Filipenses 4
marc (MARC) vs VC
1 यास्तव, बंधू व भगिनींनो, जो मी तुम्हावर प्रीती करतो व तुम्हाला भेटावयास उत्कंठित आहे व जे तुम्ही माझा आनंद, मुकुट आहात, प्रभूमध्ये अशाप्रकारे स्थिर राहा.
1 Portanto, meus muito amados e saudosos irmãos, alegria e coroa minha, continuai assim firmes no Senhor, caríssimos.
2 मी युवदीयेला विनंती करतो व सुंतुखेस विनंती करतो की प्रभूमध्ये एकमनाचे व्हा.
2 Exorto a Evódia, exorto igualmente a Síntique que vivam em paz no Senhor.
3 होय, माझ्या जिवलग मित्रा, मी तुलाही विनवितो की या भगिनींना साहाय्य कर; कारण शुभवार्तेसाठी माझ्या बरोबरीने, तसेच क्लेमेंत आणि ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत, अशा माझ्या इतर सहकार्यांबरोबर देखील त्यांनी श्रम केले आहेत.
3 E a ti, fiel Sínzigo, também rogo que as ajudes, pois que trabalharam comigo no Evangelho, com Clemente e com os demais colaboradores meus, cujos nomes estão inscritos no livro da vida.
4 प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. मी पुन्हा सांगतो आनंद करा.
4 Alegrai-vos sempre no Senhor. Repito: alegrai-vos!
5 तुमची सौम्यता प्रत्येकाला दिसून येऊ द्या. प्रभू समीप आहेत.
5 Seja conhecida de todos os homens a vossa bondade. O Senhor está próximo.
6 कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व परिस्थितीत, प्रार्थना व विनवणी करीत, उपकारस्तुतीसह आपल्या मागण्या परमेश्वराला कळवा.
6 Não vos inquieteis com nada! Em todas as circunstâncias apresentai a Deus as vossas preocupações, mediante a oração, as súplicas e a ação de graças.
7 आणि परमेश्वराची शांती, जी आपल्या सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमचे विचार आणि तुमची मने ख्रिस्त येशूंमध्ये राखील.
7 E a paz de Deus, que excede toda a inteligência, haverá de guardar vossos corações e vossos pensamentos, em Cristo Jesus.
8 शेवटी, बंधू आणि भगिनींनो, जे काही सत्य, जे काही आदरणीय व जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही सुंदर, जे काही प्रशंसनीय, श्रवणीय आणि स्तुतिपात्र आहे त्याचा विचार करा.
8 Além disso, irmãos, tudo o que é verdadeiro, tudo o que é nobre, tudo o que é justo, tudo o que é puro, tudo o que é amável, tudo o que é de boa fama, tudo o que é virtuoso e louvável, eis o que deve ocupar vossos pensamentos.
9 माझ्यापासून तुम्ही जे सर्वकाही शिकला किंवा स्वीकारले किंवा ऐकले, किंवा मजमध्ये पाहिले त्यानुसार आचरण करा आणि शांती देणारे परमेश्वर तुम्हाबरोबर राहतील.
9 O que aprendestes, recebestes, ouvistes e observastes em mim, isto praticai, e o Deus da paz estará convosco.
10 मी प्रभूमध्ये स्तुती करतो की शेवटी तुम्हाला माझ्याविषयीची पुन्हा काळजी उत्पन्न झाली. तुम्ही खरोखर काळजी करीत होता हे मला माहीत आहे, पण ते तुम्हाला प्रकट करण्याची संधी मिळाली नाही.
10 Fiquei imensamente contente, no Senhor, porque, finalmente, vi reflorescer o vosso interesse por mim. É verdade que sempre pensáveis nisso, mas vos faltava oportunidade de mostrá-lo.
11 मला गरज आहे म्हणून मी हे बोलतो असे नाही, कारण कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहण्यास मी शिकलो आहे.
11 Não é minha penúria que me faz falar. Aprendi a contentar-me com o que tenho.
12 मला गरजेमध्ये राहणे, विपुलतेमध्ये राहणे हे माहीत आहे. कोणत्याही परिस्थितीत व प्रत्येक परिस्थितीत भरल्यापोटी अथवा भुकेला, संपन्नतेत किंवा विपन्नतेत, समाधानी कसे राहावे हे मला माहीत आहे.
12 Sei viver na penúria, e sei também viver na abundância. Estou acostumado a todas as vicissitudes: a ter fartura e a passar fome, a ter abundância e a padecer necessidade.
13 जे मला शक्ती देतात त्यांच्याद्वारे सर्वकाही करण्यास मी समर्थ आहे.
13 Tudo posso naquele que me conforta.
14 तरीही तुम्ही माझ्या दुःखात सहभागी झाला हे योग्य केले.
14 Contudo, fizestes bem em tomar parte na minha tribulação.
15 फिलिप्पैकरांनो, तुम्हाला हे माहीत आहे की, शुभवार्तेच्या प्रारंभीच्या दिवसात मी मासेदोनियामधून गेलो, तेव्हा देण्याघेण्यामध्ये केवळ तुमच्याशिवाय कोणत्याच मंडळीने माझ्याशी भागीदारी केली नाही.
15 Vós que sois de Filipos, bem sabeis como, no início do meu ministério evangélico, quando parti da Macedônia, nenhuma comunidade abriu comigo contas de deve-haver, senão vós somente.
16 मी थेस्सलनीका येथे गरजेत असताना, तुम्ही मला एकदाच नव्हे तर दोनदा मदत पाठविली.
16 Já por duas vezes mandastes para Tessalônica o que me era necessário.
17 मला तुमची देणगी पाहिजे असे नाही, तर तुमच्या हिशेबी मोबदला वाढावा किंवा तुम्हाला लाभ व्हावा अशी मी अपेक्षा करतो.
17 Não é o donativo em si que eu procuro, e sim os lucros que vão aumentando a vosso crédito.
18 मजजवळ सर्वकाही आहे आणि ते भरपूर प्रमाणात आहे! एपफ्रदीत आला, तेव्हा त्याच्याबरोबर पाठविलेल्या देणग्यांमुळे मी अगदी भरून गेलो आहे. त्या देणग्या म्हणजे परमेश्वराला मान्य, संतोष देणारा सुगंधी यज्ञच आहेत.
18 Recebi tudo, e em abundância. Estou bem provido, depois que recebi de Epafrodito a vossa oferta: foi um suave perfume, um sacrifício que Deus aceita com agrado.
19 त्यामुळे परमेश्वर स्वतः ख्रिस्त येशूंमध्ये तुमच्या सर्व गरजा आपल्या गौरवी संपत्तीतून पुरवतील.
19 Em recompensa, o meu Deus há de prover magnificamente a todas as vossas necessidades, segundo a sua glória, em Jesus Cristo.
20 खरोखर, आता परमेश्वर जे आपला पिता त्यांना सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.
20 A Deus, nosso Pai, seja a glória, por toda a eternidade! Amém.
21 तेथील सर्व पवित्र लोकांना ख्रिस्त येशूंमध्ये माझी विचारणा सांगा.
21 Saudai em Jesus Cristo todos os santos. Os irmãos que estão comigo vos saúdam.
22 आणि येथील सर्व परमेश्वराचे लोक, विशेषकरून जे कैसराच्या कुटुंबातील आहेत, तुम्हा सर्वांना आपल्या शुभेच्छा पाठवितात.
22 Todos os santos vos saúdam, especialmente os da casa de César.
23 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्यासोबत असो. आमेन.
23 A graça do Senhor Jesus Cristo esteja com o vosso espírito!
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Filipenses 4, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.