Deuteronômio 1

marc (MARC) vs ARC

Sair da comparação
ARC Almeida Revista e Corrigida 2009
1 इस्राएली लोक यार्देन नदीच्या पूर्वेस असणार्‍या रानातील अराबा नावाच्या दरीमध्ये तळ देऊन राहिले होते, त्यावेळी मोशे जे बोलला त्या सर्व गोष्टीची नोंद या पुस्तकात केलेली आहे. या प्रदेशात सूफ, पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ व दीजाहाब इत्यादी शहरांचा समावेश होतो.
1 Estas são as palavras que Moisés falou a todo o Israel, dalém do Jordão, no deserto, na planície defronte do mar de Sufe, entre Parã, e Tofel, e Labã, e Hazerote, e Di-Zaabe.
2 (सेईर डोंगरमार्गे होरेब ते कादेश-बरनेआपर्यंतचा प्रवास अकरा दिवसाचा होता.)
2 Onze jornadas há desde Horebe, caminho da montanha de Seir, até Cades-Barneia.
3 चाळिसाव्या वर्षाच्या, अकराव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने इस्राएली लोकांना हे सर्व सांगितले.
3 E sucedeu que, no ano quadragésimo, no mês undécimo, no primeiro dia do mês, Moisés falou aos filhos de Israel, conforme tudo o que o Senhor lhe mandara acerca deles,
4 हे मोशेने जाहीर करण्यापूर्वीच अमोर्‍यांचा राजा सीहोनाचा हेशबोन येथे पराभव करण्यात आला होता व एद्रेई जवळील अष्टारोथ येथे बाशानचा राजा ओगचाही पराभव करण्यात आला होता.
4 depois que feriu a Seom, rei dos amorreus, que habitava em Hesbom, e a Ogue, rei de Basã, que habitava em Astarote, em Edrei.
5 यार्देनच्या पूर्वेकडील मोआब प्रदेशात मोशे इस्राएली लोकांशी नियमांसंबंधी बोलला. तो म्हणाला:
5 Dalém do Jordão, na terra de Moabe, começou Moisés a declarar esta lei, dizendo:
6 आपल्या याहवेह परमेश्वरांनी चाळीस वर्षांपूर्वी होरेब येथे आपल्याला सांगितले होते, “तुम्ही या पर्वताजवळ खूप दिवस राहिलात;
6 O Senhor , nosso Deus, nos falou em Horebe, dizendo: Tempo bastante haveis estado neste monte.
7 आता तुम्ही येथून जा व अमोर्‍यांचा डोंगराळ प्रदेश, अराबाची दरी, नेगेव, कनान व लबानोन आणि भूमध्य समुद्रकिनार्‍यापासून ते फरात नदीच्या काठापर्यंत पसरलेल्या संपूर्ण प्रदेशात जाऊन वस्ती करा.
7 Voltai-vos e parti; ide à montanha dos amorreus, e a todos os seus vizinhos, e à planície, e à montanha, e ao vale, e ao Sul, e à ribeira do mar, e à terra dos cananeus, e ao Líbano, até ao grande rio, o rio Eufrates.
8 पाहा, मी हा सर्व प्रदेश तुम्हाला देत आहे. तुम्ही जा व तो प्रदेश हस्तगत करा. कारण याहवेहने तो प्रदेश अब्राहाम, इसहाक व याकोब या तुमच्या पूर्वजास व त्यांच्या वंशजास दिलेला वचनदत्त देश आहे.”
8 Eis aqui esta terra, eu a dei diante de vós; entrai e possuí a terra que o Senhor jurou a vossos pais, Abraão, Isaque e Jacó, que a daria a eles e à sua semente depois deles.
9 त्यावेळी मी तुम्हाला सांगितले होते, “माझ्या शक्तीपलीकडे असलेले मी एकट्यानेच वाहून नेणारे तुमचे मोठे ओझे माझ्यावर पडले आहे.
9 E, no mesmo tempo, eu vos falei, dizendo: Eu sozinho não poderei levar-vos.
10 कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमची संख्या आकाशातील तार्‍यांप्रमाणे अगणित केली आहे,
10 O Senhor , vosso Deus já vos tem multiplicado; e eis que já hoje em multidão sois como as estrelas dos céus.
11 याहवेह तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वरांनी जे तुम्हाला अभिवचन दिले होते, त्यानुसार तुमची संख्या हजारपटीने वाढवो आणि तुम्हाला आशीर्वाद देवो!
11 O Senhor , Deus de vossos pais, vos aumente, como sois, ainda mil vezes mais e vos abençoe, como vos tem falado.
12 तुमच्या समस्या, तुमचे ओझे व तुमची भांडणे माझ्यासारखा एकटा मनुष्य कसा सोडवू शकेल?
12 Como suportaria eu sozinho as vossas moléstias, e as vossas cargas, e as vossas diferenças?
13 तेव्हा तुम्हीच प्रत्येक गोत्रांमधून सुज्ञ, समजूतदार व प्रतिष्ठित अशी काही माणसे निवडा, म्हणजे मी त्यांना तुमचे पुढारी नेमीन.”
13 Tomai-vos homens sábios, inteligentes e experimentados, entre as vossas tribos, para que os ponha por vossos cabeças.
14 तुम्ही मला उत्तर देऊन म्हणाला, “तुम्ही जे करण्याचा प्रस्ताव दिला ते उत्तम आहे.”
14 Então, vós me respondestes e dissestes: Bom é fazer a palavra que tens falado.
15 म्हणून मी तुमच्या प्रत्येक गोत्रांतून प्रमुख, ज्ञानी आणि आदरणीय पुरुष घेतले आणि त्यांना हजारांवर, शंभरांवर, पन्नासांवर व दहांवर प्रमुख व अधिकारी म्हणून नेमले.
15 Tomei, pois, os cabeças de vossas tribos, homens sábios e experimentados, e os tenho posto por cabeças sobre vós, e por capitães de milhares, e por capitães de cem, e por capitães de cinquenta, e por capitães de dez, e por governadores das vossas tribos.
16 आणि त्यावेळी मी तुमच्या न्यायाधीशांना आज्ञा केली, “तुमच्या लोकांचा वाद ऐकून त्यावर न्याय करावा, मग तो दोन इस्राएली लोकांमधील असो किंवा इस्राएली आणि तुमच्यामध्ये राहणारे परदेशी यांच्यातील असो.
16 E, no mesmo tempo, mandei a vossos juízes, dizendo: Ouvi a causa entre vossos irmãos e julgai justamente entre o homem e seu irmão e entre o estrangeiro que está com ele.
17 न्याय करताना पक्षपातीपणा दाखवू नका; लहान व मोठे यांचे म्हणणे समानतेत ऐकून घ्या. कोणालाही घाबरू नका; कारण न्याय हा परमेश्वराकडूनच असतो. ज्या तक्रारी तुम्हाला सोडविण्यास कठीण वाटतील, त्या माझ्याकडे आणा आणि मी ऐकेन.”
17 Não atentareis para pessoa alguma em juízo, ouvireis assim o pequeno como o grande; não temereis a face de ninguém, porque o juízo é de Deus; porém a causa que vos for difícil fareis vir a mim, e eu a ouvirei.
18 आणि त्यावेळी मी तुम्हाला जे काही करावयाचे आहे ते सर्व सांगितले होते.
18 Assim, naquele tempo, vos ordenei todas as coisas que havíeis de fazer.
19 नंतर आम्ही होरेब येथून प्रस्थान केले व जो तुम्ही पाहिला होता अशा अफाट आणि भयानक अशा अरण्यातून प्रवास करीत, याहवेह आमच्या परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे शेवटी अमोर्‍यांच्या डोंगराळ प्रदेशात पोहोचलो आणि आम्ही कादेश-बरनेआस आलो.
19 Então, partimos de Horebe e caminhamos por todo aquele grande e tremendo deserto que vistes, pelo caminho das montanhas dos amorreus, como o Senhor , nosso Deus, nos ordenara; e chegamos a Cades-Barneia.
20 तेव्हा मी तुम्हाला सांगितले, “आता तुम्ही अमोर्‍यांच्या डोंगराळ प्रदेशात येऊन पोहोचला आहात, जो याहवेह आमचे परमेश्वर आम्हाला देणार आहेत.
20 Então, eu vos disse: Chegados sois às montanhas dos amorreus, que o Senhor , nosso Deus, nos dará.
21 पाहा, याहवेह तुमच्या परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे. तुमच्या पूर्वजांचे देव परमेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे वर जा आणि तो आपल्या ताब्यात घ्या. घाबरू नका; निराश होऊ नका.”
21 Eis que o Senhor , teu Deus, te deu esta terra diante de ti; sobe e possui-a como te falou o Senhor , Deus de teus pais; não temas e não te assustes.
22 तेव्हा तुम्ही सर्व लोक माझ्याकडे आले आणि म्हणाले, “आधी आपण आपले हेर पाठवू म्हणजे कुठल्या मार्गाने त्या देशात प्रवेश करावा व त्यांची कोणती शहरे लागतील हे शोधून काढणे सोपे होईल.”
22 Então, todos vós vos chegastes a mim e dissestes: Mandemos homens adiante de nós, para que nos espiem a terra e nos deem resposta por que caminho devemos subir a ela e a que cidades devemos ir.
23 ही गोष्ट मला चांगली वाटली; म्हणून मी प्रत्येक गोत्रातून एक असे बारा हेर निवडले.
23 Pareceu-me, pois, bem este negócio; de sorte que de vós tomei doze homens, de cada tribo um homem.
24 तिथून निघून ते डोंगराळ प्रदेशात पोहोचले आणि ते अष्कोल दरीपर्यंत आले व त्यांनी त्या प्रदेशाची पाहणी केली.
24 E foram-se, e subiram à montanha, e vieram até ao vale de Escol, e o espiaram.
25 तिथून परत येताना त्यांनी त्या ठिकाणची फळे आपल्याबरोबर आणली व असा अहवाल दिला: “जो देश याहवेह आमचे परमेश्वर आम्हाला देत आहेत तो खरोखरच चांगला आहे.”
25 E tomaram do fruto da terra nas suas mãos, e no-lo trouxeram, e nos tornaram a dar resposta, e disseram: Boa é a terra que nos dá o Senhor , nosso Deus.
26 परंतु तुम्ही वर जाण्यास नाकारले व याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध बंड केले.
26 Porém vós não quisestes subir, mas fostes rebeldes ao mandado do Senhor , vosso Deus.
27 आपल्या तंबूत बसून तुम्ही कुरकुर केली आणि म्हटले, “याहवेह आमचा द्वेष करीत आहेत, म्हणून अमोर्‍यांच्या हातून आमचा नाश व्हावा यासाठी त्यांनी आम्हाला इजिप्त देशातून इकडे आणले आहे.
27 E murmurastes nas vossas tendas e dissestes: Porquanto o Senhor nos aborrece e nos tirou da terra do Egito para nos entregar nas mãos dos amorreus, para destruir-nos.
28 आम्ही आता कुठे जावे? आमच्या हेरबंधूंच्या वार्तेमुळे आम्ही भयभीत झालो आहोत. ते म्हणतात की, ‘त्या देशातील लोक आपल्यापेक्षा धिप्पाड आणि बलवान आहेत. त्यांची नगरे खूप मोठी असून नगरतट तर इतके उंच आहेत की ते जणू काही आकाशाला भिडले आहेत. आम्ही तिथे अनाकाचे वंशज देखील पाहिले आहेत.’ ”
28 Para onde subiremos? Nossos irmãos fizeram com que se derretesse o nosso coração, dizendo: Maior e mais alto é este povo do que nós; as cidades são grandes e fortificadas até aos céus; e também vimos ali filhos dos gigantes.
29 तेव्हा मी त्यांना म्हणालो, “असे भयभीत होऊ नका, त्यांना घाबरू नका.
29 Então, eu vos disse: Não vos espanteis, nem os temais.
30 — ausente —
30 O Senhor , vosso Deus, que vai adiante de vós, por vós pelejará, conforme tudo o que fez convosco, diante de vossos olhos, no Egito;
31 — ausente —
31 como também no deserto, onde viste que o Senhor , teu Deus, nele te levou, como um homem leva seu filho, por todo o caminho que andastes, até chegardes a este lugar.
32 पण तरीही तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचे नाकारले.
32 Mas nem por isso crestes no Senhor , vosso Deus,
33 ज्यांनी प्रवासात तुमच्यापुढे राहून रात्री अग्नीने आणि दिवसा मेघांनी तुमचे मार्गदर्शन केले, वाटेत विश्रांतीसाठी उत्तमोत्तम जागा निवडल्या, ते रात्री अग्नीने आणि दिवसा मेघांनी तुमचे मार्गदर्शन करीत.
33 que foi adiante de vós por todo o caminho, para vos achar o lugar onde vos deveríeis acampar; de noite no fogo, para vos mostrar o caminho por onde havíeis de andar, e de dia na nuvem.
34 तुम्ही जे म्हटले ते याहवेहनी ऐकले आणि ते रागावले व त्यांनी शपथपूर्वक म्हटले:
34 Ouvindo, pois, o Senhor a voz das vossas palavras, indignou-se e jurou, dizendo:
35 “या पिढीतील एकाच्याही दृष्टीस मी त्यांच्या पूर्वजांना वचनदत्त केलेली उत्तम भूमी पडू देणार नाही.
35 Nenhum dos homens desta maligna geração verá esta boa terra que jurei dar a vossos pais,
36 परंतु यफुन्नेहचा पुत्र कालेब, जो मला पूर्णपणे अनुसरून चालला, त्याचे पाय ज्या भूमीला लागतील ती भूमी मी त्याच्या वंशजांना देईन, कारण तो याहवेहच्या मागे पूर्ण अंतःकरणाने चालला.”
36 salvo Calebe, filho de Jefoné; ele a verá, e a terra que pisou darei a ele e a seus filhos; porquanto perseverou em seguir ao Senhor .
37 तुमच्यामुळे याहवेह माझ्यावरही रागावले व म्हणाले, “तू या वचनदत्त देशात प्रवेश करणार नाहीस.
37 Também o Senhor se indignou contra mim por causa de vós, dizendo: Também tu lá não entrarás.
38 पण तुझा मदतनीस, नूनाचा पुत्र यहोशुआ प्रवेश करेल. तू त्याला प्रोत्साहन दे, कारण तो या वतनाचा ताबा घेण्यासाठी इस्राएली लोकांचे मार्गदर्शन करेल.
38 Josué, filho de Num, que está em pé diante de ti, ali entrará; esforça-o, porque ele a fará herdar a Israel.
39 जी बालके पारतंत्र्यात जातील असे तुम्ही म्हणता, ज्यांना त्यांचे बरेवाईटही कळत नाही, त्यांना मी तो देश बहाल करेन आणि ते त्याला आपल्या ताब्यात घेतील.
39 E vossos meninos, de que dissestes: Por presa serão; e vossos filhos, que hoje nem bem nem mal sabem, ali entrarão, e a eles a darei, e eles a possuirão.
40 परंतु तुम्ही मागे वळून वाळवंटातून तांबड्या समुद्राच्या वाटेने कूच करावे.”
40 Porém vós virai-vos e parti para o deserto, pelo caminho do mar Vermelho.
41 तेव्हा लोकांनी कबुली दिली, “आम्ही याहवेहविरुद्ध पाप केले आहे; आम्ही आमच्या वचनदत्त देशात जाऊ व तो मिळविण्यासाठी याहवेह परमेश्वराच्या आज्ञेनुसार आम्ही वर जाऊन लढाई करू.” असे म्हणून त्यांना आपली शस्त्रे सरसावली. त्यांना वाटले की हा सर्व डोंगराळ प्रदेश आपण सहज जिंकून घेऊ.
41 Então, respondestes e me dissestes: Pecamos contra o Senhor ; nós subiremos e pelejaremos, conforme tudo o que nos ordenou o Senhor , nosso Deus; e armastes-vos, pois, vós, cada um dos seus instrumentos de guerra, e estivestes prestes para subir à montanha.
42 परंतु याहवेह मला म्हणाले, “त्यांना सांग, ‘लढाई करण्यास वर जाऊ नका, कारण मी तुमच्याबरोबर राहणार नाही. तुमचा तुमच्या शत्रूकडून पराभव होईल.’ ”
42 E disse-me o Senhor : Dize-lhes: Não subais, nem pelejeis, pois não estou no meio de vós, para que não sejais feridos diante de vossos inimigos.
43 तुम्हाला मी तसे सांगितले, पण तुम्ही माझे ऐकले नाही. उलट पुन्हा याहवेहच्या आज्ञेविरुद्ध बंड केले आणि धिटाई करून त्या डोंगराळ देशात शत्रूवर चाल करून गेले.
43 Porém, falando-vos eu, não ouvistes; antes, fostes rebeldes ao mandado do Senhor , e vos ensoberbecestes, e subistes à montanha.
44 तिथे डोंगराळ देशात राहणार्‍या अमोर्‍यांनी तुमच्यावर चाल करून मधमाश्यांप्रमाणे सेईरपासून होरमाहपर्यंत तुमचा पाठलाग केला व तुम्हाला मार दिला.
44 E os amorreus, que habitavam naquela montanha, vos saíram ao encontro; e perseguiram-vos, como fazem as abelhas, e vos derrotaram desde Seir até Horma.
45 यानंतर तुम्ही परत येऊन याहवेहसमोर शोक करू लागलात, परंतु त्यांनी तुमच्या रडण्याकडे लक्ष दिले नाही.
45 Tornando, pois, vós e chorando perante o Senhor , o Senhor não ouviu a vossa voz, nem vos escutou.
46 म्हणून तुम्ही कादेश येथेच दीर्घकाल राहिला, असे तुम्ही तिथे दिवस घालविले.
46 Assim, em Cades estivestes muitos dias, segundo os dias que ali estivestes.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Deuteronômio 1, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.