Ezequiel 11

marc (MARC) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 नंतर आत्म्याने मला उचलून याहवेहच्या मंदिराच्या पूर्वेकडील द्वाराजवळ आणले. तिथे द्वाराच्या प्रवेशाकडे पंचवीस पुरुष होते आणि त्यांच्यामध्ये लोकांचे पुढारी अज्जूरचा पुत्र याजन्याह व बेनाइयाहचा पुत्र पेलातियाह यांना मी पाहिले.
1 O espírito arrebatou-me e transportou-me à porta oriental do templo do Senhor, a que olha para o Levante. Havia à entrada dessa porta vinte e cinco homens, entre os quais distingui Jazanias, filho de Azur, e Feltias, filho de Banaías, chefes do povo.
2 याहवेहने मला म्हटले, “मानवपुत्रा, हे ते पुरुष आहेत जे दुष्टतेचा कट करून शहरात वाईट सल्ला देतात.
2 Filho do homem, falou-me o Senhor, são estes os maquinadores de perversidades, os difusores de maus conselhos nesta cidade,
3 ते म्हणतात, ‘तुम्ही आपली घरांची हल्लीच पुनर्बांधणी केली नाही काय? हे शहर एक कढई व आपण त्यातील मांस असे आहोत.’
3 que dizem: Não é agora o momento de reconstruir as nossas casas? Eis a panela e nós somos a carne.
4 म्हणून त्यांच्याविरुद्ध भविष्य सांग; मानवपुत्रा, भविष्यवाणी कर.”
4 Por causa disso, filho do homem, profetiza contra eles!
5 मग याहवेहचा आत्मा माझ्यावर आला आणि त्यांनी मला असे बोलावयास सांगितले: “याहवेह असे म्हणतात: इस्राएलाच्या पुढार्‍यांनो तुम्ही असेच म्हणतात, परंतु तुमच्या मनात काय सुरू आहे ते मी जाणतो.
5 Então o espírito do Senhor apoderou-se de mim e disse-me: Fala: oráculo do Senhor: eis como falais, casa de Israel; mas eu conheço os pensamentos que vos sobem ao espírito.
6 तुम्ही या नगरामध्ये पुष्कळांना मारून टाकले आणि त्यातील रस्ते प्रेतांनी भरून टाकले.
6 Tendes feito crime sobre crime nesta cidade, tendes juncado suas ruas de cadáveres.
7 “म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जी शरीरे तुम्ही तिथे टाकली आहेत ती मांस आहेत आणि हे शहर कढई असे आहे, परंतु मी तुम्हाला त्यातून बाहेर काढेन.
7 Eis por que diz o Senhor Javé: os mortos, cujos cadáveres tendes ocultado na cidade, são a carne e a cidade é a panela. Mas a vós eu vos farei sair.
8 तुम्हाला तलवारीचे भय आहे आणि मी तुमच्याविरुद्ध तलवारच आणणार आहे, असे सार्वभौम याहवेह घोषित करतात.
8 Receais a espada; farei com que a espada venha sobre vós, oráculo do Senhor Javé.
9 मी तुम्हाला शहरातून बाहेर घालवेन आणि तुम्हाला विदेशी लोकांच्या हाती देईन आणि तुमच्यावर शिक्षा आणेन.
9 Eu vos farei sair da cidade, atirar-vos-ei às mãos dos estrangeiros, e com rigor procederei contra vós.
10 तुम्ही तलवारीने पडाल आणि इस्राएलच्या सीमांवर मी तुमच्यावर न्याय आणेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.
10 Tombareis sob a espada, procederei com rigor contra vós, até os confins de Israel, e sabereis que sou eu, o Senhor.
11 हे शहर तुम्हाला कढई असे असणार नाही किंवा तुम्ही त्यात मांसही नसाल; इस्राएलच्या सीमेवर मी तुमचा न्याय करेन.
11 Esta cidade não será para vós a panela, e dentro dela não estareis como carne: até os confins de Israel vos hei de julgar.
12 आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे, कारण तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाही किंवा माझे विधी मानले नाही, परंतु तुमच्या सभोवती असलेल्या राष्ट्रांच्या मापांप्रमाणे तुम्ही वागला.”
12 E conhecereis que sou eu o Senhor, cujas leis não observais, nem praticais as minhas ordens, pois imitais os costumes dos povos que vos cercam.
13 आता मी भविष्य सांगत असतानाच बेनाइयाहचा पुत्र पेलातियाह मरण पावला. तेव्हा मी उपडा पडून मोठ्या आवाजात रडलो, “अरेरे, सार्वभौम याहवेह! इस्राएलच्या उरलेल्यांचा आपण सर्वनाश करणार काय?”
13 Ora, enquanto eu profetizava, Feltias, filho de Banaías, caiu morto. Então, prostrado com a face em terra, clamei: Ah! Senhor Javé, ides aniquilar o que resta de Israel?
14 याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
14 A palavra do Senhor foi-me dirigida nestes termos:
15 “मानवपुत्रा, यरुशलेमचे लोक तुमच्या निर्वासित भाऊबंदांविषयी व इतर सर्व इस्राएली लोकांविषयी म्हणाले, ‘ते याहवेहपासून फार दूर आहेत; हा देश आम्हाला आमचे वतन म्हणून दिला गेला होता.’
15 filho do homem: é dos teus irmãos, dos teus parentes, da casa de Israel toda que os habitantes de Jerusalém dizem: ei-los longe do Senhor! É a nós efetivamente que pertence esta terra.
16 “म्हणून असे म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जरी मी त्यांना राष्ट्रामध्ये दूर पाठवले आणि त्यांना देशांमध्ये पांगविले, तरीही ज्या देशांमध्ये ते गेले आहेत तिथे काही काळासाठी मी त्यांचे पवित्रस्थान होतो.’
16 Dize-lhes então: eis o que diz o Senhor Javé: eu os tenho lançado para longe entre as nações, e os dispersei em diversos países, e lhes tenho sido, por pouco tempo, um santuário nos países para onde foram.
17 “म्हणून असे म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी तुम्हाला राष्ट्रातून गोळा करेन आणि ज्या देशात तुम्ही पांगले आहात तिथून तुम्हाला परत आणेन आणि इस्राएल देश मी तुम्हाला परत देईन.’
17 Por isso lhes digo: eis o que diz o Senhor Javé: eu vos reunirei dentre as nações e vos recolherei dos países onde vos achais dispersos, para vos fazer retornar à terra de Israel.
18 “ते तिथे परत येतील आणि त्यातील सर्व व्यर्थ प्रतिमा व अमंगळ मूर्ती काढून टाकतील.
18 Quando houverem reentrado e extirpado os ídolos e objetos abomináveis,
19 मी त्यांना अविभाजित हृदय देईन आणि त्यांच्यात नवीन आत्मा घालेन; मी त्यांच्यामधून त्यांचे दगडरुपी हृदय काढून त्यांना मांसमय हृदय देईन.
19 eu lhes darei um só coração e os animarei com um espírito novo: extrairei do seu corpo o coração de pedra, para substituí-lo por um coração de carne,
20 तेव्हा ते माझे विधी आचरणात आणतील व काळजीपूर्वक माझे नियम पाळतील. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.
20 a fim de que observem as minhas leis, guardem e pratiquem os meus mandamentos, sejam o meu povo e eu o seu Deus.
21 परंतु ज्यांची हृदये त्यांच्या व्यर्थ प्रतिमा व अमंगळ मूर्तींकडे लागलेली आहेत, त्यांनी केलेल्या कृत्यांना मी त्यांच्याच डोक्यावर पाडीन, असे सार्वभौम याहवेह घोषित करतात.”
21 Quanto àqueles que têm o coração apegado aos ídolos e às suas práticas abomináveis, farei pesar sobre suas cabeças o peso de seu proceder - oráculo do Senhor Javé.
22 नंतर करुबांनी, त्यांच्या बाजूला असलेल्या चाकांबरोबर आपले पंख पसरले आणि इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव त्यांच्यावर होते.
22 Nesse momento, os querubins desdobraram as asas, e as rodas se puseram em movimento com eles, enquanto a glória do Deus de Israel sobre eles repousava.
23 नंतर याहवेहचे गौरव शहरातून वर निघाले व पूर्वेकडे असलेल्या डोंगरावर जाऊन थांबले.
23 A glória do Senhor, elevando-se então no interior da cidade foi parar sobre a montanha que está do lado oriental da cidade.
24 आणि परमेश्वराच्या आत्म्याद्वारे दिलेल्या दृष्टान्तामध्ये, आत्म्याने मला वर उचलले आणि बाबेलच्या निर्वासित लोकांकडे आणले.
24 Em seguida o espírito arrebatou-me e conduziu-me à Caldéia, em visão, pelo espírito de Deus, junto dos exilados. Então se esvaiu a visão que eu havia contemplado;
25 आणि याहवेहने मला जे दाखविले होते ते सर्व मी निर्वासित असलेल्यांना सांगितले.
25 e eu contei aos exilados tudo quanto o Senhor me tinha feito ver.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Ezequiel 11, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.