Deuteronômio 5
marc (MARC) vs ACF
1 मोशेने सर्व इस्राएली लोकांना बोलाविले आणि म्हटले:
1 E chamou Moisés a todo o Israel, e disse-lhes: Ouve, ó Israel, os estatutos e juízos que hoje vos falo aos ouvidos; e aprendê-los-eis, e guardá-los-eis, para os cumprir.
2 याहवेह आपल्या परमेश्वराने होरेब पर्वतावर तुमच्याशी एक करार केला होता.
2 O Senhor nosso Deus fez conosco aliança em Horebe.
3 याहवेहने हा करार आपल्या पूर्वजांशी नव्हे तर आज येथे जिवंत असलेल्या आपल्या सर्वांशी केला आहे.
3 Não com nossos pais fez o Senhor esta aliança, mas conosco, todos os que hoje aqui estamos vivos.
4 याहवेह पर्वतावर अग्नीमधून तुमच्याशी समोरासमोर बोलले.
4 Face a face o Senhor falou conosco no monte, do meio do fogo
5 (त्यावेळी मी तुमच्या आणि याहवेहमध्ये उभा राहिलो आणि तुम्हाला याहवेहच्या वचनाची घोषणा केली, कारण तुम्हाला अग्नीची भीती वाटत असल्यामुळे तुम्ही पर्वतावर चढून त्यांच्यापर्यंत गेला नाही.)
5 (Naquele tempo eu estava em pé entre o Senhor e vós, para vos notificar a palavra do Senhor; porque temestes o fogo e não subistes ao monte), dizendo:
6 “ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून व दास्यातून बाहेर आणले तो मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
6 Eu sou o Senhor teu Deus, que te tirei da terra do Egito, da casa da servidão;
7 “माझ्यासमोर तुम्हाला इतर कोणतेही देव नसावेत.
7 Não terás outros deuses diante de mim;
8 तुम्ही स्वतःसाठी वर आकाशातील, पृथ्वीवरील व पृथ्वीच्या खाली जलातील कशाचीही प्रतिमा करू नका.
8 Não farás para ti imagem de escultura, nem semelhança alguma do que há em cima no céu, nem em baixo na terra, nem nas águas debaixo da terra;
9 तुम्ही त्यांना नमन करू नये किंवा त्यांची उपासना करू नये; कारण मी याहवेह तुमचा परमेश्वर ईर्ष्यावान परमेश्वर आहे. जे माझा द्वेष करतात त्यांच्या लेकरांना तिसर्या व चौथ्या पिढीपर्यंत त्यांच्या आईवडिलांच्या पापांचे शासन करतो,
9 Não te encurvarás a elas, nem as servirás; porque eu, o Senhor teu Deus, sou Deus zeloso, que visito a iniqüidade dos pais nos filhos, até a terceira e quarta geração daqueles que me odeiam.
10 परंतु जे माझ्यावर प्रीती करतात आणि माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांपर्यंत प्रीती करतो.
10 E faço misericórdia a milhares dos que me amam e guardam os meus mandamentos.
11 याहवेह तुमच्या परमेश्वराचे नाव तुम्ही व्यर्थ घेऊ नका, कारण जे त्यांचे नाव व्यर्थ घेतात, त्यांना याहवेह शिक्षा दिल्यावाचून राहणार नाहीत.
11 Não tomarás o nome do Senhor teu Deus em vão; porque o Senhor não terá por inocente ao que tomar o seu nome em vão.
12 याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळावा.
12 Guarda o dia de sábado, para o santificar, como te ordenou o Senhor teu Deus.
13 सहा दिवस तुम्ही परिश्रम करावेत आणि आपली सर्व कामे करावी,
13 Seis dias trabalharás, e farás todo o teu trabalho.
14 परंतु सातवा दिवस याहवेह तुमच्या परमेश्वराचा शब्बाथ आहे. त्या दिवशी तुम्ही कोणतेही काम करू नये. तुम्ही किंवा तुमचा पुत्र किंवा कन्या, तुमचा दास किंवा दासी, तुमचे बैल, गाढव, तुमचे पशू किंवा तुमच्या नगरात राहणारा परदेशी, तुमचा दास आणि दासी यांनी देखील तुमच्यासह त्या दिवशी विश्रांती घ्यावी.
14 Mas o sétimo dia é o sábado do Senhor teu Deus; não farás nenhum trabalho nele, nem tu, nem teu filho, nem tua filha, nem o teu servo, nem a tua serva, nem o teu boi, nem o teu jumento, nem animal algum teu, nem o estrangeiro que está dentro de tuas portas; para que o teu servo e a tua serva descansem como tu;
15 तुम्ही इजिप्त देशात गुलाम होता याचे स्मरण करा. याहवेह तुमच्या परमेश्वराच्या सामर्थ्यवान व विस्तारित हातांनी तुम्हाला तिथून बाहेर काढले. यास्तव याहवेह तुमच्या परमेश्वराने शब्बाथ दिवस पाळण्याची आज्ञा केली आहे.
15 Porque te lembrarás que foste servo na terra do Egito, e que o Senhor teu Deus te tirou dali com mão forte e braço estendido; por isso o Senhor teu Deus te ordenou que guardasses o dia de sábado.
16 याहवेह तुमच्या परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान करा, म्हणजे जो देश याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत आहे, त्यात तुम्ही दीर्घकाळ राहाल व तुमचे कल्याण होईल.
16 Honra a teu pai e a tua mãe, como o Senhor teu Deus te ordenou, para que se prolonguem os teus dias, e para que te vá bem na terra que te dá o Senhor teu Deus.
17 तुम्ही खून करू नका.
17 Não matarás.
18 तुम्ही व्यभिचार करू नका.
18 Não adulterarás.
19 तुम्ही चोरी करू नका.
19 Não furtarás.
20 तुमच्या शेजार्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नका.
20 Não dirás falso testemunho contra o teu próximo.
21 तुमच्या शेजार्याच्या पत्नीची अभिलाषा धरू नका. त्याच्या घराचा किंवा भूमीचा, त्याच्या दासाचा किंवा दासीचा, त्याच्या बैलाचा किंवा गाढवाचा किंवा शेजार्याच्या मालकीच्या कशाचाही लोभ करू नका.”
21 Não cobiçarás a mulher do teu próximo; e não desejarás a casa do teu próximo, nem o seu campo, nem o seu servo, nem a sua serva, nem o seu boi, nem o seu jumento, nem coisa alguma do teu próximo.
22 याहवेहने या आज्ञा तुमच्यातील प्रत्येकाला अग्नी, मेघ व निबिड अंधकार यांनी वेष्टिलेल्या पर्वतावरून उंच आवाजात उच्चारून दिल्या; व त्यात अधिक काहीही जोडले नाही. त्यांनी त्या दोन दगडी पाट्यांवर लिहून माझ्याजवळ दिल्या.
22 Estas palavras falou o Senhor a toda a vossa congregação no monte, do meio do fogo, da nuvem e da escuridão, com grande voz, e nada acrescentou; e as escreveu em duas tábuas de pedra, e a mim mas deu.
23 पण ज्यावेळी तुम्ही अंधारातून येणारा आवाज ऐकला आणि डोंगर माथ्यावरील त्या भयानक ज्वाला पाहिल्या, तेव्हा तुमचे सर्व गोत्रप्रमुख व वडील माझ्याकडे आले.
23 E sucedeu que, ouvindo a voz do meio das trevas, e vendo o monte ardendo em fogo, vos achegastes a mim, todos os cabeças das vossas tribos, e vossos anciãos;
24 आणि मला म्हणाले, “याहवेह आमच्या परमेश्वराने आज आम्हाला त्यांचे गौरव व थोरवी दाखविली आहे आणि अग्नीमधून येणारा त्यांचा आवाजसुद्धा आम्ही ऐकला. आम्ही आज पाहिले आहे की, परमेश्वर मानवाशी बोलले तरी मानव जिवंत राहणे शक्य आहे.
24 E dissestes: Eis aqui o Senhor nosso Deus nos fez ver a sua glória e a sua grandeza, e ouvimos a sua voz do meio do fogo; hoje vimos que Deus fala com o homem, e que este permanece vivo.
25 परंतु आम्ही का मरावे? त्या भयानक ज्वाला आम्हाला भस्म करून टाकतील आणि याहवेह आमच्या परमेश्वराची वाणी आम्ही ऐकत राहू, तर खात्रीने मरून जाऊ.
25 Agora, pois, por que morreríamos? Pois este grande fogo nos consumiria; se ainda mais ouvíssemos a voz do Senhor nosso Deus morreríamos.
26 कारण जिवंत परमेश्वर अग्नीतून बोलत असताना त्यांची वाणी ऐकून जिवंत राहिला आहे, असा सर्व नश्वर मानवात आमच्याशिवाय कोण आहे?
26 Porque, quem há de toda a carne, que ouviu a voz do Deus vivente falando do meio do fogo, como nós, e ficou vivo?
27 तेव्हा तुम्ही याहवेह आमच्या परमेश्वराजवळ जा आणि ते जे सांगतील ते सर्व ऐका. मग याहवेह आमच्या परमेश्वराने तुम्हाला जे काही सांगितले आहे ते आम्हाला सांगा. आम्ही ऐकू आणि त्याचे पालन करू.”
27 Chega-te tu, e ouve tudo o que disser o Senhor nosso Deus; e tu nos dirás tudo o que te disser o Senhor nosso Deus, e o ouviremos, e o cumpriremos.
28 तुम्हाला माझ्याशी बोलताना याहवेहनी ऐकले आणि याहवेह मला म्हणाले, “हे लोक जे काही तुझ्याशी बोलले ते मी ऐकले आहे. त्यांनी जे सर्वकाही बोलले ते चांगले आहे.
28 Ouvindo, pois, o Senhor as vossas palavras, quando me faláveis, o Senhor me disse: Eu ouvi as palavras deste povo, que eles te disseram; em tudo falaram bem.
29 त्यांचे अंतःकरण मजविषयी नेहमीच असे राहिले आणि माझ्या आज्ञा पाळण्याचे भय त्यांच्याठायी नेहमीच राहिले तर किती बरे होईल! असे झाल्यास त्यांचे व त्यांच्या मुलाबाळांचे सदासर्वकाळ कल्याण होईल!
29 Quem dera que eles tivessem tal coração que me temessem, e guardassem todos os meus mandamentos todos os dias, para que bem lhes fosse a eles e a seus filhos para sempre.
30 “जा आणि त्यांना त्यांच्या तंबूमध्ये परत जाण्यास सांग.
30 Vai, dize-lhes: Tornai-vos às vossas tendas.
31 पण तू माझ्याबरोबर इथेच थांब, म्हणजे मी तुला माझ्या सर्व आज्ञा, विधी व नियम देईन आणि ते त्यांना शिकव म्हणजे जो देश मी त्यांना वतन म्हणून देणार आहे तिथे त्यांचे पालन करावे.”
31 Tu, porém, fica-te aqui comigo, para que eu a ti te diga todos os mandamentos, e estatutos, e juízos, que tu lhes hás de ensinar, para que cumpram na terra que eu lhes darei para possuí-la.
32 याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळण्याची तुम्ही खबरदारी घ्या; उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका.
32 Olhai, pois, que façais como vos mandou o Senhor vosso Deus; não vos desviareis, nem para a direita nem para a esquerda.
33 याहवेह तुमच्या परमेश्वराने ज्या मार्गावर चालण्यास आज्ञा केली आहे, त्यावर तुम्ही चला, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि ज्या देशाचा तुम्ही ताबा घेणार आहात, त्या देशात तुम्ही दीर्घकाल समृद्धीचे जीवन जगू शकाल.
33 Andareis em todo o caminho que vos manda o Senhor vosso Deus, para que vivais e bem vos suceda, e prolongueis os dias na terra que haveis de possuir.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Deuteronômio 5, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.