Gênesis 44

marc (MARC) vs ARIB

Sair da comparação
ARIB Almeida Revisada Imprensa Bíblica
1 आता योसेफाने आपल्या घरकारभार्‍यास आदेश दिला: “माणसांच्या पोत्यात त्यांना वाहून नेण्याइतके अन्न भरावे आणि प्रत्येक माणसाच्या पोत्याच्या तोंडाशी त्यांची चांदी ठेवावी.
1 Depois José deu ordem ao despenseiro de sua casa, dizendo: Enche de mantimento os sacos dos homens, quanto puderem levar, e põe o dinheiro de cada um na boca do seu saco.
2 याखेरीज धाकट्याच्या पोत्यामध्ये धान्याच्या पैशाबरोबरच माझा चांदीचा प्यालाही ठेवा.” असे सांगितले आणि घरकारभार्‍याने योसेफाच्या आदेशाप्रमाणे केले.
2 E a minha taça de prata porás na boca do saco do mais novo, com o dinheiro do seu trigo. Assim fez ele conforme a palavra que José havia dito.
3 पहाट होताच त्या माणसांना त्यांच्या गाढवांसोबत मार्गस्थ करण्यात आले.
3 Logo que veio a luz da manhã, foram despedidos os homens, eles com os seus jumentos.
4 पण ते शहराच्या बाहेर पडतात न पडतात तोच योसेफ त्याच्या कारभार्‍यास म्हणाला, “त्यांचा पाठलाग करा आणि त्यांना थांबवून विचारा, ‘तुम्ही चांगल्याची फेड वाईटाने का केली?
4 Havendo eles saído da cidade, mas não se tendo distanciado muito, disse José ao seu despenseiro: Levanta-te e segue os homens; e, alcançando-os, dize-lhes: Por que tornastes o mal pelo bem?
5 हाच तो चांदीचा प्याला नाही का जो माझे स्वामी स्वतः पिण्याकरिता वापरतात आणि ज्याच्यामधून ते शकुनही पाहत असतात? हे तुमचे कृत्य किती वाईट आहे!’ ”
5 Não é esta a taça por que bebe meu senhor, e de que se serve para adivinhar? Fizestes mal no que fizestes.
6 त्याप्रमाणे त्याने त्यांना गाठले आणि सांगितल्याप्रमाणे तो त्यांना बोलला.
6 Então ele, tendo-os alcançado, lhes falou essas mesmas palavras.
7 पण ते त्याला म्हणाले, “महाराज असे का बोलतात? तुमच्या सेवकांपासून असे काही करणे दूरच असो!
7 Responderam-lhe eles: Por que falo meu senhor tais palavras? Longe estejam teus servos de fazerem semelhante coisa.
8 मागीलवेळी आमच्या पोत्यांच्या तोंडाशी असलेला पैसा आम्ही कनानहून परत आणला नाही काय? तर आता तुमच्या धन्याच्या घरून चांदी किंवा सोने चोरण्याची आम्हाला काय गरज होती?
8 Eis que o dinheiro, que achamos nas bocas dos nossos sacos, to tornamos a trazer desde a terra de Canaã; como, pois, furtaríamos da casa do teu senhor prata ou ouro?
9 आमच्यापैकी कोणाच्याही जवळ जर तो प्याला सापडला तर त्याला मृत्यू येवो; आणि आम्ही सर्वजण तुझ्या धन्याचे गुलाम होऊ.”
9 Aquele dos teus servos com quem a taça for encontrada, morra; e ainda nós seremos escravos do meu senhor.
10 त्या मनुष्याने उत्तर दिले, “ठीक आहे, तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे होईल; परंतु ज्याच्याजवळ तो प्याला सापडेल तोच माझ्या धन्याचा गुलाम होईल; बाकीचे दोषापासून मुक्त होतील.”
10 Ao que disse ele: Seja conforme as vossas palavras; aquele com quem a taça for encontrada será meu escravo; mas vós sereis inocentes.
11 आपल्या पोती त्यांनी लगबगीने खाली जमिनीवर ठेऊन ती उघडली;
11 Então eles se apressaram cada um a pôr em terra o seu saco, e cada um a abri-lo.
12 त्या कारभार्‍याने वडील भावापासून आरंभ करून धाकट्या भावाच्या पोत्यापर्यंत शोध केला; आणि तो प्याला बिन्यामीनच्या पोत्यामध्ये सापडला.
12 E o despenseiro buscou, começando pelo maior, e acabando pelo mais novo; e achou-se a taça no saco de Benjamim.
13 हताश होऊन त्यांनी आपले कपडे फाडले, आपल्या गाढवांवर पोती लादली आणि ते पुन्हा शहरात परतले.
13 Então rasgaram os seus vestidos e, tendo cada um carregado o seu jumento, voltaram à cidade.
14 यहूदाह आणि त्याचे भाऊ आले, त्यावेळी योसेफ घरीच होता आणि त्यांनी त्याच्यापुढे लोटांगण घातले.
14 E veio Judá com seus irmãos à casa de José, pois ele ainda estava ali; e prostraram-se em terra diante dele.
15 योसेफाने विचारले, “तुम्ही हे काय केले? माझ्यासारखा मनुष्य शकुन पाहून या गोष्टी जाणून घेऊ शकतो हे तुम्हाला माहिती नव्हते का?”
15 Logo lhes perguntou José: Que ação é esta que praticastes? não sabeis vós que um homem como eu pode, muito bem, adivinhar?
16 यहूदाहने उत्तर दिले, “आमच्या स्वामीपुढे आम्ही काय बोलावे? आमची निर्दोषता आम्ही कशी सिद्ध करावी? परमेश्वराने तुमच्या दासांचे अपराध उघडे केले आहे. महाराज, आम्ही सर्वजण आणि ज्याच्या पोत्यात प्याला सापडला तो देखील तुमचे गुलाम आहोत.”
16 Respondeu Judá: Que diremos a meu senhor? que falaremos? e como nos justificaremos? Descobriu Deus a iniqüidade de teus servos; eis que somos escravos de meu senhor, tanto nós como aquele em cuja mão foi achada a taça.
17 योसेफ म्हणाला, “अशी गोष्ट माझ्याकडून कधीही न होवो! ज्या मनुष्याकडे माझा प्याला मिळाला, तोच माझा गुलाम होईल बाकीचे तुम्ही तुमच्या वडिलांकडे शांतीने परत जा.”
17 Disse José: Longe esteja eu de fazer isto; o homem em cuja mão a taça foi achada, aquele será meu servo; porém, quanto a vós, subi em paz para vosso pai.
18 तेव्हा यहूदाह पुढे सरसावून म्हणाला, “महाराज, तुमच्या सेवकाला क्षमा करा, मला एक शब्द बोलू द्या, क्षणभर माझे ऐकून घ्या. कृपया, आपल्या सेवकावर रागावू नका, कारण तुम्ही प्रत्यक्ष फारोहसमान आहात.
18 Então Judá se chegou a ele, e disse: Ai! senhor meu, deixa, peço-te, o teu servo dizer uma palavra aos ouvidos de meu senhor; e não se acenda a tua ira contra o teu servo; porque tu és como Faraó.
19 महाराज, तुमच्या सेवकांना तुम्ही विचारले होते की, तुम्हाला वडील आहेत का? तुम्हाला आणखी एखादा भाऊ आहे का?
19 Meu senhor perguntou a seus servos, dizendo: Tendes vós pai, ou irmão?
20 आणि आम्ही आमच्या प्रभूला उत्तर दिले की, ‘आम्हाला वृद्ध वडील आहेत आणि अशा वृद्धापकाळातच त्यांना एक पुत्र झाला. त्याचा भाऊ मरण पावला आहे आणि त्याच्या आईला झालेल्या पुत्रांपैकी तो एकटाच उरलेला आहे आणि त्याचे वडील त्याच्यावर खूप प्रीती करतात.’
20 E respondemos a meu senhor: Temos pai, já velho, e há um filho da sua velhice, um menino pequeno; o irmão deste é morto, e ele ficou o único de sua mãe; e seu pai o ama.
21 “तेव्हा तुम्ही तुमच्या सेवकांना म्हणाले, ‘त्याला माझ्याकडे घेऊन या, म्हणजे मी त्याला पाहू शकेन.’
21 Então tu disseste a teus servos: Trazei-mo, para que eu ponha os olhos sobre ele.
22 आणि आम्ही आमच्या महाराजास म्हणालो, ‘तो मुलगा आपल्या वडिलांना सोडू शकत नाही; जर त्याने वडिलांना सोडले तर त्याचे वडील मरतील.’
22 E quando respondemos a meu senhor: O menino não pode deixar o seu pai; pois se ele deixasse o seu pai, este morreria;
23 पण तुम्ही आपल्या सेवकांना सांगितले की, ‘जर तुमचा धाकटा भाऊ तुमच्यासोबत आला नाही तर तुम्ही माझे मुख पाहू शकणार नाही.’
23 replicaste a teus servos: A menos que desça convosco vosso irmão mais novo, nunca mais vereis a minha face.
24 जेव्हा आम्ही परत तुमचा सेवक आमच्या पित्याकडे जाऊन पोहोचलो, आम्ही त्यांना महाराज काय म्हणाले ते सांगितले.
24 Então subimos a teu servo, meu pai, e lhe contamos as palavras de meu senhor.
25 “आमच्या वडिलांनी म्हटले, ‘परत जा आणि थोडे धान्य विकत घेऊन या.’
25 Depois disse nosso pai: Tornai, comprai-nos um pouco de mantimento;
26 परंतु आम्ही म्हणालो, ‘आम्ही खाली जाऊ शकत नाही, जर आमचा धाकटा भाऊ आमच्याबरोबर असला तरच आम्ही जाणार. आमचा धाकटा भाऊ आमच्याबरोबर असल्याशिवाय आम्ही त्या मनुष्याचे मुख पाहू शकणार नाही.’
26 e lhe respondemos: Não podemos descer; mas, se nosso irmão menor for conosco, desceremos; pois não podemos ver a face do homem, se nosso irmão menor não estiver conosco.
27 “मग तुमचे सेवक, आमचे वडील आम्हाला म्हणाले, ‘माझ्या पत्नीने माझ्या दोन पुत्रांना जन्म दिला.
27 Então nos disse teu servo, meu pai: Vós sabeis que minha mulher me deu dois filhos;
28 त्यापैकी एक माझ्यापासून दूर गेला तेव्हा मी म्हणालो, “त्याला एखाद्या श्वापदाने फाडून त्याचे तुकडे केले असावेत,” त्यानंतर मी त्याला पहिले नाही.
28 um saiu de minha casa e eu disse: certamente foi despedaçado, e não o tenho visto mais;
29 जर यालाही तुम्ही माझ्यापासून घेऊन जाल आणि त्याच्यावरही संकट आले तर तुम्ही माझ्या पिकलेल्या केसाला दुःखाने कबरेत लोटण्यास कारणीभूत व्हाल.’
29 se também me tirardes a este, e lhe acontecer algum desastre, fareis descer as minhas cãs com tristeza ao Seol.
30 “आमच्या वडिलांचा जीव मुलाच्या जिवाशी इतका निगडीत आहे की, आता जेव्हा मी तुमचा सेवक, आम्ही या मुलाशिवाय परतलो,
30 Agora, pois, se eu for ter com o teu servo, meu pai, e o menino não estiver conosco, como a sua alma está ligada com a alma dele,
31 आणि मुलगा आमच्याबरोबर नाही असे जर त्यांनी पाहिले तर ते प्राण सोडतील आणि त्यांच्या पिकलेल्या केसांना दुःखात व कबरेत लोटण्यास आम्ही कारणीभूत होऊ.
31 acontecerá que, vendo ele que o menino ali não está, morrerá; e teus servos farão descer as cãs de teu servo, nosso pai com tristeza ao Seol.
32 तुमच्या सेवकाने आमच्या वडिलांना अभिवचन दिले आहे की, मुलाची मी काळजी घेईन. मी त्यांना सांगितले की, ‘मी जर त्याला परत आणले नाही तर त्याचा दोष माझ्या जीवनात सदैव माझ्या माथ्यावर राहील!’
32 Porque teu servo se deu como fiador pelo menino para com meu pai, dizendo: Se eu to não trouxer de volta, serei culpado, para com meu pai para sempre.
33 “म्हणून महाराज, कृपा करा आणि त्या मुलाऐवजी मलाच येथे तुमचा गुलाम म्हणून राहू द्या आणि मुलाला त्याच्या भावांबरोबर परत जाऊ द्या.
33 Agora, pois, fique teu servo em lugar do menino como escravo de meu senhor, e que suba o menino com seus irmãos.
34 कारण मुलगा माझ्याबरोबर नसला तर मी माझ्या वडिलांकडे कसे जाऊ शकतो? माझ्या वडिलांना होणारे दुःख मला पाहवणार नाही.”
34 Porque, como subirei eu a meu pai, se o menino não for comigo? para que não veja eu o mal que sobrevirá a meu pai.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Gênesis 44, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.