Ezequiel 36
marc (MARC) vs ARA
1 “मानवपुत्रा, इस्राएलच्या पर्वतांना भविष्यवाणी करून सांग, ‘इस्राएलच्या पर्वतांनो, याहवेहचे वचन ऐका.
1 Tu, ó filho do homem, profetiza aos montes de Israel e dize: Montes de Israel, ouvi a palavra do Senhor .
2 सार्वभौम याहवेह असे म्हणतात: शत्रूंनी तुम्हाला म्हटले, “अाहा! पुरातन शिखरे आमचे वतन झाले आहे.” ’
2 Assim diz o Senhor Deus: Visto que diz o inimigo contra vós outros: Bem feito!, e também: Os eternos lugares altos são nossa herança,
3 म्हणून भविष्यवाणी कर आणि सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुम्ही बाकीच्या राष्ट्रांचे वतन व्हावे व लोकांच्या द्वेष व निंदेचा विषय व्हावे म्हणून चहूकडून त्यांनी तुम्हाला उद्ध्वस्त करून तुम्हाला सर्व बाजूंनी ठेचले आहे,
3 portanto, profetiza e dize: Assim diz o Senhor Deus: Visto que vos assolaram e procuraram abocar-vos de todos os lados, para que fôsseis possessão do resto das nações e andais em lábios paroleiros e na infâmia do povo,
4 यास्तव, इस्राएलच्या पर्वतांनो सार्वभौम याहवेहचे वचन ऐका: पर्वत व टेकड्यांना, ओहोळे व खोर्यांना, ओसाड अवशेष व तुमच्या सभोवती असलेल्या बाकीच्या राष्ट्रांनी लुटून अपमानित केलेल्या उजाड नगरांना सार्वभौम याहवेह असे म्हणतात;
4 portanto, ouvi, ó montes de Israel, a palavra do Senhor Deus: Assim diz o Senhor Deus aos montes e aos outeiros, às correntes e aos vales, aos lugares desertos e desolados e às cidades desamparadas, que se tornaram rapina e escárnio para o resto das nações circunvizinhas.
5 सार्वभौम याहवेह म्हणतात: माझ्या पेटलेल्या आवेशात बाकी राष्ट्रांच्या विरुद्ध, आणि एदोमविरुद्ध मी बोललो, कारण त्यांच्या हृदयातील उल्हास व द्वेषाने त्यांनी माझ्या देशातील कुरणे लुटावी म्हणून त्याला आपलेच वतन करून घेतले.’
5 Portanto, assim diz o Senhor Deus: Certamente, no fogo do meu zelo, falei contra o resto das nações e contra todo o Edom. Eles se apropriaram da minha terra, com alegria de todo o coração e com menosprezo de alma, para despovoá-la e saqueá-la.
6 म्हणून इस्राएल देशासंबंधी भविष्यवाणी कर आणि पर्वत व टेकड्यांना, ओहोळे व खोर्यांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुम्ही राष्ट्रांचा अपमान सहन केला म्हणून मी माझ्या ईर्षेच्या क्रोधात बोलतो.
6 Portanto, profetiza sobre a terra de Israel e dize aos montes e aos outeiros, às correntes e aos vales: Assim diz o Senhor Deus: Eis que falei no meu zelo e no meu furor, porque levastes sobre vós o opróbrio das nações.
7 म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या उंचावलेल्या हाताने मी शपथ घेतो की, तुमच्या सभोवती असलेली राष्ट्रे देखील अपमान सहन करतील.
7 Portanto, assim diz o Senhor Deus: Levantando eu a mão, jurei que as nações que estão ao redor de vós levem o seu opróbrio sobre si mesmas.
8 “ ‘पण इस्राएलच्या पर्वतांनो, तुम्हावर माझ्या इस्राएली लोकांसाठी फांद्या फुटून फळे येतील, म्हणजे माझे लोक लवकर घरी येतील.
8 Mas vós, ó montes de Israel, vós produzireis os vossos ramos e dareis o vosso fruto para o meu povo de Israel, o qual está prestes a vir.
9 मी तुझ्याविषयी विचार करतो आणि मी तुझ्याकडे कृपादृष्टीने पाहीन; तुझ्यावर नांगरणी व पेरणी होईल,
9 Porque eis que eu estou convosco; voltar-me-ei para vós outros, e sereis lavrados e semeados.
10 आणि तुझ्यात, होय, सर्व इस्राएलात पुष्कळ लोक वसतील असे मी करेन. नगरे वसतील आणि भग्नावशेष पुन्हा बांधले जातील.
10 Multiplicarei homens sobre vós, a toda a casa de Israel, sim, toda; as cidades serão habitadas, e os lugares devastados serão edificados.
11 तुमच्यात राहणार्या लोकांची व प्राण्यांची संख्या मी वाढवेन आणि ते फलद्रूप होतील व संख्येने वाढतील. पूर्वीप्रमाणे मी तुझ्यावर लोकांना वसवीन आणि पूर्वीपेक्षा तुझी अधिक समृद्धी करेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.
11 Multiplicarei homens e animais sobre vós; eles se multiplicarão e serão fecundos; fá-los-ei habitar-vos como dantes e vos tratarei melhor do que outrora; e sabereis que eu sou o Senhor .
12 लोकांनी, माझ्या इस्राएल लोकांनी तुम्हावर वस्ती करावी असे मी करेन. ते तुमचा ताबा घेतील आणि तुम्ही त्यांचे वतन व्हाल; तुम्ही पुन्हा त्यांना लेकरांपासून वंचित करणार नाही.
12 Farei andar sobre vós homens, o meu povo de Israel; eles vos possuirão, e sereis a sua herança e jamais os desfilhareis.
13 “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: कारण काहीजण तुम्हाला म्हणतात, “तुम्ही लोकांना गिळून टाकता आणि राष्ट्राला लेकरांपासून वंचित ठेवतात,”
13 Assim diz o Senhor Deus: Visto que te dizem: Tu és terra que devora os homens e és terra que desfilha o seu povo,
14 यामुळे यापुढे तुम्ही लोकांना गिळणार नाही, ना राष्ट्राला अपत्यहीन ठेवाल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
14 por isso, tu não devorarás mais os homens, nem desfilharás mais o teu povo, diz o Senhor Deus.
15 मी तुम्हाला पुन्हा राष्ट्रांचे टोमणे ऐकू देणार नाही आणि तुम्ही पुन्हा लोकांचा अपमान सहन करणार नाही किंवा तुमच्या राष्ट्राचे पतन होऊ देणार नाही, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
15 Não te permitirei jamais que ouças a ignomínia dos gentios; não mais levarás sobre ti o opróbrio dos povos, nem mais farás tropeçar o teu povo, diz o Senhor Deus.
16 याहवेहचे वचन पुन्हा माझ्याकडे आले:
16 Veio a mim a palavra do Senhor , dizendo:
17 “मानवपुत्रा, इस्राएली लोक जेव्हा स्वदेशात राहत होते, तेव्हा त्यांनी तो त्यांच्या वर्तनाने व कृत्यांनी भ्रष्ट केला. त्यांची कृत्ये माझ्या दृष्टीत स्त्रियांच्या महिन्याच्या अशुद्धतेप्रमाणे होती.
17 Filho do homem, quando os da casa de Israel habitavam na sua terra, eles a contaminaram com os seus caminhos e as suas ações; como a imundícia de uma mulher em sua menstruação, tal era o seu caminho perante mim.
18 म्हणून मी माझा क्रोध त्यांच्यावर ओतला कारण त्यांनी देशात रक्तपात केला आणि त्यांनी देशाला त्यांच्या मूर्तींनी विटाळले.
18 Derramei, pois, o meu furor sobre eles, por causa do sangue que derramaram sobre a terra e por causa dos seus ídolos com que a contaminaram.
19 म्हणून मी त्यांना राष्ट्रांमध्ये विखुरले आणि ते देशांमध्ये पांगले; मी त्यांचा त्यांच्या वर्तनानुसार आणि त्यांच्या कृत्यांनुसार न्याय केला.
19 Espalhei-os entre as nações, e foram derramados pelas terras; segundo os seus caminhos e segundo os seus feitos, eu os julguei.
20 आणि राष्ट्रांमध्ये ते जिथे कुठे गेले त्यांनी माझ्या पवित्र नावाला कलंक लावला, कारण त्यांच्याविषयी असे म्हटले गेले होते, ‘हे याहवेहचे लोक आहेत, तरीही याहवेहचा देश त्यांना सोडावा लागला.’
20 Em chegando às nações para onde foram, profanaram o meu santo nome, pois deles se dizia: São estes o povo do Senhor , porém tiveram de sair da terra dele.
21 माझ्या पवित्र नावाची मला काळजी होती, जे इस्राएली लोकांनी ते ज्या राष्ट्रांमध्ये गेले तिथे कलंकित केले होते.
21 Mas tive compaixão do meu santo nome, que a casa de Israel profanou entre as nações para onde foi.
22 “म्हणून इस्राएली लोकांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएली लोकांनो या गोष्टी मी तुमच्यासाठी नाही, तर जे नाव तुम्ही ज्या राष्ट्रांमध्ये गेला तिथे अपवित्र केले होते त्या माझ्या पवित्र नावासाठी करणार आहे.
22 Dize, portanto, à casa de Israel: Assim diz o Senhor Deus: Não é por amor de vós que eu faço isto, ó casa de Israel, mas pelo meu santo nome, que profanastes entre as nações para onde fostes.
23 मी माझ्या महान नावाचे पावित्र्य दाखवेन, जे राष्ट्रांमध्ये अपवित्र केले गेले, ते नाव त्यांच्यामध्ये तुम्ही अपवित्र केले आहे. जेव्हा तुमच्याद्वारे त्यांच्या दृष्टीत माझे नाव पवित्र मानले जाईल, तेव्हा राष्ट्रे जाणतील की मीच याहवेह आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
23 Vindicarei a santidade do meu grande nome, que foi profanado entre as nações, o qual profanastes no meio delas; as nações saberão que eu sou o Senhor , diz o Senhor Deus, quando eu vindicar a minha santidade perante elas.
24 “ ‘कारण मी तुम्हाला राष्ट्रांतून बाहेर काढेन; सर्व देशातून मी तुम्हाला एकवट करेन आणि तुम्हाला तुमच्या स्वदेशात आणेन.
24 Tomar-vos-ei de entre as nações, e vos congregarei de todos os países, e vos trarei para a vossa terra.
25 मी तुमच्यावर स्वच्छ पाणी शिंपडेन, आणि तुम्ही शुद्ध व्हाल; मी तुम्हाला तुमच्या सर्व अशुद्धतेपासून आणि तुमच्या मूर्तींपासून शुद्ध करेन.
25 Então, aspergirei água pura sobre vós, e ficareis purificados; de todas as vossas imundícias e de todos os vossos ídolos vos purificarei.
26 मी तुम्हाला नवे हृदय देईन आणि तुमच्यात नवा आत्मा ओतेन; मी तुमच्यातून तुमचे पाषाणी हृदय काढून मांसमय हृदय तुम्हाला देईन.
26 Dar-vos-ei coração novo e porei dentro de vós espírito novo; tirarei de vós o coração de pedra e vos darei coração de carne.
27 आणि मी माझा आत्मा तुमच्यामध्ये घालेन, तुम्ही माझे विधी आचारावे व माझे नियम काळजीपूर्वक पाळावे म्हणून मी तुम्हाला चालवेन.
27 Porei dentro de vós o meu Espírito e farei que andeis nos meus estatutos, guardeis os meus juízos e os observeis.
28 तेव्हा तुमच्या पूर्वजांना जो देश मी देऊ केला त्यात तुम्ही वस्ती कराल; तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा परमेश्वर होईन.
28 Habitareis na terra que eu dei a vossos pais; vós sereis o meu povo, e eu serei o vosso Deus.
29 मी तुम्हाला तुमच्या सर्व अशुद्धतेपासून मुक्त करेन. मी धान्यास आज्ञा देईन आणि ते अनेकपट करेन आणि तुमच्यावर दुष्काळ आणणार नाही.
29 Livrar-vos-ei de todas as vossas imundícias; farei vir o trigo, e o multiplicarei, e não trarei fome sobre vós.
30 तुमच्या झाडांची फळे व तुमच्या शेतातील पीक मी वाढवेन, यासाठी की तुम्ही दुष्काळामुळे राष्ट्रांमध्ये आणखी अपमान सहन करणार नाही.
30 Multiplicarei o fruto das árvores e a novidade do campo, para que jamais recebais o opróbrio da fome entre as nações.
31 तेव्हा तुम्हाला तुमचे कुमार्ग आणि दुष्कृत्यांची आठवण होईल आणि तुमच्या पापांमुळे व अमंगळ कामांमुळे तुम्हाला तुमचीच किळस वाटेल.
31 Então, vos lembrareis dos vossos maus caminhos e dos vossos feitos que não foram bons; tereis nojo de vós mesmos por causa das vossas iniquidades e das vossas abominações.
32 माझी इच्छा आहे तुम्ही हे जाणावे की हे मी तुमच्यासाठी करीत नाही, सार्वभौम याहवेह जाहीर करतात की अहो इस्राएली लोकांनो तुम्ही आपल्या वर्तनामुळे लाजिरवाणी व कलंकित असावे!
32 Não é por amor de vós, fique bem-entendido, que eu faço isto, diz o Senhor Deus. Envergonhai-vos e confundi-vos por causa dos vossos caminhos, ó casa de Israel.
33 “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्या दिवशी मी तुम्हाला तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध करेन, मी तुमची नगरे पुनर्स्थापित करेन आणि उद्ध्वस्त झालेल्याची पुनर्बांधणी करेन.
33 Assim diz o Senhor Deus: No dia em que eu vos purificar de todas as vossas iniquidades, então, farei que sejam habitadas as cidades e sejam edificados os lugares desertos.
34 येजा करणार्यांच्या नजरेसमोर उजाडलेली भूमी वैराण पडण्याऐवजी तिची मशागत होईल.
34 Lavrar-se-á a terra deserta, em vez de estar desolada aos olhos de todos os que passam.
35 ते म्हणतील, “ही भूमी जी ओसाड पडली होती ती एदेन बागेसारखी झाली आहे; शहरे जी उद्ध्वस्त, उजाड व ओसाड पडली होती, ती आता तटबंदीची होऊन त्यात वस्ती झाली आहे.”
35 Dir-se-á: Esta terra desolada ficou como o jardim do Éden; as cidades desertas, desoladas e em ruínas estão fortificadas e habitadas.
36 तेव्हा तुमच्या सभोवती उरलेली राष्ट्रे जाणतील की मी याहवेहने उजाड झालेले पुन्हा बांधले आहे आणि ओसाड पडलेले होते त्याची पुन्हा लागवड केली आहे. मी याहवेह हे बोललो आहे, आणि ते मी करणारच.’
36 Então, as nações que tiverem restado ao redor de vós saberão que eu, o Senhor , reedifiquei as cidades destruídas e replantei o que estava abandonado. Eu, o Senhor , o disse e o farei.
37 “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: एकदा पुन्हा मी इस्राएलची विनंती मान्य करेन आणि त्यांच्यासाठी हे करेन: त्यांचे लोक मी मेंढरांसारखे असंख्य करेन,
37 Assim diz o Senhor Deus: Ainda nisto permitirei que seja eu solicitado pela casa de Israel: que lhe multiplique eu os homens como um rebanho.
38 तिच्या नेमलेल्या सणांच्या वेळी यरुशलेममध्ये अर्पणासाठी लागतील तेवढे असंख्य कळप मी करेन. म्हणजे पडीक असलेली शहरे लोकांच्या कळपांनी भरतील. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.”
38 Como um rebanho de santos, o rebanho de Jerusalém nas suas festas fixas, assim as cidades desertas se encherão de rebanhos de homens; e saberão que eu sou o Senhor .
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Ezequiel 36, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.