Ester 4

marc (MARC) vs ARIB

Sair da comparação
ARIB Almeida Revisada Imprensa Bíblica
1 जेव्हा मर्दखयाला समजले, ज्या सर्व गोष्टी करण्यात आल्या होत्या, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून, गोणपाट नेसून, अंगाला राख फासून व बाहेर शहरात जाऊन मोठमोठ्याने व अतिशय दुःखाने विलाप केला.
1 Quando Mordecai soube tudo quanto se havia passado, rasgou as suas vestes, vestiu-se de saco e de cinza, e saiu pelo meio da cidade, clamando com grande e amargo clamor;
2 तो राजद्वारापर्यंतच जाऊ शकला, कारण गोणपाट पांघरूण राजवाड्यात प्रवेश करण्याची कोणाला परवानगी नसे.
2 e chegou até diante da porta do rei, pois ninguém vestido de saco podia entrar elas portas do rei.
3 साम्राज्यातील सर्व प्रांतांत जिथेही राजाज्ञा जाहीर झाली, तेथील यहूदी लोक उपवास व अत्यंत विलाप करीत, रडून आक्रोश करू लागले. अनेकजण गोणपाट नेसून राखेत पडून राहिले.
3 Em todas as províncias aonde chegava a ordem do rei, e o seu decreto, havia entre os judeus grande pranto, com jejum, e choro, e lamentação; e muitos se deitavam em saco e em cinza.
4 एस्तेरच्या दासींनी आणि खोजांनी येऊन तिला मर्दखयाबद्दल सांगितले, तेव्हा ती अतिशय खिन्न झाली. मर्दखयाने गोणपाट काढून वस्त्रे घालावी म्हणून तिने त्याच्याकडे वस्त्रे पाठविली, परंतु त्याने ते घेण्याचे नाकारले.
4 Quando vieram as moças de Ester e os eunucos lho fizeram saber, a rainha muito se entristeceu; e enviou roupa para Mordecai, a fim de que, despindo-lhe o saco, lha vestissem; ele, porém, não a aceitou.
5 मग एस्तेरने राजांच्या खोजांपैकी जो एस्तेरच्या तैनातीला असे, त्या हथाकाला बोलाविणे पाठविले. मर्दखयावर कोणते संकट गुदरले होते व तो असा का वागत होता, या गोष्टीची चौकशी करण्यासाठी तिने त्याला बाहेर मर्दखयाकडे पाठविले.
5 Então Ester mandou chamar Hataque, um dos eunucos do rei, que este havia designado para a servir, e o mandou ir ter com Mordecai para saber que era aquilo, e por que era.
6 तेव्हा हथाक मर्दखयाला भेटण्यास राजद्वारासमोरील शहराच्या चौकात गेला.
6 Hataque, pois, saiu a ter com Mordecai à praça da cidade, diante da porta do rei;
7 मर्दखयाने त्याला त्याच्या बाबत घडलेले सर्वकाही सांगितले. यहूदी लोकांचा नाश करण्यासाठी जी धनराशी शाही खजिन्यात देण्याचे वचन हामानाने दिले होते त्यासंबंधीही सांगितले.
7 e Mordecai lhe fez saber tudo quanto lhe tinha sucedido, como também a soma exata do dinheiro que Hamã prometera pagar ao tesouro do rei pela destruição dos judeus.
8 मर्दखयाने त्याला शूशनमध्ये जाहीर करण्यात आलेली, सर्व यहूद्यांचा नायनाट करण्याच्या राजाज्ञेची एक प्रतही दिली आणि ती प्रत एस्तेरला दाखवून त्यासंबंधी सर्वकाही सविस्तर कळविण्यासही सांगितले. तसेच एस्तेरला तिने राजाकडे जावे आणि तिच्या लोकांसाठी तिने राजाजवळ दयेसाठी रदबदली करावी आणि त्याला विनवणी करावी, अशा सूचनेचा निरोपही त्याने त्याच्याजवळ दिला.
8 Também lhe deu a cópia do decreto escrito que se publicara em Susã para os destruir, para que a mostrasse a Ester, e lha explicasse, ordenando-lhe que fosse ter com o rei, e lhe pedisse misericórdia e lhe fizesse súplica ao seu povo.
9 मग हथाक परत आला व त्याने एस्तेरला मर्दखयाने सांगितलेला अहवाल दिला.
9 Veio, pois, Hataque, e referiu a Ester as palavras de Mordecai.
10 एस्तेरने हथाकाला मर्दखयाकडे पुढील निरोप देऊन पाठविले,
10 Então falou Ester a Hataque, mandando-o dizer a Mordecai:
11 “राजाच्या सर्व अधिकाऱ्यांना व शाही प्रांतातील लोकांना माहीत आहे की एखादी व्यक्ती, मग ती पुरुष असो वा स्त्री, राजाच्या आतील चौकात बोलाविल्यावाचून गेली, तर त्यांच्यासाठी एकच कायदा आहे: त्यांना प्राणदंड देण्यात यावा. पण जर राजाने आपला सोन्याचा राजदंड त्यांच्यापुढे केला तरच त्यांना जीवदान मिळते. आता तीस दिवस होऊन गेले आहे, पण राजाने मला आपल्याकडे बोलावलेले नाही.”
11 Todos os servos do rei, e o povo das províncias do rei, bem sabem que, para todo homem ou mulher que entrar à presença do rei no pátio interior sem ser chamado, não há senão uma sentença, a de morte, a menos que o rei estenda para ele o cetro de ouro, para que viva; mas eu já há trinta dias não sou chamada para entrar a ter com o rei.
12 तेव्हा एस्तेरचा हा निरोप मर्दखयाच्या कानी घालण्यात आला.
12 E referiram a Mordecai as palavras de Ester.
13 मर्दखयाने हे प्रत्युतर एस्तेरला पाठविले: “असा विचार करू नको की तिथे राजवाड्यात आहेस म्हणून इतर सर्व यहूदी मारले जात असताना तू एकटी वाचशील.
13 Então Mordecai mandou que respondessem a Ester: Não imagines que, por estares no palácio do rei, terás mais sorte para escapar do que todos os outros judeus.
14 अशा प्रसंगी तू जर शांत राहशील, तर दुसर्‍या मार्गाने यहूदी लोकांकरिता मुक्ती व उद्धार येईल, परंतु तू आणि तुझ्या वडिलाचे कुटुंब नाश पावेल. पण कोणजाणे कदाचित अशाच प्रसंगासाठी तुला हे शाही पद मिळाले असेल का?”
14 Pois, se de todo te calares agora, de outra parte se levantarão socorro e livramento para os judeus, mas tu e a casa de teu pai perecereis; e quem sabe se não foi para tal tempo como este que chegaste ao reino?
15 तेव्हा एस्तेरने मर्दखयाला हे उत्तर पाठविले:
15 De novo Ester mandou-os responder a Mordecai:
16 “जा, शूशन नगरातील सर्व यहूदी लोकांना एकत्र गोळा करून तुम्ही सर्वजण माझ्यासाठी उपवास करा. तीन दिवस आणि तीन रात्री अन्न किंवा पाणी पिऊ नका. मी आणि माझ्या दासीदेखील तुम्हासह उपवास करू. मग यानंतर, हे कायद्याविरुद्ध असले तरीही मी राजाला भेटण्यासाठी जाईन, आणि माझा नाश झाला तर होवो.”
16 Vai, ajunta todos os judeus que se acham em Susã, e jejuai por mim, e não comais nem bebais por três dias, nem de noite nem de dia; e eu e as minhas moças também assim jejuaremos. Depois irei ter com o rei, ainda que isso não é segundo a lei; e se eu perecer, pereci.
17 तेव्हा मर्दखया तिथून गेला व एस्तेरच्या सूचनेप्रमाणे सर्व त्याने केले.
17 Então Mordecai foi e fez conforme tudo quanto Ester lhe ordenara.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Ester 4, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.