Ezequiel 37

marc (MARC) vs ARA

Sair da comparação
ARA Almeida Revista e Atualizada 1993
1 याहवेहचा हात माझ्यावर होता आणि त्यांनी मला याहवेहच्या आत्म्याच्या द्वारे बाहेर आणले आणि खोर्‍याच्या मधोमध ठेवले; ते हाडांनी भरलेले होते.
1 Veio sobre mim a mão do Senhor ; ele me levou pelo Espírito do Senhor e me deixou no meio de um vale que estava cheio de ossos,
2 त्याने मला त्यातून चहूकडून फिरविले आणि मी पाहिले की खोर्‍याच्या भूमीवर पुष्कळ हाडे होती, ती हाडे तर शुष्क होती.
2 e me fez andar ao redor deles; eram mui numerosos na superfície do vale e estavam sequíssimos.
3 याहवेहने मला विचारले, “मानवपुत्रा, ही हाडे जिवंत होतील काय?”
3 Então, me perguntou: Filho do homem, acaso, poderão reviver estes ossos? Respondi: Senhor Deus, tu o sabes.
4 तेव्हा याहवेहने मला म्हटले, “या हाडांना भविष्यवाणी करून त्यांना सांग, ‘शुष्क हाडांनो, याहवेहचे वचन ऐका!
4 Disse-me ele: Profetiza a estes ossos e dize-lhes: Ossos secos, ouvi a palavra do Senhor .
5 या हाडांना सार्वभौम याहवेह म्हणतात: मी तुमच्यात श्वास घालेन आणि तुम्ही जिवंत व्हाल.
5 Assim diz o Senhor Deus a estes ossos: Eis que farei entrar o espírito em vós, e vivereis.
6 मी तुम्हावर स्नायू लावेन आणि तुम्हावर मांस चढवेन आणि तुम्हाला कातडीने आच्छादेन; मी तुम्हामध्ये श्वास घालेन आणि तुम्ही जिवंत व्हाल. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”
6 Porei tendões sobre vós, farei crescer carne sobre vós, sobre vós estenderei pele e porei em vós o espírito, e vivereis. E sabereis que eu sou o Senhor .
7 तेव्हा मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी भविष्यवाणी केली. आणि मी भविष्यवाणी करीत असता, मोठा आवाज, खडखडाट झाला, तेव्हा एक हाड दुसऱ्या हाडाशी, अशी हाडे एकत्र जडली.
7 Então, profetizei segundo me fora ordenado; enquanto eu profetizava, houve um ruído, um barulho de ossos que batiam contra ossos e se ajuntavam, cada osso ao seu osso.
8 तेव्हा मी पाहिले, स्नायू आणि मांस त्यांच्यावर आले आणि कातडीने त्यांना आच्छादले, पण त्यांच्यात श्वास नव्हता.
8 Olhei, e eis que havia tendões sobre eles, e cresceram as carnes, e se estendeu a pele sobre eles; mas não havia neles o espírito.
9 तेव्हा याहवेहने मला म्हटले, “श्वासाला भविष्य करून सांग; मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि त्याला सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे श्वासा, चारही बाजूंनी ये आणि या वधलेल्यांवर फुंकर घाल, म्हणजे ते जिवंत होतील.’ ”
9 Então, ele me disse: Profetiza ao espírito, profetiza, ó filho do homem, e dize-lhe: Assim diz o Senhor Deus: Vem dos quatro ventos, ó espírito, e assopra sobre estes mortos, para que vivam.
10 याहवेहने मला आज्ञा केल्याप्रमाणे मी भविष्यवाणी केली आणि श्वास त्यांच्यात आला; ते जिवंत झाले आणि एक मोठे सैन्य त्यांच्या पायांवर उभे राहिले.
10 Profetizei como ele me ordenara, e o espírito entrou neles, e viveram e se puseram em pé, um exército sobremodo numeroso.
11 तेव्हा याहवेहने मला म्हटले: “मानवपुत्रा, ही हाडे म्हणजे इस्राएली लोक आहेत. ते म्हणतात, ‘आमची हाडे शुष्क झाली आहेत आणि आमची आशा नाहीशी झाली आहे; आम्ही नाश पावलो आहोत.’
11 Então, me disse: Filho do homem, estes ossos são toda a casa de Israel. Eis que dizem: Os nossos ossos se secaram, e pereceu a nossa esperança; estamos de todo exterminados.
12 यास्तव भविष्यवाणी कर आणि त्यांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या लोकांनो मी तुमच्या कबरा उघडून त्यातून तुम्हाला बाहेर काढणार आहे; मी तुम्हाला इस्राएल देशात परत आणेन.
12 Portanto, profetiza e dize-lhes: Assim diz o Senhor Deus: Eis que abrirei a vossa sepultura, e vos farei sair dela, ó povo meu, e vos trarei à terra de Israel.
13 जेव्हा मी तुमच्या कबरा उघडेन आणि त्यातून तुम्हाला बाहेर आणेन तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.
13 Sabereis que eu sou o Senhor , quando eu abrir a vossa sepultura e vos fizer sair dela, ó povo meu.
14 मी माझा आत्मा तुमच्यात घालेन आणि तुम्ही जिवंत व्हाल आणि मी तुम्हाला तुमच्या देशात स्थायिक करेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मी याहवेह जे बोललो आहे, तेच मी केले आहे, असे याहवेह जाहीर करतात.’ ”
14 Porei em vós o meu Espírito, e vivereis, e vos estabelecerei na vossa própria terra. Então, sabereis que eu, o Senhor , disse isto e o fiz, diz o Senhor .
15 याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
15 Veio a mim a palavra do Senhor , dizendo:
16 “मानवपुत्रा, लाकडाची एक काठी घे आणि त्यावर लिही, ‘यहूदाह व त्याच्या सोबतीच्या इस्राएली लोकांचे.’ मग लाकडाची आणखी एक काठी घे आणि त्यावर लिही, ‘योसेफ (म्हणजेच एफ्राईम) आणि त्याच्या सोबतीच्या सर्व इस्राएली लोकांचे.’
16 Tu, pois, ó filho do homem, toma um pedaço de madeira e escreve nele: Para Judá e para os filhos de Israel, seus companheiros; depois, toma outro pedaço de madeira e escreve nele: Para José, pedaço de madeira de Efraim, e para toda a casa de Israel, seus companheiros.
17 या दोन काठ्यांना जोडून ती एक काठी दिसेल अशी ती तुझ्या हातात धर.
17 Ajunta-os um ao outro, faze deles um só pedaço, para que se tornem apenas um na tua mão.
18 “जेव्हा तुझे लोक तुला विचारतील, ‘याचा अर्थ काय आहे हे तू आम्हाला सांगणार नाही काय?’
18 Quando te falarem os filhos do teu povo, dizendo: Não nos revelarás o que significam estas coisas?
19 त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: योसेफाची काठी; जी एफ्राईमच्या हातात आहे तिला व इस्राएलचे जे लोक त्याचे सोबती आहेत, त्यांना मी घेऊन यहूदीयाच्या काठीशी जोडीन. मी त्यांना लाकडाची एक काठी करेन आणि ते माझ्या हातात एक होतील.’
19 Tu lhes dirás: Assim diz o Senhor Deus: Eis que tomarei o pedaço de madeira de José, que esteve na mão de Efraim, e das tribos de Israel, suas companheiras, e o ajuntarei ao pedaço de Judá, e farei deles um só pedaço, e se tornarão apenas um na minha mão.
20 ज्या काठ्यांवर तू लिहिले त्या काठ्या त्यांच्या नजरेसमोर धर
20 Os pedaços de madeira em que houveres escrito estarão na tua mão, perante eles.
21 आणि त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएली लोक ज्या राष्ट्रांमध्ये गेले आहेत, तिथून मी त्यांना बाहेर काढेन. चहूकडून मी त्यांना एकवटेन आणि त्यांना स्वदेशात आणेन.
21 Dize-lhes, pois: Assim diz o Senhor Deus: Eis que eu tomarei os filhos de Israel de entre as nações para onde eles foram, e os congregarei de todas as partes, e os levarei para a sua própria terra.
22 मी त्यांना या देशात, इस्राएलच्या पर्वतांवर एक राष्ट्र असे करेन. त्या सर्वांवर एक राजा असणार आणि ते यापुढे दोन राष्ट्र नसतील किंवा ते दोन राज्यांमध्ये विभागले जाणार नाहीत.
22 Farei deles uma só nação na terra, nos montes de Israel, e um só rei será rei de todos eles. Nunca mais serão duas nações; nunca mais para o futuro se dividirão em dois reinos.
23 आणि ते पुन्हा त्यांच्या मूर्तींनी व अमंगळ प्रतिमांनी किंवा त्यांच्या पातकांनी यापुढे स्वतःला भ्रष्ट करणार नाहीत, कारण त्यांच्या सर्व पापमय घसरणीपासून मी त्यांना वाचवेन आणि मी त्यांना शुद्ध करेन. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.
23 Nunca mais se contaminarão com os seus ídolos, nem com as suas abominações, nem com qualquer das suas transgressões; livrá-los-ei de todas as suas apostasias em que pecaram e os purificarei. Assim, eles serão o meu povo, e eu serei o seu Deus.
24 “ ‘माझा सेवक दावीद, त्यांच्यावर राजा होईल, आणि त्या सर्वांना एकच मेंढपाळ असेल. ते माझ्या नियमांचे अनुसरण करतील आणि माझे विधी काळजीपूर्वक पाळतील.
24 O meu servo Davi reinará sobre eles; todos eles terão um só pastor, andarão nos meus juízos, guardarão os meus estatutos e os observarão.
25 माझा सेवक याकोबाला मी दिलेल्या देशात, जिथे तुमचे पूर्वज राहिले तिथे ते राहतील. ते व त्यांची लेकरे आणि त्यांच्या लेकरांची लेकरे सर्वकाळ तिथे राहतील आणि माझा सेवक दावीद सर्वकाळासाठी त्यांचा राजपुत्र असेल.
25 Habitarão na terra que dei a meu servo Jacó, na qual vossos pais habitaram; habitarão nela, eles e seus filhos e os filhos de seus filhos, para sempre; e Davi, meu servo, será seu príncipe eternamente.
26 मी त्यांच्याशी शांतीचा करार करेन; तो सर्वकाळचा करार असेल. मी त्यांना स्थापित करेन आणि त्यांची संख्या बहुगुणित करेन, आणि मी माझे पवित्रस्थान सर्वकाळासाठी त्यांच्यात ठेवेन.
26 Farei com eles aliança de paz; será aliança perpétua. Estabelecê-los-ei, e os multiplicarei, e porei o meu santuário no meio deles, para sempre.
27 माझे निवासस्थान त्यांच्याबरोबर राहील; मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझे लोक होतील.
27 O meu tabernáculo estará com eles; eu serei o seu Deus, e eles serão o meu povo.
28 जेव्हा माझे पवित्रस्थान सदासर्वकाळ त्यांच्यामध्ये राहील, तेव्हा सर्व राष्ट्रे जाणतील की मी याहवेह इस्राएलला पवित्र करतो.’ ”
28 As nações saberão que eu sou o Senhor que santifico a Israel, quando o meu santuário estiver para sempre no meio deles.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Ezequiel 37, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.