Deuteronômio 3
marc (MARC) vs BKJ
1 मग आम्ही वळलो आणि बाशानाच्या वाटेने वर गेलो आणि बाशानचा राजा ओग आपले सर्व सैन्य जमवून आमच्याशी युद्ध करण्यासाठी एद्रेई येथे आला.
1 Depois, nos viramos e subimos o caminho de Basã; e Ogue, rei de Basã, veio contra nós, ele e todo o seu povo, para a batalha em Edrei.
2 याहवेहने मला म्हटले, “त्याला भिऊ नकोस; कारण मी त्याला व त्याच्या सर्व सैन्याला तुझ्या हाती दिले आहे. अमोर्यांचा राजा सीहोन जो हेशबोनात राज्य करीत होता त्याचे तू जसे केले तसेच याचे कर.”
2 E o SENHOR me disse: Não o temas, porque o entregarei, e a todo o seu povo, e a sua terra, na tua mão; e farás a ele o que fizeste a Seom, rei dos amorreus, que habitava em Hesbom.
3 याप्रमाणे याहवेह आमच्या परमेश्वराने बाशानचा ओग राजा त्याच्या सर्व सैन्यासह आमच्या अधीन झाला. आम्ही त्यांचा असा संहार केला की त्यांच्यातील कोणीही मागे जिवंत राहिला नाही.
3 Assim também o SENHOR nosso Deus entregou em nossa mão a Ogue, rei de Basã, e a todo o seu povo; e o ferimos, até que não lhe sobrou ninguém.
4 त्याची सगळी शहरे आम्ही त्यावेळी घेतली होती. अर्गोबचा संपूर्ण प्रदेश आणि बाशानमधील ओगचे राज्य, साठ नगरातील असे एकही शहर राहिले नाही जे आम्ही त्यांच्याकडून घेतले नाही.
4 E naquele tempo tomamos todas as suas cidades; não houve nenhuma cidade que não tomássemos deles, sessenta cidades, toda a região de Argobe e o reino de Ogue, em Basã.
5 या सर्व शहरांच्या तटबंदी उंच व दरवाजे लोखंडी गजांचे होते. शिवाय बरीच तटबंदी नसलेली गावेही होती.
5 Todas essas cidades eram cercadas com muros altos, portões e barras; ao lado de cidades sem muros, em grande número.
6 ज्याप्रकारे आपण सीहोन राज्याचा हेशबोन येथे नाश केला, त्याच प्रकारे आपण बाशानच्या राज्यातील संपूर्ण शहरांचा—पुरुष, स्त्रिया व मुले यासहित समूळ नायनाट केला.
6 E as destruímos completamente, como fizemos a Seom, rei de Hesbom, destruindo completamente os homens, e as mulheres, e as crianças, de todas as cidades.
7 पण त्यांची सर्व गुरे व शहरातून मिळालेली लूट आपण आपल्यासाठी नेली.
7 Mas todo o gado, e os despojos das cidades, tomamos por presa para nós.
8 म्हणून आपल्या ताब्यात दोन्हीही राजांचे सर्व प्रदेश, म्हणजे यार्देनेच्या पूर्वेकडे आर्णोन खिंडीपर्यंत असलेला हर्मोन पर्वतापर्यंतचा अमोर्यांचा सर्व प्रदेश आपल्या ताब्यात आला.
8 E naquele tempo tomamos das mãos daqueles dois reis dos amorreus a terra que estava deste lado do Jordão, desde o ribeiro de Arnom até ao monte Hermom;
9 (सीदोनी लोक हर्मोन पर्वतास सिर्योन असेही म्हणत, पण अमोरी लोक त्याला सनीर म्हणत असत.)
9 (Hermom que os sidônios chamam Siriom; e os amorreus o chamam Senir);
10 आतापर्यंत आपण पठारावरील सर्व शहरे, संपूर्ण गिलआद आणि बाशान, सलेकाह व एद्रेई, ओग या शहरांपर्यंतची सर्व शहरे काबीज केली.
10 todas as cidades da planície, e toda Gileade, e toda Basã, até Salca, e Edrei, cidades do reino de Ogue, em Basã.
11 (रेफाईम लोकांपैकी बाशानचा राजा ओग हा शेवटचा होता. त्याचा पलंग लोखंडाने सजविला होता आणि तो चार हात लांब आणि दोन हात रुंद होता. तो अजूनही अम्मोनी लोकांच्या राब्बाहमध्ये आहे.)
11 Porque somente Ogue, rei de Basã, permaneceu dos remanescentes dos gigantes; eis que o seu leito, um leito de ferro, não está em Rabá, dos filhos de Amom? De nove côvados era o seu comprimento, e de quatro côvados a sua largura, conforme côvado de um homem.
12 त्यावेळी आपण काबीज केलेला प्रदेश मी रऊबेन व गाद यांच्या वंशास दिला. रऊबेन व गादच्या वंशांना मी आर्णोन नदीवरील अरोएरापासून गिलआद पर्वताचा अर्धा भाग त्यातील शहरांसह दिला.
12 E esta terra, que tomamos naquele tempo, desde Aroer, que está junto ao ribeiro de Arnom, e metade do monte Gileade, e as suas cidades, dei aos rubenitas e aos gaditas.
13 गिलआद पर्वताचा उरलेला अर्धा भाग आणि ओग राजाचे पूर्वीचे राज्य म्हणजे अर्गोब विभाग हा मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रास दिला. (बाशानच्या अर्गोब प्रदेशाला रेफाईमचा देश असेही म्हणत.
13 E o restante de Gileade, e toda Basã, sendo o reino de Ogue, dei à meia tribo de Manassés; toda a região de Argobe, com toda Basã, que era chamada terra de gigantes.
14 मनश्शेहच्या वंशातील याईराच्या कुळाने गशूरी व माकाथी लोकांच्या सीमेपर्यंतचा अर्गोबचा संपूर्ण प्रदेश आपल्या ताब्यात घेतला; त्याच्या नावावरून त्या प्रदेशाचे नाव पडले, त्यामुळे आजपर्यंत बाशानाला हव्योथ याईर म्हणतात.)
14 Jair, filho de Manassés, tomou toda a terra de Argobe até as costas dos gesuritas e maacatitas; e as chamou, segundo o seu próprio nome, Basã-Havote-Jair, até este dia.
15 आणि मी गिलआद देश माखीरला दिला.
15 E dei Gileade a Maquir.
16 रऊबेन आणि गाद यांना मात्र गिलआद देशातील यब्बोक नदीपासून ते आर्णोन नदीच्या खोर्याच्या मध्यापर्यंतचा सर्व भाग मिळाला. गिलआद ही अम्मोन लोकांची सीमा होती.
16 E aos rubenitas e aos gaditas dei desde Gileade até o ribeiro de Arnom, metade do vale, da fronteira até o ribeiro de Jaboque, que é a fronteira dos filhos de Amom;
17 तसेच किन्नेरेथाच्या समुद्रापासून अराबाचा समुद्र (म्हणजे मृत समुद्र) आणि पिसगाच्या उतरणी खालील अराबा व यार्देनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रदेशही त्यांनाच मिळाला.
17 também a planície, e o Jordão e a sua costa, desde Quinerete até ao mar da planície, que é o mar salgado, abaixo de Asdote-Pisga, para o oriente.
18 त्यावेळी मी तुम्हाला आज्ञा दिली: “याहवेह तुमच्या परमेश्वराने हा प्रदेश तुम्हाला वतन म्हणून दिलेला आहे, परंतु तुम्ही त्यात वस्ती करण्यापूर्वी तुमच्या सक्षम योद्ध्यांना शस्त्रे धारण करून यार्देन ओलांडून इतर इस्राएलाच्या पुढे पाठवावे.
18 E naquele tempo eu vos ordenei, dizendo: O SENHOR vosso Deus vos deu essa terra, para possuí-la; passareis armados diante de vossos irmãos, os filhos de Israel, todos os que estiverem capacitados para a guerra.
19 तुमच्या स्त्रिया, मुले आणि तुमची जनावरे (मला माहीत आहे तुमच्याकडे विपुल गुरे आहेत) यांना मी तुम्हाला दिलेल्या शहरात राहता येईल,
19 Mas as vossas esposas, e os vossos pequenos, e o vosso gado (pois sei que tendes muito gado) permanecerão nas cidades que vos dei;
20 यार्देनेच्या पश्चिमेला याहवेह देत असलेल्या देशात तुमचे इस्राएली बांधव वस्ती करेपर्यंत आणि याहवेह तुमच्या परमेश्वराने ज्याप्रमाणे तुम्हाला विसावा दिला आहे, त्याप्रमाणे त्यांनाही विसावा मिळेपर्यंत, तुमच्या बांधवांना मदत करा. त्यानंतर जो प्रदेश मी तुम्हाला दिला आहे येथे तुम्ही आपल्या वतनावर परत यावे.”
20 até que o SENHOR dê descanso a vossos irmãos, bem como a vós, e até que eles também possuam a terra que o SENHOR vosso Deus lhes deu além do Jordão; e então voltareis, cada homem à sua possessão, que vos dei.
21 नंतर मी यहोशुआस म्हणालो: “याहवेह तुझ्या परमेश्वराने सीहोन व ओग या दोन राजांचे काय केले हे तू आपल्या डोळ्याने पाहिले आहेस. तुम्ही जिथे जात आहात तेथील सर्व राज्यांचेही याहवेह असेच करतील.
21 E naquele tempo eu ordenei a Josué, dizendo: Os teus olhos viram tudo o que o SENHOR teu Deus fez a esses dois reis; assim fará o SENHOR a todos os reinos aos quais passares.
22 त्यांना तू भिऊ नको; कारण याहवेह तुझे परमेश्वर स्वतः तुझ्यासाठी त्यांच्याशी लढतील.”
22 Não os temas, pois o SENHOR teu Deus lutará por ti.
23 त्यावेळी मी याहवेहला विनवणी केली:
23 E naquele tempo supliquei ao SENHOR, dizendo:
24 “हे सार्वभौम याहवेह, तुमची महानता आणि तुमचा बलवान हात तुमच्या दासाला दाखविण्यास तुम्ही आरंभ केला आहे. स्वर्गात किंवा पृथ्वीवर असे कोणते दैवत आहे की, ज्याला तुमच्यासारखी थोर व महान कृत्ये करता येतील?
24 Ó Senhor DEUS, começaste a mostrar ao teu servo a tua grandeza, e a tua mão forte; pois que Deus há nos céus ou na terra, que possa fazer segundo as tuas obras, e segundo o teu poder?
25 हे प्रभो, मला जाऊ द्या आणि यार्देनच्या पलीकडील उत्तम जमीन पाहू द्या—तो उत्तम डोंगराळ प्रदेश आणि लबानोन.”
25 Suplico-te, deixa-me passar, e ver a boa terra que está além do Jordão, este bom monte, e o Líbano.
26 पण तुमच्यामुळे याहवेह माझ्यावर रागावले आणि त्यांनी त्या वचनदत्त देशात मला जाऊ दिले नाही. ते मला म्हणाले, “पुरे कर. ही गोष्ट पुन्हा माझ्याजवळ काढू नकोस.
26 Mas o SENHOR se irou comigo, por vossa causa, e não me ouviu; e o SENHOR me disse: Basta; não me fales mais desse assunto.
27 पिसगा पर्वताच्या शिखरावर जा आणि तिथून पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण दिशांना पाहा. तिथून दूरवर तुला तो देश दिसेल, कारण तुला यार्देन ओलांडून जाता येणार नाही.
27 Sobe ao topo de Pisga, e levanta os teus olhos ao ocidente, e ao norte, e ao sul, e ao oriente, e contempla com os teus olhos, pois não passarás este Jordão.
28 पण तुझ्या जागी यहोशुआची नेमणूक कर. त्याला उत्तेजन दे, धैर्य दे, कारण तोच आपल्या लोकांना पलीकडे घेऊन जाईल आणि जो प्रदेश तुझ्या दृष्टीस पडेल तो त्यांना वतन करून देईल.”
28 Mas ordena a Josué, e encoraja-o, e fortalece-o, porque ele passará, diante deste povo, e fará com que herdem a terra que verás.
29 म्हणून आम्ही बेथ-पौरातील खोर्यातच मुक्काम केला.
29 Assim, permanecemos no vale diante de Bete-Peor.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Deuteronômio 3, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.