Deuteronômio 17

marc (MARC) vs ARA

Sair da comparação
ARA Almeida Revista e Atualizada 1993
1 तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराला दोष अथवा व्यंग असलेला बैल किंवा मेंढरू यांचे अर्पण कदापि करू नये; कारण त्याचा त्यांना वीट आहे.
1 Não sacrificarás ao Senhor , teu Deus, novilho ou ovelha em que haja imperfeição ou algum defeito grave; pois é abominação ao Senhor , teu Deus.
2 समजा याहवेहने तुम्हाला दिलेल्या देशातील एखाद्या नगरात तुमच्यातील कोणी पुरुष अथवा स्त्री याहवेह तुमच्या परमेश्वराच्या कराराविरुद्ध त्यांच्या दृष्टीने पातक करेल,
2 Quando no meio de ti, em alguma das tuas cidades que te dá o Senhor , teu Deus, se achar algum homem ou mulher que proceda mal aos olhos do Senhor , teu Deus, transgredindo a sua aliança,
3 आणि त्यांनी माझ्या आज्ञेच्या विरुद्ध अन्य दैवतांची उपासना केली, त्यांना किंवा सूर्य किंवा चंद्र किंवा आकाशातील तारे यांना नमन केले,
3 que vá, e sirva a outros deuses, e os adore, ou ao sol, ou à lua, ou a todo o exército do céu, o que eu não ordenei;
4 आणि हे तुमच्या कानी आले, तर ही गोष्ट खरी आहे की नाही याची तुम्ही प्रथम काळजीपूर्वक खात्री करून घ्यावी. इस्राएलात ही घृणास्पद गोष्ट घडली आहे व हे सत्य आहे असे निश्चित झाल्यावर,
4 e te seja denunciado, e o ouvires; então, indagarás bem; e eis que, sendo verdade e certo que se fez tal abominação em Israel,
5 ही घृणास्पद गोष्ट करणार्‍या त्या पुरुषाला अथवा स्त्रीला नगराच्या वेशीजवळ घेऊन जावे आणि त्या व्यक्तीला मरेपर्यंत धोंडमार करावा.
5 então, levarás o homem ou a mulher que fez este malefício às tuas portas e os apedrejarás, até que morram.
6 दोन किंवा तीन साक्षीदारांच्या साक्षीवर एखाद्याला मृत्यू दंड द्यावे लागते, परंतु केवळ एका साक्षीदाराच्या साक्षीवर कोणालाही मृत्यू दंड देऊ नये.
6 Por depoimento de duas ou três testemunhas, será morto o que houver de morrer; por depoimento de uma só testemunha, não morrerá.
7 ही धोंडमार करण्यासाठी जे साक्षीदार आहेत, त्यांनी प्रथम त्या मनुष्याला दगडमार करावा आणि नंतर इतरांनी त्यात सहभागी व्हावे. अशा रीतीने तुमच्यामधून दुष्टाई घालवून तुम्ही स्वतःला शुद्ध करून घ्यावे.
7 A mão das testemunhas será a primeira contra ele, para matá-lo; e, depois, a mão de todo o povo; assim, eliminarás o mal do meio de ti.
8 तुमच्या न्यायालयात खटले येतात, ज्यांचा निवाडा करण्याचे काम तुमच्या आवाक्याबाहेरचे असेल—मग ते रक्तपात असो, फिर्याद अथवा मारामारी असोत—याहवेह तुमच्या परमेश्वराने निवडलेल्या स्थानी तुम्ही तो वाद न्यावा.
8 Quando alguma coisa te for difícil demais em juízo, entre caso e caso de homicídio, e de demanda e demanda, e de violência e violência, e outras questões de litígio, então, te levantarás e subirás ao lugar que o Senhor , teu Deus, escolher.
9 त्याकाळी जे लेवी याजक किंवा न्यायाधीश आपल्या पदावर असतील, त्यांच्याशी तुम्ही मसलत करावी आणि ते त्या वादाचा निर्णय तुम्हाला देतील.
9 Virás aos levitas sacerdotes e ao juiz que houver naqueles dias; inquirirás, e te anunciarão a sentença do juízo.
10 ते आपला निर्णय देतील आणि ते सांगतील त्याप्रमाणे अगदी तंतोतंत तुम्ही करावे. याहवेहने निवडलेल्या स्थानी त्यांनी दिलेला निर्णय तुम्ही अगदी तंतोतंत पाळावा. त्यांनी तुम्हाला जे काही करण्यास सांगितले आहे ते सर्व करण्याची काळजी घ्या.
10 E farás segundo o mandado da palavra que te anunciarem do lugar que o Senhor escolher; e terás cuidado de fazer consoante tudo o que te ensinarem.
11 ते तुम्हाला जे काही शिकवतील व जो निर्णय ते देतील, त्याच्या उजवीकडे वा डावीकडे न वळता, तो अंमलात आणावा.
11 Segundo o mandado da lei que te ensinarem e de acordo com o juízo que te disserem, farás; da sentença que te anunciarem não te desviarás, nem para a direita nem para a esquerda.
12 याहवेह तुमच्या परमेश्वराने निवडलेला, त्यावेळी पदावर असलेल्या न्यायाधीशाचा अथवा याजकांचा निर्णय न पाळण्याचे धाडस जो कोणी करेल, त्याला मृत्यूची शिक्षा दिली जावी. अशा रीतीने इस्राएलातून तुम्हाला ही दुष्टाई काढून टाकता येईल.
12 O homem, pois, que se houver soberbamente, não dando ouvidos ao sacerdote, que está ali para servir ao Senhor , teu Deus, nem ao juiz, esse morrerá; e eliminarás o mal de Israel,
13 हे सर्व लोक ऐकतील व भयभीत होतील आणि पुढे ते उन्मत्तपणा करणार नाहीत.
13 para que todo o povo o ouça, tema e jamais se ensoberbeça.
14 याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या देशात तुम्ही याल व तो ताब्यात घ्याल आणि स्वतःशी म्हणाल, “इतर राष्ट्रांना जसा राजा आहे तसा आपल्यालाही असावा,”
14 Quando entrares na terra que te dá o Senhor , teu Deus, e a possuíres, e nela habitares, e disseres: Estabelecerei sobre mim um rei, como todas as nações que se acham em redor de mim,
15 तर ज्या माणसाची याहवेह तुमचे परमेश्वर निवड करतील, त्यालाच तुम्ही राजा म्हणून नेमावे. तो तुमच्या भाऊबंदांपैकी असावा; परदेशीयाला म्हणजे इस्राएली पैकी नसलेल्यास तुम्ही राजा म्हणून नेमू नये.
15 estabelecerás, com efeito, sobre ti como rei aquele que o Senhor , teu Deus, escolher; homem estranho, que não seja dentre os teus irmãos, não estabelecerás sobre ti, e sim um dentre eles.
16 राजाने स्वतःसाठी घोड्यांचा मोठा संग्रह करू नये किंवा त्याने आपल्यासाठी अधिक घोडे आणण्यासाठी आपली माणसे इजिप्त देशात पाठवू नये, कारण “तुम्ही त्या मार्गाने परत जाऊ नये,” असे याहवेहने तुम्हाला सांगितले आहे.
16 Porém este não multiplicará para si cavalos, nem fará voltar o povo ao Egito, para multiplicar cavalos; pois o Senhor vos disse: Nunca mais voltareis por este caminho.
17 तुमच्या राजाने अनेक स्त्रिया करू नयेत, जेणेकरून त्याचे अंतःकरण बहकून जाईल. त्याने आपल्यासाठी चांदी व सोन्याचा मोठा संग्रह करू नये.
17 Tampouco para si multiplicará mulheres, para que o seu coração se não desvie; nem multiplicará muito para si prata ou ouro.
18 जेव्हा तो आपल्या राजासनावर बसेल, तेव्हा त्याने लेवी याजकांच्या जवळ असणार्‍या नियमशास्त्रामधून हे सर्व नियम व आज्ञा स्वतः लिहून काढाव्यात.
18 Também, quando se assentar no trono do seu reino, escreverá para si um traslado desta lei num livro, do que está diante dos levitas sacerdotes.
19 ती प्रत नेहमीच त्याच्याजवळ असेल. त्याने त्या नियमांचे दररोज वाचन करावे म्हणजे तो याहवेह त्याच्या परमेश्वराचा आदर करण्यास शिकेल आणि या नियमाचे आणि विधीचे सर्व शब्द काळजीपूर्वक पाळेल
19 E o terá consigo e nele lerá todos os dias da sua vida, para que aprenda a temer o Senhor , seu Deus, a fim de guardar todas as palavras desta lei e estes estatutos, para os cumprir.
20 व त्याने स्वतःला आपल्या इस्राएली बांधवांपेक्षा अधिक श्रेष्ठ समजू नये आणि नियमांपासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नये. मग तो आणि त्याचे वंशज अनेक पिढ्या इस्राएलावर दीर्घकाळ राज्य करतील.
20 Isto fará para que o seu coração não se eleve sobre os seus irmãos e não se aparte do mandamento, nem para a direita nem para a esquerda; de sorte que prolongue os dias no seu reino, ele e seus filhos no meio de Israel.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Deuteronômio 17, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.