Gênesis 11
marc (MARC) vs NVI
1 त्याकाळी पृथ्वीवरील सर्व मानवांची एकच भाषा आणि एकच बोली होती.
1 No mundo todo havia apenas uma língua, um só modo de falar.
2 पुढे ते पूर्वेकडे जात असता, त्या लोकांना शिनार प्रांतात एक मैदान लागले आणि त्यांनी तिथे वस्ती केली.
2 Saindo os homens do Oriente, encontraram uma planície em Sinear e ali se fixaram.
3 ते एकमेकास म्हणाले, “चला आपण विटा तयार करून त्याला पक्क्या भाजू या.” त्याप्रमाणे त्यांनी दगडाऐवजी विटा तयार केल्या आणि चुना म्हणून डांबर वापरले.
3 Disseram uns aos outros: "Vamos fazer tijolos e queimá-los bem". Usavam tijolos em lugar de pedras, e piche em vez de argamassa.
4 मग ते म्हणाले, “आपण स्वतःसाठी एक मोठे शहर आणि आकाशाला भिडणारा अतिउंच बुरूज बांधू म्हणजे आपण प्रसिद्ध होऊ; नाहीतर पृथ्वीतलावर आपली पांगापांग होईल.”
4 Depois disseram: "Vamos construir uma cidade, com uma torre que alcance os céus. Assim nosso nome será famoso e não seremos espalhados pela face da terra".
5 परंतु जेव्हा मानव बांधत असलेले शहर आणि बुरूज पाहण्यास याहवेह खाली आले,
5 O Senhor desceu para ver a cidade e a torre que os homens estavam construindo.
6 तेव्हा याहवेह म्हणाले, “हे सर्व एक असून त्यांची भाषा ही एकच आहे, जर ही योजना साध्य झाली तर मानवांना असाध्य असे काहीही राहणार नाही.
6 E disse o Senhor: "Eles são um só povo e falam uma só língua, e começaram a construir isso. Em breve nada poderá impedir o que planejam fazer.
7 चला, आपण खाली जाऊ आणि त्यांच्या भाषेत वेगवेगळ्या भाषांची सरमिसळ करू, म्हणजे त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.”
7 Venham, desçamos e confundamos a língua que falam, para que não entendam mais uns aos outros".
8 अशा रीतीने याहवेहने सर्व पृथ्वीभर मानवांची पांगापांग केली आणि त्यांचे शहर बांधण्याचे काम थांबले.
8 Assim o Senhor os dispersou dali por toda a terra, e pararam de construir a cidade.
9 म्हणून त्या शहराला बाबिलोन म्हणतात, कारण याहवेहने मानवांना गोंधळात पाडून अनेक भाषा दिल्या आणि सर्व पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली.
9 Por isso foi chamada Babel, porque ali o Senhor confundiu a língua de todo o mundo. Dali o Senhor os espalhou por toda a terra.
10 शेमाची वंशावळी:
10 Este é o registro da descendência de Sem: Dois anos depois do Dilúvio, aos 100 anos de idade, Sem gerou Arfaxade.
11 अर्पक्षदाचा पिता झाल्यानंतर शेम आणखी 500 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
11 E depois de ter gerado Arfaxade, Sem viveu 500 anos e gerou outros filhos e filhas.
12 अर्पक्षद 35 वर्षांचा असताना तो शेलाहचा पिता झाला.
12 Aos 35 anos, Arfaxade gerou Salá.
13 शेलाहच्या जन्मानंतर अर्पक्षद आणखी 403 वर्षे जगला. त्या काळात त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
13 Depois que gerou Salá, Arfaxade viveu 403 anos e gerou outros filhos e filhas.
14 जेव्हा शेलाह 30 वर्षांचा झाला तेव्हा तो एबरचा पिता झाला.
14 Aos 30 anos, Salá gerou Héber.
15 आणि एबरचा पिता झाल्यावर शेलाह आणखी 403 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
15 Depois que gerou Héber, Salá viveu 403 anos e gerou outros filhos e filhas.
16 एबरचा पुत्र पेलेग जन्मला तेव्हा एबर 34 वर्षांचा होता.
16 Aos 34 anos, Héber gerou Pelegue.
17 पेलेग जन्मल्यानंतर एबर 430 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
17 Depois que gerou Pelegue, Héber viveu 430 anos e gerou outros filhos e filhas.
18 पेलेगचा पुत्र रऊ जन्मला तेव्हा पेलेग 30 वर्षांचा होता.
18 Aos 30 anos, Pelegue gerou Reú.
19 रऊच्या जन्मानंतर पेलेग आणखी 209 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
19 Depois que gerou Reú, Pelegue viveu 209 anos e gerou outros filhos e filhas.
20 रऊचा पुत्र सरूग जन्मला तेव्हा रऊ 32 वर्षांचा होता.
20 Aos 32 anos, Reú gerou Serugue.
21 सरूगच्या जन्मानंतर रऊ आणखी 207 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
21 Depois que gerou Serugue, Reú viveu 207 anos e gerou outros filhos e filhas.
22 सरूगचा पुत्र नाहोर जन्मला तेव्हा तो 30 वर्षांचा होता.
22 Aos 30 anos, Serugue gerou Naor.
23 नाहोरच्या जन्मानंतर सरूग आणखी 200 वर्षे जगला, आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
23 Depois que gerou Naor, Serugue viveu 200 anos e gerou outros filhos e filhas.
24 नाहोर 29 वर्षांचा होता तेव्हा त्याला तेरह झाला.
24 Aos 29 anos, Naor gerou Terá.
25 तेरहचा पिता झाल्यावर नाहोर पुढे आणखी 119 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
25 Depois que gerou Terá, Naor viveu 119 anos e gerou outros filhos e filhas.
26 तेरह 70 वर्षांचा होईपर्यंत त्याला अब्राम, नाहोर व हारान हे तीन पुत्र झाले.
26 Aos 70 anos, Terá havia gerado Abrão, Naor e Harã.
27 तेरहाच्या वंशजाचा तपशील:
27 Esta é a história da família de Terá: Terá gerou Abrão, Naor e Harã. E Harã gerou Ló.
28 पण हारान त्याच्या पिता तेरह जिवंत असताना, आपल्या जन्मस्थानी, खाल्डियनांच्या ऊर गावी मरण पावला.
28 Harã morreu em Ur dos caldeus, sua terra natal, quando ainda vivia Terá, seu pai.
29 अब्राम व नाहोर यांनी विवाह केले. अब्रामाच्या पत्नीचे नाव साराय होते व नाहोराच्या पत्नीचे नाव मिल्का होते; मिल्का ही हारानाची कन्या होती आणि हारान हा मिल्का व इस्काह यांचा पिता होता.
29 Tanto Abrão como Naor casaram-se. O nome da mulher de Abrão era Sarai, e o nome da mulher de Naor era Milca; esta era filha de Harã, pai de Milca e de Iscá.
30 सारायला मूलबाळ नव्हते कारण ती वांझ होती.
30 Ora, Sarai era estéril; não tinha filhos.
31 मग आपला पुत्र अब्राम, आपला नातू म्हणजे हारानाचा पुत्र लोट आणि आपली सून साराय, यांना बरोबर घेऊन कनान देशात जाण्यासाठी तेरहाने खाल्डियनांचे ऊर गाव सोडले; पण कनान देशात जाण्याऐवजी ते हारान शहरीच स्थायिक झाले.
31 Terá tomou seu filho Abrão, seu neto Ló, filho de Harã, e sua nora Sarai, mulher de seu filho Abrão, e juntos partiram de Ur dos caldeus para Canaã. Mas, ao chegarem a Harã, estabeleceram-se ali.
32 तेरहाचे वय 205 वर्षांचे होऊन, हारान येथे तो मरण पावला.
32 Terá viveu 205 anos e morreu em Harã.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Gênesis 11, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.