Gálatas 3

marc (MARC) vs ARA

Sair da comparação
ARA Almeida Revista e Atualizada 1993
1 अहो मूर्ख गलातीकरांनो! तुम्हाला कोणी मोहात पाडले आहे? तुमच्या डोळ्यांसमोरच येशू ख्रिस्त यांना क्रूसावर खिळण्यात आले असे स्पष्ट चित्रित केले होते.
1 Ó gálatas insensatos! Quem vos fascinou a vós outros, ante cujos olhos foi Jesus Cristo exposto como crucificado?
2 तुमच्याकडून फक्त एकच गोष्ट समजून घेणे मला आवडेल: नियमशास्त्राप्रमाणे कार्य केल्याने तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला किंवा जे काही तुम्ही ऐकले त्यावर विश्वास ठेवल्याने?
2 Quero apenas saber isto de vós: recebestes o Espírito pelas obras da lei ou pela pregação da fé?
3 तुम्ही इतके मूर्ख आहात काय? जे आत्म्याद्वारे सुरू केले ते तुम्ही आता दैहिकरितीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहात काय?
3 Sois assim insensatos que, tendo começado no Espírito, estejais, agora, vos aperfeiçoando na carne?
4 इतके अपार दुःख तुम्ही व्यर्थच अनुभवले आहे काय, जर ते खरोखरच व्यर्थ होते?
4 Terá sido em vão que tantas coisas sofrestes? Se, na verdade, foram em vão.
5 तर मी पुन्हा विचारतो, परमेश्वर त्यांचा आत्मा तुम्हाला देतात आणि चमत्काराचे कार्य तुम्हामध्ये नियमशास्त्राच्या कार्याद्वारे करतात किंवा तुम्ही जे ऐकले आहे त्यावर विश्वास ठेवण्याद्वारे?
5 Aquele, pois, que vos concede o Espírito e que opera milagres entre vós, porventura, o faz pelas obras da lei ou pela pregação da fé?
6 त्याचप्रमाणे अब्राहामानेसुद्धा, “परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.”
6 É o caso de Abraão, que creu em Deus, e isso lhe foi imputado para justiça.
7 ज्यांनी विश्वास ठेवला तीच अब्राहामाची मुले आहेत, हे तुम्हाला स्पष्ट समजू द्या.
7 Sabei, pois, que os da fé é que são filhos de Abraão.
8 पवित्र शास्त्राने आधी सांगितले होते की परमेश्वर विश्वासाने गैरयहूदीयांना नीतिमान ठरवतील आणि त्यांनी अब्राहामास आधी शुभवार्तेची घोषणा केली: “तुझ्याद्वारे सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील.”
8 Ora, tendo a Escritura previsto que Deus justificaria pela fé os gentios, preanunciou o evangelho a Abraão: Em ti, serão abençoados todos os povos.
9 म्हणून जे विश्वास ठेवतात त्यांना विश्वासू अब्राहामासोबत आशीर्वाद प्राप्त होतील.
9 De modo que os da fé são abençoados com o crente Abraão.
10 जे नियमशास्त्रावर विसंबून आहेत ते सर्वजण शापाच्या बंधनाखाली आहेत. कारण पवित्रशास्त्र स्पष्ट म्हणते: “जो कोणी नियमशास्त्राच्या पुस्तकात जे सर्वकाही लिहिले आहे त्याप्रमाणे करीत नाही तो शापित आहे.”
10 Todos quantos, pois, são das obras da lei estão debaixo de maldição; porque está escrito: Maldito todo aquele que não permanece em todas as coisas escritas no Livro da lei, para praticá-las.
11 यास्तव, हे अगदी स्पष्ट आहे की नियमशास्त्रावर अवलंबून राहणारे परमेश्वरापुढे नीतिमान ठरणार नाहीत, कारण “नीतिमान विश्वासाने जगेल.”
11 E é evidente que, pela lei, ninguém é justificado diante de Deus, porque o justo viverá pela fé.
12 नियम विश्वासावर आधारित नाही; याव्यतिरिक्त नियमशास्त्र म्हणते, “जो कोणी या गोष्टी करेल तो त्यामुळे जिवंत राहील.”
12 Ora, a lei não procede de fé, mas: Aquele que observar os seus preceitos por eles viverá.
13 ख्रिस्ताने आम्हासाठी शाप होऊन, नियमशास्त्राच्या शापापासून आम्हाला खंडणी देऊन सोडविले, कारण असे लिहिले आहे, “जो कोणी खांबावर टांगला आहे, तो शापित आहे.”
13 Cristo nos resgatou da maldição da lei, fazendo-se ele próprio maldição em nosso lugar (porque está escrito: Maldito todo aquele que for pendurado em madeiro ),
14 हे सर्व यासाठी की अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूंच्याद्वारे गैरयहूदीयांनाही प्राप्त व्हावा, म्हणजे विश्वासाद्वारे अभिवचन दिल्याप्रमाणे आपल्याला आत्म्याचे दान प्राप्त व्हावे.
14 para que a bênção de Abraão chegasse aos gentios, em Jesus Cristo, a fim de que recebêssemos, pela fé, o Espírito prometido.
15 प्रिय बंधू व भगिनींनो, रोजच्या जीवनातील उदाहरण देतो. मानवी करार जो प्रस्थापित केलेला आहे त्यात कोणी वेगळे करू शकत नाही किंवा त्यामध्ये भर घालू शकत नाही त्याप्रमाणे हे आहे.
15 Irmãos, falo como homem. Ainda que uma aliança seja meramente humana, uma vez ratificada, ninguém a revoga ou lhe acrescenta alguma coisa.
16 ही अभिवचने अब्राहाम व त्याच्या संतानाला दिली होती. शास्त्रलेख “आणि संतानांना” असे अनेक लोकांविषयी म्हणत नाही, तर “आणि तुझ्या संतानाला,” म्हणजे एका व्यक्तीविषयी म्हणतात, आणि ते ख्रिस्त आहे.
16 Ora, as promessas foram feitas a Abraão e ao seu descendente. Não diz: E aos descendentes, como se falando de muitos, porém como de um só: E ao teu descendente, que é Cristo.
17 मला म्हणावयाचे ते हे: चारशेतीस वर्षानंतर देण्यात आलेले नियमशास्त्र, परमेश्वराने आधी कायम केलेल्या कराराला वेगळे करू शकत नाही व दिलेले वचन रद्द करू शकत नाही.
17 E digo isto: uma aliança já anteriormente confirmada por Deus, a lei, que veio quatrocentos e trinta anos depois, não a pode ab-rogar, de forma que venha a desfazer a promessa.
18 कारण जर वारसा नियमशास्त्रावर अवलंबून आहे, तर ते अभिवचनांवर अवलंबून नाही. परंतु परमेश्वराने अब्राहामाला आपल्या कृपेने, अभिवचनाद्वारे वारसाहक्क दिला.
18 Porque, se a herança provém de lei, já não decorre de promessa; mas foi pela promessa que Deus a concedeu gratuitamente a Abraão.
19 तर मग नियमशास्त्र कशासाठी देण्यात आले? ज्या संतानाला त्यांचे अभिवचन दिलेले होते, त्यांचे आगमन होईपर्यंत उल्लंघन काय आहे हे समजण्यासाठी हे लावून दिले होते. आपले नियम देवदूतांद्वारे मध्यस्थाला सोपवून दिले.
19 Qual, pois, a razão de ser da lei? Foi adicionada por causa das transgressões, até que viesse o descendente a quem se fez a promessa, e foi promulgada por meio de anjos, pela mão de um mediador.
20 मध्यस्थ म्हणजे एकापेक्षा अधिक पक्षाचा असतो; पण परमेश्वर एक आहे.
20 Ora, o mediador não é de um, mas Deus é um.
21 तर मग नियमशास्त्र आणि परमेश्वराची अभिवचने परस्परविरोधी आहेत काय? मुळीच नाही! नियमशास्त्र दिल्याने जीवन मिळत असले, तर नीतिमत्व नियमापासून आले असते.
21 É, porventura, a lei contrária às promessas de Deus? De modo nenhum! Porque, se fosse promulgada uma lei que pudesse dar vida, a justiça, na verdade, seria procedente de lei.
22 पूर्ण जग पापाच्या नियंत्रणात आहे असे शास्त्रलेखाने स्पष्ट केले. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार्‍यांाठी जे अभिवचन मिळणार होते, ते त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांना दिले जावे.
22 Mas a Escritura encerrou tudo sob o pecado, para que, mediante a fé em Jesus Cristo, fosse a promessa concedida aos que creem.
23 हा विश्वास येण्यापूर्वी, आपण नियमशास्त्राच्या पहार्‍यात होतो आणि आपण पहार्‍यात राहू जोपर्यंत तो विश्वास प्रकट होत नाही.
23 Mas, antes que viesse a fé, estávamos sob a tutela da lei e nela encerrados, para essa fé que, de futuro, haveria de revelar-se.
24 विश्वासाद्वारे आपल्याला नीतिमान ठरविण्यासाठी ख्रिस्त येईपर्यंत नियमशास्त्र आपले संरक्षक होते.
24 De maneira que a lei nos serviu de aio para nos conduzir a Cristo, a fim de que fôssemos justificados por fé.
25 पण आता विश्वास आल्यामुळे आपण संरक्षकाच्या अधीन नाही.
25 Mas, tendo vindo a fé, já não permanecemos subordinados ao aio.
26 कारण आता आपण ख्रिस्त येशूंवरील विश्वासाच्याद्वारे परमेश्वराची लेकरे आहोत.
26 Pois todos vós sois filhos de Deus mediante a fé em Cristo Jesus;
27 ज्या आपण सर्वांनी ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, त्या आपण ख्रिस्ताला परिधान केले आहे.
27 porque todos quantos fostes batizados em Cristo de Cristo vos revestistes.
28 आता कोणी यहूदी किंवा गैरयहूदी, गुलाम किंवा स्वतंत्र, स्त्री किंवा पुरुष नाहीत, तर आपण सर्व ख्रिस्त येशूंमध्ये एक आहोत,
28 Dessarte, não pode haver judeu nem grego; nem escravo nem liberto; nem homem nem mulher; porque todos vós sois um em Cristo Jesus.
29 जर आपण ख्रिस्ताचे आहोत तर अब्राहामाचे खरे संतान व परमेश्वराने दिलेल्या अभिवचनांचे वारस आहोत.
29 E, se sois de Cristo, também sois descendentes de Abraão e herdeiros segundo a promessa.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Gálatas 3, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.