Deuteronômio 19
marc (MARC) vs VC
1 याहवेह तुमचे परमेश्वर जी भूमी तुम्हाला देणार आहेत, तेथील राष्ट्रांचा ते नाश करतील व जेव्हा तुम्ही त्यांना त्या भूमीतून घालवून द्याल आणि त्यांच्या शहरात व घरात वस्ती कराल,
1 Quando o Senhor, teu Deus, tiver exterminado as nações cuja terra te dá, quando as tiveres despojado e te tiveres estabelecido em suas cidades e habitações,
2 त्यावेळी याहवेह तुमचे परमेश्वर जी भूमी तुम्हाला वतन म्हणून देत आहेत, त्यामधील तीन शहरे तुम्ही वेगळी करून ठेवावी.
2 reservarás três cidades no meio da terra cuja posse o Senhor, teu Deus, te dá.
3 यातील अंतर निश्चित करा आणि याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला वतन म्हणून देत असलेल्या भूमीचे तीन भाग करा, म्हणजे एखाद्याने कोणाची हत्या केली, तर त्याला स्वतःच्या संरक्षणासाठी त्या नगरात पळून जाता येईल.
3 Farás estradas que conduzam a elas e dividirás em três partes a terra que te dá o Senhor, teu Deus, a fim de que todo homicida possa encontrar refúgio nessas cidades.
4 जो कोणी एखाद्या व्यक्तीची हत्या करतो आणि आश्रयाच्या नगरात पळून जातो, त्याच्यासाठी हे नियम असावे: एखाद्या मनुष्याने मनात काहीही द्वेष नसताना व हेतुपुरस्सर नव्हे, पण चुकून त्याच्या शेजार्याचा वध केला.
4 Eis a regra a seguir para o homicida que ali se refugiar, procurando salvar sua vida. Se matou o seu próximo por inadvertência, sem ódio prévio,
5 एखादा मनुष्य लाकडे तोडण्यासाठी आपल्या शेजार्याबरोबर अरण्यात गेला आणि झाड तोडत असता त्याने कुर्हाड चालविली व ती दांड्यातून निसटून उडाली व त्याच्या शेजार्याला ती लागली आणि तो मरण पावला, तर त्या मनुष्याने पळून जाऊन या तीन शहरांपैकी एका शहराचा आश्रय घेऊन सुरक्षित राहावे.
5 como, por exemplo, se ele tiver ido à floresta com outro cortar lenha e, no momento de brandir o machado para abater a árvore, o ferro se tenha deslocado do cabo e ferido mortalmente o seu companheiro, esse homem refugiar-se-á em uma dessas cidades para salvar sua vida.
6 नाही तर, अशा रक्तपाताबद्दल सूड घेणारा संतापाने त्याचा पाठलाग करेल व मार्ग लांब असल्याने त्याला वाटेत गाठून ठार मारेल. त्याला मृत व्यक्तीबद्दल द्वेष नव्हता व त्याने पूर्वनियोजित केल्याशिवाय आपल्या शेजार्याशी हे कृत्य केले, तो प्राणदंडाच्या शिक्षेस पात्र नव्हता.
6 De outra forma, o vingador do sangue , no ardor de sua cólera, poderia perseguir o homicida e, se o caminho fosse muito longo, atingi-lo para dar-lhe o golpe mortal. Entretanto, esse homem não merece a morte, pois que não tinha ódio da vítima.
7 म्हणून मी तुम्हाला आज्ञा देतो की तीन शहरे निवडून ती वेगळी करून ठेवावी.
7 Eis por que te ordeno reservar três cidades.
8 याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे तुमच्या देशाच्या सीमांचा विस्तार करून संपूर्ण देश तुम्हाला दिला,
8 Quando o Senhor, teu Deus, tiver alargado os teus limites, como jurou aos teus pais, e tiver dado toda a terra que lhes prometeu -
9 कारण मी आज तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन केले—तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती केली व त्यांच्या मार्गात आज्ञाधारकपणे चाललात—तर तुम्ही आणखी तीन शहरे निवडावीत.
9 contento que ponhas fielmente em prática todos os mandamentos que hoje te prescrevo, amando o Senhor, teu Deus, e andando todo o tempo em seus caminhos -, juntarás a essas três cidades outras três.
10 हे करावे, अशा रीतीने याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला वतनादाखल देत असलेल्या भूमीवर निरपराधी माणसांचे रक्त सांडल्याचा दोष तुमच्यावर येणार नाही.
10 Desse modo não se derramará sangue inocente na terra que o Senhor, teu Deus, te dá por herança, e não haverá sangue sobre ti.
11 परंतु कोणी द्वेषाने दबा धरून राहील व आपल्या शेजार्यावर अचानक प्राणघातक हल्ला करून त्याला ठार करेल आणि मग यापैकी एखाद्या शहरात पळून जाईल,
11 Mas, se um homem, tendo ódio do seu próximo, armar-lhe ciladas, levantar-se contra ele e feri-lo mortalmente, indo em seguida refugiar-se numa dessas cidades,
12 तर त्या गावाच्या वडील मंडळीने माणसे पाठवून त्याला धरून आणावे व त्याला वध झालेल्या माणसाच्या रक्तपाताचा सूड घेणार्याच्या स्वाधीन करावे.
12 os anciãos de sua cidade mandarão tirá-lo do lugar de seu refúgio, e o entregarão nas mãos do vingador do sangue, para ser morto.
13 त्याला दया दाखवू नये. इस्राएलास निरपराधी माणसांचे रक्त सांडल्याच्या दोषापासून शुद्ध करावे, म्हणजे तुमचे सर्व बाबतीत कल्याण होईल.
13 Não terás compaixão dele; deves tirar de Israel o sangue inocente, para seres feliz.
14 याहवेह तुमचे परमेश्वर जो देश तुम्हाला वतनात देत आहेत, तो ताब्यात घेतल्यावर, आधीच्या माणसांनी ठेवलेल्या शेजार्याच्या जमीन हद्दीच्या खुणा कदापि बदलू नये.
14 Não removerás os marcos de teu vizinho, que teus predecessores fixaram na herança que te couber na terra, cuja posse te há de dar o Senhor, teu Deus.
15 केवळ एकाच साक्षीदाराच्या साक्षीवर तुम्ही कोणालाही त्याच्या गुन्ह्याबद्दल किंवा अपराधाबद्दल कदापि दोषी ठरवू नये. दोन किंवा तीन साक्षीदारांच्या संमतीने प्रकरण स्थापित केले पाहिजे.
15 Não será admitida contra um homem somente uma testemunha, qualquer que seja o crime, falta ou delito. Só se tomará a coisa em consideração sobre o depoimento de duas ou três testemunhas.
16 एखाद्याने मत्सराने खोटी साक्ष देऊन कोणावर चुकीचा आरोप लावल्यास,
16 Se se apresentar uma testemunha falsa contra um homem, acusando-o de uma má ação,
17 त्या दोन्हीही इसमांना याहवेहसमोर, त्यावेळी जबाबदार असलेल्या याजकांपुढे आणि न्यायाधीशांपुढे आणावे.
17 ambos os contendores comparecerão diante do Senhor, na presença dos sacerdotes e dos juízes que estiverem em exercício naqueles dias.
18 न्यायाधीशांनी त्यांची बारकाईने चौकशी करावी आणि साक्षीदार खोटे बोलत असल्याचे सिद्ध झाले व तो दुसर्या इस्राएली बांधवावर खोटा आरोप करीत असेल,
18 Depois de uma cuidadosa investigação feita pelos juízes, se se verificar que se trata de um falso testemunho, e que a testemunha fez contra o seu irmão uma falsa deposição,
19 तर त्याच्या बांधवाचे जे करण्याचे त्याने मनात योजिले होते, तेच त्याचे करण्यात यावे. अशा रीतीने तुमच्यातील दुष्टाई तुम्ही घालवून टाकावी.
19 vós o tratareis como premeditara tratar o seu irmão. Assim, tirarás o mal do meio de ti
20 इतर लोक हे ऐकतील व भयभीत होतील आणि तुम्हामध्ये अशी दुष्टाई पुन्हा कधीही घडणार नाही.
20 para que os outros, ao sabê-lo, tenham medo, e não ousem mais cometer semelhante falta no meio de ti.
21 खोट्या साक्षीदाराला तुम्ही दया दाखवू नये: जिवाबद्दल जीव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय.
21 Não terás compaixão: vida por vida, olho por olho, dente por dente, mão por mão, pé por pé.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Deuteronômio 19, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.