Ezequiel 33

marc (MARC) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
1 Esta palavra do Senhor veio a mim:
2 “मानवपुत्रा, तुझ्या लोकांशी बोल आणि त्यांना सांग: ‘जेव्हा मी एका देशावर तलवार आणतो, तेव्हा त्या देशाचे लोक त्यांच्या लोकांतील एकाची निवड करून त्याची पहारेकरी म्हणून नेमणूक करतात,
2 "Filho do homem, fale com os seus compatriotas e diga-lhes: ‘Quando eu trouxer a espada contra uma terra e o povo da terra escolher um homem para ser sentinela,
3 आणि ती तलवार देशावर येत आहे असे पाहताच लोकांना सावध करण्यासाठी तो कर्णा वाजवितो,
3 e ele vir a espada vindo contra a terra e tocar a trombeta para advertir o povo,
4 तेव्हा जर कोणी कर्ण्याचा आवाज ऐकूनही इशार्‍याकडे लक्ष देत नाही आणि तलवार येऊन त्यांचा जीव घेते, तर त्यांचे रक्त त्यांच्याच माथ्यावर असेल.
4 então, se alguém ouvir a trombeta mas não der atenção à advertência e a espada vier e tirar a sua vida, ele será culpado de sua própria morte.
5 जरी त्यांनी कर्ण्यांचा आवाज ऐकला तरी इशार्‍याकडे लक्ष दिले नाही, म्हणून त्यांचे रक्त त्यांच्याच माथ्यावर असेल. जर ते सावध झाले असते, तर त्यांनी स्वतःस वाचविले असते.
5 Uma vez que ele ouviu o som da trombeta mas não deu atenção à advertência, será culpado de sua própria morte. Se ele desse atenção à advertência, se livraria.
6 परंतु तलवार येत आहे असे पाहूनही इशारा देण्यासाठी पहारेकरी कर्णा वाजवित नाही आणि तलवार येऊन त्यातील एकाचा जीव घेते, तर त्यांच्या पापामुळे त्या व्यक्तीचा जीव गेला तरी त्यांच्या रक्ताचा जाब मी त्या पहारेकर्‍याकडून घेईन.’
6 Mas, se a sentinela vir chegar a espada e não tocar a trombeta para advertir o povo e a espada vier e tirar a vida de um deles, aquele homem morrerá por causa de sua iniqüidade, mas considerarei a sentinela responsável pela morte daquele homem’.
7 “मानवपुत्रा, मी तुला इस्राएली लोकांचा पहारेकरी केले आहे; तर जे वचन मी सांगतो ते ऐक आणि माझ्यावतीने त्यांना सावध कर.
7 "Filho do homem, eu o fiz uma sentinela para a nação de Israel; por isso ouça a minha palavra, e advirta-os em meu nome.
8 जेव्हा मी दुष्टाला म्हणतो, ‘अरे दुष्टा, तू खचितच मरशील,’ आणि त्या व्यक्तीने आपल्या मार्गांपासून वळावे म्हणून तू सांगत नाहीस, तर ते दुष्ट व्यक्ती त्यांच्या पापामुळे मरतील आणि त्यांच्या रक्तासाठी मी तुला दोषी ठरवेन.
8 Quando eu disser ao ímpio que é certo que ele morrerá, e você não falar para dissuadi-lo de seus caminhos, aquele ímpio morrerá por sua iniqüidade, mas eu considerarei você responsável pela morte dele.
9 परंतु त्या दुष्ट व्यक्तीने त्याच्या मार्गापासून वळावे म्हणून तू त्याला सावध केलेस आणि ते तसे करीत नाहीत, तर ते त्यांच्या पापामुळे मरतील, परंतु तू स्वतः वाचशील.
9 Mas, se você de fato advertir o ímpio para que se desvie dos seus caminhos e ele não se desviar, ele morrerá por sua iniqüidade, mas você estará livre da sua responsabilidade.
10 “मानवपुत्रा, इस्राएली लोकांना सांग, ‘तुम्ही असे म्हणता: “आमचे अपराध व पापे आम्हावर भारी आहेत आणि त्यामुळे आम्ही नाश पावत आहोत. मग आम्ही कसे जगू शकतो?” ’
10 "Filho do homem, diga à nação de Israel: ‘É isto que vocês estão dizendo: "Nossas ofensas e pecados são um peso sobre nós, e estamos desfalecendo por causa deles. Como então poderemos viver? " ’
11 त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जीविताची शपथ, दुष्टाच्या मरणात मला संतोष नाही, परंतु त्यांनी आपल्या मार्गापासून वळावे व जगावे. वळा! आपल्या दुष्ट मार्गापासून वळा! मग अहो इस्राएली लोकहो तुम्ही का मरावे?’
11 Diga-lhes: ‘Juro pela minha vida, palavra do Soberano Senhor, que não tenho prazer na morte dos ímpios, antes tenho prazer em que eles se desviem dos seus caminhos e vivam. Voltem! Voltem-se dos seus maus caminhos! Por que iriam morrer, ó nação de Israel? ’
12 “म्हणून, हे मानवपुत्रा, तुझ्या लोकांना सांग, ‘एखाद्या नीतिमान व्यक्तीने जर आज्ञाभंग केला, तर त्या व्यक्तीची पूर्वीची नीतिमत्ता मोजण्यात येणार नाही. आणि एखादा दुष्ट पश्चात्ताप करतो, त्या व्यक्तीची पूर्वीची दुष्टता त्याच्यावर दंड आणणार नाही. नीतिमान व्यक्ती जो पाप करतो, तो जरी पूर्वी नीतिमान असला तरी त्याला जगू दिले जाणार नाही.’
12 "Por isso, filho do homem, diga aos seus compatriotas: ‘A retidão do justo não o livrará se ele voltar-se para a desobediência, e a maldade do ímpio não o fará cair se ele se desviar dela. E se o justo pecar, não viverá por causa de sua justiça’.
13 जर मी एका नीतिमान व्यक्तीला म्हटले की ते अवश्य जगतील, परंतु त्यांच्या नीतिमत्तेवर भरवसा करून त्यांनी दुष्टाई केली, त्या व्यक्तीने केलेली कोणतीही नीतीची कृत्ये आठवली जाणार नाही; जी दुष्टाई त्यांनी केली, त्यामुळे ते मरतील.
13 Se eu garantir ao justo que ele vai viver, mas ele, confiando em sua justiça, fizer o mal, nada de justo que fez será lembrado; ele morrerá por causa do mal que fez.
14 आणि मी जर एखाद्या दुष्ट मनुष्याला म्हटले, ‘तू खचित मरशील,’ परंतु ते त्यांच्या पापापासून वळले आणि जे न्याय्य व योग्य ते केले;
14 E, se você disser ao ímpio: ‘Certamente você morrerá’, mas ele se desviar do seu pecado e fizer o que é justo e certo;
15 गहाण ठेवलेल्या वस्तू त्यांनी जर परत केल्या, चोरून घेतलेले परत केले, जीवन देणारे नियम पाळले आणि काही वाईट केले नाही; तो व्यक्ती खचित जगेल; ते मरणार नाहीत.
15 se ele devolver o que apanhou como penhor de um empréstimo, se devolver o que roubou, se agir segundo os decretos que dão vida e não fizer mal algum, é certo que viverá; não morrerá.
16 पूर्वी केलेल्या कोणत्याही पापांची त्यांच्याविरुद्ध आठवण केली जाणार नाही. जे न्याययुक्त व योग्य ते त्यांनी केले आहे; त्यामुळे ते खचितच जगतील.
16 Nenhum dos pecados que cometeu será lembrado contra ele. Ele fez o que é justo e certo; certamente viverá.
17 “तरी तुझे लोक म्हणतात, ‘प्रभूचा मार्ग न्यायाचा नाही.’ परंतु त्यांचेच मार्ग न्याययुक्त नाहीत.
17 "Contudo, os seus compatriotas dizem: ‘O caminho do Senhor não é justo’. Mas é o caminho deles que não é justo.
18 जर नीतिमान व्यक्ती त्यांच्या नीतिमत्तेपासून वळतात आणि जे वाईट ते करतात, तर त्यामुळे ते मरतील.
18 Se um justo se afastar de sua justiça e fizer o mal, morrerá.
19 आणि जर दुष्ट व्यक्ती त्यांच्या दुष्टाईपासून वळतील आणि जे न्याययुक्त व योग्य ते करतील, तर त्यामुळे ते जगतील.
19 E, se um ímpio se desviar de sua maldade e fizer o que é justo e certo, viverá por assim proceder.
20 तरीही तुम्ही इस्राएली लोक म्हणता, ‘प्रभूचा मार्ग न्यायाचा नाही.’ परंतु तुम्हा सर्वांच्या मार्गांनुसार मी तुमचा न्याय करेन.”
20 No entanto, ó nação de Israel, vocês dizem: ‘O caminho do Senhor não é justo’. Mas eu julgarei cada um de acordo com os seus próprios caminhos".
21 बंदिवासाच्या बाराव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, एक मनुष्य जो यरुशलेमहून निसटून आला होता, तो माझ्याकडे येऊन म्हणाला, “शहर पडले आहे!”
21 No quinto dia do décimo mês do décimo segundo ano do nosso exílio, um homem que havia escapado de Jerusalém veio a mim e disse: "A cidade caiu! "
22 तो मनुष्य आला त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी, याहवेहचा हात माझ्यावर होता आणि याहवेहने सकाळी तो मनुष्य माझ्याकडे येण्यापूर्वी माझे तोंड उघडले. म्हणून माझे तोंड उघडलेले होते आणि मी आणखी शांत नव्हतो.
22 Ora, na tarde do dia anterior, a mão do Senhor esteve sobre mim, e ele abriu a minha boca antes de chegar aquele homem. Assim foi aberta a minha boca, e eu não me calei mais.
23 तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
23 Então me veio esta palavra do Senhor:
24 “मानवपुत्रा, इस्राएलात ओसाडीमध्ये राहत असलेले लोक म्हणतात, ‘अब्राहाम केवळ एक मनुष्य होता, तरीही त्याला देश वतन मिळाला. परंतु आम्ही तर पुष्कळ आहोत; खचितच हा देश आम्हाला आमचे वतन म्हणून दिला गेला आहे.’
24 "Filho do homem, o povo que vive naquelas ruínas em Israel está dizendo: ‘Abraão era apenas um único homem, e, contudo, possuiu a terra. Mas nós somos muitos; com certeza receberemos a terra como propriedade’.
25 म्हणून त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मांसात रक्त असताच तुम्ही ते खाता आणि रक्तपात करत तुमच्या मूर्तींकडे बघता, तर मग तुम्ही या देशाचे वतन मिळविणार काय?
25 Então diga a eles: ‘Assim diz o Soberano Senhor: Uma vez que vocês comem carne com sangue, voltam-se para os seus ídolos e derramam sangue, deveriam possuir a terra?
26 तुम्ही तुमच्या तलवारीवर भिस्त ठेवता, तुम्ही अमंगळ कृत्ये करता, तुम्हातील प्रत्येकजण आपल्या शेजार्‍याच्या पत्नीला भ्रष्ट करतो. तरी तुम्हाला देशाचे वतन मिळावे काय?’
26 Vocês confiam na espada, cometem práticas repugnantes, e cada um de vocês contamina a mulher do seu próximo. E deveriam possuir a terra? ’
27 “त्यांना असे सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या जीविताची शपथ, जे ओसाडीमध्ये उरलेले आहेत ते तलवारीने पडतील, जे शहराच्या बाहेर आहेत त्यांना जंगली जनावरांनी खावे म्हणून मी देऊन टाकेन, आणि जे गडात व गुहेत आहेत ते मरीने मरतील.
27 "Diga isto a eles: ‘Assim diz o Soberano Senhor: Juro pela minha vida, que os que restam nas ruínas cairão pela espada, e que entregarei os que estão no campo aos animais selvagens para serem devorados, e que os que se abrigam em fortalezas e em cavernas morrerão de peste.
28 मी या देशास वैराण करेन आणि तिच्या अहंकारी बळाचा शेवट होईल आणि इस्राएलचे डोंगर ओसाड पडतील व त्यातून कोणी पार जाणार नाही.
28 Tornarei a terra um deserto abandonado. Darei fim ao poder que se orgulha, e tão arrasados estarão os montes de Israel que ninguém vai querer passar por lá.
29 त्यांनी केलेल्या अमंगळ कृत्यांमुळे जेव्हा मी हा देश ओसाड करेन, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’
29 Eles saberão que eu sou o Senhor, quando eu tiver tornado a terra um deserto abandonado por causa de todas as práticas repugnantes que eles cometeram’.
30 “मानवपुत्रा, तुझ्याविषयी म्हटले तर, तुझे लोक भिंतींजवळ व घरांच्या दरवाजांजवळ तुझ्याविषयी बोलत आहेत व एकमेकांना म्हणत आहेत, ‘या आणि याहवेहकडून आलेला संदेश ऐका.’
30 "Quanto a você, filho do homem, seus compatriotas estão conversando sobre você junto aos muros e às portas das casas, dizendo uns aos outros: ‘Venham ouvir a mensagem que veio da parte do Senhor’.
31 नियमाप्रमाणे येतात तसे माझे लोक तुझ्याकडे येतात आणि तुझे वचन ऐकण्यासाठी तुझ्यासमोर बसतात, परंतु ते त्याप्रमाणे अनुसरण करीत नाहीत. ते मुखाने प्रीतीविषयी बोलतात, परंतु त्यांची हृदये अन्यायाने लाभ मिळविण्यासाठी लोभी आहेत.
31 O meu povo vem a você, como costuma fazer, e se assenta diante de você para ouvir as suas palavras, mas não as põe em prática. Com a boca eles expressam devoção, mas o coração deles está ávido de ganhos injustos.
32 खरोखर, त्यांच्यासाठी तू केवळ मंजूळ आवाजात चांगले वाद्य वाजवित सुंदर प्रेमगीत गाणार्‍या एका मनुष्यासारखा आहेस, कारण ते तुझे वचन तर ऐकतात परंतु त्याचे अनुसरण करीत नाहीत.
32 De fato, para eles você não é nada mais do que alguém que entoa cânticos de amor com uma bela voz e que sabe tocar um instrumento, pois eles ouvem as suas palavras, mas não as põem em prática.
33 “जेव्हा हे सर्वकाही घडेल; आणि ते खचितच घडेल; तेव्हा ते जाणतील की त्यांच्यामध्ये एक संदेष्टा आहे.”
33 "Quando tudo isso acontecer — e certamente acontecerá — eles saberão que um profeta esteve no meio deles".

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Ezequiel 33, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.