Êxodo 8
marc (MARC) vs ARC
1 मग याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहकडे जा आणि त्याला सांग, याहवेह असे म्हणतात, माझ्या लोकांना जाऊ दे, अशासाठी की त्यांनी माझी उपासना करावी.
1 Depois, disse o Senhor a Moisés: Entra a Faraó e dize-lhe: Assim diz o Senhor : Deixa ir o meu povo, para que me sirva.
2 तू जर त्यांना जाऊ देण्याचे नाकारलेस, तर तुझ्या संपूर्ण देशात मी बेडकांची पीडा पाठवेन.
2 E, se recusares deixá-lo ir, eis que ferirei com rãs todos os teus termos.
3 नाईल नदी बेडकांनी भरून जाईल. ते तुझ्या महालात व तुझ्या शयनगृहात, तुझ्या अंथरुणात येतील, तुझ्या अधिकार्यांच्या घरात आणि तुझ्या लोकांवर, तुझ्या भट्ट्या व तुझ्या परातीत ते येतील.
3 E o rio criará rãs, que subirão e virão à tua casa, e ao teu dormitório, e sobre a tua cama, e às casas dos teus servos, e sobre o teu povo, e aos teus fornos, e às tuas amassadeiras.
4 बेडूक तुझ्यावर आणि तुझ्या लोकांवर आणि तुझ्या सर्व अधिकार्यांवर येतील.”
4 E as rãs subirão sobre ti, e sobre o teu povo, e sobre todos os teus servos.
5 यानंतर याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाला सांग, त्याने त्याच्या हातात काठी घेऊन आपला हात इजिप्तमधील सर्व ओढे, कालव्याच्या व तलावाच्या दिशेला लांब करावा म्हणजे इजिप्त देशाच्या भूमीवर बेडूक येतील.”
5 Disse mais o Senhor a Moisés: Dize a Arão: Estende a tua mão com tua vara sobre as correntes, e sobre os rios, e sobre os tanques, e faze subir rãs sobre a terra do Egito.
6 त्याप्रमाणे अहरोनाने इजिप्तच्या पाण्यावर आपला हात लांब केला आणि संपूर्ण देश बेडकांनी व्यापून गेला.
6 E Arão estendeu a mão sobre as águas do Egito, e subiram rãs e cobriram a terra do Egito.
7 पण जादूगारांनीही आपल्या गुप्तज्ञानाने तसेच केले व इजिप्त देशात बेडूक आणले.
7 Então, os magos fizeram o mesmo com os seus encantamentos; e fizeram subir rãs sobre a terra do Egito.
8 मग फारोहने मोशे व अहरोन यांना बोलावून सांगितले, “याहवेहकडे प्रार्थना करा की त्यांनी माझ्यापासून व माझ्या लोकांपासून बेडूक दूर करावेत, मग मी तुझ्या लोकांनी याहवेहला यज्ञ करावा म्हणून त्यांना जाऊ देईन.”
8 E Faraó chamou a Moisés e a Arão e disse: Rogai ao Senhor que tire as rãs de mim e do meu povo; depois, deixarei ir o povo, para que sacrifiquem ao Senhor .
9 मोशे फारोहला म्हणाला, “हा सन्मान मी तुला देतो, की मी तुझ्यासाठी, तुझ्या अधिकार्यांसाठी व लोकांसाठी विनंती करावी अशी वेळ तू नेमून ठेवावी, म्हणजे तुमच्यातून बेडूक नाहीसे होतील, नाईल नदीतील बेडके मात्र राहतील.”
9 E Moisés disse a Faraó: Tu tenhas glórias sobre mim. Quando orarei por ti, e pelos teus servos, e por teu povo, para tirar as rãs de ti e das suas casas, de sorte que somente fiquem no rio?
10 फारोह मोशेला म्हणाला, “उद्या.”
10 E ele disse: Amanhã. E Moisés disse: Seja conforme a tua palavra, para que saibas que ninguém há como o Senhor , nosso Deus.
11 नाईल नदीतील बेडूक सोडून बाकीचे सर्व बेडूक तू, तुझे घर, तुझे सेवक व तुझ्या लोकांपासून निघून जातील.”
11 E as rãs apartar-se-ão de ti, e das tuas casas, e dos teus servos, e do teu povo; somente ficarão no rio.
12 मग मोशे व अहरोन फारोहला सोडून गेल्यानंतर, जी बेडके याहवेहने फारोहवर आणली होती, त्याविषयी मोशेने याहवेहला विनंती केली.
12 Então, saiu Moisés e Arão de Faraó; e Moisés clamou ao Senhor por causa das rãs que tinha posto sobre Faraó.
13 मोशेने मागितल्याप्रमाणे याहवेहने केले; आणि घरातील, अंगणातील व शेतातील सर्व बेडूक मरून गेले.
13 E o Senhor fez conforme a palavra de Moisés; e as rãs morreram nas casas, nos pátios e nos campos.
14 त्यांचे ढीग जमा झाले, व देशात त्यांची दुर्गंधी पसरली.
14 E ajuntaram-nas em montões, e a terra cheirou mal.
15 पण सगळे व्यवस्थित झाले असे पाहून फारोहने आपले मन कठीण केले व याहवेहने सांगितल्याप्रमाणे मोशे व अहरोनाचे त्याने ऐकले नाही.
15 Vendo, pois, Faraó que havia descanso, agravou o seu coração e não os ouviu, como o Senhor tinha dito.
16 मग याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाला सांग, ‘आपली काठी लांब कर व भूमीच्या धुळीवर आपट,’ आणि संपूर्ण इजिप्तभर या धुळीची चिलटे होतील.”
16 Disse mais o Senhor a Moisés: Dize a Arão: Estende a tua vara e fere o pó da terra, para que se torne em piolhos por toda a terra do Egito.
17 त्यांनी तसे केले, आणि जेव्हा अहरोनाने काठी घेऊन आपला हात लांब केला आणि भूमीच्या धुळीवर मारली, तेव्हा मनुष्य व जनावरे यावर चिलटे आली. इजिप्त देशभरातील सगळी धूळ चिलटे अशी झाली.
17 E fizeram assim; porque Arão estendeu a mão com a sua vara e feriu o pó da terra, e havia muitos piolhos nos homens e no gado; todo o pó da terra se tornou em piolhos em toda a terra do Egito.
18 परंतु जेव्हा जादूगारांनी आपल्या गुप्तज्ञानाने तसेच करण्याचा प्रयत्न केला, ते करू शकले नाही.
18 E os magos fizeram também assim com os seus encantamentos para produzirem piolhos, mas não puderam; e havia piolhos nos homens e no gado.
19 तेव्हा ते जादूगार फारोहला म्हणाले, “ही परमेश्वराची अंगुली आहे.” पण याहवेहने सांगितल्याप्रमाणे फारोहचे हृदय कठीण होते आणि त्याने त्यांचे ऐकले नाही.
19 Então, disseram os magos a Faraó: Isto é o dedo de Deus. Porém o coração de Faraó se endureceu, e não os ouvia, como o Senhor tinha dito.
20 यानंतर याहवेह मोशेला म्हणाले, “पहाटे ऊठ व फारोह नदीवर जात असता त्याची भेट घे आणि त्याला सांग याहवेह असे म्हणतात: माझ्या लोकांना जाऊ दे, यासाठी की त्यांनी माझी उपासना करावी.
20 Disse mais o Senhor a Moisés: Levanta-te pela manhã cedo, e põe-te diante de Faraó; eis que ele sairá às águas, e dize-lhe: Assim diz o Senhor : Deixa ir o meu povo, para que me sirva.
21 जर तू माझ्या लोकांना जाऊ दिले नाहीस तर मी तुझ्यावर आणि तुझ्या सेवकांवर व तुझ्या लोकांवर व तुमच्या घरांमध्ये गोमाश्यांचे थवे पाठवेन. इजिप्त लोकांची घरे गोमाश्यांनी भरून जातील; व जमीन सुद्धा गोमाश्यांनी झाकली जाईल.
21 Porque, se não deixares ir o meu povo, eis que enviarei enxames de moscas sobre ti, e sobre os teus servos, e sobre o teu povo, e às tuas casas; e as casas dos egípcios se encherão destes enxames, e também a terra em que eles estiverem.
22 “पण त्या दिवशी माझे लोक राहतात त्या गोशेन प्रांताशी मी वेगळा वागेन; त्या ठिकाणी मात्र गोमाश्यांचे थवे नसतील, यावरून तुला समजावे की, मी याहवेह या भूमीवर आहे.
22 E, naquele dia, eu separarei a terra de Gósen, em que meu povo habita, a fim de que nela não haja enxames de moscas, para que saibas que eu sou o Senhor no meio desta terra.
23 माझे लोक व तुझे लोक यांच्यामध्ये मी फरक करेन. हे चिन्ह उद्याच घडेल.”
23 E porei separação entre o meu povo e o teu povo; amanhã será este sinal.
24 आणि याहवेहने तसेच केले. आणि पाहा, फारोहचा राजवाडा, त्याच्या अधिकार्यांची घरे व इजिप्तच्या लोकांची सर्व घरे गोमाश्यांच्या दाट थव्यांनी भरून गेली; आणि गोमाश्यांनी देशाची नासाडी केली.
24 E o Senhor fez assim; e vieram grandes enxames de moscas à casa de Faraó, e às casas dos seus servos, e sobre toda a terra do Egito; a terra foi corrompida destes enxames.
25 मग फारोहने मोशे व अहरोन यांना बोलावून म्हटले, “जा, याच देशात तुमच्या परमेश्वराला यज्ञ करा.”
25 Então, chamou Faraó a Moisés e a Arão e disse: Ide e sacrificai ao vosso Deus nesta terra.
26 पण मोशे म्हणाला, “तसे करणे बरे नाही. याहवेह आमच्या परमेश्वराला जो यज्ञ आम्ही करतो तो इजिप्तच्या लोकांना किळसवाणा वाटेल. आणि असा यज्ञ ज्याची ते किळस करतात तो जर आम्ही केला, तर ते आम्हाला धोंडमार करणार नाही काय?
26 E Moisés disse: Não convém que façamos assim, porque sacrificaríamos ao Senhor , nosso Deus, a abominação dos egípcios; eis que, se sacrificássemos a abominação dos egípcios perante os seus olhos, não nos apedrejariam eles?
27 म्हणून आम्ही तीन दिवसांचा प्रवास करून रानात जाऊन आमचे परमेश्वर याहवेह आज्ञा देईल त्याप्रमाणे आम्ही बळी अर्पण करू.”
27 Deixa-nos ir caminho de três dias ao deserto, para que sacrifiquemos ao Senhor , nosso Deus, como ele nos dirá.
28 फारोहने म्हटले, “तुमचा परमेश्वर याहवेह यास रानात जाऊन यज्ञ करावा म्हणून मी तुम्हाला जाऊ देतो, परंतु फार दूर जाऊ नका. आता माझ्यासाठी विनंती करा.”
28 Então, disse Faraó: Deixar-vos-ei ir, para que sacrifiqueis ao Senhor , vosso Deus, no deserto; somente que indo, não vades longe; orai também por mim.
29 मोशे त्याला म्हणाला, “मी तुला सोडून गेल्याबरोबर याहवेहकडे तुझ्यासाठी विनंती करेन, आणि उद्या गोमाशा फारोहस व त्याच्या अधिकार्यांस व त्याच्या लोकास सोडून जातील. लोकांनी याहवेहला यज्ञ करण्यास जाऊ नये म्हणून फारोहने पुन्हा फसवणूक करू नये याची त्याने दक्षता घ्यावी.”
29 E Moisés disse: Eis que saio de ti e orarei ao Senhor , que estes enxames de moscas se retirem amanhã de Faraó, dos seus servos e do seu povo; somente que Faraó não mais me engane, não deixando ir a este povo para sacrificar ao Senhor .
30 मग मोशे फारोह पुढून निघून गेला व याहवेहकडे विनंती केली,
30 Então, saiu Moisés de Faraó e orou ao Senhor .
31 व मोशेने जे याहवेहपाशी मागितले त्याप्रमाणे याहवेहने केले. फारोह, त्याचे सेवक व त्याच्या लोकांपासून गोमाशा निघून गेल्या; एक सुद्धा गोमाशी बाकी राहिली नाही.
31 E fez o Senhor conforme a palavra de Moisés, e os enxames de moscas se retiraram de Faraó, dos seus servos e do seu povo; não ficou uma só.
32 परंतु यावेळी सुद्धा फारोहने आपले हृदय कठीण केले आणि इस्राएली लोकांना जाऊ दिले नाही.
32 Mas endureceu Faraó ainda esta vez seu coração e não deixou ir o povo.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Êxodo 8, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.