Ezequiel 22
marc (MARC) vs VC
1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
1 A palavra do Senhor foi-me dirigida nestes termos:
2 “मानवपुत्रा, तू तिचा न्याय करशील काय? या रक्तपाती शहराचा न्याय तू करशील काय? तर तिच्या सर्व अमंगळ कृत्यांविषयी तिचा निषेध कर
2 E tu, filho do homem, não julgarás, não julgarás esta cidade sanguinária? Faze-lhe conhecer todas as suas abominações.
3 आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे नगरी, तू रक्तपात करून व मूर्ती बनवून स्वतःला अशुद्ध करून आपला नाश ओढवून घेतला आहेस,
3 Dize-lhe: eis o que diz o Senhor Javé: ah! cidade que espalhas o sangue em tuas ruas para que chegue a tua hora, que eriges ídolos para te sujares,
4 जो रक्तपात तू केलास त्यामुळे तू दोषी झालीस आणि ज्या मूर्ती तू बनविल्यास त्यामुळे तू विटाळली आहेस. तुझे दिवस जवळ आणले आहेस आणि तुझ्या वर्षांचा शेवट आला आहे. म्हणून मी तुला राष्ट्राकरिता निंदा व देशांसाठी हास्य असे करेन.
4 pelo sangue que tens derramado tu te tornaste culpada e te poluíste pelos teus ídolos que talhaste; precipitaste a tua hora, adiantaste o termo de teus anos. Por isso vou abandonar-te aos ultrajes das nações, e ao escárnio de todos os países.
5 हे अपकीर्तिच्या, उपद्रवाने भरलेल्या नगरी, जे तुझ्याजवळ आहेत व जे दूर आहेत, ते सर्व तुझी थट्टा करतील.
5 Próximos ou distantes, eles zombarão de ti, cidade cujo nome é odioso, cidade cheia de desordens.
6 “ ‘पाहा, इस्राएलचे प्रत्येक राजपुत्र त्यांच्या अधिकाराचा उपयोग कसा रक्तपातासाठी करीत आहेत.
6 Vê: os príncipes de Israel estão em ti ocupados, cada um por si, a derramar sangue.
7 तुझ्यातील आईवडिलांना त्यांनी तुच्छ मानले; त्यांनी तुझ्यातील विदेशीयांवर अत्याचार केला आणि अनाथ व विधवांना अयोग्य वागणूक दिली.
7 Em ti, desprezam-se pai e mãe, violenta-se o hóspede estrangeiro, maltratam-se o órfão e a viúva.
8 तुम्ही माझ्या पवित्र वस्तूंचा अवमान केला आणि माझे शब्बाथ अपवित्र केले आहेत.
8 Tens aviltado meus santuários e profanado os meus sábados.
9 तुझ्यात निंदक राहतात, ज्यांचा कल रक्तपाताकडे आहे; तुझ्यात असे लोक आहेत जे डोंगरावरील पूजास्थानात प्रसाद खातात आणि अश्लील कृत्ये करतात.
9 Há em ti delatores que fazem derramar sangue; gente de tua casa que vai comer na montanha. Cometem-se infâmias no meio de ti:
10 तुझ्यात असे लोक आहेत ज्यांनी आपल्या पित्याचा पलंग विटाळला आहे; जे मासिक पाळीच्या वेळी जेव्हा स्त्रिया विधीनुसार अशुद्ध असतात, तेव्हा त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवतात.
10 descobre-se a nudez de seu pai, faz-se violência à mulher durante o período da menstruação;
11 तुझ्यातील एक पुरुष त्याच्या शेजार्याच्या पत्नीशी निंद्यकर्म करतो, तर दुसरा त्याच्या सुनेला भ्रष्ट करतो आणि अजून दुसरा त्याच्या बहिणीला, त्याच्याच पित्याच्या मुलीला भ्रष्ट करतो.
11 um comete horrores com a mulher do próximo, outro desonra incestuosamente sua nora, outro viola sua irmã, filha de seu pai.
12 तुझ्यात लोक आहेत, जे रक्तपात करण्यास लाच घेतात; तू व्याज घेते आणि गरिबांकडून नफा करून घेतेस. तू आपल्या शेजार्याकडून जबरीने वसूल करून लाभ घेतेस. आणि तुला माझा विसर पडला आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
12 Em ti aceitam-se presentes para derramar sangue, tu recebes a usura e os juros, fazes violência ao próximo para despojá-lo; e a mim tu me esqueces - oráculo do Senhor Javé.
13 “ ‘अन्यायाने तू जो लाभ करून घेतला आहे, आणि तुमच्यात जो रक्तपात तू केला आहे, त्यामुळे संतापाने मी माझे हात एकत्र चालवेन.
13 Muito em breve, porém, vou bater palmas devido às pilhagens que tens feito e ao sangue em ti derramado.
14 मी तुझा झाडा घेईन त्या दिवशी तुझे धाडस टिकेल काय किंवा तुझे हात दृढ राहतील काय? मी याहवेह हे बोललो आहे आणि मी हे करणारच.
14 Poderá resistir teu coração, tuas mãos poderão agüentar, ao chegarem os dias em que eu me levantar contra ti? Sou eu, o Senhor, que o digo, e que o executarei.
15 राष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग आणि देशांमध्ये तुम्हाला विखरून टाकीन; आणि तुमच्या अशुद्धतेचा शेवट मी करेन.
15 Eu te disseminarei entre as nações, te dispersarei através dos povos. Limparei totalmente a tua mancha,
16 राष्ट्रांच्या नजरेत तू जेव्हा विटाळलेली ठरशील, तेव्हा तू जाणशील की मीच याहवेह आहे.’ ”
16 serás aviltada, por tua culpa, aos olhos das nações, e reconhecerás assim que sou eu o Senhor.
17 तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
17 A palavra do Senhor foi-me dirigida nestes termos:
18 “मानवपुत्रा, इस्राएली लोक माझ्यासाठी गाळ असे झाले आहेत; ते सर्व भट्टीत राहिलेले कास्य, कथील, लोखंड व शिसे यासारखे आहेत. ते केवळ चांदीचा गाळ आहेत.
18 Filho do homem, a casa de Israel tornou-se para mim escória. São todos {como} cobre, estanho e ferro e chumbo no cadinho: são escória da prata.
19 म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘तुम्ही सर्वजण गाळ असे झाला आहात, म्हणून मी तुम्हाला यरुशलेममध्ये एकत्र करेन.
19 Por isso, eis o que diz o senhor Javé: já que todos vós sois escórias, vou reunir-vos em Jerusalém.
20 जसे चांदी, कास्य, लोखंड, शिसे व कथील वितळण्यासाठी धगधगत्या आगीच्या भट्टीत टाकली जातात, तसेच मी तुम्हाला माझ्या रागाने व क्रोधाने एकत्र करेन आणि तुम्हाला शहरात ठेवून वितळवीन.
20 Do mesmo modo como se ajunta no meio do forno a prata, o cobre, o ferro, o chumbo e o estanho, e como se atiça o fogo sobre eles para fundi-los, do mesmo modo, no furor da minha cólera, eu vos amontoarei todos juntos lá para vos fazer fundir.
21 मी तुम्हाला एकत्र करेन व तुमच्यावर माझा क्रोधाग्नी फुंकेन, आणि तुम्ही त्या शहरात वितळून जाल.
21 Eu vos reunirei e atiçarei sobre vós o fogo do meu furor, para vos fazer fundir em Jerusalém.
22 जशी चांदी भट्टीत वितळली जाते, असेच तुम्ही त्या शहरात वितळून जाल आणि तुम्ही जाणाल की मी याहवेहने माझा कोप तुमच्यावर ओतला आहे.’ ”
22 Semelhantes à prata, que se funde no cadinho, sereis fundidos no meio da cidade e assim reconhecereis que sou eu, o Senhor, que desencadeei sobre vós o meu furor.
23 याहवेहचे वचन पुन्हा माझ्याकडे आले:
23 A palavra do Senhor foi-me dirigida nestes termos:
24 “मानवपुत्रा, या देशाला सांग, ‘तुम्ही असा एक देश आहात जो कोपाच्या दिवशी ना शुद्ध केला गेला ना ज्यावर पाऊस पडला.’
24 filho do homem, dize a Jerusalém: és uma terra que não recebeu nem chuva nem aguaceiro, na estação da cólera.
25 तिच्यातील राजपुत्रांचा एक कट आहे, ते गर्जना करीत भक्ष फाडणार्या सिंहाप्रमाणे आहेत; ते लोकांना ग्रस्त करतात, ते खजिना व मोलवान वस्तू घेतात आणि त्यांच्यात पुष्कळांना विधवा बनवतात.
25 Há em teu seio uma conspiração de príncipes. Como o leão que ruge, que arrebata a presa, eles devoram as pessoas, tomam-lhes os bens e as riquezas, e multiplicam as viúvas.
26 तिचे याजक माझ्या नियमाचे उल्लंघन करतात व माझ्या पवित्र वस्तूंना अपवित्र करतात; पवित्र व सर्वसामान्य यात ते फरक ठेवत नाहीत; शुद्ध व अशुद्ध यात काही भेद नाही अशी शिकवण ते देतात आणि त्यांच्यात मी अपवित्र मानला जाईल म्हणून माझ्या शब्बाथांकडे दुर्लक्ष करतात.
26 Seus sacerdotes violam a minha lei, profanam o meu santuário, tratam indiferentemente o sagrado e o profano e não ensinam a distinguir o que é puro do que é impuro; fecham os olhos para não ver os meus sábados; no meio deles a minha santidade é profanada.
27 तिचे सरदार भक्ष फाडणार्या लांडग्याप्रमाणे आहेत; अन्यायाने लाभ करून घेण्यासाठी ते रक्तपात करतात व लोकांना जिवे मारतात.
27 Seus chefes lá estão como lobos que despedaçam a presa, derramando sangue, perdendo vidas para tirar proveitos.
28 त्यांचे संदेष्टे खोटे दर्शन व लबाड शकुनाद्वारे या सर्व कृत्यांवर चुन्याचा लेप फासतात आणि याहवेह बोलले नाही तरी ते म्हणतात, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’
28 Seus profetas cobrem tudo com uma argamassa: têm visões de mentira e oráculos enganadores. Dizem: eis o que diz o Senhor, quando o Senhor nada disse.
29 या देशातील लोक फसवणूक व लुटारूपण करतात; ते गरीब व गरजवंतावर अत्याचार करतात आणि विदेशी लोकांना न्याय न देता अन्यायाने वागवितात.
29 A população da terra se entrega à violência e à rapina, à opressão do pobre e do indigente, e às vexações injustificáveis contra o estrangeiro.
30 “या देशाचा मी नाश करू नये म्हणून तिच्यातील कोणी एक भिंत बांधेल आणि देशासाठी माझ्यासमोर खिंडारात उभा राहील अशा व्यक्तीला मी त्यांच्यात शोधले, परंतु मला कोणी सापडला नाही.
30 Tenho procurado entre eles alguém que construísse o muro e se detivesse sobre a brecha diante de mim, em favor da terra, a fim de prevenir a sua destruição, mas não encontrei ninguém.
31 म्हणून मी त्यांच्यावर माझा क्रोध ओतेन आणि माझ्या कोपाग्नीने त्यांना भस्म करेन त्यांनी जे काही केले ते मी त्यांच्याच माथ्यावर आणेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”
31 Por isso vou desencadear sobre eles o meu furor e exterminá-los no fogo da minha exasperação; farei cair sobre eles o peso de sua conduta - oráculo do Senhor Javé.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Ezequiel 22, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.