Filemom 1

marc (MARC) vs ARC

Sair da comparação
ARC Almeida Revista e Corrigida 2009
1 ख्रिस्त येशूंचा बंदिवान पौल आणि आपला बंधू तीमथ्य,
1 Paulo, prisioneiro de Jesus Cristo, e o irmão Timóteo, ao amado Filemom, nosso cooperador,
2 आमची बहीण अप्फिया आणि आमचा सहसैनिक अर्खिप—आणि जी मंडळी तुमच्या घरात एकत्र भेटतात त्यांना:
2 e à nossa irmã Áfia, e a Arquipo, nosso companheiro, e à igreja que está em tua casa:
3 परमेश्वर आपले पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो.
3 graça a vós e paz, da parte de Deus, nosso Pai, e da do Senhor Jesus Cristo.
4 मी माझ्या प्रार्थनांमध्ये तुझी आठवण करून माझ्या परमेश्वराचे सतत आभार मानतो,
4 Graças dou ao meu Deus, lembrando-me sempre de ti nas minhas orações,
5 कारण त्यांच्या सर्व पवित्र लोकांवरील तुझी प्रीती आणि प्रभू येशूंवरील तुझा विश्वास याविषयी मी ऐकले आहे.
5 ouvindo o teu amor e a fé que tens para com o Senhor Jesus Cristo e para com todos os santos;
6 तुला ख्रिस्तात प्राप्त होणार्‍या सर्व चांगल्या गोष्टींचे सखोल ज्ञान होण्यासाठी तुझी आमच्याबरोबर विश्वासामध्ये असलेली भागीदारी कार्यरत व्हावी अशी मी प्रार्थना करतो.
6 para que a comunicação da tua fé seja eficaz, no conhecimento de todo o bem que em vós há, por Cristo Jesus.
7 तुझ्या प्रीतीने मला फार आनंद व प्रोत्साहन प्राप्त झाले आहे, कारण बंधू, तू प्रभूच्या लोकांची अंतःकरणे ताजीतवानी केली आहेस.
7 Tive grande gozo e consolação do teu amor, porque por ti, ó irmão, o coração dos santos foi reanimado.
8 यास्तव, जे योग्य आहे ते तू करावे म्हणून तुला आज्ञा देण्याचे जरी मला ख्रिस्ताद्वारे धैर्य आहे,
8 Pelo que, ainda que tenha em Cristo grande confiança para te mandar o que te convém,
9 तरी मी पौल—वयस्क मनुष्य आणि आता ख्रिस्त येशूंचा बंदिवान, तुला प्रीतीस्तव विनंती करण्याचे पसंत करतो.
9 todavia, peço- te, antes, por amor, sendo eu tal como sou, Paulo, o velho e também agora prisioneiro de Jesus Cristo.
10 माझी विनंती माझा पुत्र अनेसिम जो मी बंधनात असताना माझा आत्मिक पुत्र झाला त्याच्या संदर्भात आहे.
10 Peço-te por meu filho Onésimo, que gerei nas minhas prisões,
11 तो यापूर्वी तुला उपयोगी नव्हता, परंतु आता तो आपल्या दोघांनाही, तुला व मला उपयोगी आहे.
11 o qual, noutro tempo, te foi inútil, mas, agora, a ti e a mim, muito útil; eu to tornei a enviar.
12 तो माझा प्राण आहे—त्याला मी तुझ्याकडे—परत पाठवित आहे.
12 E tu torna a recebê-lo como ao meu coração.
13 शुभवार्तेमुळे मी या बंधनात असताना माझी मदत करण्यासाठी त्याने तुझी जागा घेतली असती आणि त्याला येथेच ठेवणे मला आवडले असते.
13 Eu bem o quisera conservar comigo, para que, por ti, me servisse nas prisões do evangelho;
14 परंतु तुझ्या संमतीशिवाय काहीही करणे मला योग्य वाटले नाही, यासाठी की जे काही औदार्य तू करशील ते बळजबरीने केल्यासारखे नसावे परंतु स्वेच्छेने केलेले असावे.
14 mas nada quis fazer sem o teu parecer, para que o teu benefício não fosse como por força, mas voluntário.
15 कदाचित या कारणासाठी तो थोडा काळ तुझ्यापासून वेगळा झाला असेल, जेणेकरून तू त्याला सर्वकाळासाठी प्राप्त करून घ्यावे.
15 Porque bem pode ser que ele se tenha separado de ti por algum tempo, para que o retivesses para sempre,
16 परंतु येथून पुढे दास नव्हे, तर दासापेक्षा योग्य असा प्रिय बंधू व्हावे. तो मला अतिशय प्रिय आहे, परंतु व्यक्तिगत रीतीने आणि प्रभूमध्ये बंधू या दोन्हीही नात्याने तो तुला अधिक प्रिय आहे.
16 não já como servo; antes, mais do que servo, como irmão amado, particularmente de mim e quanto mais de ti, assim na carne como no Senhor.
17 यास्तव जर तू मला भागीदार समजत असशील, तर जसे तू माझे स्वागत केले असते, तसेच त्याचे कर.
17 Assim, pois, se me tens por companheiro, recebe-o como a mim mesmo.
18 जर त्याने काही अयोग्य कृत्य केले असेल अथवा तो तुझा कर्जदार असेल तर ते मूल्य माझ्या हिशोबी मांड.
18 E, se te fez algum dano ou te deve alguma coisa, põe isso na minha conta.
19 हे, मी पौल, माझ्या स्वतःच्या हातांनी लिहित आहे. मी त्याची परतफेड करेन—वास्तविक तू स्वतः माझा ॠणी आहेस, परंतु मी त्याचा उल्लेख करणार नाही.
19 Eu, Paulo, de minha própria mão o escrevi: Eu o pagarei, para te não dizer que ainda mesmo a ti próprio a mim te deves.
20 बंधू, माझी इच्छा आहे की प्रभूमध्ये मला तुझ्याकडून काही लाभ व्हावा; माझ्या ह्रदयाला ख्रिस्तामध्ये ताजेतवाने कर.
20 Sim, irmão, eu me regozijarei de ti no Senhor; reanima o meu coração, no Senhor.
21 तू आज्ञापालन करशील याची खात्री बाळगून मी तुला हे लिहिले आहे आणि जे मी तुला सांगत आहे त्यापेक्षा तू कितीतरी अधिक करशील हे मला माहीत आहे.
21 Escrevi-te confiado na tua obediência, sabendo que ainda farás mais do que digo.
22 आणखी एक गोष्ट: माझ्यासाठी पाहुण्यांची खोली तयार ठेव, कारण तुझ्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून माझ्या येण्याने तुझी भरपाई होईल अशी मी आशा करतो.
22 E juntamente prepara-me também pousada, porque espero que, pelas vossas orações, vos hei de ser concedido.
23 ख्रिस्त येशूंमध्ये माझा सहबंदीवान एपफ्रास तुला शुभेच्छा पाठवितो.
23 Saúdam-te Epafras, meu companheiro de prisão por Cristo Jesus,
24 आणि मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे माझे सहकारी देखील तुला शुभेच्छा पाठवितात.
24 Marcos, Aristarco, Demas e Lucas, meus cooperadores.
25 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्यासह असो.
25 A graça de nosso Senhor Jesus Cristo seja com o vosso espírito. Amém!

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Filemom 1, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.