Efésios 6
marc (MARC) vs VC
1 लेकरांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा, कारण हे योग्य आहे.
1 Filhos, obedecei a vossos pais segundo o Senhor; porque isto é justo.
2 “तुमच्या आई आणि वडिलांचा मान राखा” अभिवचन असलेली ही पहिली आज्ञा आहे.
2 O primeiro mandamento acompanhado de uma promessa é: Honra teu pai e tua mãe,
3 “यासाठी की तुमचे कल्याण व्हावे आणि तुम्हाला पृथ्वीवर दीर्घायुष्याचा लाभ घेता यावा.”
3 para que sejas feliz e tenhas longa vida sobre a terra {Dt 5,16}.
4 पित्यांनो, तुम्ही आपल्या मुलांना प्रकोपित करू नका; याउलट प्रभूच्या शिक्षणात व बोधवचनात त्यांना वाढवा.
4 Pais, não exaspereis vossos filhos. Pelo contrário, criai-os na educação e doutrina do Senhor.
5 दासांनो, जसे आपण ख्रिस्ताचे आज्ञापालन करतो, तसेच खर्या मनाने आपल्या ऐहिक धन्याचा मान राखा व भय धरा व त्यांच्या आज्ञा पाळा
5 Servos, obedecei aos vossos senhores temporais, com temor e solicitude, de coração sincero, como a Cristo,
6 केवळ त्यांची नजर तुमच्यावर असतानाच त्यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून त्यांचे आज्ञापालन करू नका, तर मनापासून परमेश्वराची इच्छा पूर्ण करणारे ख्रिस्ताचे दास असे व्हा.
6 não por mera ostentação, só para agradar aos homens, mas como servos de Cristo, que fazem de bom grado a vontade de Deus.
7 ही सेवा लोकांची म्हणून नाही परंतु पूर्ण मनाने आपण जशी प्रभूची करतो अशी समजून करा.
7 Servi com dedicação, como servos do Senhor e não dos homens.
8 तुम्ही दास किंवा स्वतंत्र असला, तरी प्रत्येक चांगल्या गोष्टीचे वेतन प्रभू तुम्हा प्रत्येकाला देईल, हे लक्षात ठेवा.
8 E estai certos de que cada um receberá do Senhor a recompensa do bem que tiver feito, quer seja escravo quer livre.
9 आणि धन्यांनो, तुमच्या दासांशी तसेच वागा. त्यांना धमक्या देऊ नका. कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमचा व त्यांचा दोघांचाही एकच धनी जे स्वर्गात असून त्यांच्याजवळ पक्षपात नाही.
9 Senhores, procedei também assim com os servos. Deixai as ameaças. E tende em conta que o Senhor está no céu, Senhor tanto deles como vosso, que não faz distinção de pessoas.
10 सर्वात शेवटी प्रभूच्या बळामध्ये आणि त्यांच्या पराक्रमी सामर्थ्याने सज्ज व्हा.
10 Finalmente, irmãos, fortalecei-vos no Senhor, pelo seu soberano poder.
11 परमेश्वराची सर्व शस्त्रास्त्रे धारण करा, म्हणजे तुम्हाला सैतानाच्या योजनेविरुद्ध उभे राहता येईल.
11 Revesti-vos da armadura de Deus, para que possais resistir às ciladas do demônio.
12 कारण आपले युद्ध मांस आणि रक्त यांच्याविरुद्ध नाही, तर सत्ताधारी, अधिपतींविरुद्ध, अंधकाराच्या शक्तीविरुद्ध, आणि आकाशमंडळातील दुष्ट आत्मे यांच्याविरुद्ध आहे.
12 Pois não é contra homens de carne e sangue que temos de lutar, mas contra os principados e potestades, contra os príncipes deste mundo tenebroso, contra as forças espirituais do mal {espalhadas} nos ares.
13 यास्तव वाईट दिवसांमध्ये तुम्हाला खंबीरपणे उभे राहता यावे आणि सर्वकाही केल्यानंतर टिकाव धरता यावा म्हणून परमेश्वराची शस्त्रसामुग्री धारण करा.
13 Tomai, por tanto, a armadura de Deus, para que possais resistir nos dias maus e manter-vos inabaláveis no cumprimento do vosso dever.
14 म्हणून सत्यरूपी कमरबंदाने आपली कंबर बांधा, नीतिमत्वाचे ऊरस्त्राण घेऊन स्थिर उभे राहा.
14 Ficai alerta, à cintura cingidos com a verdade, o corpo vestido com a couraça da justiça,
15 परमेश्वराच्या शांतीची शुभवार्ता गाजविण्याची तत्परता ही पादत्राणे घालून तयार राहा.
15 e os pés calçados de prontidão para anunciar o Evangelho da paz.
16 या सर्व व्यतिरिक्त विश्वासरूपी ढाल घ्या, जिच्याद्वारे तुम्ही त्या दुष्टाचे अग्निबाण विझवू शकाल.
16 Sobretudo, embraçai o escudo da fé, com que possais apagar todos os dardos inflamados do Maligno.
17 तारणाचे शिरस्त्राण, आणि आत्म्याची तरवार म्हणजे परमेश्वराचे वचन हे देखील घ्या.
17 Tomai, enfim, o capacete da salvação e a espada do Espírito, isto é, a palavra de Deus.
18 सर्वदा प्रार्थना करा. पवित्र आत्म्यामध्ये प्रत्येक प्रसंगी, सर्वप्रकारच्या प्रार्थनेने आणि विनवणीने, प्रभूच्या लोकांसाठी जागृत राहून अगत्याने प्रार्थना करीत राहा.
18 Intensificai as vossas invocações e súplicas. Orai em toda circunstância, pelo Espírito, no qual perseverai em intensa vigília de súplica por todos os cristãos.
19 माझ्यासाठी सुद्धा प्रार्थना करा, की जेव्हाही मी बोलेन तेव्हा मला शब्द सुचावेत, व मी निर्भयपणे शुभवार्तेचे रहस्य स्पष्ट करून सांगावे.
19 E orai também por mim, para que me seja dado anunciar corajosamente o mistério do Evangelho,
20 त्यासाठीच मी साखळदंड धारण केलेला राजदूत आहे. प्रार्थना करा की निर्भयतेने सांगावयास हवे तसे मी ते जाहीर करावे.
20 do qual eu sou embaixador, prisioneiro. E que eu saiba apregoá-lo publicamente, e com desassombro, como é meu dever!
21 येथे मी कसा आहे व काय करीत आहे, यासंबंधीची सर्व हकिकत माझा प्रिय बंधू आणि प्रभूच्या कार्यातील प्रामाणिक सहकारी तुखिक तुम्हाला सांगेल.
21 E para que também vós estejais a par da minha situação e do que faço aqui, Tíquico, o irmão muito amado e fiel ministro no Senhor, vos informará de tudo.
22 आमची खुशाली तुम्हाला समजावी व त्याने तुम्हाला प्रोत्साहित करावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे पाठवित आहे.
22 Eu vo-lo envio precisamente para isto: para que sejais informados do que se passa conosco e para que ele conforte os vossos corações.
23 बंधू व भगिनींना शांती असो आणि परमेश्वर जो पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हाला विश्वासाबरोबर प्रीती प्राप्त होवो!
23 Paz aos irmãos, amor e fé, da parte de Deus Pai e do Senhor Jesus Cristo.
24 आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर शाश्वत प्रीती करणार्या तुम्हा सर्वांवर कृपा असो.
24 A graça esteja com todos os que amam nosso Senhor Jesus Cristo com amor inalterável e eterno.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Efésios 6, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.