Deuteronômio 9

marc (MARC) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 हे इस्राएला, ऐक: तुम्ही आता यार्देन पार करून पलीकडे आत जाणार आहात आणि ज्यांच्या शहरांची तटबंदी आकाशापर्यंत आहेत, अशा तुमच्यापेक्षा महान आणि अधिक बलवान लोकांना हाकलून देणार आहात.
1 Ouve, Israel: hoje passarás o Jordão para despojar nações maiores e ais fortes do que tu, cidades importantes cujas muralhas sobem até os céus,
2 तेथील लोक धिप्पाड व उंच आहेत—अनाकी वंशज! तुम्हाला त्यांच्याबद्दल माहीत आहे आणि तुम्ही हे ऐकले आहे: “अनाकी लोकांविरुद्ध कोण उभे राहू शकेल?”
2 um povo forte e de alta estatura, descendente dos enacim, que conheces e dos quais ouviste dizer: quem poderá enfrentar os filhos de Enac?
3 पण तुमची खात्री असू द्या की, याहवेह तुमचे परमेश्वर भस्म करणार्‍या अग्निरुपाने तुमच्यापुढे जातील. ते त्यांचा नाश करतील; त्यांना तुमच्यापुढे नमवतील आणि तुमच्यासमोर त्यांचा नायनाट करतील, मग याहवेहने दिलेल्या अभिवचनानुसार तुम्ही त्यांना लगेच संपूर्ण नष्ट कराल आणि त्यांना तिथून घालवून द्याल.
3 Sabe, pois, hoje, que o Senhor, teu Deus, marcha diante de ti como um fogo devorador. É ele quem os destruirá e os esmagará diante de ti, de tal forma que tu os despojarás e os aniquilarás prontamente, como o Senhor te prometeu.
4 याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यांना तुमच्यापुढून घालवून दिल्यानंतर स्वतःशी म्हणू नका, “मी नीतिमान आहे, म्हणूनच याहवेहने हा देश वतन म्हणून घेण्यास मला मदत केली.” नाही! तसे मुळीच नाही, तर या राष्ट्रांच्या दुष्टपणामुळेच याहवेह त्यांना तुमच्यापुढून घालवून देत आहेत.
4 Depois que o Senhor, teu Deus, os tiver expulsado de diante de ti, não digas no teu coração: por causa de minha justiça é que o Senhor me introduziu na posse dessa terra. Porque é por causa da perversidade dessas nações que o Senhor as despoja diante de ti.
5 तुम्ही नीतिमान आणि सरळ मनाचे लोक आहात म्हणून याहवेह तुम्हाला त्यांचा देश ताब्यात देतील असे मुळीच नाही; मी पुन्हा सांगतो की याहवेह तुमचे परमेश्वर हे केवळ त्या राष्ट्रांच्या दुष्टपणामुळेच व त्यांनी तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब यांना जी शपथ दिली होती, ती पूर्ण करण्यासाठीच ते त्या राष्ट्रांना तुमच्यापुढून घालवून देतील.
5 Não é pela tua justiça nem pela retidão do teu coração que entrarás na posse de suas terras, mas é por causa da perversidade dessas nações que o Senhor as despoja diante de ti. E é também porque o Senhor, teu Deus, quer cumprir a palavra que deu com, juramento a teus pais, Abraão, Isaac e Jacó.
6 आणि हे जाणून घ्या, याहवेह तुमचे परमेश्वर, तुम्ही नीतिमान आहात म्हणून हा उत्तम देश तुम्हाला वतन म्हणून देत नाहीत, खरेतर तुम्ही ताठ मानेचे लोक आहात.
6 Sabe, pois, que não é pela tua justiça que o Senhor, teu Deus, te dá a posse dessa terra excelente, porque és um povo de cabeça dura.
7 तुम्ही त्या रानात याहवेह तुमच्या परमेश्वराला राग येईल असे वागलात, हे तुम्ही विसरू नका आणि याची नेहमी आठवण ठेवा. ज्या दिवशी तुम्ही इजिप्त देश सोडला त्या दिवसापासून या ठिकाणी येईपर्यंत, तुम्ही याहवेहविरुद्ध सतत बंड केले.
7 Lembra-te, não te esqueças de que modo irritaste o Senhor, teu Deus, no deserto. Desde o dia em que saíste do Egito até que chegaste a este lugar, não cessaste de ser rebelde ao Senhor.
8 होरेब पर्वतावर तुम्ही त्यांना इतके संतप्त केले की याहवेह तुमचा नाश करणारच होते.
8 Em Horeb o provocaste de tal forma que ele, irado, quis aniquilar-te.
9 याहवेहने तुमच्याशी केलेल्या कराराच्या दगडी पाट्या स्वीकारण्यासाठी मी त्या पर्वतावर चढून गेलो होतो. तिथे मी चाळीस दिवस व चाळीस रात्री होतो; त्या काळात मी भाकर खाल्ली नाही आणि पाणीदेखील प्यालो नाही.
9 Quando eu subi ao monte para receber as tábuas de pedra, as tábuas da aliança que o Senhor fez convosco, permaneci no monte quarenta dias e quarenta noites, sem comer pão nem beber água.
10 याहवेहने दोन दगडी पाट्या मला दिल्या, ज्यावर परमेश्वराच्या बोटाने लिहिलेले होते. तुम्ही पर्वताच्या पायथ्याशी गोळा झालेले होता, त्यावेळी याहवेहने तुमच्याशी बोलताना पर्वतावर अग्नीतून सांगितलेल्या सर्व आज्ञा त्यावर होत्या.
10 E o Senhor entregou-me as duas tábuas de pedra escritas com o dedo de Deus, nas quais estavam gravadas todas as palavras que o Senhor vos tinha dirigido no monte, no meio do fogo, no dia da assembléia.
11 चाळीस दिवस व चाळीस रात्री लोटल्यानंतर, याहवेहने कराराच्या दोन दगडी पाट्या मला दिल्या.
11 Passados quarenta dias e quarenta noites, o Senhor entregou-me as duas tábuas de pedra, as tábuas da aliança.
12 मग याहवेह मला म्हणाले, “ताबडतोब येथून उतरून खाली जा, कारण तुझे लोक, ज्यांना तू इजिप्त देशातून बाहेर काढून आणले, ते भ्रष्ट झाले आहेत. मी त्यांना जे करण्याची आज्ञा दिलेली होती, त्यापासून बहकून त्यांनी स्वतःसाठी ओतीव मूर्ती तयार केली आहे.”
12 O Senhor disse-me: vamos: desce prontamente daqui, porque o teu povo que tiraste do Egito corrompeu-se. Depressa se desviaram do caminho que lhes mandei seguir: fabricaram para si um ídolo fundido.
13 याहवेह मला म्हणाले, “मी या लोकांना ओळखतो, हे ताठ मानेचे लोक आहेत.
13 Vejo, continuou o Senhor, que essa nação é um povo de cabeça dura.
14 तू माझ्या आड येऊ नकोस, मी या लोकांचा नाश करेन आणि त्यांचे नाव पृथ्वीवरून पुसून टाकेन आणि त्यांच्याहीपेक्षा अधिक बलवान व बहुगुणित असे राष्ट्र मी तुझ्यापासून बनवीन.”
14 Deixa que eu o aniquile e apague o seu nome de debaixo do céu. Farei de ti uma nação mais forte e mais numerosa do que esta.
15 नंतर मी मागे वळलो आणि पर्वतावरून खाली उतरत असताना पर्वत अग्नीने जळत होता आणि त्या कराराच्या दोन पाट्या माझ्या हातात होत्या.
15 Tendo eu descido do monte, o qual ardia em fogo, trazendo na mão as duas tábuas da aliança,
16 जेव्हा मी पाहिले की, याहवेह तुमच्या परमेश्वराविरुद्ध तुम्ही पाप केले आहे; तुम्ही तुमच्यासाठी वासराची ओतीव मूर्ती घडविली, असे माझ्या दृष्टीस पडले. याहवेहनी दिलेल्या आज्ञा पाळण्याचे सोडून तुम्ही किती लवकर पथभ्रष्ट झालात.
16 verifiquei que vós tínheis de fato pecado contra o Senhor, vosso Deus, fabricando-vos um bezerro de metal fundido, e desviando-vos assim tão depressa do caminho que vos tinha traçado o Senhor.
17 तेव्हा मी त्या दोन दगडी पाट्या घेतल्या आणि माझ्या हातांतून फेकून, तुमच्या डोळ्यादेखत त्यांचा चुराडा केला.
17 Arrojei então de minhas mãos as duas tábuas e quebrei-as à vossa vista.
18 नंतर आणखी चाळीस दिवस व चाळीस रात्री मी याहवेहपुढे पालथा पडून राहिलो; मी भाकर खाल्ली नाही आणि पाणीदेखील प्यालो नाही, कारण याहवेहच्या दृष्टीने वाईट आहे, तेच पाप तुम्ही करून त्यांचा क्रोध भडकाविला होता.
18 Prostrei-me em seguida diante do Senhor, como antes, e estive quarenta dias e quarenta noites sem comer pão, nem beber água, por causa de todos os pecados que tínheis cometido, fazendo o que é mau aos olhos do Senhor, e provocando-o à ira.
19 मला याहवेहच्या रागाची आणि क्रोधाची भीती वाटली, कारण ते तुमचा नाश करण्याइतके रागावले होते. परंतु त्यावेळी सुद्धा याहवेहने माझे ऐकले.
19 Eu estava aterrado vendo o furor do Senhor contra ti, a ponto de te querer destruir. Entretanto, ainda desta vez ele me ouviu.
20 आणि याहवेह अहरोनवर अत्यंत संतप्त झाले व त्याचा नाश करणार होते, परंतु मी त्याच्यासाठी देखील प्रार्थना केली.
20 Também contra Aarão o Senhor estava de tal forma irado que queria matá-lo, mas eu intercedi também por Aarão.
21 मी तुमचे पापकृत्य, म्हणजे जे वासरू तुम्ही बनविले होते ते घेतले आणि अग्नीत जाळून त्याची कुटून धुळीसारखी बारीक पूड केली आणि ती धूळ डोंगरातून वाहणार्‍या ओहोळात फेकून दिली.
21 Quanto ao objeto de vosso pecado, o bezerro que tínheis feito, tomei-o, atirei-o ao fogo e o fiz em pedaços, esmagando-o até que fosse reduzido a pó; e joguei esse pó na torrente que desce da montanha.
22 पुन्हा तबेरा येथे, मस्सा येथे आणि किब्रोथ-हत्ताव्वा येथेही तुम्ही याहवेहला संतप्त केले.
22 Provocastes também o Senhor em Tabeera, em Massa e em Quibrot-Hataava.
23 आणि जेव्हा याहवेहने तुम्हाला कादेश-बरनेआ येथून पाठविले, तेव्हा ते म्हणाले, “वर जा आणि जो देश मी तुम्हाला दिला आहे त्याचा ताबा घ्या.” पण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध बंड केले. त्यांच्यावर भरवसा ठेवला नाही व त्यांची आज्ञा पाळली नाही.
23 Quando o Senhor quis que partísseis de Cades-Barne, dizendo: subi e tomai posse da terra que vos dei, vós vos rebelasses contra a ordem do Senhor, desconfiando dele, e não ouvistes a sua voz.
24 मी तुम्हाला ओळखतो, त्या दिवसापासून तुम्ही याहवेहविरुद्ध बंड करीत आहात.
24 Desde que vos conheço, fostes sempre rebeldes ao Senhor.
25 म्हणूनच मी याहवेहपुढे चाळीस दिवस व चाळीस रात्र पालथा पडून राहिलो, कारण याहवेह म्हणाले होते की, ते तुमचा नाश करतील.
25 Fiquei, portanto, quarenta dias e quarenta noites prostrado diante do Senhor, porque vos queria aniquilar.
26 मी याहवेहला प्रार्थना केली आणि म्हणालो, “हे सार्वभौम याहवेह, तुमच्या प्रचंड शक्तीने व तुमच्या बलाढ्य हाताने इजिप्त देशातून वाचविलेल्या तुमच्या लोकांचा, तुमच्या वारसांचा संहार करू नका.
26 Orando, eu disse-lhe: Senhor Javé, não destruais vosso povo, vossa herança, que resgatasses com a vossa grandeza e tirastes do Egito com mão forte.
27 तुमचे सेवक अब्राहाम, इसहाक व याकोब यांची आठवण करा. या लोकांचा हट्टीपणा, त्यांच्या दुष्टपणाकडे व त्यांच्या पापाकडे लक्ष देऊ नका.
27 Lembrai-vos de vossos servos Abraão, Isaac e Jacó. Não olheis para a dureza desse povo, para sua maldade e seu pecado,
28 कारण जर तुम्ही यांचा नाश केला, तर ज्या देशामधून तुम्ही आम्हाला बाहेर आणले ते लोक म्हणतील, ‘वचनदत्त देशात त्यांना नेण्यास त्यांचा याहवेह असमर्थ होता आणि तो त्यांचा द्वेष करीत होता म्हणून त्याने त्यांचा नाश केला व त्यांना ठार मारण्यासाठीच त्याने त्यांना रानात नेले.’
28 para que os habitantes da terra de onde nos tirastes não digam: o Senhor não podia introduzi-los na terra que lhes tinha prometido, ou então: ele os odiava, e por isso tirou-os, a fim de matá-los no deserto.
29 पण हे तुमचे लोक, तुमचे वारसदार आहेत. तुम्हीच त्यांना तुमच्या महान सामर्थ्याने आणि पसरलेल्या बाहूने इजिप्तमधून बाहेर आणले.”
29 E não obstante, eles são o vosso povo, a vossa herança, que tirasses do Egito com a vossa grande força e com o vosso braço estendido.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Deuteronômio 9, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.