Gênesis 24
marc (MARC) vs NAA
1 अब्राहाम आता खूप वृद्ध झाला होता. याहवेहने त्याला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते.
1 Abraão já era velho, de idade bem avançada, e o Senhor o havia abençoado em tudo.
2 अब्राहाम आपल्या घरादाराचा कारभार पाहणार्या सर्वात जुन्या सेवकाला म्हणाला, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव.
2 Abraão disse ao mais antigo servo da sua casa, que governava tudo o que possuía: — Ponha a sua mão por baixo da minha coxa,
3 स्वर्ग व पृथ्वीचे परमेश्वर याहवेह यांच्या नावाने मला वचन दे की, माझ्या मुलाचा मी राहत असलेल्या स्थानिक कनानी मुलीबरोबर विवाह करून देणार नाहीस,
3 para que eu faça com que você jure pelo Senhor , Deus do céu e da terra, que você não buscará uma esposa para o meu filho entre as filhas dos cananeus, no meio dos quais estou morando,
4 याऐवजी तू माझ्या मायदेशात माझ्या नातेवाईकांकडे जाशील आणि माझा पुत्र इसहाकासाठी एक वधू शोधून आणशील.”
4 mas que você irá à minha parentela e ali buscará uma esposa para Isaque, meu filho.
5 सेवकाने अब्राहामाला विचारले, “पण समजा, आपले घर सोडून इतक्या दूर येण्यास ती स्त्री तयार नसेल तर मी इसहाकाला जो देश तुम्ही सोडून आला त्या देशात घेऊन जावे काय?”
5 Então o servo disse: — Talvez a mulher não queira vir comigo para esta terra. Nesse caso, devo levar o seu filho à terra de onde o senhor veio?
6 “माझ्या मुलाला तिकडे कधीही नेऊ नको,” अब्राहाम त्याला म्हणाला.
6 Abraão respondeu: — Cuidado! Não faça o meu filho voltar para lá.
7 “कारण याहवेह जे स्वर्गाचे परमेश्वर आहेत, त्यांनी माझ्या पित्याच्या घरातून व माझ्या जन्मभूमीतून काढून मला आणि माझ्या मुलाबाळांना हा देश देण्याचे वचन दिले आहे, तेच परमेश्वर तुझ्यापुढे आपला दूत पाठवतील आणि माझ्या मुलासाठी योग्य वधू तुला मिळेल.
7 O Senhor , Deus do céu, que me tirou da casa de meu pai e da terra dos meus parentes, e que me falou, e jurou, dizendo: “À sua descendência darei esta terra”, ele enviará o seu anjo adiante de você, para que lá você encontre uma esposa para o meu filho.
8 पण स्त्री येथे येण्यास तयार झाली नाही, तर तू आपल्या वचनातून मुक्त होशील. फक्त माझ्या मुलाला तिकडे नेऊ नकोस.”
8 Caso a mulher não queira vir, você ficará desobrigado do seu juramento; entretanto, não leve o meu filho para lá.
9 तेव्हा सेवकाने त्याचा धनी अब्राहामाच्या मांडीखाली हात ठेऊन ही बाब शपथपूर्वक मान्य केली.
9 Com isso, o servo pôs a sua mão por baixo da coxa de Abraão, seu senhor, e jurou fazer segundo o resolvido.
10 मग त्या सेवकाने अब्राहामाचे दहा उंट घेऊन, आपल्या धन्याच्या मालमत्तेतील उत्तमोत्तम वस्तू निवडून त्या सर्व उंटांवर लादल्या. मग तो प्रवास करीत अराम-नहराईम मधील नाहोराच्या नगरास गेला.
10 O servo pegou dez dos camelos do seu senhor e, levando consigo uma parte dos bens dele, levantou-se e partiu para a Mesopotâmia, para a cidade onde Naor havia morado.
11 तिथे नगराच्या बाहेर त्याने विहिरीजवळ उंटांना बसविले; ती संध्याकाळची वेळ होती. स्त्रिया विहिरीतून पाणी नेण्यासाठी तिथे येत होत्या.
11 Fora da cidade, fez os camelos se ajoelharem junto a um poço de água. Era de tardinha, a hora em que as moças saem para tirar água.
12 त्यावेळी त्या सेवकाने प्रार्थना केली, “हे याहवेह, माझ्या धन्याच्या परमेश्वरा, माझा धनी अब्राहाम याच्यावर दया करा आणि ज्या उद्देशाने मी हा प्रवास केला तो सफल करा.
12 Então o servo orou: — Ó
13 पाहा, मी येथे विहिरीजवळ उभा आहे व पाणी नेण्याकरिता नगरातील कन्या येत आहेत.
13 Eis que estou ao pé da fonte de água, e as filhas dos homens desta cidade saem para tirar água.
14 माझी तुम्हाला अशी विनंती आहे की, त्या तरुणींपैकी एकीला ‘तुझी पाण्याची घागर वाकवून मला प्यायला पाणी दे’ असा ज्यावेळी मी म्हणेन त्यावेळी, ‘होय निश्चितच, मी तुझ्या उंटांनाही पाणी पाजते’ असे जी म्हणेल तीच इसहाकासाठी तुम्ही निवडलेली वधू आहे, यावरून मला समजेल की तुम्ही माझ्या धन्याला कृपा दाखविली आहे.”
14 Concede, pois, que a moça a quem eu disser: “Incline o cântaro para que eu beba”; e ela me responder: “Beba, e darei ainda de beber aos seus camelos”, seja a que designaste para o teu servo Isaque; e nisso verei que foste bondoso para com o meu senhor.
15 त्याची प्रार्थना समाप्त होण्यापूर्वी रिबेकाह खांद्यावर घागर घेऊन तिथे आली. ती नाहोर आणि मिल्का यांचा पुत्र बेथुएल याची कन्या होती. नाहोर हा अब्राहामाचा भाऊ होता.
15 Antes que ele acabasse de orar, eis que surgiu Rebeca, filha de Betuel, filho de Milca, mulher de Naor, irmão de Abraão, trazendo um cântaro sobre o ombro.
16 ती अतिशय देखणी असून कुमारिका होती; आतापर्यंत कोणत्याही पुरुषाने तिला स्पर्श केला नव्हता. तिने खाली जाऊन विहिरीच्या पाण्याने घागर भरली आणि ती वर आली.
16 A moça era muito bonita, virgem, a quem nenhum homem havia possuído. Ela desceu até a fonte, encheu o seu cântaro e subiu.
17 अब्राहामाचा सेवक तिच्याकडे धावत गेला आणि तो तिला म्हणाला, “कृपया मला तुझ्या घागरीतील थोडे पाणी दे.”
17 Então o servo correu ao encontro dela e disse: — Peço que me deixe beber um pouco da água do seu cântaro.
18 “प्या, माझ्या स्वामी,” असे म्हणून तिने लगेच आपली घागर वाकवून त्याला प्यायला पाणी दिले.
18 Ela respondeu: — Beba, meu senhor. E prontamente, baixando o cântaro para a mão, deu-lhe de beber.
19 त्यास पुरेसे पाणी पाजल्यानंतर ती त्याला म्हणाली, “मी तुमच्या उंटांसाठीही त्यांना पुरेल इतके पाणी काढते.”
19 Depois de lhe dar de beber, disse: — Vou tirar água também para os seus camelos, até que todos bebam.
20 तिने आपल्या घागरीतील पाणी कुंडात ओतले आणि ती पुन्हा पाणी काढण्याकरिता विहिरीकडे धावत गेली आणि त्याच्या सर्व उंटांना पुरेल इतके पाणी तिने काढले.
20 E, apressando-se em despejar o cântaro no bebedouro, correu outra vez ao poço para tirar mais água; ela tirou água para todos os camelos.
21 ती पाणी काढीत असताना, तो सेवक एक शब्दही न बोलता, तिचे बारकाईने निरीक्षण करीत होता की याहवेहने त्याचा प्रवास सफल केला की नाही.
21 O homem a observava, em silêncio, atentamente, para saber se o Senhor teria levado a bom termo a sua jornada ou não.
22 शेवटी उंटांचे पाणी पिणे संपल्यावर, त्याने तिला एक बेका वजनाची सोन्याची नथ आणि दहा शेकेल वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या दिल्या.
22 Quando os camelos acabaram de beber, o homem pegou um pendente de ouro pesando seis gramas e duas pulseiras para as mãos dela, pesando cento e vinte gramas de ouro.
23 नंतर त्याने तिला विचारले, “तू कोणाची कन्या आहेस? कृपया मला सांग की रात्री मुक्काम करण्यासाठी आम्हाला तुझ्या वडिलांच्या घरी जागा मिळू शकेल काय?”
23 Em seguida perguntou: — Diga-me: De quem você é filha? Será que na casa de seu pai haveria lugar para eu e os que estão comigo passarmos a noite?
24 तिने उत्तर दिले, “मी नाहोर व मिल्का, यांचा पुत्र बेथुएल यांची कन्या आहे.”
24 Ela respondeu: — Sou filha de Betuel, que é filho de Milca e de Naor.
25 आणि ती पुढे हे म्हणाली, “आमच्या घरी रात्री मुक्काम करण्यासाठी खोली आणि उंटांसाठीही भरपूर गवत व चारा आहे.”
25 E acrescentou: — Temos palha, muito pasto e lugar para passar a noite.
26 तेव्हा त्या मनुष्याने आपले डोके लवविले आणि याहवेहची आराधना केली.
26 Então o homem se inclinou e adorou o Senhor .
27 तो म्हणाला, “माझा धनी अब्राहामाचे परमेश्वर याहवेहची स्तुती असो, माझ्या धन्याबरोबर तुम्ही इतक्या प्रेमाने आणि विश्वासूपणाने वागता म्हणून मी तुमचे आभार मानतो. माझ्या धन्याच्या नातेवाईकांच्या कुटुंबात तुम्ही मला सरळ घेऊन आला म्हणूनही मी तुमचे आभार मानतो.”
27 E disse: — Bendito seja o
28 तेव्हा ती मुलगी आपल्या आईच्या कुटुंबातील लोकांना ही बातमी सांगण्यासाठी धावतच घरी गेली.
28 E a moça correu e contou tudo aos da casa de sua mãe.
29 रिबेकाहला एक भाऊ होता, त्याचे नाव लाबान होते. तो धावतच त्या मनुष्याला भेटण्यासाठी विहिरीकडे गेला;
29 Ora, Rebeca tinha um irmão, chamado Labão. Este correu ao encontro do homem junto à fonte.
30 त्याने तिची नथ व तिच्या हातातील बांगड्या पाहिल्या आणि रिबेकाहच्या तोंडची हकिकत ऐकली, तेव्हा तो विहिरीकडे गेला आणि पाहिले की तो मनुष्य अद्यापही आपल्या उंटांपाशी विहिरीजवळच उभा आहे.
30 Acontece que Labão tinha visto o pendente e as pulseiras nas mãos de sua irmã e ouvido as palavras de Rebeca, sua irmã, que dizia: “Ele me falou assim e assim.” Por isso foi até onde ele estava e o encontrou em pé junto aos camelos, ao lado da fonte.
31 त्याने म्हटले, “या, तुम्ही जे याहवेहद्वारे आशीर्वादित आहात, बाहेर का उभे आहात? तुम्हाला राहण्यास खोली आणि उंटांकरिता मी जागा तयार केली आहे.”
31 E Labão disse: — Entre, bendito do
32 मग तो मनुष्य त्यांच्या घरी गेला. उंटांवरून सामान उतरून त्यांना गवत आणि खाण्याकरिता चाराही देण्यात आला. त्यास व त्याच्या बरोबरीच्या लोकांस पाय धुण्याकरिता त्याने पाणीही दिले.
32 Então o homem entrou na casa. Descarregaram os camelos e lhes deram forragem e pasto. Também trouxeram água para que ele e os homens que estavam com ele lavassem os pés.
33 यानंतर भोजन वाढण्यात आले; परंतु तो म्हणाला, “मला जे काही सांगायचे ते सांगेपर्यंत मी भोजन करणार नाही.”
33 Puseram comida diante dele. Porém ele disse: — Não vou comer enquanto não disser o que tenho para dizer. Labão respondeu: — Diga.
34 तेव्हा तो म्हणाला, “मी अब्राहामाचा सेवक आहे.
34 Então ele disse: — Sou servo de Abraão.
35 याहवेहने माझ्या धन्याला फार आशीर्वाद दिले आहेत आणि तो थोर पुरुष झाला आहे. त्यांनी त्याला मेंढरांचे कळप, गुरांची खिल्लारे, सोने चांदी, पुष्कळ दास आणि दासी, उंट आणि गाढवे दिली आहेत.
35 O Senhor tem abençoado muito o meu senhor, e ele se tornou um grande homem. O Senhor lhe deu ovelhas e bois, prata e ouro, servos e servas, camelos e jumentos.
36 माझ्या धन्याला त्याची पत्नी साराह हिच्यापासून वृद्धापकाळात एक पुत्र झाला. माझ्या धन्याने त्याचे सर्वस्व त्याला दिले आहे.
36 Sara, mulher do meu senhor, já era idosa quando lhe deu à luz um filho, a quem o meu senhor deu tudo o que tem.
37 त्या पुत्रासाठी, मी जिथे राहत आहे तेथील स्थानिक कनानी मुलींमधून पत्नी निवडू नये, असे वचन माझ्या धन्याने माझ्यापासून घेतले आहे.
37 E meu senhor me fez jurar, dizendo: “Não busque uma esposa para o meu filho entre as mulheres dos cananeus, em cuja terra estou morando.
38 माझ्या वडिलांच्या कुटुंबात जावे आणि माझ्या स्वतःच्या घराण्यातील लोकांकडे जाऊन माझ्या मुलासाठी येथील मुलगी निवडून मी आणावी, असे त्याने मला बजावले आहे.
38 Pelo contrário, vá à casa de meu pai e à minha família e ali busque uma esposa para o meu filho.”
39 “मग मी माझ्या धन्यास विचारले, ती मुलगी माझ्याबरोबर परत आली नाही तर?
39 Respondi ao meu senhor: “Talvez a mulher não queira me acompanhar.”
40 “यावर त्याने उत्तर दिले, ‘ती खात्रीने येईल, कारण ज्या याहवेहच्या समक्षतेत मी चालतो ते त्यांचा दूत तुझ्याबरोबर पाठवतील आणि तुझी यात्रा सिद्धीस नेतील. माझ्या नातेवाईकांकडे जाऊन माझ्या वडिलाच्या घराण्यातील एक मुलगी शोधून आण.
40 Ele me disse: “O Senhor , em cuja presença eu ando, enviará o seu Anjo com você e levará a bom termo a sua jornada, para que, da minha família e da casa de meu pai, você traga uma esposa para o meu filho.
41 याप्रमाणे करण्यास तू वचनबद्ध आहेस. जेव्हा तू माझ्या घराण्याकडे जाशील आणि त्यांनी मुलगी पाठविण्याचे नाकारले, तर तू तुझ्या शपथेतून मुक्त होशील.’
41 Você estará desobrigado do seu juramento, caso você for até a minha família e eles não quiserem dar a moça a você; neste caso, você estará desobrigado do juramento.”
42 “आज मी विहिरीजवळ आलो तेव्हा मी अशी प्रार्थना केली की, माझा धनी अब्राहामाचे परमेश्वर याहवेह, कृपया माझी यात्रा तुम्ही यशस्वी करा.
42 — Hoje, pois, quando cheguei à fonte, eu disse: “Ó Senhor , Deus de meu senhor Abraão, leva a bom termo a jornada em que sigo.
43 पाहा, मी येथे या विहिरीजवळ उभा असताना पाणी भरण्यास आलेल्या एखाद्या मुलीला म्हणेन, ‘तुझ्या घागरीतील थोडे पाणी मला प्यावयास दे,’
43 Eis-me agora junto à fonte de água. A moça que sair para tirar água, a quem eu disser: ‘Dê-me um pouco de água do seu cântaro’,
44 आणि यावर ती मला म्हणेल, ‘अवश्य महाराज, आणि मी तुम्हाला आणि तुमच्या उंटांनाही पाणी पाजीन,’ तीच मुलगी माझ्या धन्याच्या पुत्राची पत्नी होण्यासाठी याहवेहने निवडलेली आहे असे होऊ द्या.
44 e ela me responder: ‘Beba, e também tirarei água para os seus camelos’, seja essa a mulher que o Senhor designou para o filho de meu senhor.”
45 “माझ्या मनातल्या मनात माझे हे बोलणे संपले नाही तोच रिबेकाह आपल्या खांद्यावर घागर घेऊन पाणी भरण्यास आली आणि तिने विहिरीत उतरून पाणी भरले. मग मी तिला म्हणालो, ‘मला थोडे पाणी प्यावयाला दे.’
45 — Antes que eu acabasse de orar em meu íntimo, eis que veio Rebeca trazendo o seu cântaro sobre o ombro. Ela desceu à fonte e tirou água. E eu lhe disse: “Peço que me dê de beber.”
46 “मला पाणी पिता यावे म्हणून तिने आपल्या खांद्यावरील घागर झटकन खाली उतरविली आणि ती मला म्हणाली, ‘अवश्य महाराज, मी तुम्हाला आणि तुमच्या उंटांनाही पाणी पाजते.’ मग मी प्यालो आणि तिने उंटांनाही पाणी पाजले.
46 Ela prontamente baixou o cântaro do ombro e disse: “Beba, e também darei de beber aos seus camelos.” Bebi, e ela deu de beber aos camelos.
47 “मी तिला विचारले, ‘तू कोणाची मुलगी आहेस?’
47 Daí lhe perguntei: “De quem você é filha?” Ela respondeu: “Filha de Betuel, que é filho de Naor e Milca.” Então lhe pus o pendente no nariz e as pulseiras nas mãos.
48 माझ्या धन्याच्या भावाची नात शोधून काढण्यास मला योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल मी माझे मस्तक लवविले आणि माझा धनी अब्राहामाचे परमेश्वर याहवेहचे मी स्तवन केले.
48 E, prostrando-me, adorei o Senhor e louvei o Senhor , Deus do meu senhor Abraão, que me havia conduzido por um caminho direito, a fim de encontrar para o filho do meu senhor uma filha do seu parente.
49 तर आता माझ्या धन्यावर दया आणि विश्वासूपणा दाखवून जे योग्य ते करण्याची तुमची तयारी आहे की नाही हे मला नक्की सांगा, म्हणजे पुढे काय करावयाचे ते मला ठरविता येईल.”
49 Agora, pois, se estiverem dispostos a usar de bondade e de fidelidade para com o meu senhor, digam; do contrário, digam também, para que eu siga o meu caminho, para a direita ou para a esquerda.
50 यावर लाबान आणि बेथुएल यांनी उत्तर दिले, “हे याहवेहकडूनच आहे; हे अगदी उघड आहे. तेव्हा आम्ही तुम्हास बरे किंवा वाईट कसे काय बोलावे?
50 Labão e Betuel responderam: — Isto procede do
51 ही रिबेकाह तुमच्यापुढे आहे, तिला घेऊन जा. याहवेह परमेश्वराने मार्गदर्शन केल्याप्रमाणे तिला तुमच्या धन्याच्या पुत्राची पत्नी होऊ द्या.”
51 Aqui está Rebeca; leve-a com você e que ela seja a mulher do filho do seu senhor, segundo a palavra do Senhor Deus.
52 जेव्हा अब्राहामाच्या सेवकाने हे ऐकले, त्याने याहवेहपुढे गुडघे टेकले.
52 Quando o servo de Abraão ouviu tais palavras, prostrou-se em terra diante do Senhor .
53 मग त्या सेवकाने रिबेकाहला सोने आणि चांदीचे दागिने आणि कपडे दिले; तसेच त्याने तिच्या आईसाठी आणि भावासाठीही पुष्कळ मौल्यवान वस्तू दिल्या.
53 Tirou joias de ouro e de prata e vestidos e os deu a Rebeca. Também deu ricos presentes ao irmão e à mãe dela.
54 यानंतर त्यांनी संध्याकाळचे भोजन केले आणि तो सेवक व त्याच्या बरोबरच्या माणसांनी खाणेपिणे करून रात्री तिथेच मुक्काम केला.
54 Depois, comeram e beberam, ele e os homens que estavam com ele, e passaram a noite. De madrugada, quando se levantaram, o servo disse: — Permitam que eu volte ao meu senhor.
55 परंतु तिची आई व भाऊही म्हणाला, “मुलीने आमच्याजवळ कमीतकमी दहा दिवस राहावे अशी आमची इच्छा आहे; नंतर तुम्ही जावे.”
55 Mas o irmão e a mãe da moça disseram: — Deixe que ela fique conosco mais alguns dias, pelo menos dez; e depois poderá ir.
56 पण विनंती करीत तो म्हणाला, “कृपा करून माझ्या परतण्यात अडथळा आणू नका. कारण याहवेहने माझी यात्रा यशस्वी केली आहे; मला माझ्या मार्गावर पाठवा म्हणजे मी माझ्या धन्याकडे परत जाईन.”
56 Ele, porém, lhes disse: — Não me detenham, pois o
57 तेव्हा ते म्हणाले, “आम्ही मुलीला बोलावून विचारतो”
57 Disseram: — Vamos chamar a moça para ver o que ela diz.
58 त्याप्रमाणे त्यांनी रिबेकाहला बोलावून विचारले, “तू या मनुष्यासोबत जाशील का?”
58 Chamaram, pois, Rebeca e lhe perguntaram: — Você quer ir com este homem? Ela respondeu: — Sim, quero.
59 तेव्हा त्यांनी तिला निरोप दिला. म्हणून त्यांनी आपली बहीण रिबेकाह हिला, तिची दाई, अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे यांच्यासह तिची रवानगी केली.
59 Então deixaram que Rebeca, a irmã deles, partisse, junto com a sua ama, com o servo de Abraão e os homens que estavam com ele.
60 एकमेकांपासून दूर होण्यापूर्वी त्यांनी रिबेकाहला आशीर्वाद दिला:
60 Abençoaram Rebeca e lhe disseram: — Que você, nossa irmã, seja a mãe de milhares de milhares, e que a sua descendência tome posse das cidades dos seus inimigos.
61 नंतर रिबेकाह व तिच्या दासी तयार होऊन उंटावर आरूढ झाल्या आणि त्या मनुष्याबरोबर गेल्या, त्या सेवकाने रिबेकाहला घेतले आणि निघाला.
61 Então Rebeca se levantou com as suas servas e, montando os camelos, seguiram o homem. O servo de Abraão tomou Rebeca e partiu.
62 दरम्यानच्या काळात इसहाक नेगेव-दक्षिण-प्रांतातील आपल्या घरून बएर-लहाई-रोई येथे आला होता.
62 Ora, Isaque veio de Beer-Laai-Roi, porque morava na terra do Neguebe.
63 एके दिवशी संध्याकाळी तो मनन करीत शेतातून फिरावयास निघाला असताना, त्याने नजर वर करून पाहिले, तो त्याला काही उंट येताना दिसले.
63 Ao cair da tarde, Isaque saiu para meditar no campo. Erguendo os olhos, viu, e eis que vinham camelos.
64 रिबेकाहने दृष्टी वर करून इसहाकाला पाहिले, तेव्हा ती उंटावरून खाली उतरली
64 Também Rebeca levantou os olhos e, vendo Isaque, desceu do camelo,
65 आणि सेवकाला विचारले, “शेतातून आपल्याला भेटावयास येत असलेला तो पुरुष कोण आहे?”
65 e perguntou ao servo: — Quem é aquele homem que vem pelo campo ao nosso encontro? O servo respondeu: — É o meu senhor. Então ela pegou o véu e se cobriu.
66 आपण काय काय केले याचा सर्व वृतांत सेवकाने इसहाकाला सांगितला.
66 O servo contou a Isaque todas as coisas que havia feito.
67 मग इसहाकाने रिबेकाहला आपली आई साराहच्या तंबूमध्ये आणले. त्याने रिबेकाहशी विवाह केला आणि ती त्याची पत्नी झाली. त्याचे तिच्यावर प्रेम बसले; आणि आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्यामुळे त्याला सांत्वन मिळाले.
67 Isaque a conduziu até a tenda de Sara, mãe dele. Ele tomou Rebeca, e esta se tornou a mulher dele. Ele a amou; e assim Isaque foi consolado depois da morte de sua mãe.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Gênesis 24, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.