Deuteronômio 22

marc (MARC) vs NVT

Sair da comparação
NVT Nova Versão Transformadora
1 आपल्यापैकी एखाद्या इस्राएली मनुष्याचा बैल अथवा मेंढरू दूरवर भटकलेला तुम्ही पाहिला, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये; त्याला त्याच्या मालकाकडे घेऊन जावे.
1 “Se você vir solto por aí o boi ou a ovelha de um israelita, não fuja de sua responsabilidade. Devolva o animal ao dono.
2 जर मालक तुमच्याजवळ राहत नसतील किंवा तो कोण आहे हे तुम्हाला ठाऊक नसेल, तर तो तुम्ही तुमच्या घरी न्यावा व त्याचा मालक त्याला शोधीत तिथे येईपर्यंत त्याला ठेवावे. मग त्याच्या मालकाला तो परत करावा.
2 Se o dono não morar por perto ou se você não o conhecer, leve o animal para sua casa e fique com ele até o dono vir procurá-lo. Então, devolva o animal.
3 जर तुम्हाला त्यांचे गाढव किंवा झगा किंवा त्यांनी हरवलेले इतर काही सापडले तर असेच करा. त्याकडे दुर्लक्ष करू नका.
3 Faça o mesmo se encontrar um jumento, uma peça de roupa ou qualquer outra coisa que alguém tenha perdido. Não fuja de sua responsabilidade.
4 जर तुमच्या इस्राएली बांधवाचे गाढव किंवा बैल मार्गात घसरून पडलेले दिसले तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. त्याला आपल्या पायांवर उभे करण्यास त्याच्या मालकाला मदत करावी.
4 “Se você vir o jumento ou o boi de um israelita caído no caminho, não o ignore. Vá e ajude o dono a levantar o animal.
5 कोणत्याही स्त्रीने पुरुषाचा पोशाख घालू नये किंवा कोणत्याही पुरुषाने स्त्रीचा पोशाख घालू नये, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने असे करणे घृणित आहे.
5 “A mulher não deve usar roupas de homem, e o homem não deve usar roupas de mulher. Quem age desse modo é detestável aos olhos do S enhor , seu Deus.
6 जर तुम्हाला मार्गाच्या कडेला किंवा झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे घरटे आढळले आणि त्यात मादी पिलांवर किंवा अंड्यांवर बसलेली असेल, तर त्या मादीला पिलांसोबत धरू नये.
6 “Se acontecer de você encontrar o ninho de um pássaro numa árvore ou no chão, e houver nele filhotes ou ovos que a mãe esteja chocando, não leve a mãe junto com os filhotes.
7 तुम्हाला हवी असतील तर तुम्ही तिची पिल्ले घेऊ शकता, त्यांच्या आईस मात्र तुम्ही अवश्य जाऊ द्यावे; म्हणजे तुमचे कल्याण होईल व तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल.
7 Leve os filhotes, mas deixe a mãe, para que você prospere e tenha vida longa.
8 जेव्हा तुम्ही नवीन घर बांधाल तेव्हा धाब्याला कठडा बांधवा, म्हणजे कोणीही धाब्यावरून पडल्यास मनुष्य हत्येचा दोष तुमच्या घरावर येऊ नये.
8 “Quando você construir uma casa nova, coloque um parapeito em torno do terraço. Desse modo, se alguém cair do terraço, você e sua família não serão culpados pela morte da vítima.
9 तुमच्या द्राक्षमळ्यात तुम्ही दोन प्रकारचे बी पेरू नये; तसे केल्यास, दोन्हीही पिकेच नव्हे तर दोन्ही बीजे देखील दूषित समजल्या जातील.
9 “Não plantem nenhuma outra semente entre as videiras em seu vinhedo. Se o fizerem, estarão proibidos de usar tanto as uvas desse vinhedo como o fruto da outra plantação que semearam.
10 एकाच नांगराला बैल व गाढव यांना एकत्र जुंपून नांगरणी करू नये.
10 “Não arem a terra com um boi e um jumento presos ao mesmo jugo.
11 लोकर व ताग यांचे मिश्रण असलेली वस्त्रे घालू नका.
11 “Não usem roupas feitas de fios de lã e linho entrelaçados.
12 आपल्या अंगरख्याच्या चारही कोपर्‍यांना गोंडे लावावीत.
12 “Coloquem franjas nas quatro pontas do manto com o qual vocês se cobrem.”
13 एखाद्या पुरुषाने पत्नी केली आणि तिच्याशी समागम केल्यानंतर ती त्याला आवडेनाशी झाली
13 “Se um homem se casar com uma mulher e, depois de ter relações com ela, rejeitá-la
14 आणि तिची निंदा केली आणि तिच्या नावाची बदनामी करून म्हटले, “मी या स्त्रीसोबत लग्न केले, पण जेव्हा मी तिच्याजवळ गेलो तेव्हा तिच्यात मला कौमार्याबद्दलचा पुरावा आढळला नाही,”
14 e acusá-la publicamente de conduta vergonhosa, dizendo: ‘Quando me casei com esta mulher, descobri que ela não era virgem’,
15 तर मुलीच्या आईवडिलांनी तिच्या कौमार्याबद्दलचा पुरावा, त्या नगराच्या वेशीत वडील मंडळीपुढे साजरा करावा.
15 então o pai e a mãe da mulher levarão a prova da virgindade da filha até a porta da cidade, onde as autoridades estarão reunidas.
16 तिच्या वडिलांनी त्यांना असे सांगावे, “मी माझी कन्या या मनुष्याला त्याची पत्नी व्हावी म्हणून दिली, परंतु आता ती त्याला आवडत नाही.
16 O pai lhes dirá: ‘Dei minha filha em casamento a este homem, e agora ele a rejeitou.
17 आता त्याने तिची निंदा केली आणि म्हणाला, ‘मला तुमच्या कन्येमध्ये कौमार्याबद्दलचे पुरावे आढळले नाही.’ पण हे पाहा आमच्या कन्येच्या कौमार्याबद्दलचा पुरावा.” मग तिच्या आईवडिलांनी ते वस्त्र नगराच्या वडीलांपुढे सादर करावे,
17 Acusou-a de conduta vergonhosa, dizendo: ‘Descobri que sua filha não era virgem’. Aqui está, porém, a prova da virgindade de minha filha’. Então os pais estenderão o lençol da filha diante das autoridades,
18 आणि मग नगरातील वडील मंडळीने त्या पुरुषाला घ्यावे आणि त्याला शिक्षा द्यावी.
18 e eles pegarão o homem e o castigarão.
19 शंभर चांदीची नाणी दंडादाखल त्याच्याकडून वसूल करावी आणि मुलीच्या वडिलांना द्यावीत, कारण त्या तरुणाने एका इस्राएली कुमारिकेची बदनामी केली. ती त्याची पत्नी म्हणून राहील; तो जिवंत असेपर्यंत त्याने तिला कदापि घटस्फोट देऊ नये.
19 Também lhe aplicarão uma multa de cem peças de prata que ele pagará ao pai da mulher, uma vez que acusou publicamente de conduta vergonhosa uma virgem de Israel. Ela continuará a ser esposa do homem, e ele jamais poderá se divorciar dela.
20 परंतु आरोप सत्य असल्यास आणि तिच्या कौमार्याबद्दलचा पुरावा आढळला नाही,
20 “Mas, se as acusações do homem forem verdadeiras e ele puder provar que a mulher não era virgem,
21 तर मात्र नगराच्या वडिलांनी त्या कन्येला तिच्या वडिलांच्या घराच्या दारापर्यंत न्यावे व तिथे नगरातील लोकांनी तिला मरेपर्यंत धोंडमार करावी. आपल्या आईवडिलांच्या घरात राहत असताना, व्यभिचारिणी होऊन तिने इस्राएलात घृणास्पद कृत्य केले आहे. अशा रीतीने तुमच्यामधील दोष काढून टाकण्यात यावे.
21 então ela será levada até a porta da casa de seu pai e ali será executada por apedrejamento pelos homens da cidade. Ela cometeu um crime vergonhoso em Israel, praticando imoralidade sexual enquanto vivia na casa de seus pais. Desse modo, vocês eliminarão o mal do seu meio.
22 एखादा पुरुष दुसर्‍या पुरुषाच्या स्त्रीबरोबर व्यभिचार करीत असताना आढळला, तर तिच्यासोबत झोपलेला पुरुष आणि स्त्री दोघांनाही जिवे मारावे. अशा रीतीने इस्राएलमधून कलंक दूर करून शुद्ध करावे.
22 “Se um homem for flagrado cometendo adultério, ele e a mulher terão de morrer. Desse modo, vocês eliminarão o mal do meio de Israel.
23 ज्या कुमारिकेचा वाङ्निश्चय झालेला आहे, अशा कुमारिकेला जर एखाद्या नगरात एखाद्या पुरुषाने भ्रष्ट केले,
23 “Se um homem encontrar uma moça virgem, prometida em casamento, e tiver relações sexuais com ela dentro da cidade,
24 तर त्या दोघांनाही नगराच्या वेशीच्या बाहेर घेऊन जावे आणि मरेपर्यंत धोंडमार करावा—त्या कुमारिकेला अशासाठी की नगरात असताना तिने मदतीसाठी आरडाओरडा केला नाही आणि त्या पुरुषाला अशासाठी की त्याने दुसर्‍या पुरुषाच्या स्त्रीला भ्रष्ट केले. अशा रीतीने तुमच्यामधून कलंक दूर करून शुद्ध करावे.
24 levem os dois para a porta da cidade e executem-nos por apedrejamento. A mulher é culpada porque não gritou por socorro, e o homem deverá morrer porque humilhou a esposa de outro homem. Desse modo, vocês eliminarão o mal do seu meio.
25 परंतु एखाद्या पुरुषाने वाङ्निश्चय झालेल्या कुमारिकेला बाहेर शेतात गाठून तिच्यावर बलात्कार केला, तर असे करणार्‍या पुरुषाला ठार मारावे.
25 “Mas, se o homem encontrar a moça prometida em casamento no campo e a violentar, somente o homem deverá ser morto.
26 त्या कुमारिकेला काही करू नये; तिला मरणदंड मिळावा असे पाप तिने केले नाही. एखाद्याने आपल्या शेजार्‍यावर हल्ला करून त्याला ठार मारावे त्याप्रमाणे हे आहे,
26 Não façam nada à moça; não cometeu crime algum que mereça a pena de morte. É tão inocente quanto uma vítima de homicídio.
27 कारण त्या पुरुषाने त्या एकट्या कुमारिकेला शेतात शोधून काढली आणि मदतीसाठी ती ओरडलीच असेल, परंतु ते ऐकण्यासाठी आणि तिची सुटका करण्यासाठी त्या ठिकाणी कोणीही नव्हते.
27 Uma vez que o homem a violentou no campo, deve-se presumir que ela gritou, mas não houve quem a socorresse.
28 जर एखाद्या पुरुषाने जिचा वाङ्निश्चय झालेला नसेल, अशा कुमरिकेवर बलात्कार केला आणि ते करीत असताना तो आढळला,
28 “Se um homem tiver relações com uma moça virgem, mas que não esteja prometida em casamento, e eles forem descobertos,
29 तर त्याने मुलीच्या वडिलांना पन्नास चांदीची नाणी दंड म्हणून दिली पाहिजेत आणि त्या कुमारिकेशी विवाह केला पाहिजे, कारण त्याने तिला भ्रष्ट केले. तो जिवंत असेपर्यंत तिला घटस्फोट देऊ शकत नाही.
29 o homem pagará ao pai da moça cinquenta peças de prata. Uma vez que ele humilhou a moça, se casará com ela e jamais poderá se divorciar.
30 कोणाही पुरुषाने आपल्या पित्याच्या पत्नीशी विवाह करू नये; त्याने आपल्या पित्याच्या अंथरुणास भ्रष्ट करू नये.
30 “Nenhum homem tomará por mulher alguém que foi esposa de seu pai, pois isso desonraria seu pai.”

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Deuteronômio 22, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.