Gênesis 43

marc (MARC) vs ACF

Sair da comparação
ACF Almeida Corrigida Fiel
1 परंतु देशात दुष्काळ तीव्र होता.
1 E a fome era gravíssima na terra.
2 इजिप्तमधून त्यांनी आणलेले धान्य संपले तेव्हा त्यांचे वडील त्यांना म्हणाले, “इजिप्तमध्ये पुनः जाऊन आपल्यासाठी थोडे धान्य विकत आणा.”
2 E aconteceu que, como acabaram de comer o mantimento que trouxeram do Egito, disse-lhes seu pai: Voltai, comprai-nos um pouco de alimento.
3 तेव्हा यहूदाह त्यास म्हणाला, “त्या मनुष्याने आम्हाला चेतावणी दिली होती की, ‘तुमच्या भावास सोबत आणल्याशिवाय तुम्ही माझे मुख पाहणार नाही.’
3 Mas Judá respondeu-lhe, dizendo: Fortemente nos protestou aquele homem, dizendo: Não vereis a minha face, se o vosso irmão não vier convosco.
4 जर तुम्ही आमच्या भावाला आमच्याबरोबर पाठवाल तरच आम्ही जाऊन धान्य विकत घेऊ.
4 Se enviares conosco o nosso irmão, desceremos e te compraremos alimento;
5 जर तुम्ही त्याला पाठवित नसाल तर आम्ही जाणार नाही, कारण त्या मनुष्याने आम्हाला म्हटले, ‘जर तुम्ही तुमच्या भावास सोबत आणले नाही तर तुम्ही माझे मुख पाहणार नाही.’ ”
5 Mas se não o enviares, não desceremos; porquanto aquele homem nos disse: Não vereis a minha face, se o vosso irmão não vier convosco.
6 इस्राएल म्हणाला, “तुम्हाला आणखी एक भाऊ आहे असे तुम्ही त्याला सांगून माझ्यावर हे अनर्थ का आणले?”
6 E disse Israel: Por que me fizeste tal mal, fazendo saber àquele homem que tínheis ainda outro irmão?
7 यावर ते म्हणाले, “पण त्या मनुष्याने आपल्याबद्दल आणि आपल्या कुटुंबाची खोल चौकशी केली. त्याने आम्हाला विचारले, ‘तुमचे वडील अजून जिवंत आहेत काय? तुम्हाला आणखी एखादा भाऊ आहे काय?’ आम्ही सहजपणे त्याच्या प्रश्नांची उत्तरे दिली. ‘तुमच्या भावाला घेऊन या’ असे तो म्हणेल, असे आम्हाला कसे ठाऊक असणार?”
7 E eles disseram: Aquele homem particularmente nos perguntou por nós, e pela nossa parentela, dizendo: Vive ainda vosso pai? Tendes mais um irmão? E respondemos-lhe conforme as mesmas palavras. Podíamos nós saber que diria: Trazei vosso irmão?
8 तेव्हा यहूदाह आपला पिता इस्राएलला म्हणाला, “मुलाला माझ्याबरोबर पाठवा, आम्ही लगेच जाऊ, म्हणजे तुम्ही, आम्ही व आमची मुले जगणार आणि मरणार नाही.
8 Então disse Judá a Israel, seu pai: Envia o jovem comigo, e levantar-nos-emos, e iremos, para que vivamos e não morramos, nem nós, nem tu, nem os nossos filhos.
9 त्याच्या सुरक्षिततेची हमी मी घेतो. जर मी त्याला परत आणले नाही व तुमच्या स्वाधीन केले नाही, तर त्याचा दोष माझ्या माथ्यावर कायमचा राहील.
9 Eu serei fiador por ele, da minha mão o requererás; se eu não o trouxer, e não o puser perante a tua face, serei réu de crime para contigo para sempre.
10 जर आम्ही उशीर केला नसता तर इतक्या दिवसात आम्ही तिकडे दोनदा जाऊन आलो असतो.”
10 E se não nos tivéssemos detido, certamente já estaríamos segunda vez de volta.
11 नंतर त्यांचे वडील इस्राएल त्यांना म्हणाले, “जर असेच असेल तर मग हे करा: या देशात उत्पादन होणारे सर्वोत्तम पदार्थ—थोडे औषधी बलसान, थोडे मध, मसाले, गंधरस, पिस्ते व बदाम आपल्या गोण्यात घ्या आणि या वस्तू त्या मनुष्याला देणगी म्हणून घेऊन जा.
11 Então disse-lhes Israel, seu pai: Pois que assim é, fazei isso; tomai do mais precioso desta terra em vossos vasos, e levai ao homem um presente: um pouco do bálsamo e um pouco de mel, especiarias e mirra, terebinto e amêndoas;
12 दुप्पट चांदी सोबत घेऊन जा म्हणजे तुमच्या पोत्याच्या तोंडाशी असलेला चांदीचा पैसाही तुम्हाला परत करता येईल. कदाचित काही तरी चूक झाली असेल.
12 E tomai em vossas mãos dinheiro em dobro, e o dinheiro que voltou na boca dos vossos sacos tornai a levar em vossas mãos; bem pode ser que fosse erro.
13 तुमच्या भावाला बरोबर घेऊन त्या मनुष्याकडे लगेच जा.
13 Tomai também a vosso irmão, e levantai-vos e voltai àquele homem;
14 त्या माणसापुढे, सर्वसमर्थ परमेश्वराने तुमच्यावर कृपा करावी म्हणजे तो दुसर्‍या भावाला आणि बिन्यामीनालाही तुमच्यासोबत परत पाठवेल. पण जर मी माझ्या पुत्रांना मुकलो तर मुकलो.”
14 E Deus Todo-Poderoso vos dê misericórdia diante do homem, para que deixe vir convosco vosso outro irmão, e Benjamim; e eu, se for desfilhado, desfilhado ficarei.
15 मग त्यांनी भेट व दुप्पट चांदी आणि बिन्यामीनाला सोबत घेतले आणि खाली इजिप्तला गेले आणि योसेफापुढे उपस्थित झाले.
15 E os homens tomaram aquele presente, e dinheiro em dobro em suas mãos, e a Benjamim; e levantaram-se, e desceram ao Egito, e apresentaram-se diante de José.
16 बिन्यामीन त्यांच्याबरोबर आहे हे योसेफाने पाहिले, तेव्हा तो आपल्या घराच्या कारभार्‍याला म्हणाला, “या माणसांना माझ्या घरी घेऊन जा, पशू मार आणि भोजन तयार कर; ते दुपारी माझ्याबरोबर भोजन करतील.”
16 Vendo, pois, José a Benjamim com eles, disse ao que estava sobre a sua casa: Leva estes homens à casa, e mata reses, e prepara tudo; porque estes homens comerão comigo ao meio-dia.
17 त्या मनुष्याने योसेफाच्या सांगितल्याप्रमाणे केले आणि त्याने माणसांना योसेफाच्या घरी नेले.
17 E o homem fez como José dissera, e levou-os à casa de José.
18 त्यांना योसेफाच्या घरी नेल्यावर त्यांची भीतीने गाळण उडाली. त्यांनी विचार केला आणि म्हणाले, “पहिल्यांदा आपल्या पोत्यात जी चांदी टाकण्यात आली होती त्यासाठी आपल्याला इथे आणण्यात आले आहे. आपल्यावर हल्ला करून आपल्यावर विजय मिळवून आपल्याला गुलाम करावे व आपल्या गाढवांना हस्तगत करावे असा त्याचा बेत असावा.”
18 Então temeram aqueles homens, porquanto foram levados à casa de José, e diziam: Por causa do dinheiro que dantes voltou nos nossos sacos, fomos trazidos aqui, para nos incriminar e cair sobre nós, para que nos tome por servos, e a nossos jumentos.
19 घराच्या दाराशी आल्यानंतर ते योसेफाच्या घरकारभार्‍याकडे गेले;
19 Por isso chegaram-se ao homem que estava sobre a casa de José, e falaram com ele à porta da casa,
20 आणि त्याला म्हणाले, “महाराज, पहिल्या फेरीत आम्ही इथे धान्य खरेदीसाठी आलो होतो.
20 E disseram: Ai! senhor meu, certamente descemos dantes a comprar mantimento;
21 तेव्हा परत घरी जाताना आम्ही रात्री जिथे थांबलो आणि आमची पोती उघडली तेव्हा आम्हा प्रत्येकाचा पोत्यात त्याची चांदी—अचूक वजनाची—पोत्याच्या तोंडाशी सापडली. आम्ही ती परत देण्यासाठी बरोबर आणली आहे.
21 E aconteceu que, chegando à estalagem, e abrindo os nossos sacos, eis que o dinheiro de cada um estava na boca do seu saco, nosso dinheiro por seu peso; e tornamos a trazê-lo em nossas mãos;
22 या रकमेबरोबरच धान्य विकत घेण्यासाठी आम्ही वेगळी चांदी आणली आहे. आमच्या पोत्यांमध्ये आमची चांदी कोणी ठेवली हे आम्हाला माहीत नाही.”
22 Também trouxemos outro dinheiro em nossas mãos, para comprar mantimento; não sabemos quem tenha posto o nosso dinheiro nos nossos sacos.
23 “ते सर्व ठीक आहे,” तो म्हणाला, “घाबरू नका. तुमचा परमेश्वर, तुमच्या पित्याचा परमेश्वर यांनीच तुमच्या पोत्यात ते धन दिले आहे; तुमची चांदी मला मिळाली आहे.” मग त्याने शिमओनाला बाहेर काढून त्यांच्याकडे आणले.
23 E ele disse: Paz seja convosco, não temais; o vosso Deus, e o Deus de vosso pai, vos tem dado um tesouro nos vossos sacos; o vosso dinheiro me chegou a mim. E trouxe-lhes fora a Simeão.
24 नंतर घरकारभार्‍याने त्यांना योसेफाच्या घरात नेले, त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी दिले आणि त्यांच्या गाढवांना चाराही दिला.
24 Depois levou os homens à casa de José, e deu-lhes água, e lavaram os seus pés; também deu pasto aos seus jumentos.
25 योसेफ दुपारी येणार त्यावेळी त्याला देण्यासाठी त्यांनी आपली भेट तयार करून ठेवली, कारण त्यांना तिथेच भोजन करावयाचे आहे असे सांगण्यात आले होते.
25 E prepararam o presente, para quando José viesse ao meio-dia; porque tinham ouvido que ali haviam de comer pão.
26 योसेफ घरी आला तेव्हा त्यांनी त्याला जमिनीपर्यंत लवून मुजरा केला आणि त्याला देणग्या दिल्या ज्या त्यांनी घरात आणल्या होत्या.
26 Vindo, pois, José à casa, trouxeram-lhe ali o presente que tinham em suas mãos; e inclinaram-se a ele até à terra.
27 त्याने त्यांना अभिवादन केले, मग त्याने विचारले, “त्या वृद्ध माणसाविषयी तुम्ही बोलला, ते तुमचे वडील कसे आहेत? ते अजून जिवंत आहेत काय?”
27 E ele lhes perguntou como estavam, e disse: Vosso pai, o ancião de quem falastes, está bem? Ainda vive?
28 “होय” ते म्हणाले, “तुमचा सेवक, आमचे वडील जिवंत असून सुखरुप आहेत,” आणि त्यांनी त्याला पुन्हा लवून मुजरा केला.
28 E eles disseram: Bem está o teu servo, nosso pai vive ainda. E abaixaram a cabeça, e inclinaram-se.
29 त्याने आपली नजर वर करून आपल्या आईचा मुलगा, आपला सख्खा भाऊ, बिन्यामीनाकडे पाहून त्याने विचारले, “हाच का तुमचा धाकटा भाऊ, याच्याचविषयी तुम्ही मला सांगत होता ना?” आणि तो म्हणाला, “माझ्या मुला, परमेश्वर तुजवर कृपा करो.”
29 E ele levantou os seus olhos, e viu a Benjamim, seu irmão, filho de sua mãe, e disse: Este é vosso irmão mais novo de quem falastes? Depois ele disse: Deus te dê a sua graça, meu filho.
30 नंतर योसेफ घाईघाईने बाहेर जाऊन रडण्यासाठी जागा शोधत होता, कारण आपल्या भावाबद्दलच्या प्रेमाने त्याचा ऊर भरून आला होता, तो आपल्या स्वतःच्या खोलीत जाऊन रडला.
30 E José apressou-se, porque as suas entranhas comoveram-se por causa do seu irmão, e procurou onde chorar; e entrou na câmara, e chorou ali.
31 मग तो आपले तोंड धुऊन बाहेर आला आणि स्वतःवर ताबा ठेवून म्हणाला, “भोजन वाढा.”
31 Depois lavou o seu rosto, e saiu; e conteve-se, e disse: Ponde pão.
32 योसेफ एकटाच जेवला; आणि त्याच्या भावांना वेगळ्या पंक्तीत बसविले; त्याचप्रमाणे इजिप्त लोकांचीही वेगळीच पंगत होती, कारण इजिप्तचे लोक इब्री लोकांना तुच्छ लेखीत आणि त्यांच्या पंक्तीला बसून कधीही भोजन करीत नसत.
32 E serviram-lhe à parte, e a eles também à parte, e aos egípcios, que comiam com ele, à parte; porque os egípcios não podem comer pão com os hebreus, porquanto é abominação para os egípcios.
33 प्रत्येकाने कुठे बसावे हे त्याने सांगितले आणि त्यांना ज्येष्ठापासून कनिष्ठापर्यंत त्यांच्या वयाप्रमाणे बसविले, यावर फार आश्चर्यचकित होऊन ते एकमेकांकडे पाहू लागले.
33 E assentaram-se diante dele, o primogênito segundo a sua primogenitura, e o menor segundo a sua menoridade; do que os homens se maravilhavam entre si.
34 योसेफ, जी पक्वान्ने खात होता, तीच पक्वान्ने त्यांनाही वाढण्यात आली. पण बिन्यामीनाला इतर भावांपेक्षा पाचपट अधिक वाढण्यात आले. ते सर्व त्याच्यासोबत भरपूर जेवले व मनमुरादपणे पिऊन तृप्त झाले.
34 E apresentou-lhes as porções que estavam diante dele; porém a porção de Benjamim era cinco vezes maior do que as porções deles todos. E eles beberam, e se regalaram com ele.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Gênesis 43, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.