Gênesis 29
marc (MARC) vs ARA
1 प्रवास करीत याकोब पूर्वेकडील लोकांच्या प्रदेशात आला.
1 Pôs-se Jacó a caminho e se foi à terra do povo do Oriente.
2 त्याला समोरच्या मैदानात मेंढरांचे तीन कळप, एका विहिरीजवळ पाणी पिण्यासाठी बसलेले दिसले, परंतु एका मोठ्या दगडाने विहिरीचे तोंड झाकून ठेवलेले होते.
2 Olhou, e eis um poço no campo e três rebanhos de ovelhas deitados junto dele; porque daquele poço davam de beber aos rebanhos; e havia grande pedra que tapava a boca do poço.
3 सर्व कळप विहिरीजवळ जमल्यानंतर मेंढपाळ तो दगड लोटत असत आणि सर्व कळपांना पाणी पाजून मग तो दगड विहिरीच्या तोंडावर पुन्हा ठेवीत असत.
3 Ajuntavam-se ali todos os rebanhos, os pastores removiam a pedra da boca do poço, davam de beber às ovelhas e tornavam a colocá-la no seu devido lugar.
4 याकोब मेंढपाळांकडे गेला, आणि त्याने त्यांना विचारले, “माझ्या भावांनो, तुम्ही कुठून आहात?”
4 Perguntou-lhes Jacó: Meus irmãos, donde sois? Responderam: Somos de Harã.
5 तेव्हा त्याने त्यांना विचारले, “नाहोराचा नातू लाबान याला तुम्ही ओळखता काय?”
5 Perguntou-lhes: Conheceis a Labão, filho de Naor? Responderam: Conhecemos.
6 यावर याकोबाने त्यांना विचारले, “ते बरे आहेत काय?”
6 Ele está bom? Perguntou ainda Jacó. Responderam: Está bom. Raquel, sua filha, vem vindo aí com as ovelhas.
7 याकोबाने म्हटले, “पाहा सूर्य अजून मावळला नाही; कळपांना एकत्र करण्याची अजून वेळ झालेली नाही. त्यांना पाणी पाजून पुन्हा चरावयास घेऊन जा.”
7 Então, lhes disse: É ainda pleno dia, não é tempo de se recolherem os rebanhos; dai de beber às ovelhas e ide apascentá-las.
8 आम्ही तसे करू शकत नाही, त्यांनी उत्तर दिले, “सगळे कळप येथे जमल्यानंतर आम्ही विहिरीवरील दगड बाजूला काढतो आणि कळपांना पाणी पाजतो.”
8 Não o podemos, responderam eles, enquanto não se ajuntarem todos os rebanhos, e seja removida a pedra da boca do poço, e lhes demos de beber.
9 त्यांचे संभाषण चालू असताना राहेल आपल्या पित्याची मेंढरे घेऊन तिथे आली, कारण ती मेंढपाळ होती.
9 Falava-lhes ainda, quando chegou Raquel com as ovelhas de seu pai; porque era pastora.
10 जेव्हा याकोबाने त्याचा मामा लाबानची मुलगी राहेल आणि लाबानाची मेंढरे पाहिली, तेव्हा त्याने विहिरीच्या तोंडावरील दगड बाजूला केला आणि आपल्या मामाच्या मेंढरांना पाणी पाजले.
10 Tendo visto Jacó a Raquel, filha de Labão, irmão de sua mãe, e as ovelhas de Labão, chegou-se, removeu a pedra da boca do poço e deu de beber ao rebanho de Labão, irmão de sua mãe.
11 नंतर याकोबाने राहेलचे चुंबन घेतले आणि तो मोठ्याने रडू लागला.
11 Feito isso, Jacó beijou a Raquel e, erguendo a voz, chorou.
12 याकोबाने राहेलला सांगितले की तो तिच्या पित्याच्या नात्यातील आहे आणि रिबेकाह हिचा मुलगा आहे. तेव्हा राहेल धावतच गेली आणि आपल्या पित्याला ही बातमी सांगितली.
12 Então, contou Jacó a Raquel que ele era parente de seu pai, pois era filho de Rebeca; ela correu e o comunicou a seu pai.
13 लाबानाला आपल्या बहिणीचा मुलगा याकोबाची बातमी कळताच तो त्याला लगबगीने भेटावयाला आला. त्याने त्याला मिठी मारली आणि त्याचे चुंबन घेतले आणि त्याला आपल्या घरी आणले आणि तिथे याकोबाने त्याला सर्व गोष्टी सांगितल्या.
13 Tendo Labão ouvido as novas de Jacó, filho de sua irmã, correu-lhe ao encontro, abraçou-o, beijou-o e o levou para casa. E contou Jacó a Labão os acontecimentos de sua viagem.
14 तेव्हा लाबान त्याला म्हणाला, “तू माझे स्वतःचे मांस व रक्त आहेस.”
14 Disse-lhe Labão: De fato, és meu osso e minha carne. E Jacó, pelo espaço de um mês, permaneceu com ele.
15 लाबान त्याला म्हणाला, “आपण एकमेकांचे नातेवाईक असलो तरी त्यामुळे तू माझ्यासाठी फुकट काम करावे हे योग्य नाही. तू वेतन म्हणून काय घेशील?”
15 Depois, disse Labão a Jacó: Acaso, por seres meu parente, irás servir-me de graça? Dize-me, qual será o teu salário?
16 लाबानाला दोन कन्या होत्या. वडील कन्येचे नाव लेआ व धाकटीचे नाव राहेल.
16 Ora, Labão tinha duas filhas: Lia, a mais velha, e Raquel, a mais moça.
17 लेआचे डोळे निस्तेज होते पण राहेल बांधेसूद व दिसायला सुंदर होती.
17 Lia tinha os olhos baços, porém Raquel era formosa de porte e de semblante.
18 याकोबाचे राहेलवर प्रेम बसले होते, म्हणून तो म्हणाला, “मला तुमची धाकटी मुलगी राहेल पत्नी म्हणून द्याल, तर मी तुमच्यासाठी सात वर्षे काम करेन.”
18 Jacó amava a Raquel e disse: Sete anos te servirei por tua filha mais moça, Raquel.
19 लाबान म्हणाला, “परकीय मनुष्याला तिला देण्यापेक्षा ती तुला देणेच उत्तम आहे. माझ्यासोबत इथे राहा.”
19 Respondeu Labão: Melhor é que eu ta dê, em vez de dá-la a outro homem; fica, pois, comigo.
20 याप्रमाणे याकोबाने राहेलकरिता पुढील सात वर्षे काम केले. परंतु त्याचे तिच्यावर इतके प्रेम होते की, ही वर्षे त्याला काही दिवसांप्रमाणे भासली.
20 Assim, por amor a Raquel, serviu Jacó sete anos; e estes lhe pareceram como poucos dias, pelo muito que a amava.
21 तेव्हा याकोब लाबानाला म्हणाला, “माझी पत्नी मला द्या. माझी मुदत संपली आहे, आता मला तिचा स्वीकार करता येईल.”
21 Disse Jacó a Labão: Dá-me minha mulher, pois já venceu o prazo, para que me case com ela.
22 तेव्हा लाबानाने वस्तीतील सर्व लोकांना बोलाविले आणि मेजवानी दिली.
22 Reuniu, pois, Labão todos os homens do lugar e deu um banquete.
23 परंतु संध्याकाळी लाबानाने आपली कन्या लेआला याकोबाकडे पाठविले आणि याकोबाने तिच्याबरोबर रात्र घालविली.
23 À noite, conduziu a Lia, sua filha, e a entregou a Jacó. E coabitaram.
24 आणि लाबानाने आपली दासी जिल्पा, त्याची कन्या लेआ हिला दासी म्हणून दिली.
24 (Para serva de Lia, sua filha, deu Labão Zilpa, sua serva.)
25 पण याकोब सकाळी उठून पाहतो, तर ती लेआ होती! याकोब लाबानाला म्हणाला, “हे तुम्ही काय केले? मी राहेलसाठी सात वर्षे काम केले आणि तुम्ही माझी अशी फसवणूक का केली?”
25 Ao amanhecer, viu que era Lia. Por isso, disse Jacó a Labão: Que é isso que me fizeste? Não te servi eu por amor a Raquel? Por que, pois, me enganaste?
26 लाबानाने उत्तर दिले, “मोठ्या बहिणीचे लग्न झाल्याशिवाय धाकट्या बहिणीचे लग्न करून देण्याची आमच्यात प्रथा नाही.
26 Respondeu Labão: Não se faz assim em nossa terra, dar-se a mais nova antes da primogênita.
27 लग्नाचा सप्ताह पूर्ण होऊ दे, मग माझ्यासाठी आणखी सात वर्षे काम करण्याचे तू वचन देत असशील तर राहेलही तुला मिळेल.”
27 Decorrida a semana desta, dar-te-emos também a outra, pelo trabalho de mais sete anos que ainda me servirás.
28 याकोबाने त्याप्रमाणे केले. त्याने लेआसोबत संपूर्ण एक आठवडा घालविला, मग लाबानाने त्याला त्याची कन्या राहेल ही पत्नी म्हणून दिली.
28 Concordou Jacó, e se passou a semana desta; então, Labão lhe deu por mulher Raquel, sua filha.
29 लाबानाने आपली दासी बिल्हा, त्याची कन्या राहेलला दासी म्हणून दिली.
29 (Para serva de Raquel, sua filha, deu Labão a sua serva Bila.)
30 मग याकोबाने राहेलचाही पत्नी म्हणून स्वीकार केला. तो तिच्यावर लेआपेक्षा अधिक प्रेम करी आणि तिच्यासाठी आणखी सात वर्षे तिथे राहून त्याने काम केले.
30 E coabitaram. Mas Jacó amava mais a Raquel do que a Lia; e continuou servindo a Labão por outros sete anos.
31 याकोब लेआला कमी प्रीती करीत आहे, म्हणून याहवेहने तिला गर्भधारणा करण्याचे सामर्थ्य दिले, पण राहेल वांझच राहिली.
31 Vendo o Senhor que Lia era desprezada, fê-la fecunda; ao passo que Raquel era estéril.
32 लेआ गर्भवती झाली व तिला एक पुत्र झाला आणि तिने त्याचे नाव रऊबेन असे ठेवले. कारण लेआ म्हणाली, “याहवेहने माझे दुःख पाहिले आहे. आता माझे पती माझ्यावर प्रेम करतील.”
32 Concebeu, pois, Lia e deu à luz um filho, a quem chamou Rúben, pois disse: O Senhor atendeu à minha aflição. Por isso, agora me amará meu marido.
33 लवकरच ती पुन्हा गर्भवती झाली आणि तिला दुसरा पुत्र झाला. तिने त्याचे नाव शिमओन असे ठेवले, कारण ती म्हणाली, “याहवेहने माझे ऐकले आहे, मी नावडती आहे म्हणून त्यांनी मला आणखी एक पुत्र दिला.”
33 Concebeu outra vez, e deu à luz um filho, e disse: Soube o Senhor que era preterida e me deu mais este; chamou-lhe, pois, Simeão.
34 मग ती पुन्हा गर्भवती झाली आणि तिला पुत्र झाला; आणि ती म्हणाली, “यावेळी माझे पती माझ्याशी पुन्हा जोडले जातील, कारण मी त्यांना तीन पुत्र दिले.” म्हणून त्याचे नाव लेवी असे ठेवण्यात आले.
34 Outra vez concebeu Lia, e deu à luz um filho, e disse: Agora, desta vez, se unirá mais a mim meu marido, porque lhe dei à luz três filhos; por isso, lhe chamou Levi.
35 ती पुन्हा एकदा गर्भवती झाली आणि तिला आणखी एक पुत्र झाला तिने त्याचे नाव यहूदाह असे ठेवले, कारण ती म्हणाली, “आता मी याहवेहची स्तुती करेन.” यानंतर तिला मूल होण्याचे थांबले.
35 De novo concebeu e deu à luz um filho; então, disse: Esta vez louvarei o Senhor . E por isso lhe chamou Judá; e cessou de dar à luz.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Gênesis 29, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.