Gênesis 20
marc (MARC) vs NVI
1 आता अब्राहाम तिथून दक्षिणेस नेगेव प्रांताकडे गेला आणि त्याने कादेश आणि शूर यांच्या दरम्यान वस्ती केली. काही काळासाठी तो गरार नगरात राहिला,
1 Abraão partiu dali para a região do Neguebe e foi viver entre Cades e Sur. Depois morou algum tempo em Gerar.
2 साराह आपली बहीण असल्याचे अब्राहामाने सांगितले, तेव्हा गरारचा राजा अबीमेलेख याने माणसे पाठवून सारेला आपल्याकडे आणले.
2 Ele dizia que Sara, sua mulher, era sua irmã. Então Abimeleque, rei de Gerar, mandou buscar Sara e tomou-a para si.
3 पण एका रात्री परमेश्वर स्वप्नात अबीमेलेखकडे आले आणि त्याला म्हणाले, “आता तुझा अंत झाल्यासारखाच आहे, कारण जी स्त्री तू आणली आहेस, ती विवाहित आहे.”
3 Certa noite Deus veio a Abimeleque num sonho e lhe disse: "Você morrerá! A mulher que você tomou é casada".
4 पण अबीमेलेखाने तिला अद्याप स्पर्श केला नव्हता, म्हणून तो म्हणाला, “प्रभू, तुम्ही एक निरपराधी राष्ट्राचा अंत कराल काय?
4 Mas Abimeleque, que ainda não havia tocado nela, disse: "Senhor, destruirias um povo inocente?
5 खुद्द अब्राहामानेच मला सांगितले नव्हते का की ती माझी बहीण आहे? आणि तिनेही सांगितले नव्हते का तो माझा भाऊ आहे? मी हे शुद्ध हृदयाने आणि शुद्ध हातांनी केले आहे.”
5 Não foi ele que me disse: ‘Ela é minha irmã’? E ela também não disse: ‘Ele é meu irmão’? O que fiz foi de coração puro e de mãos limpas".
6 परमेश्वराने त्याला स्वप्नात म्हणाले, “होय, ते मला माहीत आहे; ते तू शुद्ध हृदयाने केले आहे आणि म्हणूनच मी तुला पाप करण्यापासून रोखून धरले आणि तिला स्पर्शही करू दिला नाही.
6 Então Deus lhe respondeu no sonho: "Sim, eu sei que você fez isso de coração puro. Eu mesmo impedi que você pecasse contra mim e por isso não lhe permiti tocá-la.
7 आता तू तिला आपल्या पतीकडे परत पाठवून दे. तिचा पती माझा संदेष्टा आहे. तो तुझ्यासाठी प्रार्थना करेल, म्हणजे तू जिवंत राहशील; पण जर तू तिला परत पाठविले नाहीस, तर तू आणि तुझे सर्व लोक खात्रीने मरतील.”
7 Agora devolva a mulher ao marido dela. Ele é profeta, e orará em seu favor, para que você não morra. Mas se não a devolver, esteja certo de que você e todos os seus morrerão".
8 दुसर्या दिवशी सकाळीच अबीमेलेखाने आपल्या सर्व अधिकार्यांना बोलाविले आणि काय घडले हे त्याने सांगितले, तेव्हा सर्व लोक फार घाबरले.
8 Na manhã seguinte, Abimeleque convocou todos os seus conselheiros e, quando lhes contou tudo o que acontecera, tiveram muito medo.
9 मग अबीमेलेखाने अब्राहामास बोलावून विचारणा केली, “हे तू आमच्याशी काय केलेस? मी असे काय अपराध केले की, मला तुझ्याकडून अशी वागणूक मिळावी आणि त्यामुळे माझ्यावर आणि माझ्या राज्यावर घोर पातक आणले? जे कृत्य कधीही करू नये ते तू माझ्याशी केले आहेस.”
9 Depois Abimeleque chamou Abraão e disse: "O que fizeste conosco? Em que foi que pequei contra ti para que trouxesses tamanha culpa sobre mim e sobre o meu reino? O que me fizeste não se faz a ninguém! "
10 मग अबीमेलेखाने अब्राहामास विचारले, “तू हे असे करण्याचे काय कारण आहे?”
10 E perguntou Abimeleque a Abraão: "O que te levou a fazer isso? "
11 अब्राहाम म्हणाला, “मी मनात विचार केला, ‘या शहरात कोणीही परमेश्वराला भीत नाही आणि माझ्या पत्नीमुळे ते माझा वध करतील.’
11 Abraão respondeu: "Eu disse a mim mesmo: Certamente ninguém teme a Deus neste lugar, e irão matar-me por causa da minha mulher.
12 असे असूनही, ती माझी बहीण आहे, माझ्या वडिलांची मुलगी आहे, परंतु माझ्या आईची मुलगी नाही; आणि ती माझी पत्नी झाली.
12 Além disso, na verdade ela é minha irmã por parte de pai, mas não por parte de mãe; e veio a ser minha mulher.
13 परमेश्वराने माझ्या वडिलांचे घर सोडून मला प्रवासास पाठविले, तेव्हा मी तिला म्हटले की, ‘जिथेही आपण जाऊ तिथे मी तुझा भाऊ आहे असे सांगून तू माझ्यावरील तुझी प्रीती मला दाखव.’ ”
13 E quando Deus me fez sair errante da casa de meu pai, eu disse a ela: Assim você me provará sua lealdade: em qualquer lugar aonde formos, diga que sou seu irmão".
14 मग अबीमेलेखाने अब्राहामाला मेंढरे, बैल आणि स्त्री व पुरुष गुलाम दिले आणि त्याची पत्नी साराहदेखील त्याला परत केली.
14 Então Abimeleque trouxe ovelhas e bois, servos e servas, deu-os a Abraão e devolveu-lhe Sara, sua mulher.
15 आणि अबीमेलेख म्हणाला, “माझा देश तुमच्यासमोर आहे. तुम्हाला आवडेल तिथे राहा.”
15 E disse Abimeleque: "Minha terra está diante de ti; podes ficar onde quiseres".
16 मग साराहला तो म्हणाला, “तुझ्या भावाला मी चांदीचे एक हजार शेकेल देत आहे. मी तुझ्यावर केलेल्या गुन्ह्याबद्दल तुझ्याबरोबरच्या लोकांसमोर ही भरपाई आहे; तू पूर्णपणे निर्दोष आहे.”
16 A Sara ele disse: "Estou dando a seu irmão mil peças de prata, para reparar a ofensa feita a você diante de todos os seus; assim todos saberão que você é inocente".
17 यानंतर अब्राहामाने परमेश्वराजवळ प्रार्थना केली आणि परमेश्वराने अबीमेलेख राजा, राणी व त्याच्या दासी यांना आरोग्य दिले आणि त्यांना परत मुले होऊ लागली.
17 A seguir Abraão orou a Deus, e Deus curou Abimeleque, sua mulher e suas servas, de forma que puderam novamente ter filhos,
18 कारण अब्राहामाची पत्नी साराह हिच्यामुळे याहवेहनी अबीमेलेखाच्या घराण्यातील सर्व स्त्रियांची गर्भधारणा बंद केली होती.
18 porque o Senhor havia tornado estéreis todas as mulheres da casa de Abimeleque por causa de Sara, mulher de Abraão.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Gênesis 20, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.