Deuteronômio 24

marc (MARC) vs ARA

Sair da comparação
ARA Almeida Revista e Atualizada 1993
1 कोणा पुरुषाने एखाद्या स्त्रीसोबत विवाह केला, परंतु नंतर तो तिच्यासोबत संतुष्ट होत नाही आणि त्याला तिच्यात काही दोष आढळला, तर त्याने सूटपत्र लिहून तिच्या हाती द्यावे आणि तिला आपल्या घरातून घालवून द्यावे,
1 Se um homem tomar uma mulher e se casar com ela, e se ela não for agradável aos seus olhos, por ter ele achado coisa indecente nela, e se ele lhe lavrar um termo de divórcio, e lho der na mão, e a despedir de casa;
2 आणि त्याचे घर सोडल्यानंतर ती दुसर्‍या पुरुषाची पत्नी होते,
2 e se ela, saindo da sua casa, for e se casar com outro homem;
3 आणि तिच्या दुसर्‍या पतीलाही ती आवडली नाही व त्यानेही तिच्या हाती सूटपत्रे देऊन तिला घालवून दिले किंवा तो मरण पावला,
3 e se este a aborrecer, e lhe lavrar termo de divórcio, e lho der na mão, e a despedir da sua casa ou se este último homem, que a tomou para si por mulher, vier a morrer,
4 तर तिच्या पहिल्या पतीने तिला पत्नी म्हणून पुन्हा स्वीकारू नये, कारण ती भ्रष्ट झालेली आहे. अशा स्त्रीशी विवाह करणे ही गोष्ट याहवेहच्या दृष्टीने अमंगळ अशी आहे. याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला वतन म्हणून देत असलेल्या देशावर पाप आणू नका.
4 então, seu primeiro marido, que a despediu, não poderá tornar a desposá-la para que seja sua mulher, depois que foi contaminada, pois é abominação perante o Senhor ; assim, não farás pecar a terra que o Senhor , teu Deus, te dá por herança.
5 नुकतेच विवाह झालेल्या पुरुषाला सैन्याबरोबर मोहिमेवर पाठवू नये किंवा त्याच्यावर इतर कुठलीही जबाबदारी टाकू नये. त्याला वर्षभर घरी राहण्याची मोकळीक असावी आणि त्याने घरी राहून आपल्या विवाहित पत्नीला आनंदित करावे.
5 Homem recém-casado não sairá à guerra, nem se lhe imporá qualquer encargo; por um ano ficará livre em casa e promoverá felicidade à mulher que tomou.
6 तुम्ही एखाद्या मनुष्याला काही उसने देता—तेव्हा जाते किंवा जात्याची तळी गहाण म्हणून ठेवून घेऊ नये—कारण अशी वस्तू गहाण ठेवणे म्हणजे त्या मनुष्याचे जीवितच गहाण ठेवणे होय.
6 Não se tomarão em penhor as duas mós, nem apenas a de cima, pois se penhoraria, assim, a vida.
7 जर एखाद्याने आपल्याच इस्राएली बांधवाचे अपहरण केले आणि त्याला एखाद्या गुलामाप्रमाणे वागविले किंवा तो विकून टाकताना त्याला धरण्यात आले, तर अपहरण करणार्‍याला अवश्य जिवे मारावे. अशा रीतीने तुमच्यातील दुष्कर्म तुम्ही दूर करावे.
7 Se se achar alguém que, tendo roubado um dentre os seus irmãos, dos filhos de Israel, o trata como escravo ou o vende, esse ladrão morrerá. Assim, eliminarás o mal do meio de ti.
8 कुष्ठरोगाच्या बाबतीत लेवी याजकाने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वागण्याची काळजी घ्या. मी त्यांना दिलेल्या आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळा.
8 Guarda-te da praga da lepra e tem diligente cuidado de fazer segundo tudo o que te ensinarem os sacerdotes levitas; como lhes tenho ordenado, terás cuidado de o fazer.
9 इजिप्तमधून येताना याहवेह तुमच्या परमेश्वराने मिर्यामचे काय केले, याची तुम्ही आठवण ठेवावी.
9 Lembra-te do que o Senhor , teu Deus, fez a Miriã no caminho, quando saíste do Egito.
10 जेव्हा तुम्ही आपल्या शेजार्‍याला काही उसने देता, तर तारण घेण्यासाठी तुम्ही त्याच्या घरात शिरू नये,
10 Se emprestares alguma coisa ao teu próximo, não entrarás em sua casa para lhe tirar o penhor.
11 तुम्ही बाहेर उभे राहावे आणि ज्या शेजार्‍याला तुम्ही कर्ज देत आहात त्याने तुम्हाला बाहेर तारण आणून द्यावे.
11 Ficarás do lado de fora, e o homem, a quem emprestaste, aí te trará o penhor.
12 जर शेजारी गरीब असेल, तर तुम्ही त्याने तारण म्हणून दिलेले पांघरूण अंगावर घेऊन झोपू नका.
12 Porém, se for homem pobre, não usarás de noite o seu penhor;
13 गहाणादाखल त्याने आपले पांघरूण दिले असेल व तर सूर्यास्तसमयी ते त्याला परत करावे म्हणजे ते पांघरूण अंगावर घेऊन तो झोपेल. तो तुमचे आभार मानेल आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने तुमचे हे कृत्य नीतिमत्व असे ठरेल.
13 em se pondo o sol, restituir-lhe-ás, sem falta, o penhor para que durma no seu manto e te abençoe; isto te será justiça diante do Senhor , teu Deus.
14 गरीब व गरजवंत मजुराचा तुम्ही गैरफायदा घेऊ नये, मग तो तुमचा इस्राएली बांधव असो किंवा तुमच्या गावात राहणारा परदेशी असो.
14 Não oprimirás o jornaleiro pobre e necessitado, seja ele teu irmão ou estrangeiro que está na tua terra e na tua cidade.
15 त्यांना दररोज सूर्य मावळण्यापूर्वीच त्यांची मजुरी द्यावी, कारण ते गरीब आहेत आणि ते त्या मजुरीवर अवलंबून आहेत. नाहीतर ते तुमच्याविरुद्ध याहवेहकडे गार्‍हाणे करतील व मग ते तुमच्याविरुद्ध पाप असे मोजण्यात येईल.
15 No seu dia, lhe darás o seu salário, antes do pôr do sol, porquanto é pobre, e disso depende a sua vida; para que não clame contra ti ao Senhor , e haja em ti pecado.
16 आईवडिलांना त्यांच्या मुलांच्या कारणामुळे जिवे मारू नये, तसेच आईवडिलांच्या कारणामुळे त्यांच्या मुलांना जिवे मारू नये. प्रत्येकजण स्वतःच्या पापासाठी मरतील.
16 Os pais não serão mortos em lugar dos filhos, nem os filhos, em lugar dos pais; cada qual será morto pelo seu pecado.
17 परदेशी आणि अनाथांना यथायोग्य न्याय दिला पाहिजे, किंवा विधवेची वस्त्रे गहाण म्हणून कधीही घेतली जाऊ नये.
17 Não perverterás o direito do estrangeiro e do órfão; nem tomarás em penhor a roupa da viúva.
18 तुम्ही इजिप्त देशात गुलाम होता आणि याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यातून तुमची सुटका केली, याची तुम्ही सतत आठवण ठेवावी. म्हणूनच मी तुम्हाला हे करण्याची आज्ञा देत आहे.
18 Lembrar-te-ás de que foste escravo no Egito e de que o Senhor te livrou dali; pelo que te ordeno que faças isso.
19 पिकांची कापणी करीत असताना तुम्ही बांधून ठेवलेली एखादी पेंढी शेतातून आणावयाचे विसरलात, तर ती आणण्यासाठी तुम्ही माघारी जाऊ नये, तर परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी ती तिथेच राहू द्यावी, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या हाताच्या सर्व कार्यात आशीर्वाद देतील.
19 Quando, no teu campo, segares a messe e, nele, esqueceres um feixe de espigas, não voltarás a tomá-lo; para o estrangeiro, para o órfão e para a viúva será; para que o Senhor , teu Deus, te abençoe em toda obra das tuas mãos.
20 तुम्ही तुमच्या जैतून वृक्षांवरील फळे काढण्याकरिता झोडपणी कराल, तेव्हा तुम्ही एकाच फांदीवर दोनदा प्रहार करू नये. त्या फांदीवर जी काही फळे राहतील ती परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी राहू द्यावी.
20 Quando sacudires a tua oliveira, não voltarás a colher o fruto dos ramos; para o estrangeiro, para o órfão e para a viúva será.
21 जेव्हा तुम्ही तुमच्या द्राक्षमळ्यातील द्राक्षे काढता तेव्हा परत वेलींवर जाऊ नका. तर राहिलेली द्राक्षे परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी तशीच राहू द्यावीत.
21 Quando vindimares a tua vinha, não tornarás a rebuscá-la; para o estrangeiro, para o órfão e para a viúva será o restante.
22 इजिप्त देशामध्ये तुम्ही गुलाम होता याची आठवण ठेवावी म्हणून मी तुम्हाला हे करण्याची आज्ञा देत आहे.
22 Lembrar-te-ás de que foste escravo na terra do Egito; pelo que te ordeno que faças isso.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Deuteronômio 24, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.