Gênesis 28
marc (MARC) vs ARC
1 तेव्हा इसहाकाने याकोबाला बोलावून आशीर्वाद दिला आणि नंतर त्याला आज्ञा दिली, “कनानी मुलीशी तू लग्न करू नकोस.
1 E Isaque chamou a Jacó, e abençoou-o, e ordenou-lhe, e disse-lhe: Não tomes mulher de entre as filhas de Canaã.
2 तू त्वरित पद्दन-अराम येथे तुझा आईचा पिता बेथुएल याच्या घरी जा, आणि तुझ्या आईचा भाऊ लाबान याच्या मुलींपैकी पत्नी कर.
2 Levanta-te, vai a Padã-Arã, à casa de Betuel, pai de tua mãe, e toma de lá uma mulher das filhas de Labão, irmão de tua mãe.
3 सर्वसमर्थ परमेश्वर तुला आशीर्वाद देवो. तुला पुष्कळ संतती देवो आणि तुझ्यापासून अनेक वंशाचे एक मोठे राष्ट्र निर्माण करो.
3 E Deus Todo-Poderoso te abençoe, e te faça frutificar, e te multiplique, para que sejas uma multidão de povos;
4 अब्राहामाला जे आशीर्वाद परमेश्वराने दिले, ते तुझ्या वंशजाला लाभोत, ज्या भूमीवर तू आता परदेशी म्हणून राहत आहेस, ती भूमी तुझ्या मालकीची होवो, कारण परमेश्वराने ती अब्राहामाला दिलेली आहे.”
4 e te dê a bênção de Abraão, a ti e à tua semente contigo, para que em herança possuas a terra de tuas peregrinações, que Deus deu a Abraão.
5 अशा रीतीने इसहाकाने याकोबाला पद्दन-अराम येथे अरामी बेथुएलाचा पुत्र आणि याकोब व एसाव यांची आई रिबेकाहचा भाऊ, लाबान याच्याकडे पाठविले.
5 Assim, enviou Isaque a Jacó, o qual se foi a Padã-Arã, a Labão, filho de Betuel, arameu, irmão de Rebeca, mãe de Jacó e de Esaú.
6 एसावाला समजले की इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देऊन पद्दन-अराम येथे पत्नी करण्यासाठी पाठविले आहे, आणि जेव्हा त्याने त्याला आशीर्वाद दिला, तेव्हा त्याला आज्ञा दिली की तू कनानी मुलीशी विवाह करू नको,
6 Vendo, pois, Esaú que Isaque abençoara a Jacó, e o enviara a Padã-Arã, para tomar mulher para si dali, e que, abençoando-o, lhe ordenara, dizendo: Não tomes mulher das filhas de Canaã;
7 आणि याकोब आपल्या पित्याची व आईची आज्ञा पाळून पद्दन-अराम येथे गेला.
7 e que Jacó obedecera a seu pai e a sua mãe e se fora a Padã-Arã;
8 तेव्हा एसावाला समजले की, त्याचे वडील इसहाकाला कनानी मुली अजिबात आवडत नाहीत.
8 vendo também Esaú que as filhas de Canaã eram más aos olhos de Isaque, seu pai,
9 म्हणून एसाव अब्राहामाचा पुत्र इश्माएलच्या घरी गेला आणि तिथे त्याने त्याची कन्या, नबायोथाची बहीण माहलथशी विवाह केला आणि माहलथ त्याच्या पूर्वीच्या पत्नींमध्ये सामील झाली.
9 foi-se Esaú a Ismael e tomou para si por mulher, além das suas mulheres, a Maalate, filha de Ismael, filho de Abraão, e irmã de Nebaiote.
10 याकोब बेअर-शेबा सोडून हारानास जाण्यास निघाला.
10 Partiu, pois, Jacó de Berseba, e foi-se a Harã.
11 त्या रात्री सूर्य मावळल्यावर तो मुक्कामास एके ठिकाणी थांबला असताना, त्याने एक धोंडा उशासाठी घेतला आणि तो त्या ठिकाणी झोपी गेला.
11 E chegou a um lugar onde passou a noite, porque já o sol era posto; e tomou uma das pedras daquele lugar, e a pôs por sua cabeceira, e deitou-se naquele lugar.
12 तेव्हा त्याला एक स्वप्न पडले. त्यात त्याने पृथ्वीवर उभी केलेली व तिचे वरचे टोक स्वर्गाला टेकलेले आहे अशी एक शिडी पाहिली. परमेश्वराचे दूत त्या शिडीवरून वर जाताना व खाली उतरतांना त्याने पाहिले.
12 E sonhou: e eis era posta na terra uma escada cujo topo tocava nos céus; e eis que os anjos de Deus subiam e desciam por ela.
13 शिडीच्या वरच्या टोकाला याहवेह उभे राहून त्यास म्हणाले, “मी याहवेह, तुझा पिता अब्राहाम व इसहाक यांचा परमेश्वर आहे. ज्या भूमीवर तू झोपला आहेस ती मी तुला आणि तुझ्या वंशजांना देईन.
13 E eis que o Senhor estava em cima dela e disse: Eu sou o Senhor , o Deus de Abraão, teu pai, e o Deus de Isaque. Esta terra em que estás deitado ta darei a ti e à tua semente.
14 तुझे गोत्र धुळीच्या कणांइतके वाढतील. ते नेगेव पासून पूर्वेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत विस्तार करतील. तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील.
14 E a tua semente será como o pó da terra; e estender-se-á ao ocidente, e ao oriente, e ao norte, e ao sul; e em ti e na tua semente serão benditas todas as famílias da terra.
15 पाहा, मी तुझ्याबरोबर आहे आणि ज्या ठिकाणी तू जाशील, त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करेन आणि याच भूमीवर तुला सुखरुपपणे परत आणेन. तुला दिलेले अभिवचन पूर्ण होईपर्यंत मी तुझ्याबरोबर सतत राहीन.”
15 E eis que estou contigo, e te guardarei por onde quer que fores, e te farei tornar a esta terra, porque te não deixarei, até que te haja feito o que te tenho dito.
16 मग याकोब झोपेतून जागा झाला, त्याने विचार केला, “निश्चितच याहवेहची उपस्थिती या ठिकाणी आहे, पण मला हे माहीत नव्हते.
16 Acordado, pois, Jacó do seu sono, disse: Na verdade o Senhor está neste lugar, e eu não o sabia.
17 तो भयभीत झाला आणि म्हणाला, हे किती अद्भुत स्थळ आहे! हे परमेश्वराच्या भवनाशिवाय दुसरे काहीही असू शकत नाही; हे स्वर्गाचे द्वार आहे.”
17 E temeu e disse: Quão terrível é este lugar! Este não é outro lugar senão a Casa de Deus; e esta é a porta dos céus.
18 दुसर्या दिवशी याकोब अगदी पहाटेस उठला आणि जो धोंडा त्याने उशाशी घेतला होता, तो त्याने स्तंभ म्हणून उभा केला आणि त्यावर जैतुनाचे तेल ओतले.
18 Então, levantou-se Jacó pela manhã, de madrugada, e tomou a pedra que tinha posto por sua cabeceira, e a pôs por coluna, e derramou azeite em cima dela.
19 त्याने त्या जागेचे नाव बेथेल असे ठेवले, जरी त्या नगराचे नाव लूज असे होते.
19 E chamou o nome daquele lugar Betel; o nome, porém, daquela cidade, dantes, era Luz.
20 नंतर याकोबाने नवस केला, “जर परमेश्वर माझ्यासोबत असतील, या प्रवासात माझे रक्षण करतील, मला अन्नपाणी, वस्त्र देतील,
20 E Jacó fez um voto, dizendo: Se Deus for comigo, e me guardar nesta viagem que faço, e me der pão para comer e vestes para vestir,
21 व मला आपल्या पित्याच्या घरी सुखरुपपणे परत आणतील, तर याहवेह माझे परमेश्वर होतील
21 e eu em paz tornar à casa de meu pai, o Senhor será o meu Deus;
22 आणि हा जो धोंडा मी स्तंभ म्हणून उभा केला आहे ते परमेश्वराचे भवन होईल आणि जे सर्वकाही ते मला देतील, त्यातील प्रत्येकाचा दशांश मी त्यांना अर्पण करेन.”
22 e esta pedra, que tenho posto por coluna, será Casa de Deus; e, de tudo quanto me deres, certamente te darei o dízimo.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Gênesis 28, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.