Ezequiel 17

marc (MARC) vs ARC

Sair da comparação
ARC Almeida Revista e Corrigida 2009
1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
1 E veio a mim a palavra do Senhor , dizendo:
2 “हे मानवपुत्रा, एक रूपक घे आणि ते दाखला म्हणून इस्राएलच्या लोकांना सांग.
2 Filho do homem, propõe uma parábola e usa de uma comparação para com a casa de Israel.
3 त्यांना म्हण, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्याचे पंख शक्तिशाली आहेत, लांब पिसांचा व निरनिराळ्या रंगाचा पिसारा असलेला एक गरुड लबानोनमध्ये आला व त्याने गंधसरूच्या टोकावरील फांदी पकडली,
3 E dize: Assim diz o Senhor Jeová : Uma grande águia, de grandes asas, de farta plumagem, cheia de penas de várias cores, veio ao Líbano e levou o mais alto ramo de um cedro.
4 त्याने त्यावरील अगदी वरचा कोंब तोडला, तो व्यापार्‍यांच्या देशात नेला आणि तिथे विक्रेत्यांच्या शहरात लावला.
4 E arrancou a ponta mais alta dos seus ramos e a trouxe a uma terra de mercancia; na cidade de mercadores a pôs.
5 “ ‘त्याने देशातील एक रोप घेतले आणि ते सुपीक भूमीत लावले. त्याने ते वाळुंजीप्रमाणे भरपूर पाण्याजवळ लावले,
5 Tomou da semente da terra e a lançou num campo de semente; tomando-a, a pôs junto às grandes águas, com grande prudência.
6 आणि ते फुटले, पसरट व कमी उंचीची वाढून द्राक्षवेल झाली. तिच्या फांद्या त्या गरुडाच्या दिशेने वळल्या होत्या, परंतु तिची मुळे तिच्याच खाली होती. ती एक द्राक्षवेल झाली आणि तिला पानांनी भरलेल्या फांद्या आल्या.
6 E brotou e tornou-se numa videira mui larga, de pouca altura, virando-se para ela os seus ramos, porque as suas raízes estavam debaixo dela; e tornou-se numa videira, e produzia sarmentos, e lançava renovos.
7 “ ‘परंतु अजून एक मोठा गरुड आला, ज्याचे शक्तिशाली पंख आणि भरलेला पिसारा होता. द्राक्षवेलीने आता आपली मुळे ती जिथे लावली होती तिथून त्या गरुडाकडे पसरविली आणि पाण्यासाठी आपल्या फांद्या त्याच्याकडे लांब केल्या.
7 Houve mais uma grande águia, de grandes asas, e cheia de penas; e eis que essa videira lançou para ela as suas raízes e estendeu para ela os seus ramos, desde as auréolas do seu plantio, para que a regasse.
8 त्या द्राक्षवेलीला पाने आणि फळ यावे व ती एक उत्कृष्ट द्राक्षवेल व्हावी म्हणून भरपूर पाणी असलेल्या चांगल्या भूमीत ती लावली गेली होती.’
8 Numa boa terra, à borda de muitas águas, estava ela plantada, para produzir ramos e para dar fruto, para que fosse videira excelente.
9 “त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तिची भरभराट होईल काय? ती वाळून जावी म्हणून तिचे फळ काढून घेऊन तिला मुळापासून उपटले जाईल काय? तिची सर्व नवीन पालवी वाळून जाईल. तिला समूळ उपटण्यासाठी ना मजबूत हात लागणार ना पुष्कळ लोकांची गरज लागणार.
9 Dize: Assim diz o Senhor Jeová : Ela prosperará? Não lhe arrancará ele as suas raízes e não cortará o seu fruto, para que se seque? Em todas as folhas de seus renovos se secará; e, não com braço grande, nem com muita gente, será arrancada pelas suas raízes.
10 तिला लावले तर आहे, पण तिची भरभराट होईल काय? पूर्वेकडील वारा तिला लागला म्हणजे ती पूर्णपणे वाळून—ज्या ठिकाणी वाढली त्याच ठिकाणी ती वाळणार नाही काय?’ ”
10 Mas, estando plantada, prosperará? Porventura, tocando-lhe vento oriental, de todo não se secará? Desde as auréolas do seu plantio se secará.
11 तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
11 Então, veio a mim a palavra do Senhor , dizendo:
12 “बंडखोर लोकांना सांग, ‘या गोष्टींचा अर्थ तुम्हाला माहीत नाही काय?’ त्यांना सांग: ‘बाबेलचा राजा यरुशलेमात गेला आणि तिचा राजा व सरदारांना घेऊन त्याच्याबरोबर परत बाबिलोनात आणले.
12 Dize, agora, à casa rebelde: Não sabeis o que significam estas coisas? Dize: Eis que veio o rei de Babilônia a Jerusalém, e tomou o seu rei e os seus príncipes, e os levou consigo para Babilônia;
13 मग त्याने राजघराण्यातील एक सदस्य घेतला व त्याच्याशी करार केला आणि त्याला शपथेत बांधले. त्याने देशातील प्रमुख पुरुषांना देखील नेले,
13 e tomou um da semente real e fez concerto com ele; e o trouxe sob juramento e tomou os poderosos da terra,
14 म्हणजे राज्याचा पडाव होऊन ते पुन्हा उठू शकणार नाही आणि केवळ त्याचा करार पाळूनच वाचेल.
14 para que o reino ficasse humilhado e não se levantasse; para que, guardando o seu concerto, pudesse subsistir.
15 परंतु राजाने त्याच्याविरुद्ध बंड केले आणि आपले घोडे व मोठे सैन्य आणण्यासाठी इजिप्तला त्याचे राजदूत पाठवले. तो यशस्वी होईल काय? अशा प्रकारचे काम करणारा वाचेल काय? करार तोडला तरी वाचेल काय?
15 Mas rebelou-se contra ele, enviando os seus mensageiros ao Egito, para que lhe mandassem cavalos e muita gente; prosperará ou escapará aquele que faz tais coisas? Ou quebrantará o concerto e escapará?
16 “ ‘सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जिवाची शपथ, तो बाबेलमध्ये, ज्याने त्याला राजासनावर बसविले, ज्याची शपथ त्याने तुच्छ मानली आणि ज्याचा करार त्याने मोडला, त्याच राजाच्या देशात तो मरेल.
16 Como eu vivo, diz o Senhor Jeová , no lugar em que habita o rei que o fez reinar, cujo juramento desprezou e cujo concerto quebrantou, sim, com ele, no meio de Babilônia certamente morrerá.
17 पुष्कळ जिवांचा नाश करण्यासाठी जेव्हा मोर्चे बांधतील व बुरूज उभारतील, तेव्हा फारोह त्याच्या बलवान सैन्य व मोठ्या जमावाच्या मदतीने त्या युद्धात त्याचे साहाय्य करू शकणार नाही.
17 E Faraó, nem com grande exército, nem com uma companhia numerosa, fará coisa alguma com ele em guerra, levantando tranqueiras e edificando baluartes, para destruir muitas vidas.
18 त्याने करार मोडून शपथ तुच्छ मानली आहे. कारण त्याने हातात हात देऊन प्रतिज्ञा केली आणि तरीही त्याने या सर्व गोष्टी केल्या, त्याचा निभाव होणार नाही.
18 Pois que desprezou o juramento, quebrantando o concerto, feito com aperto de mão; havendo feito todas essas coisas, não escapará.
19 “ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या जिवाची शपथ, माझी शपथ तुच्छ मानली व माझा करार मोडला, म्हणून मी त्याचा न्याय करेन.
19 Portanto, assim diz o Senhor Jeová : Vivo eu, que o meu juramento, que desprezou, e o meu concerto, que quebrantou, isto farei recair sobre a sua cabeça.
20 त्याच्यासाठी मी माझे जाळे पसरवीन आणि तो त्या पाशात पकडला जाईल. मी त्याला बाबेलमध्ये आणेन आणि तिथे त्याच्यावर न्याय आणेन कारण तो माझ्याशी अविश्वासू राहिला.
20 Estenderei sobre ele a minha rede, e ficará preso no meu laço; e o levarei a Babilônia e ali entrarei em juízo com ele pela rebeldia com que se rebelou contra mim.
21 त्याचे सर्व उत्तम सैन्य तलवारीने पडेल आणि त्यातून जे वाचतील ते वार्‍याच्या दिशेने पसरतील. तेव्हा तुम्ही जाणाल की मी याहवेह हे बोललो आहे.
21 E todos os seus fugitivos, com todas as suas tropas, cairão à espada, e os que restarem serão espalhados em todas as direções; e sabereis que eu, o Senhor , o disse.
22 “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी एका गंधसरूचा सर्वात उंच शेंडा घेऊन तो लावेन; मी त्याचा अगदी वरचा लवचिक शेंडा तोडेन आणि तो सर्वात उंच व मोठ्या पर्वतावर लावेन.
22 Assim diz o Senhor Jeová : Também eu tomarei o topo do cedro e o plantarei; do principal dos seus renovos cortarei o mais tenro e o plantarei sobre um monte alto e sublime.
23 इस्राएलच्या उंच पर्वतावर मी तो लावेन; त्याला फांद्या फुटतील व ते फळ देईल आणि ते वैभवी गंधसरू बनेल. प्रत्येक प्रकारचे पक्षी त्यात घरटे बनवतील; त्यांना त्या गंधसरूच्या फांद्यांच्या छायेत आसरा मिळेल.
23 No monte alto de Israel, o plantarei, e produzirá ramos, e dará fruto, e se fará um cedro excelente; e habitarão debaixo dele todas as aves de toda sorte de asas e à sombra dos seus ramos habitarão.
24 रानातील सर्व झाडे जाणतील की मी याहवेह उंच झाडांना वाकवितो आणि वाकलेल्या झाडांना उंच वाढवतो. हिरव्या झाडांना मी वाळवितो आणि वाळलेल्या झाडांना भरभराटीस आणतो.
24 Assim saberão todas as árvores do campo que eu, o Senhor , abati a árvore alta, elevei a árvore baixa, sequei a árvore verde e fiz reverdecer a árvore seca; eu, o Senhor , o disse e o farei.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Ezequiel 17, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.