Gênesis 35

marc (MARC) vs ARIB

Sair da comparação
ARIB Almeida Revisada Imprensa Bíblica
1 मग परमेश्वराने याकोबाला म्हटले, “ऊठ आणि बेथेलला जाऊन तिथेच स्थायिक हो. तुझा भाऊ एसाव, याच्यापासून तू पळून जात असता, ज्या परमेश्वराने तुला दर्शन दिले होते, तिथे त्याच परमेश्वरासाठी एक वेदी बांध.”
1 Depois disse Deus a Jacó: Levanta-te, sobe a Betel e habita ali; e faze ali um altar ao Deus que te apareceu quando fugias da face de Esaú, teu irmão.
2 म्हणून याकोब आपल्या सर्व कुटुंबीयांना व बरोबरच्या सर्वांना म्हणाला, “तुम्ही बरोबर आणलेल्या परक्या दैवतांचा नाश करा, शुद्ध व्हा, आपली वस्त्रे बदला.
2 Então disse Jacó à sua família, e a todos os que com ele estavam: Lançai fora os deuses estranhos que há no meio de vós, e purificai-vos e mudai as vossas vestes.
3 चला आपण आता वर बेथेलला जाऊ या. ज्या परमेश्वराने माझ्या संकटसमयी माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले आणि मी जिथे कुठे गेलो तिथे माझ्याबरोबर राहिले, त्या परमेश्वरासाठी मी तिथे एक वेदी बांधणार आहे.”
3 Levantemo-nos, e subamos a Betel; ali farei um altar ao Deus que me respondeu no dia da minha angústia, e que foi comigo no caminho por onde andei.
4 तेव्हा त्या सर्वांनी आपल्याकडील इतर दैवताच्या मूर्ती व कर्णफुले याकोबाला दिली व त्याने ती शेखेमजवळ असलेल्या एका एला वृक्षाखाली पुरून टाकली.
4 Entregaram, pois, a Jacó todos os deuses estranhos, que tinham nas mãos, e as arrecadas que pendiam das suas orelhas; e Jacó os escondeu debaixo do carvalho que está junto a Siquém.
5 मग ते पुन्हा पुढे निघाले आणि त्यांच्याभोवती असलेल्या सर्व नगरांवर परमेश्वराचे भय पडले, त्यामुळे त्यांनी याकोबाचा पाठलाग केला नाही.
5 Então partiram; e o terror de Deus sobreveio às cidades que lhes estavam ao redor, de modo que não perseguiram os filhos de Jacó.
6 शेवटी याकोब आणि त्याच्यासोबतचे सर्व लोक कनान देशातील लूज (याला बेथेल असेही नाव होते) येथे येऊन पोहोचले.
6 Assim chegou Jacó à Luz, que está na terra de Canaã {esta é Betel}, ele e todo o povo que estava com ele.
7 त्या ठिकाणी याकोबाने एक वेदी उभारली व त्या वेदीचे नाव त्याने एल बेथेल असे ठेवले; कारण तो एसावापासून पळून जात असता परमेश्वराने येथेच त्याला दर्शन दिले होते.
7 Edificou ali um altar, e chamou ao lugar El-Betel; porque ali Deus se lhe tinha manifestado quando fugia da face de seu irmão.
8 यानंतर लवकरच रिबेकाहची वृद्ध दाई दबोरा, ही मरण पावली आणि बेथेलच्या खोर्‍यात एका एला वृक्षाखाली तिला मूठमाती देण्यात आली. तेव्हापासून त्या वृक्षाला अल्लोन-बकूथ असे नाव पडले.
8 Morreu Débora, a ama de Rebeca, e foi sepultada ao pé de Betel, debaixo do carvalho, ao qual se chamou Alom-Bacute.
9 याकोब पद्दन-अराम वरून बेथेल येथे आला तेव्हा परमेश्वराने त्याला पुन्हा एकदा दर्शन देऊन आशीर्वाद दिला.
9 Apareceu Deus outra vez a Jacó, quando ele voltou de Padã-Arã, e o abençoou.
10 परमेश्वर त्याला म्हणाले, “तुझे नाव याकोब आहे, पण आता येथून पुढे, तुला याकोब म्हणजे ‘ठक’ असे म्हणणार नाहीत, तर इस्राएल असे म्हणतील.” याप्रकारे त्याला इस्राएल हे नाव देण्यात आले.
10 E disse-lhe Deus: O teu nome é Jacó; não te chamarás mais Jacó, mas Israel será o teu nome. Chamou-lhe Israel.
11 परमेश्वर त्याला म्हणाले, “मी सर्वसमर्थ परमेश्वर आहे; फलद्रूप हो आणि तुझी संख्या अनेक पटीने वाढो. तुझे एक मोठे राष्ट्र निर्माण व्हावे म्हणून मी तुझी वृद्धी करेन. पुष्कळ राजे तुझ्या वंशजातून उदय पावतील.
11 Disse-lhe mais: Eu sou Deus Todo-Poderoso; frutifica e multiplica-te; uma nação, sim, uma multidão de nações sairá de ti, e reis procederão dos teus lombos;
12 अब्राहाम व इसहाक यांना जो देश मी दिला तो मी तुला व तुझ्यानंतर तुझ्या वंशजांना देईन.”
12 a terra que dei a Abraão e a Isaque, a ti a darei; também à tua descendência depois de ti a darei.
13 ज्या ठिकाणी परमेश्वराने त्याच्याशी बोलणे केले, त्या ठिकाणाहून परमेश्वर वर निघून गेले.
13 E Deus subiu dele, do lugar onde lhe falara.
14 नंतर याकोबाने ज्या ठिकाणी परमेश्वराने त्याच्याशी बोलणे केले, त्या ठिकाणी एक पाषाणस्तंभ उभा केला आणि त्यावर परमेश्वराला पेयार्पण ओतले आणि त्या स्तंभावर तैलाभ्यंग केला.
14 Então Jacó erigiu uma coluna no lugar onde Deus lhe falara, uma coluna de pedra; e sobre ela derramou uma libação e deitou-lhe também azeite;
15 ज्या स्थानी परमेश्वर त्याच्याशी बोलले होते. त्या स्थानाचे नाव याकोबाने बेथेल असे ठेवले.
15 e Jacó chamou Betel ao lugar onde Deus lhe falara.
16 मग ते बेथेलमधून पुढे निघाले. तरी एफ्राथाहपासून काही अंतरावर असतानाच राहेलला प्रसूती वेदना सुरू झाल्या व तिला अतिशय कष्ट झाले.
16 Depois partiram de Betel; e, faltando ainda um trecho pequeno para chegar a Efrata, Raquel começou a sentir dores de parto, e custou-lhe o dar à luz.
17 अतिशय त्रासदायक प्रसूती होताना सुईण तिला म्हणाली, “भिऊ नकोस; कारण तुला आणखी एक पुत्र झाला आहे.”
17 Quando ela estava nas dores do parto, disse-lhe a parteira: Não temas, pois ainda terás este filho.
18 तिने अखेरचा श्वास घेतला—कारण ती मृतवत झाली होती—तिने तिच्या मुलाचे नाव बेन-ओनी ठेवले पण त्याच्या वडिलांनी त्याचे नाव बिन्यामीन ठेवले.
18 Então Raquel, ao sair-lhe a alma {porque morreu}, chamou ao filho Benôni; mas seu pai chamou-lhe Benjamim.
19 अशाप्रकारे राहेल मरण पावली आणि एफ्राथच्या (म्हणजे बेथलेहेमकडे) जाणार्‍या वाटेवर तिला मूठमाती देण्यात आली.
19 Assim morreu Raquel, e foi sepultada no caminho de Efrata {esta é Bete-Leém}.
20 मग याकोबाने तिच्या कबरेवर एक दगडी स्मारक उभारले, ते स्मारक आजही राहेलच्या कबरेचे खूण म्हणून तिथे उभे आहे.
20 E Jacó erigiu uma coluna sobre a sua sepultura; esta é a coluna da sepultura de Raquel até o dia de hoje.
21 मग इस्राएल पुढे प्रवास करीत निघाला आणि त्याने एदेरच्या बुरुजापलीकडे आपला तळ दिला.
21 Então partiu Israel, e armou a sua tenda além de Migdal-Eder.
22 तो त्या प्रदेशात राहत असताना रऊबेन हा आपल्या पित्याची उपपत्नी बिल्हा हिच्याजवळ जाऊन निजला, हे वृत्त इस्राएलला सांगण्यात आले.
22 Quando Israel habitava naquela terra, foi Rúben e deitou-se com Bila, concubina de seu pai; e Israel o soube. Eram doze os filhos de Jacó:
23 लेआचे पुत्र:
23 Os filhos de Léia: Rúben o primogênito de Jacó, depois Simeão, Levi, Judá, Issacar e Zebulom;
24 राहेलचे पुत्र:
24 os filhos de Raquel: José e Benjamim;
25 राहेलची दासी बिल्हा हिचे पुत्र:
25 os filhos de Bila, serva de Raquel: Dã e Naftali;
26 लेआची दासी जिल्पा हिचे पुत्र:
26 os filhos de Zilpa, serva de Léia: Gade e Aser. Estes são os filhos de Jacó, que lhe nasceram em Padã-Arã.
27 अशा रीतीने शेवटी याकोब किर्याथ-अर्बा म्हणजे हेब्रोन येथील मम्रे या ठिकाणी आपला पिता इसहाक याच्याकडे येऊन पोहोचला. याच ठिकाणी अब्राहामही राहिला होता.
27 Jacó veio a seu pai Isaque, a Manre, a Quiriate-Arba {esta é Hebrom}, onde peregrinaram Abraão e Isaque.
28 इसहाक एकशेऐंशी वर्षे जगला.
28 Foram os dias de Isaque cento e oitenta anos;
29 तो परिपक्व वयाचा वयोवृद्ध होऊन मरण पावला आणि त्याचे पुत्र एसाव व याकोब यांनी त्याला मूठमाती दिली.
29 e, exalando o espírito, morreu e foi congregado ao seu povo, velho e cheio de dias; e Esaú e Jacó, seus filhos, o sepultaram.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Gênesis 35, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.