Gênesis 37
marc (MARC) vs VC
1 कनान देशात ज्या ठिकाणी आपला पिता वस्ती करून राहिला होता, त्या ठिकाणी याकोब जाऊन स्थायिक झाला.
1 Jacó habitou na região onde seu pai havia morado, na terra de Canaã.
2 याकोबाच्या कुटुंबाचा वृतांत असा आहे:
2 Eis a história da descendência de Jacó: José, ainda jovem, com a idade de dezessete anos, apascentava o rebanho com seus irmãos, os filhos de Bala e os filhos de Zelfa, mulheres de seu pai; e ele contou ao seu pai as más conversas dos irmãos.
3 इस्राएल योसेफावर आपल्या इतर मुलांपेक्षा अधिक प्रीती करीत असे, कारण त्याला तो म्हातारपणी झाला होता; म्हणून याकोबाने त्याच्यासाठी एक आकर्षक रंगाचा अंगरखा तयार केला.
3 Israel amava José mais do que todos os outros filhos, porque ele era o filho de sua velhice; e mandara-lhe fazer uma túnica de várias cores.
4 जेव्हा त्याच्या भावांनी पाहिले की त्यांचे वडील त्यांच्यापेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतात, तेव्हा ते योसेफाचा द्वेष करू लागले आणि त्याच्याशी सलोख्याचा एकही शब्द बोलू शकत नव्हते.
4 Seus irmãos, vendo que seu pai o preferia a eles, conceberam ódio contra ele e não podiam mais tratá-lo com bons modos.
5 एके रात्री योसेफाला एक स्वप्न पडले आणि त्याने ते आपल्या भावांना सांगितले. ते ऐकून तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले.
5 Ora, José teve um sonho, e o contou aos seus irmãos, que o detestaram ainda mais:
6 योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “माझे स्वप्न ऐका:
6 "Ouvi, disse-lhes ele, o sonho que tive:
7 आपण शेतात पेंढ्या बांधत होतो, तेवढ्यात माझी पेंढी उठून उभी राहिली आणि तुमच्या सर्वांच्या पेंढ्या माझ्या पेंढीभोवती गोळा होऊन उभ्या राहिल्या व त्यांनी माझ्या पेंढीला नमन केले.”
7 estávamos ligando feixes no campo, e eis que o meu feixe se levantou e se pôs de pé, enquanto os vossos o cercavam e se prostravam diante dele."
8 तेव्हा त्याच्या भावांनी त्याची हेटाळणी करून त्याला म्हटले. “काय! तू आमचा राजा होणार? तू आम्हावर सत्ता चालविणार?” आणि त्याच्या स्वप्नामुळे व त्याने त्याचे कथन केल्यामुळे ते त्याचा अधिक द्वेष करू लागले.
8 Seus irmãos disseram-lhe: "Quererias, porventura, reinar sobre nós e tornar-te nosso senhor?" E odiaram-no ainda mais por causa de seus sonhos e de suas palavras.
9 पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले. तो त्यांना म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले. सूर्य, चंद्र आणि अकरा तारे यांनी मला खाली लवून नमन केले.”
9 José teve ainda outro sonho, que contou aos seus irmãos. "Tive, disse ele, ainda um sonho: o sol, a lua e onze estrelas prostravam-se diante de mim."
10 त्याने आपले स्वप्न आपल्या भावांबरोबर आपल्या वडिलांनाही सांगितले, तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला धमकावून विचारले, “हे काय बोलतोस? मी, तुझी आई आणि तुझे भाऊ तुझ्याकडे येऊन तुला भूमीपर्यंत लवून नमन करणार आहोत काय?”
10 Ele contou isso ao seu pai e aos seus irmãos, mas foi repreendido por seu pai: "Que significa, disse-lhe ele, este sonho que tiveste? Viremos, porventura, eu, tua mãe e teus irmãos, a nos prostrar por terra diante de ti?"
11 या कारणामुळे त्याच्या भावांचा द्वेष अधिक तीव्र झाला; परंतु त्याच्या वडिलांनी ही बाब आपल्या मनात ठेवली.
11 Seus irmãos ficaram, pois, com inveja dele, mas seu pai guardou a lembrança desse acontecimento.
12 योसेफाचे भाऊ आपल्या वडिलांची मेंढरे शेखेम येथे चारावयास घेऊन गेले होते.
12 Os irmãos de José foram apascentar os rebanhos de seu pai em Siquém.
13 इस्राएलने योसेफाला म्हटले, “तुझे भाऊ शेखेम येथे मेंढरे चारावयास गेले आहेत; मी तुला त्यांच्याकडे पाठवित आहे.”
13 Israel disse a José: "Teus irmãos guardam os rebanhos em Siquém. Vem: vou mandar-te a eles." "Eis-me aqui", respondeu José.
14 याकोबाने योसेफास म्हटले, “तू शेखेमला जा आणि तुझ्या भावांचे सर्वकाही ठीक आहे का व कळपांची स्थिती कशी आहे, हे पाहून मला येऊन सांग.” नंतर याकोबाने त्याला हेब्रोन खोर्यातून पाठवले.
14 "Vai, pois, ver se tudo corre bem a teus irmãos e ao rebanho, e traze-me notícias deles." Enviou-o do vale de Hebron, e José foi a Siquém.
15 तो शेतातून फिरत असता त्याला एका मनुष्याने पाहिले आणि त्याने योसेफाला विचारले, “तू काय शोधीत आहेस?”
15 Um homem encontrou-o errando pelo campo: "Que buscas?" perguntou ele.
16 योसेफाने उत्तर दिले, “मी माझ्या भावांना शोधीत आहे. ते कुठे कळप चारीत आहे, हे मला सांगाल का?”
16 "Busco meus irmãos, respondeu ele. Dize-me onde apascentam os rebanhos."
17 तेव्हा तो मनुष्य म्हणाला, “होय, पण आता ते येथे नाहीत, ‘आपण दोथानला जाऊ’ तुझ्या भावांना असे बोलताना मी ऐकले.”
17 E o homem respondeu: "Partiram daqui e ouvi-os dizer: Vamos a Dotain." Partiu então José em busca dos seus irmãos e encontrou-os em Dotain.
18 त्याच्या भावांनी त्याला दुरून येताना पाहिले आणि तो पोहोचण्या आधी त्याला जिवे मारण्याचा कट रचला.
18 Eles o viram de longe. Antes que José se aproximasse, combinaram entre si como o haveriam de matar;
19 ते एकमेकांना म्हणाले, “अरे हा स्वप्नदर्शी येत आहे.
19 e disseram: "Eis o sonhador que chega.
20 चला आपण याला ठार करू. त्याला एखाद्या विहिरीत फेकून देऊ आणि आपल्या वडिलांना सांगू की त्याला हिंस्र पशूने खाऊन टाकले आहे; मग त्याच्या स्वप्नांचे काय होते ते आपण पाहू.”
20 Vamos, matemo-lo e atiremo-lo numa cisterna; diremos depois que uma fera o devorou; e então veremos de que lhe aproveitaram os seus sonhos."
21 जेव्हा रऊबेनने हे ऐकले तेव्हा त्याने योसेफाचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला; तो म्हणाला, “आपण त्याला जिवे मारणार नाही;
21 Ouvindo-o, porém, Rubem, quis livra-lo de suas mãos: "Não lhe tiremos a vida, disse ele.
22 आपण रक्तपात करणार नाही; तर आपण त्याला या रानातल्या विहिरीत फेकून देऊ; परंतु त्याला हात लावू नका.” रऊबेनने असा बेत केला होता की नंतर योसेफाला विहिरीतून काढावे आणि आपल्या वडिलांकडे परत पाठवून द्यावे.
22 Não derrameis sangue. Jogai-o naquela cisterna, no deserto, mas não levanteis vossa mão contra ele." Pois Rubem pensava livrá-lo de suas mãos para o reconduzir ao pai.
23 योसेफ त्यांच्याजवळ आला तेव्हा त्यांनी त्याचा झगा—जो गडद रंगाचा, सुशोभित होता—ओढून काढला,
23 Quando José se aproximou de seus irmãos, eles o despojaram de sua túnica, daquela bela túnica de várias cores que trazia,
24 आणि त्याला एका कोरड्या विहिरीत फेकून दिले, ती विहीर रिकामी होती, तिच्यात पाणी नव्हते.
24 e jogaram-no numa cisterna velha, que não tinha água.
25 मग ते भोजन करण्यास बसले असता त्यांना दूर अंतरावरून उंटांचा एक काफिला त्यांच्याकडे येताना दिसला. ते इश्माएली व्यापारी असून गिलआदहून इजिप्तला डिंक, मसाले व गंधरस घेऊन चालले होते.
25 E, sentando-se para comer, eis que, levantando os olhos, viram surgir no horizonte uma caravana de ismaelitas vinda de Galaad. Seus camelos estavam carregados de resina, de bálsamo e de ládano, que transportavam para o Egito.
26 तेव्हा यहूदाह आपल्या भावांना म्हणाला, “आपल्या भावाला मारून त्याचा रक्तपात झाकून आपल्याला काय फायदा?
26 Então Judá disse aos seus irmãos: "Que nos aproveita matar nosso irmão e ocultar o seu sangue?
27 चला आपण योसेफाला इश्माएली लोकांना विकून टाकू या, त्याला हात लावू नका, तो आपला भाऊच आहे, आपल्याच रक्तमांसाचा आहे.” त्या सर्व भावांना त्याचे म्हणणे पटले.
27 Vinde e vendamo-lo aos ismaelitas. Não levantemos nossas mãos contra ele, pois, afinal, é nosso irmão, nossa carne." Seus irmãos concordaram.
28 मिद्यानी व्यापार्यांचा काफिला म्हणजे इश्माएली लोक जवळ आले, तेव्हा त्यांनी योसेफाला त्या विहिरीतून बाहेर काढले आणि वीस शेकेल चांदी घेऊन भावांनी योसेफाला विकून टाकले; आणि व्यापार्यांनी योसेफाला आपल्याबरोबर इजिप्त देशाला नेले.
28 E, quando passaram os negociantes madianitas, tiraram José da cisterna e venderam-no por vinte moedas de prata aos ismaelitas, que o levaram para o Egito.
29 जेव्हा रऊबेन त्या विहिरीजवळ परत आला आणि योसेफ विहिरीत नाही हे पाहून त्याने आपली वस्त्रे फाडली.
29 Rubem voltou à cisterna, e eis que José já não estava ali.
30 तो रडत आपल्या भावांना म्हणाला, “मुलगा विहिरीत नाही; आता मी कुठे जाऊ?”
30 Rasgou então suas vestes e voltou para junto dos seus irmãos: "O menino desapareceu, disse ele. E eu, para onde irei?"
31 मग त्यांनी योसेफाचा झगा घेतला, एक बोकड मारला आणि त्याच्या रक्तात तो झगा बुडवला.
31 Tomaram então a túnica de José, mataram um cabrito e a mergulharam no seu sangue.
32 तो झगा त्यांनी आपल्या वडिलांकडे आणून म्हटले, “हा झगा आम्हास सापडला आहे; हा तुमच्या मुलाचा झगा आहे की नाही ते पाहा!”
32 E mandaram-na levar ao seu pai com esta mensagem: "Eis o que encontramos: vê se não é, porventura, a túnica do teu filho."
33 त्याने तो झगा ओळखला आणि म्हणाला, “होय, हा माझ्या मुलाचाच झगा आहे; त्याला वनपशूने खाऊन टाकले असावे. योसेफाचे त्याने फाडून तुकडे केले आहे यात शंका नाही.”
33 Jacó reconheceu-a e exclamou: "É a túnica de meu filho! Uma fera o devorou! José foi estraçalhado!"
34 यानंतर याकोबाने आपली वस्त्रे फाडली आणि गोणपाट नेसून त्याने मुलासाठी पुष्कळ दिवस शोक केला.
34 E, rasgando as vestes, cobriu-se de um saco, e chorou o seu filho por muito tempo.
35 त्याचे सर्व पुत्र आणि कन्या आले आणि त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो म्हणत असे, “मी पुत्र शोकानेच मरेन आणि अधोलोकी आपल्या मुलाकडे जाईन.” अशा रीतीने तो त्याच्यासाठी दुःखाने रडत असे.
35 Todos os seus filhos e filhas vieram consolá-lo, mas ele não aceitou nenhuma condolência: "É chorando, disse ele, que descerei para junto de meu filho na habitação dos mortos." Foi assim que o seu pai o chorou.
36 दरम्यान, मिद्यानी लोकांनी योसेफाला इजिप्तमधील पोटीफर, फारोहच्या सरदारांपैकी एका सुरक्षादलाच्या प्रमुखास विकले.
36 Os madianitas venderam-no a Putifar, no Egito, eunuco do faraó e chefe da guarda.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Gênesis 37, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.