Gênesis 34
marc (MARC) vs ACF
1 एके दिवशी याकोबापासून झालेली लेआची कन्या दीना त्या देशातील मुलींना भेटावयास गेली.
1 E saiu Diná, filha de Lia, que esta dera a Jacó, para ver as filhas da terra.
2 तेव्हा त्या देशाचा अधिपती हमोर नावाचा हिव्वी याचा पुत्र शेखेम, याने तिला पाहिले, तेव्हा तो तिला घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार करून त्याने तिला भ्रष्ट केले.
2 E Siquém, filho de Hamor, heveu, príncipe daquela terra, viu-a, e tomou-a, e deitou-se com ela, e humilhou-a.
3 याकोबाची मुलगी दीना हिच्यावर त्याचे हृदय आकर्षित झाले; त्याने त्या तरुण स्त्रीवर प्रेम केले आणि तो कोमलतेने तिच्याशी बोलला.
3 E apegou-se a sua alma com Diná, filha de Jacó, e amou a moça e falou afetuosamente à moça.
4 मग शेखेमने आपले वडील हमोर यांना म्हणाला, “ही मुलगी मला पत्नी करून द्या.”
4 Falou também Siquém a Hamor, seu pai, dizendo: Toma-me esta moça por mulher.
5 आपली कन्या दीना हिला शेखेमने भ्रष्ट केले आहे हे याकोबाने ऐकले त्यावेळी त्याचे पुत्र रानात गुरांबरोबर होते; म्हणून ते घरी परत येईपर्यंत त्याने त्याबाबत काहीही केले नाही.
5 Quando Jacó ouviu que Diná, sua filha, fora violada, estavam os seus filhos no campo com o gado; e calou-se Jacó até que viessem.
6 मग जेव्हा शेखेमचा बाप हमोर याकोबाकडे आपल्या मुलाच्या विवाहासंबंधी बोलणी करावयास आला.
6 E saiu Hamor, pai de Siquém, a Jacó, para falar com ele.
7 तेवढ्यात याकोबाचे पुत्रही रानातून घरी आले. शेखेमने इस्राएलात अशी भयानक गोष्ट करून याकोबाच्या कन्येला भ्रष्ट केल्याचे वृत ऐकून त्यांना मोठा धक्का बसला आणि ते संतप्त झाले कारण ही अपमानजनक गोष्ट घडणे अत्यंत घृणास्पद होते.
7 E vieram os filhos de Jacó do campo, ouvindo isso, e entristeceram-se os homens, e iraram-se muito, porquanto Siquém cometera uma insensatez em Israel, deitando-se com a filha de Jacó; o que não se devia fazer assim.
8 हमोर त्यांना म्हणाला, “माझा मुलगा शेखेम याचे हृदय तुमच्या मुलीकडे आकर्षित झाले आहे, म्हणून तिला त्याची पत्नी म्हणून द्या.
8 Então falou Hamor com eles, dizendo: A alma de Siquém, meu filho, está enamorada da vossa filha; dai-lha, peço-vos, por mulher;
9 आमच्याशी सोयरीक करा; आम्हाला तुमच्या मुली द्या आणि आमच्या मुली तुमच्यासाठी घ्या.
9 E aparentai-vos conosco, dai-nos as vossas filhas, e tomai as nossas filhas para vós;
10 आमच्याबरोबर राहा; हा देश तुमच्यासमोर मोकळा आहे, त्यात राहा आणि व्यापार करा आणि मालमत्ता प्राप्त करा.”
10 E habitareis conosco; e a terra estará diante de vós; habitai e negociai nela, e tomai possessão nela.
11 मग शेखेम, दीनाचे वडील व भाऊ यांना उद्देशून म्हणाला, “माझ्यावर एवढी कृपादृष्टी करा, तुम्ही जे मागाल ते मी देईन.
11 E disse Siquém ao pai dela, e aos irmãos dela: Ache eu graça em vossos olhos, e darei o que me disserdes;
12 तुम्ही वधूबद्दल वाटेल तितका हुंडा आणि भेट मागा, मी ती तुम्हाला देईन, पण ती मुलगी मला पत्नी म्हणून द्या.”
12 Aumentai muito sobre mim o dote e a dádiva e darei o que me disserdes; dai-me somente a moça por mulher.
13 आपली बहीण दीना हिला शेखेमने भ्रष्ट केले म्हणून याकोबाच्या पुत्रांनी शेखेम आणि त्याचा पिता हमोर यांच्याशी मनात कपट धरून बोलणी केली.
13 Então responderam os filhos de Jacó a Siquém e a Hamor, seu pai, enganosamente, e falaram, porquanto havia violado a Diná, sua irmã.
14 ते म्हणाले, “आमची बहीण शेखेमाला देणे आम्हाला जमणार नाही, कारण तुमची सुंता झालेली नाही. अशा बेसुंती मनुष्याबरोबर विवाह केल्यास आमचा अपमान होईल.
14 E disseram-lhe: Não podemos fazer isso, dar a nossa irmã a um homem não circuncidado; porque isso seria uma vergonha para nós;
15 आता आपण एक करार करू: जर तुमच्या देशातील प्रत्येक पुरुष आपली सुंता करून घेईल,
15 Nisso, porém, consentiremos a vós: se fordes como nós; que se circuncide todo o homem entre vós;
16 तर तुमच्या मुली आम्ही करू व आमच्या मुली तुम्हाला देऊ व आम्ही तुमच्यामध्ये स्थायिक होऊ आणि तुमच्याबरोबर एक लोक होऊ.
16 Então dar-vos-emos as nossas filhas, e tomaremos nós as vossas filhas, e habitaremos convosco, e seremos um povo;
17 जर तुम्ही सुंता करण्यास तयार होणार नाही तर आम्ही तिला आमच्याबरोबर घेऊन आमची वाट धरू.”
17 Mas se não nos ouvirdes, e não vos circuncidardes, tomaremos a nossa filha e ir-nos-emos.
18 त्यांचा प्रस्ताव हमोर आणि त्याचा मुलगा शेखेम यांना चांगला वाटला.
18 E suas palavras foram boas aos olhos de Hamor, e aos olhos de Siquém, filho de Hamor.
19 तो तरुण, जो त्याच्या वडिलांच्या घराण्यात सर्वात आदरणीय होता, त्याने जे सांगितले ते करण्यात वेळ घालविला नाही, कारण याकोबाच्या मुलीवर त्याचे खूप मन बसले होते.
19 E não tardou o jovem em fazer isto; porque a filha de Jacó lhe contentava; e ele era o mais honrado de toda a casa de seu pai.
20 म्हणून हमोर आणि शेखेम यांनी त्या शहरातील वेशीकडे जाऊन लोकांपुढे सुंतेची ही सूचना मांडली.
20 Veio, pois, Hamor e Siquém, seu filho, à porta da sua cidade, e falaram aos homens da sua cidade, dizendo:
21 ते म्हणाले, “हे लोक आपले मित्र आहेत. त्यांना आपण आपल्यात राहण्याचे आमंत्रण देऊ आणि व्यापार करण्यास परवानगी देऊ; कारण आपला देश त्यांनाही पुरेल इतका मोठा असून त्यांना येथे सहज राहता येईल आणि त्यांच्या मुली आपण स्त्रिया करून घेऊ आणि आपण आपल्या मुली त्यांना देऊ.
21 Estes homens são pacíficos conosco; portanto habitarão nesta terra, e negociarão nela; eis que a terra é larga de espaço para eles; tomaremos nós as suas filhas por mulheres, e lhes daremos as nossas filhas.
22 परंतु ते लोक आपल्यात राहून राष्ट्राशी एकरूप होण्यास एकाच अटीवर तयार आहेत. ती अट म्हणजे आपल्यातील प्रत्येक पुरुषाने त्यांच्याप्रमाणेच स्वतःची सुंता करून घेतली पाहिजे.
22 Nisto, porém, consentirão aqueles homens, em habitar conosco, para que sejamos um povo, se todo o homem entre nós se circuncidar, como eles são circuncidados.
23 तेव्हा त्यांची ही अट आपण मान्य करू या, म्हणजे ते आपल्यामध्ये वस्ती करतील. आपण हे केले तर त्यांची शेरडेमेंढरे, गुरे व मालमत्ता ते सर्व आपले होणार नाही का?”
23 E seu gado, as suas possessões, e todos os seus animais não serão nossos? Consintamos somente com eles e habitarão conosco.
24 हमोर आणि शेखेम यांच्या या गोष्टीला सर्व पुरुषांनी मान्यता दिली. ते त्या नगराच्या वेशीबाहेर आले आणि त्या सर्वांची सुंता करण्यात आली.
24 E deram ouvidos a Hamor e a Siquém, seu filho, todos os que saíam da porta da cidade; e foi circuncidado todo o homem, de todos os que saíam pela porta da sua cidade.
25 परंतु तीन दिवसानंतर, त्यांच्या जखमांमुळे ते वेदनेत असताना, याकोबाच्या पुत्रांपैकी दीनाचे दोन भाऊ शिमओन व लेवी, यांनी आपल्या हाती तलवारी घेतल्या, ते बेसावध असलेल्या शहरात शिरले आणि त्यांनी तेथील प्रत्येक पुरुषाची कत्तल केली.
25 E aconteceu que, ao terceiro dia, quando estavam com a mais violenta dor, os dois filhos de Jacó, Simeão e Levi, irmãos de Diná, tomaram cada um a sua espada, e entraram afoitamente na cidade, e mataram todos os homens.
26 हमोर आणि शेखेम यांचीही त्यांनी तलवारीने कत्तल केली. त्यांनी दीनाची शेखेमाच्या घरातून सुटका केली आणि तिला घेऊन ते परत आले.
26 Mataram também ao fio da espada a Hamor, e a seu filho Siquém; e tomaram a Diná da casa de Siquém, e saíram.
27 यानंतर याकोबाचे सर्व पुत्र शहरात गेले आणि त्यांनी ते संपूर्ण शहर लुटले, जिथे त्यांच्या बहिणीला भ्रष्ट केले होते.
27 Vieram os filhos de Jacó aos mortos e saquearam a cidade; porquanto violaram a sua irmã.
28 त्यांनी त्यांचे कळप, गुरे, गाढवे आणि त्यांच्या नगरात व शेतात असलेले सर्वकाही त्यांनी नेले.
28 As suas ovelhas, e as suas vacas, e os seus jumentos, e o que havia na cidade e no campo, tomaram.
29 तसेच त्यांच्या घरातील सर्व संपत्ती आणि त्यांच्या सर्व स्त्रिया व लेकरे, त्यांना जे काही घरात सापडले ते सर्व त्यांनी लुटले.
29 E todos os seus bens, e todos os seus meninos, e as suas mulheres, levaram presos, e saquearam tudo o que havia em casa.
30 तेव्हा याकोब, शिमओन व लेवी यांना म्हणाला, “या भूमीतील सर्व कनानी व परिज्जी लोकांना माझी किळस येईल असे वर्तन तुम्ही केले आहे. आपण अगदी थोडके आहोत; ते आपल्यावर चालून येतील आणि आपल्याला चिरडून टाकतील व आपण सर्वजण मारले जाऊ.”
30 Então disse Jacó a Simeão e a Levi: Tendes-me turbado, fazendo-me cheirar mal entre os moradores desta terra, entre os cananeus e perizeus; tendo eu pouco povo em número, eles ajuntar-se-ão, e serei destruído, eu e minha casa.
31 यावर त्यांनी प्रत्युत्तर केले, “त्याने आमच्या बहिणीशी एखाद्या वेश्येप्रमाणे व्यवहार करावा काय?”
31 E eles disseram: Devia ele tratar a nossa irmã como a uma prostituta?
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Gênesis 34, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.