Gênesis 38
marc (MARC) vs VC
1 याच सुमारास यहूदाह आपल्या भावांना सोडून अदुल्लाम येथे आला आणि हीरा नावाच्या एका मनुष्याबरोबर राहू लागला.
1 Naquele tempo, Judá, apartando-se dos seus irmãos, foi para a casa de um homem de Odolão, chamado Hira.
2 तिथे शूवा नावाच्या एका कनानी मनुष्याची कन्या यहूदाहच्या दृष्टीस पडली आणि तिच्याशी विवाह करून त्याने तिचा स्वीकार केला;
2 Judá viu ali a filha de um cananeu, de nome Sué, e desposou-a, unindo-se a ela.
3 ती गर्भवती झाली, तिला पुत्र झाला. त्याचे नाव एर ठेवण्यात आले.
3 Ela concebeu e deu à luz um filho, ao qual chamou Her.
4 ती पुन्हा गर्भवती झाली, तिला पुत्र झाला, त्याचे नाव ओनान ठेवण्यात आले.
4 Concebeu novamente e deu ao mundo um filho, e deu-lhe o nome de Onã.
5 तिने आणखी एका पुत्राला जन्म दिला व त्याचे नाव शेलाह ठेवले, ते कजीब येथे राहत असताना तिने त्याला जन्म दिला.
5 E teve ainda um filho, que chamou Sela. Judá estava em Achzib na ocasião desse nascimento.
6 यहूदाहने आपला ज्येष्ठपुत्र एर याचा विवाह तामार नावाच्या एका स्त्रीशी करून दिला.
6 Judá escolheu para Her, seu primogênito, uma mulher chamada Tamar.
7 परंतु यहूदाहचा ज्येष्ठपुत्र एर, याहवेहच्या नजरेत एक दुष्ट मनुष्य होता म्हणून याहवेहने त्याला ठार मारले.
7 Her, porém, o primogênito de Judá, era mau aos olhos do Senhor, e o Senhor o feriu de morte.
8 तेव्हा यहूदाह ओनान यास म्हणाला, “तू तिचा दीर असल्याची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तामारेशी विवाह केला पाहिजे, म्हणजे तुझ्यापासून तिला तुझ्या भावाचे संतान होतील.”
8 Então Judá disse a Onã: "Vai, toma a mulher de teu irmão, cumpre teu dever de levirato e suscita uma posteridade a teu irmão."
9 ओनानला हे ठाऊक होते की संतती झाली तर ती आपली होणार नाही म्हणून ज्यावेळी तो तिच्याशी समागम करी, त्यावेळी तो आपले वीर्य जमिनीवर पाडी, यासाठी की त्याच्यापासून भावाला संतती होऊ नये.
9 Mas Onã, que sabia que essa posteridade não seria dele, maculava-se por terra cada vez que se unia à mulher do seu irmão, para não dar a ele posteridade.
10 हे त्याचे कृत्य याहवेहच्या दृष्टीने एक फार मोठे पाप होते; म्हणून याहवेहने त्यालाही मारून टाकले.
10 Seu comportamento desagradou ao Senhor, que o feriu de morte também.
11 यहूदाह आपली सून तामारला म्हणाला, “माझा पुत्र शेलाहचे विवाहाचे वय होईपर्यंत तू तुझ्या वडिलांच्या घरात विधवा म्हणून राहा.” यहूदाहला भीती वाटत होती की हा मुलगाही आपल्या भावांप्रमाणे मरेल. मग तामार तिच्या वडिलांच्या घरी गेली.
11 E Judá disse a Tamar, sua nora: "Conserva-te viúva em casa de teu pai até que meu filho Sela se torne adulto." "Não é bom, pensava ele consigo, que também ele morra como seus irmãos." E Tamar voltou a habitar na casa paterna.
12 कालांतराने यहूदाहची पत्नी जी शूवाची मुलगी होती ती मरण पावली. शोक करण्याचे दिवस संपल्यावर यहूदाह, आपला मित्र अदुल्लाम येथील हीरा, याच्याबरोबर आपल्या मेंढरांची लोकर कातरणार्यांकडे तिम्ना येथे गेला.
12 Muito tempo depois, morreu a filha de Sué, mulher de Judá. Passado o luto, subiu Judá a Tamna para a tosquia de suas ovelhas, com seu amigo Hira, o odolamita.
13 “तुझा सासरा तिम्ना येथे मेंढरांची लोकर कातरण्यासाठी गेला आहे,” असे कोणीतरी तामारेला सांगितले.
13 E foi noticiado a Tamar: "Eis que o teu sogro sobe a Tamna para a tosquia de suas ovelhas."
14 तिने आपले वैधव्यदशेत वापरण्याचे कपडे बाजूला ठेवून दिले आणि आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून तिने अंगावर बुरखा घेतला. मग तिम्नाच्या वाटेवर असलेल्या एनाईम गावाच्या प्रवेशद्वाराजवळ ती जाऊन बसली. कारण तिने पाहिले की, शेलाह आता मोठा झाला असला तरी तिला त्याची पत्नी म्हणून दिले गेले नाही.
14 Depôs ela então os seus vestidos de viúva, cobriu-se de um véu, e, assim disfarçada, assentou-se à entrada de Enaim, que se encontra no caminho de Tamna, pois via que Sela tinha crescido e não lha tinham dado por mulher.
15 तिथून जाताना यहूदाहने तिला पाहिले आणि तिच्या तोंडावर बुरखा असल्यामुळे त्याला वाटले की ती एक वेश्या आहे,
15 Judá, vendo-a, julgou tratar-se de uma prostituta, porque tinha o rosto coberto.
16 म्हणून तो तिच्याजवळ जाऊन थांबला आणि त्याने तिला म्हटले, “तुझ्याशी रत होण्याची माझी इच्छा आहे.” अर्थात् ती आपली सून आहे, हे त्याला माहीत नव्हते.
16 E, chegando-se a ela no caminho, disse: "Queres juntar-te comigo?" {Ignorava ele que se tratava de sua nora.} Ela respondeu: "O que me darás para juntar-me contigo?"
17 त्याने म्हटले, “मी तुला माझ्या कळपातून एक कोवळी शेळी पाठवून देईन.”
17 "Mandar-te-ei um cabrito do meu rebanho." "Está bem; mas dá-me então um penhor, até que o tenhas enviado."
18 “तुला काय तारण हवे आहे?” त्याने तिला विचारले.
18 "Que penhor queres que eu te dê?" "Teu anel, teu cordão e o bastão que tens na mão." Ele os entregou; em seguida, aproximou-se dela e ela concebeu.
19 यानंतर तिने वैधव्यदशेतील आपले कपडे पुन्हा धारण केले.
19 E levantando-se, partiu; tirou o seu véu e retomou seus vestidos de viúva.
20 यहूदाहने आपला अदुल्लामी मित्र हीरा, याला तिच्याकडे कोवळी शेळी घेऊन जाण्यास आणि तिला दिलेल्या गहाण वस्तू परत आणण्यात सांगितले; पण हीराला ती सापडली नाही.
20 E Judá mandou-lhe o cabrito por seu amigo, o odolamita, para retirar o penhor das mãos daquela mulher, mas ele, não a encontrando,
21 म्हणून त्याने एनाईम गावातील काही लोकांना विचारले, “गावाच्या प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर बसलेली देवदासी कुठे राहते?”
21 perguntou aos habitantes do lugar: "Onde está aquela prostituta que estava em Enaim, à beira do caminho?" Responderam-lhe: "Não há prostituta nesse lugar!"
22 तेव्हा तो यहूदाहकडे परत गेला आणि त्याने त्याला सांगितले, “मला ती कुठेच सापडली नाही, तसेच तेथील लोकांनी सांगितले की आमच्या गावात कोणी देवदासी राहत नाही.”
22 Ele voltou para junto de Judá: "Não a encontrei, disse ele, e os moradores daquele lugar disseram-me que não havia nenhuma prostituta ali."
23 यावर यहूदाह म्हणाला, “मग त्या वस्तू तिच्याकडेच राहू दे. नाहीतर तेथील लोकांसाठी आपण उपहासाचा विषय होऊ. मी तर तुझ्यामार्फत तिच्यासाठी ही कोवळी शेळी पाठविली होती, पण ती तुला आढळली नाही.”
23 "Guarde ela o meu penhor, respondeu Judá, não nos tornemos ridículos! Eu mandei o cabrito; tu, porém, não a encontraste".
24 सुमारे तीन महिन्यानंतर, “तुझी सून तामार ही वेश्याकर्मामुळे गर्भवती झाली आहे,” अशी बातमी यहूदाहच्या कानावर गेली.
24 Mais ou menos três meses depois, vieram dizer a Judá: "Tamar, tua nora, conduziu-se mal: vê-se que está grávida." Judá respondeu: "Tirai-a para fora, que ela seja queimada!"
25 त्याप्रमाणे ते तिला जाळून टाकण्यासाठी बाहेर घेऊन जात असताना तिने आपल्या सासर्याला निरोप पाठविला, “ही मुद्रिका, हा गोफ आणि ही काठी ज्याची आहे, त्याच्यापासून मला गर्भ राहिलेला आहे. तुम्ही या वस्तू ओळखता काय?”
25 E, enquanto era conduzida, ela mandou dizer ao seu sogro: "Concebi do homem a quem pertence isto: examine bem, ajuntou ela, de quem são este anel, este cordão e este bastão."
26 यहूदाहने त्या वस्तूंना ओळखले आणि म्हटले, “माझ्यापेक्षा ती अधिक नीतिमान आहे, कारण माझा पुत्र शेलाह तिला पती म्हणून दिला नाही.” यानंतर त्याने कधीही तिच्याशी शरीरसंबंध ठेवला नाही.
26 Judá, reconhecendo-os, exclamou: "Ela é mais justa do que eu; pois que não a dei ao meu filho Sela." E não a conheceu mais.
27 योग्य वेळी तामारेचे दिवस भरले आणि तिला जुळे पुत्र झाले.
27 E, na ocasião de dar à luz, eis que ela trazia dois gêmeos no seu ventre.
28 त्यांचा जन्म होत असताना, एका मुलाने प्रथम हात बाहेर काढला, त्याच्या मनगटावर सुइणीने शेंदरी रंगाचा दोरा बांधला व ती म्हणाली, “हा प्रथम जन्माला आला.”
28 No parto, saindo uma mão, a parteira tomou-a e atou nela um fio vermelho, dizendo: "Este é o que saiu primeiro!"
29 परंतु त्याने त्याचा हात मागे ओढून घेतला आणि त्याचा भाऊ बाहेर आला, ती म्हणाली, “तर अशाप्रकारे तू वाट काढली!” आणि त्याचे नाव पेरेस ठेवले.
29 Mas, como ele retirasse a mão, saiu o seu irmão. "Que brecha fizeste! exclamou a parteira: Que a brecha esteja sobre ti!"
30 यानंतर लवकरच मनगटावर शेंदरी दोरा असलेले मूल जन्मले आणि त्याचे नावे जेरह असे ठेवण्यात आले.
30 E chamou-se-lhe Farés. Em seguida, veio o seu irmão, com o fio vermelho atado na mão. Deu-se-lhe o nome de Zara.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Gênesis 38, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.