Gálatas 4

marc (MARC) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 आता मी असे म्हणतो की वारस जोपर्यंत बाळ आहे, तोपर्यंत तो सर्व मालमत्तेचा धनी असूनही, दासापेक्षा वेगळा नाही.
1 Digo porém que, enquanto o herdeiro é menor de idade, em nada difere de um escravo, embora seja dono de tudo.
2 पित्याने ठरविलेल्या वेळेपर्यंत, त्याला त्याचे पालक व कारभारी सांगतील तसे वागावे लागते.
2 No entanto, ele está sujeito a guardiães e administradores até o tempo determinado por seu pai.
3 जेव्हा आम्ही बालक होतो, तेव्हा आम्ही जगाच्या आत्मिक तत्वांच्या दबावाखाली होतो.
3 Assim também nós, quando éramos menores, estávamos escravizados aos princípios elementares do mundo.
4 परंतु काळाची पूर्णता झाल्यावर परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठविले; ते स्त्रीपासून जन्मलेले, नियमांच्या अधीन असे जन्मले होते.
4 Mas, quando chegou a plenitude do tempo, Deus enviou seu Filho, nascido de mulher, nascido debaixo da lei,
5 जे आपण नियमांच्या अधीन होतो, त्या आपल्याला खंडणी देऊन सोडवावे आणि पुत्र म्हणून दत्तक घ्यावे.
5 a fim de redimir os que estavam sob a lei, para que recebêssemos a adoção de filhos.
6 कारण तुम्ही त्यांचे पुत्र आहात, म्हणूनच परमेश्वराने त्यांचा आत्मा आमच्या हृदयात पाठविला आहे, त्याद्वारेच आपण, “अब्बा, पिता अशी त्यांना हाक मारतो.”
6 E, porque vocês são filhos, Deus enviou o Espírito de seu Filho aos seus corações, o qual clama: "Aba, Pai".
7 आता आपण दास नसून परमेश्वराची लेकरे झालो आहोत, जर लेकरे आहोत, तर परमेश्वराने आपल्याला त्यांचे वारसही केले आहे.
7 Assim, você já não é mais escravo, mas filho; e, por ser filho, Deus também o tornou herdeiro.
8 तुम्हाला परमेश्वराची ओळख होण्यापूर्वी, तुम्ही सुद्धा, जे वास्तविक परमेश्वर नाहीत, त्यांचे दास होता.
8 Antes, quando vocês não conheciam a Deus, eram escravos daqueles que, por natureza, não são deuses.
9 पण आता ज्याअर्थी तुम्हाला परमेश्वराची ओळख झाली आहे, किंवा परमेश्वराद्वारे ओळखले गेला आहात, त्याअर्थी परत त्या दुबळ्या, दयनीय तत्वाच्या प्रभावाखाली का येता? पुन्हा त्याचे दास होण्याची आशा का धरता?
9 Mas agora, conhecendo a Deus, ou melhor, sendo por ele conhecidos, como é que estão voltando àqueles mesmos princípios elementares, fracos e sem poder? Querem ser escravizados por eles outra vez?
10 तुम्ही विशेष दिवस, महिने, ॠतू आणि वर्ष हे पाळता!
10 Vocês estão observando dias especiais, meses, ocasiões específicas e anos!
11 तुम्हासाठी केलेले माझे सारे कष्ट वाया गेले असावेत अशी मला भीती वाटते.
11 Temo que os meus esforços por vocês tenham sido inúteis.
12 प्रिय बंधू व भगिनींनो, माझ्यासारखे व्हा, कारण मी तुमच्यासारखा झालो आहे. तुम्ही माझे काही नुकसान केले नाही.
12 Eu lhes suplico, irmãos, que se tornem como eu, pois eu me tornei como vocês. Em nada vocês me ofenderam;
13 वास्तविक माझ्या शारीरिक आजारात मी तुम्हाला प्रथम शुभवार्तेचा प्रचार केला होता.
13 como sabem, foi por causa de uma doença que lhes preguei o evangelho pela primeira vez.
14 माझ्या शारीरिक आजाराने जणू तुमची परीक्षा झाली, तरी तुम्ही माझा धिक्कार व अवमान केला नाही. उलट तुम्ही माझे स्वागत केले, जणू काही मी परमेश्वराचा दूत, किंवा स्वतः ख्रिस्त येशूच होतो.
14 Embora a minha doença lhes tenha sido uma provação, vocês não me trataram com desprezo ou desdém; pelo contrário, receberam-me como se eu fosse um anjo de Deus, como o próprio Cristo Jesus.
15 तुमची माझ्याविषयीची आशीर्वादाची वृत्ती आता कुठे आहे? मी साक्ष देतो, की शक्य झाले असते तर तुम्ही स्वतःचे डोळेदेखील काढून मला दिले असते.
15 Que aconteceu com a alegria de vocês? Tenho certeza que, se fosse possível, vocês teriam arrancado os próprios olhos para dá-los a mim.
16 आता सत्य बोलून मी तुमचा शत्रू झालो काय?
16 Tornei-me inimigo de vocês por lhes dizer a verdade?
17 ते लोक तुम्हाला आपल्या पक्षात घेण्यास उत्सुक आहेत, पण ते तुमच्या भल्यासाठी नाही. परंतु तुम्ही त्यांचे शिष्य व्हावे, म्हणून ते तुम्हाला आम्हापासून वेगळे करू पाहतात.
17 Os que fazem tanto esforço para agradá-los, não agem bem, mas querem isolá-los a fim de que vocês também mostrem zelo por eles.
18 आस्था असणे आणि उद्देश चांगला असणे गरजेचे आहे, केवळ मी तुमच्याबरोबर आहे तेव्हाच नव्हे तर नेहमीच असे असणे आवश्यक आहे.
18 É bom sempre ser zeloso pelo bem, e não apenas quando estou presente.
19 माझ्या प्रिय मुलांनो, ख्रिस्ताचे स्वरूप तुम्हामध्ये निर्माण होईपर्यंत मला प्रसूती वेदना होत राहतील.
19 Meus filhos, novamente estou sofrendo dores de parto por sua causa, até que Cristo seja formado em vocês.
20 आताच मी तिथे तुमच्याबरोबर असतो व माझा सूर बदलू शकलो असतो, तर बरे झाले असते, कारण मी तुमच्या संदर्भात गोंधळात आहे.
20 Eu gostaria de estar com vocês agora e mudar o meu tom de voz, pois estou perplexo quanto a vocês.
21 मला सांगा, तुम्ही जे नियमांच्या अधीन राहू इच्छिता, त्या तुम्हाला नियम काय म्हणतात याची जाणीव नाही का?
21 Digam-me vocês, os que querem estar debaixo da lei: Acaso vocês não ouvem a lei?
22 असे लिहिले आहे की अब्राहामाला दोन पुत्र होते एक दासीपासून झालेला, तर दुसरा स्वतंत्र स्त्रीपासून झालेला.
22 Pois está escrito que Abraão teve dois filhos, um da escrava e outro da livre.
23 त्या दासीपासून झालेला पुत्र दैहिकरितीने जन्मला, परंतु स्वतंत्र स्त्रीपासून झालेला पुत्र दैवी अभिवचनाचा परिणाम म्हणून जन्मला.
23 O filho da escrava nasceu de modo natural, mas o filho da livre nasceu mediante promessa.
24 अलंकारिक रूपात या गोष्टी घेतल्या आहेत पाहा: या स्त्रिया दोन करार आहेत. त्यापैकी एक करार आहे सीनाय पर्वतावर केलेला करार ज्यामुळे दास्यत्वाच्या संतानाचा जन्म होतो: ही हागार आहे.
24 Isso é usado aqui como uma ilustração; estas mulheres representam duas alianças. Uma aliança procede do monte Sinai e gera filhos para a escravidão: esta é Hagar.
25 आता हागार ही अरबस्थानातील सीनाय पर्वत असा आहे आणि आता अस्तित्वात असलेल्या यरुशलेम शहराचे प्रतीक आहे, कारण ती तिच्या संतानाबरोबर दास्यात आहे.
25 Hagar representa o monte Sinai, na Arábia, e corresponde à atual cidade de Jerusalém, que está escravizada com os seus filhos.
26 परंतु यरुशलेम जी वर आहे ती स्वतंत्र आहे आणि ती आपली मातृनगरी आहे.
26 Mas a Jerusalém do alto é livre, e essa é a nossa mãe.
27 जसे यशायाहने लिहिले आहे:
27 Pois está escrito: "Regozije-se, ó estéril, você que nunca teve um filho; grite de alegria, você que nunca esteve em trabalho de parto; porque mais são os filhos da mulher abandonada do que os daquela que tem marido".
28 आता बंधू व भगिनींनो, आपण इसहाकासारखे अभिवचनाची मुले आहोत.
28 Vocês, irmãos, são filhos da promessa, como Isaque.
29 त्यावेळेस दैहिकरित्या जन्मलेल्या पुत्राने आत्म्याच्या शक्तीने जन्मलेल्या पुत्राचा छळ केला तसेच आताही होत आहे.
29 Naquele tempo, o filho nascido de modo natural perseguia o filho nascido segundo o Espírito. O mesmo acontece agora.
30 पण शास्त्रलेखात काय लिहिले आहे? “दासी व तिचा पुत्र यांना घालवून द्या, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर कधीही वारस होणार नाही.”
30 Mas o que diz a Escritura? "Mande embora a escrava e o seu filho, porque o filho da escrava jamais será herdeiro com o filho da livre".
31 प्रिय बंधू व भगिनींनो, आपण दासीपुत्र नाही, तर आपण स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.
31 Portanto, irmãos, não somos filhos da escrava, mas da livre.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Gálatas 4, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.