Deuteronômio 21

marc (MARC) vs NVT

Sair da comparação
NVT Nova Versão Transformadora
1 याहवेह तुमच्या परमेश्वराने वतन म्हणून दिलेल्या देशात तुम्ही आल्यावर एखाद्या शेतामध्ये वध झालेला मनुष्यदेह तुम्हाला आढळला व त्याला कोणी मारले हे समजले नाही,
1 “Quando estiverem na terra que o S enhor , seu Deus, lhes dá, e alguém for encontrado morto no campo e não se saiba quem o matou,
2 तर वडीलजनांनी आणि न्यायाधीशांनी तिथे जाऊन त्या मृतदेहापासून आजूबाजूच्या प्रत्येक नगरापर्यंत अंतर मोजावे.
2 as autoridades e os juízes medirão a distância do local onde está o cadáver até as cidades vizinhas.
3 नंतर मृतदेहाच्या सर्वात जवळ असलेल्या नगरातील वडीलजनांनी, कधीही कामास न लावलेली आणि पूर्वी कधीही जू न ठेवलेली अशी एक कालवड घ्यावी
3 Quando se determinar qual é a cidade mais próxima, as autoridades da cidade escolherão do rebanho uma novilha que nunca tenha sido usada para trabalhar no campo e nunca tenha puxado um arado.
4 आणि तिला वडिलांनी ज्या भूमीची कधी नांगरणी अथवा पेरणी केलेली नाही, अशा सतत पाणी वाहत असलेल्या खोर्‍यात नेऊन तिथे कालवडीची मान मोडावी.
4 Levarão a novilha a um vale que não tenha sido lavrado nem semeado e pelo qual passe um ribeiro. Ali, no vale, quebrarão o pescoço da novilha.
5 यानंतर लेवी वंशातील याजक जवळ येतील, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यांना आपल्यासमोर सेवा करण्यासाठी याहवेहच्या नावाने आशीर्वाद देण्यासाठी व वाद आणि हल्ला यांचे निर्णय घेण्यासाठी निवडलेले आहे.
5 Os sacerdotes levitas se aproximarão, pois o S enhor , seu Deus, os escolheu para servirem diante dele e pronunciarem bênçãos em seu nome. Cabe a eles decidir todos os casos legais e criminais.
6 मग मृत माणसाच्या देहाच्या सर्वात जवळ असलेल्या नगरातील सगळे वडीलजन आपले हात खोर्‍यात मान मोडून टाकलेल्या त्या कालवडीवर धुतील,
6 “As autoridades daquela cidade lavarão as mãos sobre a novilha cujo pescoço foi quebrado
7 आणि त्यांनी हे घोषित करावे, “आमच्या हातांनी हा रक्तपात केलेला नाही किंवा आमच्या डोळ्यांनी तो पाहिलेला नाही.
7 e dirão: ‘Nossas mãos não derramaram o sangue dessa pessoa, nem vimos o crime acontecer.
8 हे याहवेह, ज्या तुमच्या इस्राएली लोकांना तुम्ही सोडविले आहे, त्या लोकांना तुम्ही क्षमा करा व निरपराधी माणसाच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर ठेवू नका.” मग या रक्तपाताचे प्रायश्चित्त होईल,
8 Ó S enhor , perdoa o teu povo, Israel, o qual libertaste. Não culpes o teu povo pela morte de um inocente’. Assim, serão absolvidos da culpa pelo sangue da pessoa.
9 आणि तुम्ही तुमच्यावरील निरपराधी माणसाच्या रक्तपाताचा दोष घालवून टाकाल, कारण याहवेहच्या दृष्टीने योग्य ते केले आहे.
9 Desse modo, vocês removerão do seu meio a culpa pela morte da vítima e farão o que é certo aos olhos do S enhor .”
10 जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूविरुद्ध युद्ध करण्यास जाल आणि याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या शत्रूंना तुमच्या स्वाधीन करतील आणि त्यांना तुम्ही बंदिवान कराल,
10 “Quando vocês saírem para guerrear contra seus inimigos e o S enhor , seu Deus, entregá-los em suas mãos e vocês os fizerem prisioneiros,
11 आणि त्या बंदिवानात तुम्हाला जर एखादी देखणी तरुणी आढळली आणि तुम्ही तिच्याकडे आकर्षित झालात तर तिचा तुम्ही तुमची पत्नी म्हणून स्वीकार करावा.
11 pode acontecer de algum de vocês vir uma mulher bonita entre os cativos, sentir-se atraído por ela e desejar casar-se com ela.
12 तिला तुम्ही तुमच्या घरी न्यावे आणि तिच्या डोक्यावरील केसांचे मुंडण करावे, तिची नखे कापावीत
12 Nesse caso, leve-a para casa, onde ela raspará a cabeça, cortará as unhas
13 आणि तिने बंदिवासाची सर्व वस्त्रे बाजूला ठेवून द्यावीत आणि नंतर तिने तुमच्या घरी तिच्या आईवडिलांसाठी संपूर्ण महिनाभर शोक करावा. त्यानंतर तुम्ही तिच्याशी संबंध ठेऊ शकता, तुम्ही तिचे पती व ती तुमची पत्नी होईल.
13 e trocará as roupas que estava usando quando foi capturada. Ela ficará em sua casa, mas você deixará que ela fique de luto pelo pai e pela mãe por um mês inteiro. Depois disso, você se casará com ela. Passará a ser seu marido, e ela será sua esposa.
14 जर तुम्हाला ती आवडेनाशी झाली, तर तिला मुक्त करावे व तिला हवे तिथे जाऊ द्यावे, तुम्ही तिला किंमत घेऊन विकू नये, अथवा तिला गुलामासारखे वागवू नये कारण तुम्ही तिची अवहेलना केली आहे.
14 Se depois do casamento ela não o agradar, liberte-a. Não a venda nem a trate como escrava, pois você a humilhou.”
15 एखाद्या मनुष्याला दोन पत्नी असतील व तो एकीवर प्रीती करीत असेल व दुसरीवर करीत नसेल आणि त्या दोघींनाही त्याच्यापासून पुत्र झाले असतील आणि जी त्याला प्रिय नाही तिचा पुत्र ज्येष्ठ असेल,
15 “Se um homem tiver duas esposas e amar apenas uma delas, mas ambas lhe derem filhos homens, e o filho mais velho for da esposa que ele não ama,
16 तर जेव्हा तो आपल्या पुत्रांना आपली संपत्ती त्याचे वतन म्हणून वाटून देईल, तेव्हा जो खरा ज्येष्ठपुत्र असून नावडत्या पत्नीचा पुत्र आहे, त्याला डावलून, धाकट्या पुत्राला, जो त्याच्या आवडत्या पत्नीचा आहे, त्याला आपल्या प्रथम पुत्राचा अधिकार देऊ नये.
16 quando dividir sua herança o homem não poderá dar a porção maior ao filho da esposa amada, como se este fosse o filho mais velho.
17 आपल्या परंपरेप्रमाणे त्याने आपल्या सर्वात ज्येष्ठ पुत्राला दुप्पट वाटा द्यावा, कारण तो त्याच्या पौरुषाचे प्रथमफळ आहे. तो जरी नावडत्या पत्नीचा पुत्र असला, तरीही ज्येष्ठ पुत्राचा हक्क त्याचाच आहे.
17 Terá de reconhecer os direitos do filho mais velho, da esposa não amada, dando-lhe porção dobrada. Ele é o primeiro filho do vigor de seu pai, e os direitos do filho mais velho lhe pertencem.”
18 जर एखाद्या मनुष्याला हट्टी व बंडखोर पुत्र असेल, जो आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळत नसेल आणि त्यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तरी तो त्यांचे ऐकत नसेल,
18 “Se um homem tiver um filho teimoso e rebelde, que não obedece ao pai nem à mãe, apesar de eles o disciplinarem,
19 तर त्याच्या आईवडिलांनी त्याला धरून नगराच्या वेशीवर वडील मंडळीपुढे घेऊन जावे.
19 o pai e a mãe levarão o filho até a porta da cidade e dirão às autoridades ali reunidas:
20 त्यांनी वडील मंडळीपुढे सांगावे, “हा आमचा पुत्र हट्टी आणि बंडखोर आहे. तो आमच्या आज्ञा पाळत नसून आमचे ऐकत नाही. तो खादाड व मद्यपी आहे.”
20 ‘Este nosso filho é teimoso e rebelde e se recusa a obedecer. É mau-caráter e vive bêbado’.
21 मग त्या नगरातील सर्व लोकांनी त्याला धोंडमार करून ठार मारावे. अशा रीतीने तुमच्यामधील दोष तुम्ही घालवून टाकावे म्हणजे सर्व इस्राएली लोक हे ऐकतील आणि घाबरतील.
21 Então todos os homens da cidade o executarão por apedrejamento. Desse modo, vocês eliminarão o mal do seu meio, e todo o Israel ficará sabendo disso e temerá.”
22 जर एखाद्या मनुष्याने असा काही गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला ज्याची शिक्षा मृत्युदंड आहे व त्याला मृत्युदंड देण्यात आला आणि त्याला झाडावर टांगण्यात आले असेल,
22 “Se alguém cometeu um crime que merece a pena de morte e, por isso, foi executado e pendurado numa árvore,
23 तर त्याचा मृतदेह रात्रभर तिथे ठेवू नये, तर त्याच दिवशी त्याचे दफन करावे; कारण जो कोणी खांबावर टांगलेला असेल, त्याच्यावर परमेश्वराचा शाप असतो. म्हणून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला जो देश वतन म्हणून देत आहे, तो तुम्ही भ्रष्ट करू नये.
23 não deverá permanecer pendurado ali durante a noite. Enterrem o corpo no mesmo dia, pois todo aquele que é pendurado é maldito aos olhos de Deus. Desse modo, vocês evitarão a contaminação da terra que o S enhor , seu Deus, lhes dá como herança.”

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Deuteronômio 21, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.