Deuteronômio 23
marc (MARC) vs NVI
1 जो भग्नांड आहे किंवा ज्याच्या लिंगाचा छेद झाला आहे त्याने याहवेहच्या सभेत प्रवेश करू नये.
1 Qualquer que tenha os testículos esmagados ou tenha amputado o membro viril, não poderá entrar na assembléia do Senhor.
2 निषिद्ध विवाहबंधनापासून जन्मलेला अथवा त्यांच्या वंशातल्या अगदी दहाव्या पिढीपर्यंत कोणीही याहवेहच्या सभेत प्रवेश करू नये.
2 Quem nasceu de união ilícita não poderá entrar na assembléia do Senhor, como também os seus descendentes, até a décima geração.
3 तसेच दहाव्या पिढीनंतर कोणाही अम्मोनी अथवा मोआब्याने याहवेहच्या सभेत कधीही प्रवेश करू नये.
3 Nenhum amonita ou moabita ou qualquer dos seus descendentes, até a décima geração, poderá entrar na assembléia do Senhor.
4 कारण जेव्हा तुम्ही इजिप्त देशातून बाहेर आला, तेव्हा हे मार्गात अन्न व पाणी घेऊन तुम्हाला भेटण्यास आले नाहीत, एवढेच नव्हे तर अराम-नहराईम येथील पथोर नगरात राहणारा बौराचा पुत्र बलामास द्रव्य देऊन तुम्हाला शाप देण्यासाठी आणले.
4 Pois eles não vieram encontrar-se com vocês com pão e água no caminho, quando vocês saíram do Egito; além disso convocaram Balaão, filho de Beor, para vir de Petor, na Mesopotâmia, para pronunciar maldição contra vocês.
5 तरीही याहवेह तुमच्या परमेश्वराने बलामाचे ऐकले नाही, परंतु त्यांनी त्याच्या शापाचे तुमच्यासाठी आशीर्वादात रूपांतर केले, कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हावर प्रीती करतात.
5 No entanto, o Senhor, o seu Deus, não atendeu Balaão, e transformou a maldição em bênção para vocês, pois o Senhor, o seu Deus, os ama.
6 म्हणून तुम्ही जिवंत असेपर्यंत त्यांच्याशी तहाची मैत्री करण्याचा कधीही प्रयत्न करू नये.
6 Não façam um tratado de amizade com eles enquanto vocês viverem.
7 परंतु एदोमी लोकांना तुच्छ लेखू नका, कारण एदोमी तुमचे भाऊबंद आहेत. इजिप्तच्या लोकांचा तिरस्कार करू नका कारण त्यांच्या देशात तुम्ही परदेशी म्हणून राहिला होता.
7 Não rejeitem o edomita, pois ele é seu irmão. Também não rejeitem o egípcio, pois vocês viveram como estrangeiros na terra deles.
8 त्यांच्यात जन्मलेल्या तिसर्या पिढीच्या संततीस याहवेहच्या सभेत प्रवेश करण्यास हरकत नाही.
8 A terceira geração dos filhos deles poderá entrar na assembléia do Senhor.
9 जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूविरुद्ध तळ ठोकाल, तेव्हा सर्व अशुद्ध गोष्टींपासून दूर राहावे.
9 Quando estiverem acampados, em guerra contra os seus inimigos, mantenham-se afastados de todas as coisas impuras.
10 एखादा पुरुष स्वप्नावस्थेमुळे रात्रीतून अशुद्ध झाला असेल, तर त्याने छावणीबाहेर जावे आणि बाहेरच राहावे.
10 Se um de seus homens estiver impuro devido à polução noturna, ele terá que sair do acampamento.
11 पण जशी संध्याकाळ होईल तसे त्याने स्नान करावे व सूर्यास्तानंतर छावणीत परत यावे.
11 Mas ao entardecer ele se lavará, e ao pôr-do-sol poderá voltar ao acampamento.
12 नैसर्गिक विधी करण्यासाठी लागणारी जागा छावणीच्या बाहेर असावी.
12 Determinem um local fora do acampamento onde se possa evacuar.
13 तुमच्या हत्यारांमध्ये कुदळ अवश्य असावी आणि बहिर्दिशेच्या वेळी आपल्या मलमूत्रासाठी त्याने खड्डा खोदावा व नंतर झाकून टाकण्यासाठी तिचा वापर करावा.
13 Como parte do seu equipamento, tenham algo com que cavar, e quando evacuarem, façam um buraco e cubram as fezes.
14 तुमचे रक्षण करण्यासाठी आणि तुमच्यापुढे तुमच्या शत्रूंना तुमच्या हाती देण्यासाठी, याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या छावणीमध्ये फिरत असतात. तुमची छावणी पवित्र असली पाहिजे, यासाठी की त्यांच्या दृष्टीस अमंगळता पडल्यास ते तुमच्यापासून दूर निघून जातील.
14 Pois o Senhor, o seu Deus, anda pelo seu acampamento para protegê-los e entregar-lhes os seus inimigos. O acampamento terá que ser santo, para que ele não veja no meio de vocês alguma coisa desagradável e se afaste de vocês.
15 एखादा गुलाम आपल्या धन्यापासून पळून तुमच्याकडे आला असेल, तर तुम्ही त्याला त्याच्या धन्याच्या स्वाधीन करू नका.
15 Se um escravo refugiar-se entre vocês, não o entreguem nas mãos do seu senhor.
16 त्यांना जे गाव आवडेल, त्या गावात तुमच्यामध्ये त्यांना राहू द्यावे. तुम्ही त्यांना छळू नये.
16 Deixem-no viver no meio de vocês pelo tempo que ele desejar e em qualquer cidade que ele escolher. Não o oprimam.
17 इस्राएलातील कन्या वा पुत्रांनी मंदिरातील देवदासी बनू नये.
17 Nenhum israelita, homem ou mulher, poderá tornar-se prostituto cultual.
18 वेश्येच्या कमाईचा अथवा पुमैथुन करणार्याच्या मिळकतीचा पैसा याहवेह तुमच्या परमेश्वराच्या मंदिरात नवस फेडण्यासाठी कोणीही आणू नये; कारण हे दान व दान देणारी व्यक्ती या दोन्हीही गोष्टी याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने ओंगळ होत.
18 Não tragam ao santuário do Senhor, do seu Deus, os ganhos de uma prostituta ou de um prostituto, a fim de pagar algum voto, pois o Senhor, o seu Deus, por ambos têm repugnância.
19 तुमच्या इस्राएली बंधूला दिलेल्या कर्जावर व्याज मागू नका, मग ते कर्ज पैशाच्या, अन्नाच्या अथवा दुसर्या कशाच्याही रूपाने दिलेले असो, त्याच्यावर व्याज मागू नका.
19 Não cobrem juros de um israelita, por dinheiro, alimento, ou qualquer outra coisa que possa render juros.
20 तुम्ही एखाद्या परदेशीकडून व्याज घेऊ शकता, पण कोणाही इस्राएली बांधवाकडून घेऊ नका, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर जेव्हा तुम्हाला वतन म्हणून ज्या देशात आणतील, तेव्हा तुम्ही केलेल्या प्रत्येक कार्याला आशीर्वाद देतील.
20 Vocês poderão cobrar juros do estrangeiro, mas não do seu irmão israelita, para que o Senhor, o seu Deus, os abençoe em tudo o que vocês fizerem na terra em que estão entrando para dela tomar posse.
21 तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराला एखादा नवस करता, तेव्हा तो फेडण्यास विलंब लावू नये, कारण नवसांची फेड तत्परतेने करावी, अशी याहवेह तुमच्या परमेश्वराची अपेक्षा आहे. तसे न केल्याने तुम्ही पापाचे दोषी ठराल.
21 Se um de vocês fizer um voto ao Senhor, ao seu Deus, não demore a cumpri-lo, pois o Senhor, o seu Deus, certamente lhe pedirá contas, e você será culpado de pecado se não o cumprir.
22 परंतु तुम्ही नवस केला नसेल, तर ते मात्र पाप नाही.
22 Mas se você não fizer o voto, de nada será culpado.
23 तुमच्या ओठांनी तुम्ही जे काही वचन दिले असेल, त्याप्रमाणे तुम्ही अवश्य केले पाहिजे; कारण तो नवस तुम्ही मुखाने, स्वखुशीने याहवेह तुमच्या परमेश्वराला केला होता.
23 Faça tudo para cumprir o que os seus lábios prometeram, pois com a sua própria boca você fez, espontaneamente, o seu voto ao Senhor, ao seu Deus.
24 तुम्ही तुमच्या शेजार्याच्या द्राक्षमळ्यात गेलात, तर हवी तितकी द्राक्षे तुम्ही खावी, परंतु टोपलीत घालून तुम्ही काहीही नेऊ नये.
24 Se vocês entrarem na vinha do seu próximo, poderão comer as uvas que desejarem, mas nada poderão levar em sua cesta.
25 आपल्या शेजार्याच्या उभ्या पिकात तुम्ही गेलात, तर हवी तेवढी कणसे तुम्ही हाताने मोडून खावी, पण त्याच्या उभ्या पिकास मात्र विळा लावू नये.
25 Se entrarem na plantação de trigo do seu próximo, poderão apanhar espigas com as mãos, mas nunca usem foice para ceifar o trigo do seu próximo.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Deuteronômio 23, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.