Deuteronômio 18

marc (MARC) vs ARC

Sair da comparação
ARC Almeida Revista e Corrigida 2009
1 लेवी याजकांना—अर्थात् संपूर्ण लेवी गोत्राला—इतर गोत्रांप्रमाणे इस्राएलात वाटा किंवा वतन नाही. ते याहवेहला केलेल्या होमार्पणावर जगतील, कारण हेच त्यांचे वतन आहे.
1 Os sacerdotes levitas, toda a tribo de Levi, não terão parte nem herança em Israel; das ofertas queimadas do Senhor e da sua herança comerão.
2 त्यांच्या इस्राएली भाऊबंदांप्रमाणे त्यांना वतन नसेल; कारण याहवेहच त्यांचे वतन आहेत, जसे त्यांनी त्यांना अभिवचन दिले होते.
2 Pelo que não terão herança no meio de seus irmãos; o Senhor é a sua herança, como lhe tem dito.
3 बैलाचे किंवा मेंढराचे अर्पण करणार्‍या लोकांकडून मिळणारा याजकांचा हा वाटा आहे: खांदा, अंतर्गत अवयव आणि डोक्याचे मांस.
3 Este, pois, será o direito dos sacerdotes, a receber do povo, dos que sacrificarem sacrifício, seja boi ou gado miúdo: que darão ao sacerdote a espádua, e as queixadas, e o bucho.
4 याशिवाय धान्य, नवा द्राक्षारस व जैतुनाचे तेल यांच्या उत्पन्नाचे प्रथम भाग आणि मेंढरांची प्रथम कातरलेली लोकर त्यांना दिली जावी,
4 Dar-lhe-ás as primícias do teu cereal, do teu mosto e do teu azeite e as primícias da tosquia das tuas ovelhas.
5 कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यांना आणि त्यांच्या वंशजांना सर्व गोत्रातून पिढ्यान् पिढ्या निरंतर उभे राहून आणि याहवेहच्या नावाची सेवा करण्यासाठी निवडले आहे.
5 Porque o Senhor , teu Deus, o escolheu de todas as tuas tribos, para que assista a servir no nome do Senhor , ele e seus filhos, todos os dias.
6 जर एखाद्या लेवीची इस्राएली राष्ट्राच्या एका नगरातून दुसर्‍या नगरात जाऊन राहण्याची कळकळीची इच्छा असल्यास आणि तो याहवेहने निवडलेल्या पवित्रस्थानी येऊन राहिल्यास,
6 E, quando vier um levita de alguma das tuas portas, de todo o Israel, onde habitar, e vier com todo o desejo da sua alma ao lugar que o Senhor escolheu,
7 याहवेह त्याच्या परमेश्वराच्या नावाने इस्राएली भूमीत इतर लेवी बांधवांप्रमाणे याहवेहच्या उपस्थितीत त्याने सेवा करावी.
7 e servir no nome do Senhor , seu Deus, como também todos os seus irmãos, os levitas, que assistem ali perante o Senhor ,
8 वारसाहक्काने मिळालेली संपत्ती विकून आलेले पैसे त्याच्याकडे असतील तरी देखील त्याला इतरांप्रमाणेच सारखा वाटा मिळावा.
8 igual porção comerão, além das vendas do seu patrimônio.
9 जेव्हा तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या वचनदत्त देशात याल, तेव्हा त्या देशात राहणार्‍या राष्ट्रांच्या अमंगळ चालीरीती शिकू नका.
9 Quando entrares na terra que o Senhor , teu Deus, te der, não aprenderás a fazer conforme as abominações daquelas nações.
10 तुमच्यामध्ये आपल्या पुत्राचा किंवा कन्येचा होम करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा किंवा चेटके करणारा, दुष्ट आत्म्यांची मदत घेऊन भविष्य सांगणारा, जादूटोणा करणारा,
10 Entre ti se não achará quem faça passar pelo fogo o seu filho ou a sua filha, nem adivinhador, nem prognosticador, nem agoureiro, nem feiticeiro,
11 अथवा वशीकरण करणारा, अथवा कोणी मध्यस्थ अथवा मृतात्म्यांना बोलावून त्यांच्याशी मसलत करणारा असू नये.
11 nem encantador de encantamentos, nem quem consulte um espírito adivinhante, nem mágico, nem quem consulte os mortos,
12 जो कोणी अशी कृत्ये करतो त्याचा याहवेहला तिरस्कार आहे; आणि त्यांच्या या अमंगळ कृत्यांमुळेच त्या राष्ट्रांना याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्यापुढून घालवून देणार आहेत.
12 pois todo aquele que faz tal coisa é abominação ao Senhor ; e por estas abominações o Senhor , teu Deus, as lança fora de diante de ti.
13 तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे निर्दोषपणे चालावे.
13 Perfeito serás, como o Senhor , teu Deus.
14 जी सर्व राष्ट्रे शकुनमुहूर्त पाहणार्‍यांचे व दैवज्ञांची भाकिते ऐकतात त्या राष्ट्रांचा ताबा तुम्ही घेणार आहात, त्यामधून त्यांना हुसकावून लावा. परंतु याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला अशा गोष्टी करण्याची परवानगी देत नाहीत.
14 Porque estas nações, que hás de possuir, ouvem os prognosticadores e os adivinhadores; porém a ti o Senhor , teu Deus, não permitiu tal coisa.
15 याहवेह तुमचे परमेश्वर इस्राएलातून तुमच्यासाठी माझ्यासारखा एक संदेष्टा उभा करतील. तुम्ही त्याचे ऐकावे.
15 O Senhor , teu Deus, te despertará um profeta do meio de ti, de teus irmãos, como eu; a ele ouvireis;
16 कारण होरेबाच्या पर्वताजवळ हीच विनंती तुम्ही स्वतः याहवेह तुमच्या परमेश्वराजवळ केली होती, जेव्हा तुम्ही विनविले, “याहवेह आमच्या परमेश्वराचा भयावह आवाज पुन्हा ऐकण्याचा अथवा त्या पर्वतावर तो भयावह अग्नी पुनरपि पाहण्याचा प्रसंग आम्हावर येऊ नये, नाहीतर आम्हाला मृत्यू येईल.”
16 conforme tudo o que pediste ao Senhor , teu Deus, em Horebe, no dia da congregação, dizendo: Não ouvirei mais a voz do Senhor , meu Deus, nem mais verei este grande fogo, para que não morra.
17 तेव्हा याहवेह मला म्हणाले: “ते जे म्हणतात ते योग्य आहे.
17 Então, o Senhor me disse: Bem falaram naquilo que disseram.
18 त्यांच्या भाऊबंदांतून मी त्यांच्यासाठी तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करेन आणि मी माझी वचने त्याच्या मुखात घालेन. मी त्याला ज्याकाही आज्ञा देईन त्या सर्व तो त्यांना सांगेल.
18 Eis que lhes suscitarei um profeta do meio de seus irmãos, como tu, e porei as minhas palavras na sua boca, e ele lhes falará tudo o que eu lhe ordenar.
19 तो संदेष्टा जे काही माझ्या नावाने बोलेल आणि जो कोणी माझे शब्द ऐकणार नाही, त्याची मी स्वतः झडती घेईन.
19 E será que qualquer que não ouvir as minhas palavras, que ele falar em meu nome, eu o requererei dele.
20 पण जो संदेष्टा माझ्या नावाने असे काही बोलतो ज्याची मी आज्ञा दिली नाही किंवा जो संदेष्टा इतर दैवतांच्या नावाने बोलतो त्याला जिवे मारावे.”
20 Porém o profeta que presumir soberbamente de falar alguma palavra em meu nome, que eu lhe não tenho mandado falar, ou o que falar em nome de outros deuses, o tal profeta morrerá.
21 तुम्ही स्वतःशी म्हणू शकता, “हा संदेश याहवेह बोलले नाहीत, हे आम्ही कसे ओळखावे?”
21 E se disseres no teu coração: Como conheceremos a palavra que o Senhor não falou?
22 तर एखाद्या संदेष्ट्याने याहवेहच्या नावाने ज्या गोष्टीची घोषणा केलेली असेल, ती गोष्ट जर घडून आली नाही किंवा खरेच तसे होत नसेल तर तो संदेश याहवेहने दिलेला नाही. तो संदेष्टा उन्मत्तपणे बोलला आहे, तुम्ही त्याचे भय बाळगू नये.
22 Quando o tal profeta falar em nome do Senhor , e tal palavra se não cumprir, nem suceder assim, esta é palavra que o Senhor não falou; com soberba a falou o tal profeta; não tenhas temor dele.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Deuteronômio 18, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.