Gênesis 26
marc (MARC) vs ACF
1 त्या देशात दुष्काळ पडला—अब्राहामाच्या काळात पडला त्या खेरीज हा दुसरा दुष्काळ होता—म्हणून इसहाक गरार या शहरात पलिष्ट्यांचा राजा अबीमेलेख याजकडे गेला.
1 E havia fome na terra, além da primeira fome, que foi nos dias de Abraão; por isso foi Isaque a Abimeleque, rei dos filisteus, em Gerar.
2 याहवेहने तिथे इसहाकाला दर्शन देऊन म्हटले, “खाली इजिप्त देशात जाऊ नकोस; मी तुला सांगतो त्या देशात राहा.
2 E apareceu-lhe o Senhor, e disse: Não desças ao Egito; habita na terra que eu te disser;
3 या प्रांतात काही काळ राहा आणि मी तुझ्यासह असेन व तुला आशीर्वादित करेन. तुझा पिता अब्राहाम याला मी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी हा सर्व प्रदेश तुला आणि तुझ्या वंशजाला देईन.
3 Peregrina nesta terra, e serei contigo, e te abençoarei; porque a ti e à tua descendência darei todas estas terras, e confirmarei o juramento que tenho jurado a Abraão teu pai;
4 मी तुझ्या वंशजांची संख्या असंख्य तार्यांसारखी करेन. मी हा सर्व प्रदेश तुझ्या वंशजांना देईन आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील.
4 E multiplicarei a tua descendência como as estrelas dos céus, e darei à tua descendência todas estas terras; e por meio dela serão benditas todas as nações da terra;
5 कारण अब्राहामाने माझे आज्ञापालन केले आणि मी सांगितलेला प्रत्येक नियम, विधी व प्रत्येक सूचनेचे पालन केले.”
5 Porquanto Abraão obedeceu à minha voz, e guardou o meu mandado, os meus preceitos, os meus estatutos, e as minhas leis.
6 म्हणून इसहाक गरारातच राहिला.
6 Assim habitou Isaque em Gerar.
7 जेव्हा तेथील लोकांनी त्याला त्याच्या पत्नीबद्दल विचारले, तेव्हा तो म्हणाला, “ती माझी बहीण आहे.” कारण “ती माझी पत्नी आहे” असे सांगण्याची त्याला भीती वाटली; त्याने विचार केला, “या ठिकाणचे लोक रिबेकाहमुळे कदाचित मला मारून टाकतील, कारण ती फार सुंदर आहे.”
7 E perguntando-lhe os homens daquele lugar acerca de sua mulher, disse: É minha irmã; porque temia dizer: É minha mulher; para que porventura (dizia ele) não me matem os homens daquele lugar por amor de Rebeca; porque era formosa à vista.
8 तो तिथे बराच काळ राहिल्यानंतर एके दिवशी पलिष्ट्यांचा राजा अबीमेलेख याने खिडकीतून बाहेर पाहिले की तो इसहाक आपली पत्नी रिबेकाह हिच्याशी प्रेम करीत आहे.
8 E aconteceu que, como ele esteve ali muito tempo, Abimeleque, rei dos filisteus, olhou por uma janela, e viu, e eis que Isaque estava brincando com Rebeca sua mulher.
9 अबीमेलेखाने इसहाकाला बोलाविणे पाठविले आणि त्याला म्हणाला, “निश्चितच ही तुझी पत्नी आहे, ‘तर ती माझी बहीण आहे’ असे तू का सांगितलेस?”
9 Então chamou Abimeleque a Isaque, e disse: Eis que na verdade é tua mulher; como pois disseste: É minha irmã? E disse-lhe Isaque: Porque eu dizia: Para que eu porventura não morra por causa dela.
10 अबीमेलेखाने उद्गार काढले, “तू आमच्यासोबत असे का केले? माझ्या लोकांपैकी कोणीही तिच्यासोबत निजला असता आणि तू आमच्यावर दोष आणला असतास.”
10 E disse Abimeleque: Que é isto que nos fizeste? Facilmente se teria deitado alguém deste povo com a tua mulher, e tu terias trazido sobre nós um delito.
11 यानंतर अबीमेलेखाने जाहीर फर्मान काढले: “या मनुष्याला किंवा याच्या पत्नीला कोणी त्रास दिल्यास त्याला मृत्यूची शिक्षा दिली जाईल.”
11 E mandou Abimeleque a todo o povo, dizendo: Qualquer que tocar neste homem ou em sua mulher, certamente morrerá.
12 इसहाकाने त्या देशात धान्य पेरले व त्याच वर्षी त्याला शंभरपट पीक मिळाले, कारण याहवेहने इसहाकाला आशीर्वादित केले.
12 E semeou Isaque naquela mesma terra, e colheu naquele mesmo ano cem medidas, porque o Senhor o abençoava.
13 तो श्रीमंत होत गेला आणि त्याचे धन असे वाढत गेले की पुढे तो खूप धनाढ्य झाला.
13 E engrandeceu-se o homem, e ia enriquecendo-se, até que se tornou mui poderoso.
14 त्याच्याकडे इतके मेंढ्या, गुरे आणि नोकर होते की पलिष्ट्यांनी त्याचा हेवा केला.
14 E tinha possessão de ovelhas, e possessão de vacas, e muita gente de serviço, de maneira que os filisteus o invejavam.
15 म्हणून ज्या विहिरी त्याचा पिता अब्राहाम याच्या नोकरांनी खणल्या होत्या त्या सर्व पलिष्ट्यांनी मातीने बुजवून टाकल्या.
15 E todos os poços, que os servos de seu pai tinham cavado nos dias de seu pai Abraão, os filisteus entulharam e encheram de terra.
16 तेव्हा अबीमेलेखाने इसहाकाला म्हटले, “तू आमच्यापासून दूर निघून जा; तू आमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली झाला आहेस.”
16 Disse também Abimeleque a Isaque: Aparta-te de nós; porque muito mais poderoso te tens feito do que nós.
17 तेव्हा इसहाकाने ते ठिकाण सोडले आणि गरारच्या खोर्यात तळ देऊन राहू लागला.
17 Então Isaque partiu dali e fez o seu acampamento no vale de Gerar, e habitou lá.
18 इसहाकाने आपला पिता अब्राहाम याने खणलेल्या आणि अब्राहामाच्या मृत्यूनंतर पलिष्टी लोकांनी बुजवून टाकलेल्या सर्व विहिरी पुन्हा खणल्या. अब्राहामाने विहिरीना जी नावे दिली होती तीच नावे त्याने पुनः दिली.
18 E tornou Isaque e cavou os poços de água que cavaram nos dias de Abraão seu pai, e que os filisteus entulharam depois da morte de Abraão, e chamou-os pelos nomes que os chamara seu pai.
19 इसहाकाच्या नोकरांनी खोर्यात एक नवी विहीर खणली आणि तिथे त्यांना गोड पाण्याचा एक झरा सापडला.
19 Cavaram, pois, os servos de Isaque naquele vale, e acharam ali um poço de águas vivas.
20 मग गरारचे गुराखी इसहाकाच्या गुराख्यांशी भांडले आणि म्हणाले, “हे पाणी आमचे आहे!” म्हणून त्याने विहिरीला एसेक असे नाव दिले; कारण त्यांचे त्याच्याशी भांडण झाले.
20 E os pastores de Gerar porfiaram com os pastores de Isaque, dizendo: Esta água é nossa. Por isso chamou aquele poço Eseque, porque contenderam com ele.
21 मग त्यांनी दुसरी एक विहीर खणली; पण तिच्यावरूनही पुन्हा भांडणे झाली, म्हणून तिचे नाव सितनाह असे ठेवले.
21 Então cavaram outro poço, e também porfiaram sobre ele; por isso chamou-o Sitna.
22 यानंतर इसहाकाने आणखी एक विहीर खणली, पण त्यावेळी कोणाशीही भांडण झाले नाही. म्हणून त्याने त्या विहिरीचे नाव रेहोबोथ असे ठेवले. तो म्हणाला, “आता तरी याहवेहने आम्हाला जागा दिली आहे. आता आमची या देशात भरभराट होईल.”
22 E partiu dali, e cavou outro poço, e não porfiaram sobre ele; por isso chamou-o Reobote, e disse: Porque agora nos alargou o Senhor, e crescemos nesta terra.
23 पुढे इसहाक तिथून बेअर-शेबाला गेला;
23 Depois subiu dali a Berseba.
24 त्याच रात्री याहवेहने त्याला दर्शन देऊन म्हटले, “मी तुझा पिता अब्राहामाचा परमेश्वर आहे; भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी आपला सेवक अब्राहाम याच्यासाठी तुला आशीर्वादित करेन आणि तुझा वंश वाढवेन.”
24 E apareceu-lhe o Senhor naquela mesma noite, e disse: Eu sou o Deus de Abraão teu pai; não temas, porque eu sou contigo, e abençoar-te-ei, e multiplicarei a tua descendência por amor de Abraão meu servo.
25 मग इसहाकाने तिथे एक वेदी बांधली आणि याहवेहची उपासना केली. त्याने तिथे वस्ती केली आणि तिथे त्यांच्या नोकरांनी एक विहीर खणली.
25 Então edificou ali um altar, e invocou o nome do Senhor, e armou ali a sua tenda; e os servos de Isaque cavaram ali um poço.
26 एके दिवशी त्याला भेटण्यासाठी गरारहून अबीमेलेख, त्याचा सल्लागार अहुज्जाथ आणि त्याचा सेनापती पीकोल हे आले.
26 E Abimeleque veio a ele de Gerar, com Auzate seu amigo, e Ficol, príncipe do seu exército.
27 “तुम्ही येथे का आला?” इसहाकाने त्यांना विचारले, “कारण तुम्ही मला द्वेषाने वागवून हाकलून दिले होते.”
27 E disse-lhes Isaque: Por que viestes a mim, pois que vós me odiais e me repelistes de vós?
28 यावर ते म्हणाले, “आम्हाला हे स्पष्टपणे दिसत आहे की, याहवेह तुला आशीर्वादित करीत आहेत; तुझ्याशी—तुझ्या आणि आमच्यामध्ये एक करार करावा असे आम्हाला वाटले. म्हणून आम्हाला तुमच्याबरोबर करार करू द्यावा.
28 E eles disseram: Havemos visto, na verdade, que o Senhor é contigo, por isso dissemos: Haja agora juramento entre nós, entre nós e ti; e façamos aliança contigo.
29 आम्ही जसा तुला कसलाही उपद्रव दिला नाही, तसा तू आम्हाला कसलाही उपद्रव देणार नाहीस, असे वचन दे. उलट आम्ही तुझे भलेच केले आणि तुला शांतीने जाऊ दिले; आणि आता तू याहवेहद्वारे आशीर्वादित झाला आहे.”
29 Que não nos faças mal, como nós te não temos tocado, e como te fizemos somente bem, e te deixamos ir em paz. Agora tu és o bendito do Senhor.
30 इसहाकाने त्यांच्यासाठी एक मोठी मेजवानी दिली आणि त्यांनी खाणेपिणे केले.
30 Então lhes fez um banquete, e comeram e beberam;
31 पहाटेस उठल्याबरोबर त्यांनी एकमेकांशी करार केला. नंतर इसहाकाने त्यांना निरोप दिला व ते शांतीने परतले.
31 E levantaram-se de madrugada e juraram um ao outro; depois os despediu Isaque, e despediram-se dele em paz.
32 त्या दिवशी इसहाकाचे नोकर त्याच्याकडे येऊन त्याला सांगू लागले. “आम्ही खणीत असलेल्या विहिरीला पाणी लागले आहे!”
32 E aconteceu, naquele mesmo dia, que vieram os servos de Isaque, e anunciaram-lhe acerca do negócio do poço, que tinham cavado; e disseram-lhe: Temos achado água.
33 त्याने तिला शिबाह म्हटले, आणि आजपर्यंत या नगराचे नाव बेअर-शेबा असे आहे.
33 E chamou-o Seba; por isso é o nome daquela cidade Berseba até o dia de hoje.
34 एसावाने त्याच्या चाळिसाव्या वर्षी यहूदीथ नावाच्या बवरी हिथीच्या मुलीसोबत आणि एलोन हिथी याची कन्या बासमाथ हिच्याबरोबरही विवाह केला.
34 Ora, sendo Esaú da idade de quarenta anos, tomou por mulher a Judite, filha de Beeri, heteu, e a Basemate, filha de Elom, heteu.
35 त्या इसहाक आणि रिबेकाहसाठी दुःखाचे स्रोत होत्या.
35 E estas foram para Isaque e Rebeca uma amargura de espírito.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Gênesis 26, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.