Ezequiel 14

marc (MARC) vs ARC

Sair da comparação
ARC Almeida Revista e Corrigida 2009
1 इस्राएलच्या वडिलांपैकी काहीजण माझ्याकडे आले व माझ्यासमोर बसले.
1 E vieram a mim alguns homens dos anciãos de Israel e se assentaram diante de mim.
2 तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
2 Então, veio a mim a palavra do Senhor , dizendo:
3 “मानवपुत्रा, या माणसांनी आपल्या हृदयात मूर्ती बसविल्या आहेत आणि त्यांच्या मुखासमोर त्यांनी दुष्ट अडखळण्याचे धोंडे ठेवले आहेत. त्यांना मी, मला प्रश्न विचारू द्यावा काय?
3 Filho do homem, estes homens levantaram os seus ídolos no seu coração e o tropeço da sua maldade puseram diante da sua face; devo eu de alguma maneira ser interrogado por eles?
4 म्हणून त्यांच्याशी बोल आणि त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएलमध्ये जेव्हा कोणी आपल्या हृदयात मूर्ती बसवितात आणि आपल्यासमोर दुष्ट अडखळण्याचे धोंडे ठेवून मग संदेष्ट्याकडे जातात, मी सार्वभौम याहवेह, स्वतः त्यांची मोठी मूर्तिपूजा लक्षात ठेवून त्यांना उत्तर देईन.
4 Portanto, fala com eles e dize-lhes: Assim diz o Senhor Jeová : Qualquer homem da casa de Israel que levantar os seus ídolos no seu coração, e puser o tropeço da sua maldade diante da sua face, e vier ao profeta, eu, o Senhor , vindo ele, lhe responderei conforme a multidão dos seus ídolos;
5 आपल्या मूर्तींसाठी ज्यांनी मला सोडले आहे, त्या इस्राएल लोकांची मने पुन्हा फिरावी म्हणून मी असे करेन.’
5 para que possa apanhar a casa de Israel no seu coração, porquanto todos se apartaram de mim para seguirem os seus ídolos.
6 “म्हणून इस्राएल लोकांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: पश्चात्ताप करा! तुमच्या मूर्तींपासून वळा आणि आपली अमंगळ कृत्ये टाकून द्या!
6 Portanto, dize à casa de Israel: Assim diz o Senhor Jeová : Convertei-vos, e deixai os vossos ídolos, e desviai o vosso rosto de todas as vossas abominações.
7 “ ‘जेव्हा इस्राएलातील किंवा इस्राएलमध्ये राहत असलेला कोणी परदेशी स्वतःला माझ्यापासून वेगळे करतात आणि त्यांच्या हृदयात मूर्ती बसवितात आणि आपल्या मुखासमोर दुष्ट अडखळण्याचे धोंडे ठेवून मग माझ्याविषयी विचारण्यास संदेष्ट्याकडे जातात, त्यांना मी याहवेह स्वतः उत्तर देईन.
7 Porque qualquer homem da casa de Israel, ou dos estrangeiros que peregrinam em Israel que se alienar de mim, e levantar os seus ídolos no seu coração, e puser o tropeço da sua maldade diante do seu rosto, e vier ao profeta, para me consultar por meio dele, a esse, eu, o Senhor , responderei por mim mesmo.
8 मी आपले मुख त्यांच्याविरुद्ध करेन आणि त्यांना एक चिन्ह व निंदेचा एक विषय असे करेन. मी त्यांना माझ्या लोकांमधून नाहीसे करेन, तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.
8 E porei o rosto contra o tal homem, e o farei um espanto, um sinal, e um provérbio, e arrancá-lo-ei do meio do meu povo; e sabereis que eu sou o Senhor .
9 “ ‘जर एखादा संदेष्टा भविष्य सांगण्यासाठी भुलविला गेला, तर त्याला मी याहवेहने भुलविले आहे आणि त्याच्याविरुद्ध मी माझा हात लांब करेन आणि माझ्या इस्राएली लोकांतून त्यांचा नाश करेन.
9 E, se o profeta for enganado e falar alguma coisa, eu, o Senhor , persuadi esse profeta; e estenderei a mão contra ele e destruí-lo-ei do meio do meu povo de Israel.
10 त्यांना आपला दोष वाहून घ्यावा लागेल; त्या संदेष्टाकडून सल्ला घेणारा जितका दोषी असणार, संदेष्टा सुद्धा तितकाच दोषी असेल.
10 E levarão a sua maldade; como a maldade do que pergunta será a maldade do profeta;
11 तेव्हा इस्राएली लोक माझ्यापासून आणखी बहकून जाणार नाहीत किंवा ते स्वतःला आपल्या सर्व पापांनी आणखी विटाळविणार नाहीत. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
11 para que a casa de Israel não se desvie mais de mim, nem se contamine mais com todas as suas transgressões; então, eles serão o meu povo, e eu serei o seu Deus, diz o Senhor Jeová .
12 याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
12 Veio ainda a mim a palavra do Senhor , dizendo:
13 “हे मानवपुत्रा, जर एखाद्या देशाने अविश्वासू राहून माझ्याविरुद्ध पाप केले आणि त्यांचा अन्नपुरवठा बंद करण्यास व त्यावर दुष्काळ आणून त्यातील लोक व जनावरे मारून टाकण्यास त्याविरुद्ध मी माझा हात लांब केला,
13 Filho do homem, quando uma terra pecar contra mim, gravemente se rebelando, então, estenderei a mão contra ela, e tornarei instável o sustento do pão, e enviarei contra ela fome, e arrancarei dela homens e animais;
14 जरी नोआह, दानीएल व इय्योब हे तिघे त्या देशात असते; तरी त्यांच्या नीतिमत्वामुळे केवळ तेच वाचले असते, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
14 ainda que estivessem no meio dela estes três homens, Noé, Daniel e Jó, eles, pela sua justiça, livrariam apenas a sua alma, diz o Senhor Jeová .
15 “किंवा त्या देशभरात मी जंगली जनावरे पाठवली आणि त्यांनी तो अपत्यहीन केला आणि जंगली जनावरांमुळे कोणीही त्यातून येणे जाणे करीत नाही, त्यामुळे देश ओसाड पडला,
15 Se eu fizer passar pela terra nocivas alimárias, e elas a assolarem, que fique assolada, e ninguém possa passar por ela por causa das feras;
16 तर सार्वभौम याहवेह घोषित करतात की माझ्या जिवाची शपथ, जरी हे तीन पुरुष त्यात असले, ते आपल्या स्वतःच्या मुला-मुलींना वाचवू शकले नसते. केवळ तेच वाचले असते, परंतु देश ओसाड पडला असता.
16 ainda que esses três homens estivessem no meio dela, vivo eu, diz o Senhor Jeová , que nem a filhos nem a filhas livrariam; só eles ficariam livres, e a terra seria assolada.
17 “किंवा त्या देशाविरुद्ध तलवार आणली आणि म्हटले, ‘तलवार संपूर्ण देशभर चालो,’ आणि त्यातील सर्व लोकांना व जनावरांना मारून टाकले,
17 Ou, se eu trouxer a espada sobre a tal terra, e disser: Espada, passa pela terra: e eu arrancar dela homens e animais;
18 सार्वभौम याहवेह जाहीर करतात माझ्या जिवाची शपथ, जरी हे तीन पुरुष त्यात असले, ते आपल्या स्वतःच्या मुला-मुलींना वाचवू शकले नसते. केवळ तेच वाचले असते.
18 ainda que aqueles três homens estivessem nela, vivo eu, diz o Senhor Jeová , que nem filhos nem filhas livrariam, mas eles só ficariam livres.
19 “किंवा त्या देशावर मी मरी पाठवून त्यातील लोकांना व जनावरांना मारून रक्तपाताने माझा क्रोध त्यावर ओतला,
19 Ou se eu enviar a peste sobre a tal terra e derramar o meu furor sobre ela com sangue, para arrancar dela homens e animais;
20 तर सार्वभौम याहवेह जाहीर करतात की माझ्या जिवाची शपथ, जरी नोआह, दानीएल व इय्योब त्यात असते, ते आपल्या मुलांना किंवा मुलींना वाचवू शकले नसते. त्यांच्या नीतिमत्वामुळे केवळ ते आपलाच जीव वाचवू शकले असते.
20 ainda que Noé, Daniel e Jó estivessem no meio dela, vivo eu, diz o Senhor Jeová , que nem filho nem filha eles livrariam, mas só livrariam a sua própria alma pela sua justiça.
21 “कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ते किती भयंकर असणार, जेव्हा मी माझ्या चार उग्र शिक्षा; तलवार व दुष्काळ व जंगली जनावरे आणि मरी यरुशलेमविरुद्ध आणेन व त्यातील लोक व त्यांची जनावरे मारून टाकेन!
21 Porque assim diz o Senhor Jeová : Quanto mais, se eu enviar os meus quatro maus juízos, a espada, e a fome, e as nocivas alimárias, e a peste, contra Jerusalém para arrancar dela homens e animais?
22 तरीही त्यातून काही वाचतील; काही पुत्र व कन्या ज्यांना त्यातून बाहेर काढले जाईल. ते तुमच्याजवळ येतील आणि तुम्ही जेव्हा त्यांची वागणूक व त्यांची कृत्ये पाहाल, मी यरुशलेमवर आणलेल्या प्रत्येक अनर्थाविषयी तुम्ही सांत्वन पावाल.
22 Mas eis que alguns restarão nela, que serão levados para fora, assim filhos como filhas; eis que eles virão a vós, e vereis o seu caminho e os seus feitos; e ficareis consolados do mal que eu trouxe sobre Jerusalém e de tudo o que trouxe sobre ela.
23 तुम्ही जेव्हा त्यांचे वर्तन व त्यांची कृत्ये पाहाल तेव्हा तुमचे सांत्वन होईल, कारण तुम्ही जाणाल की मी त्यात विनाकारण असे काहीही केले नाही, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”
23 E sereis consolados, quando virdes o seu caminho e os seus feitos; e sabereis que não fiz sem razão tudo quanto tenho feito nela, diz o Senhor Jeová .

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Ezequiel 14, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.