप्त देशभर कायदा केला. हा कायदा आजवर चालू आहे.
26 José, pois, estabeleceu isto por estatuto quanto ao solo do Egito, até o dia de hoje, que a Faraó coubesse o quinto a produção; somente a terra dos sacerdotes não ficou sendo de Faraó.
27 अशा रीतीने इस्राएली इजिप्तच्या गोशेन प्रांतात राहू लागले, आणि त्यांनी तिथे जमीनजुमला संपादन केला व ते फलद्रूप होऊन संख्येने खूप वाढले.
27 Assim habitou Israel na terra do Egito, na terra de Gósen; e nela adquiriram propriedades, e frutificaram e multiplicaram-se muito.
28 इजिप्त देशात याकोब सतरा वर्षे जगला आणि त्याच्या जीवनाची वर्षे एकशे सत्तेचाळीस होती.
28 E Jacó viveu na terra do Egito dezessete anos; de modo que os dias de Jacó, os anos da sua vida, foram cento e quarenta e sete anos.
29 इस्राएलाची मृत्युघटका भरत आली त्यावेळी त्याने आपला पुत्र योसेफ याला बोलाविले आणि म्हटले, “जर तुझी माझ्यावर कृपादृष्टी असेल तर माझ्या मांडीखाली हात ठेऊन अशी शपथ घे की तू मला करुणेने व विश्वासाने वागवशील. इजिप्त देशात मला मूठमाती देऊ नकोस,
29 Quando se aproximava o tempo da morte de Israel, chamou ele a José, seu filho, e disse-lhe: Se tenho achado graça aos teus olhos, põe a mão debaixo da minha coxa, e usa para comigo de benevolência e de verdade: rogo-te que não me enterres no Egito;
30 परंतु जेव्हा मी माझ्या पूर्वजांसोबत झोपी जाईन, मला इजिप्तमधून बाहेर ने आणि त्यांना जिथे पुरले आहे, तिथे मला मूठमाती दे.”
30 mas quando eu dormir com os meus pais, levar-me-ás do Egito e enterrar-me-ás junto à sepultura deles. Respondeu José: Farei conforme a tua palavra.
31 “मला शपथ दे.” त्याने म्हटले, मग योसेफाने त्याला शपथ दिली आणि मग इस्राएलने आपल्या काठीच्या टोकावर टेकून उपासना केली.
31 E Jacó disse: Jura-me; e ele lhe jurou. Então Israel inclinou-se sobre a cabeceira da cama.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Gênesis 47, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.