Deuteronômio 14

marc (MARC) vs ARC

Sair da comparação
ARC Almeida Revista e Corrigida 2009
1 याहवेह तुमच्या परमेश्वराची तुम्ही संतती आहात. मृतांसाठी स्वतःला जखमा करून घेऊ नका किंवा डोक्याचे मुंडण करून घेऊ नका,
1 Filhos sois do Senhor , vosso Deus; não vos dareis golpes, nem poreis calva entre vossos olhos por causa de algum morto.
2 कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे पवित्रजन आहात. पृथ्वीवरील इतर सर्व राष्ट्रांमधून तुम्हीच त्यांचा मौल्यवान ठेवा असावे म्हणूनच याहवेहने तुम्हाला निवडले आहे.
2 Porque és povo santo ao Senhor , teu Deus, e o Senhor te escolheu de todos os povos que há sobre a face da terra, para lhe seres o seu povo próprio.
3 कोणतेही निषिद्ध ठरविण्यात आलेले अन्न तुम्ही खाऊ नये.
3 Nenhuma abominação comereis.
4 तुम्ही हे प्राणी खाऊ शकता: बैल, मेंढरे व शेरडे,
4 Estes são os animais que comereis: o boi, o gado miúdo das ovelhas, o gado miúdo das cabras,
5 सांबर, हरिण, भेकर, रानबोकड, रोही, गवा व डोंगरी मेंढा.
5 o veado, a corça, o búfalo, a cabra montês, o texugo, o boi silvestre e o gamo.
6 ज्यांचे खूर दुभागलेले आहेत आणि जे प्राणी रवंथ करतात असे कोणतेही प्राणी तुम्ही खाऊ शकता.
6 Todo animal que tem unhas fendidas, que tem a unha dividida em duas, que remói, entre os animais, isso comereis.
7 तरी, जे प्राणी फक्त रवंथ करतात अथवा ज्यांचे फक्त खूर दुभागलेले असतात, हे प्राणी तुम्ही खाऊ नयेत: उंट, ससा आणि रानससा; कारण हे प्राणी रवंथ करतात, परंतु त्यांचे खूर दुभागलेले नसतात; ते प्राणी तुमच्यासाठी विधिनियमानुसार अशुद्ध आहेत.
7 Porém estes não comereis, dos que somente remoem ou que têm a unha fendida: o camelo, a lebre e o coelho, porque remoem, mas não têm a unha fendida; imundos vos serão.
8 डुकरे देखील अशुद्ध आहेत; त्यांचे खूर जरी दुभागलेले आहेत, तरी ते रवंथ करीत नाहीत, त्यांचे मांस तुम्ही खाऊ नये किंवा त्यांच्या मृतशरीरांना स्पर्श करू नये.
8 Nem o porco, porque tem unhas fendidas, mas não remói; imundo vos será; não comereis da carne destes e não tocareis no seu cadáver.
9 पाण्यात राहणार्‍या सर्व प्राण्यांपैकी ज्यांना कल्ले व खवले आहेत, त्यांना तुम्ही खाऊ शकता.
9 Isto comereis de tudo o que há nas águas: tudo o que tem barbatanas e escamas comereis.
10 परंतु ज्यांना कल्ले व खवले नाहीत ते तुम्ही खाऊ नये; तुमच्यासाठी ते अशुद्ध आहे.
10 Mas tudo o que não tiver barbatanas nem escamas não o comereis; imundo vos será.
11 कोणतेही शुद्ध पक्षी खाण्यास योग्य आहेत.
11 Toda ave limpa comereis.
12 परंतु हे पक्षी तुम्ही खाऊ नये: गरुड, गिधाड, काळे गिधाड,
12 Porém estas são as de que não comereis: a águia, o quebrantosso, o xofrango,
13 लाल पतंग, काळे पतंग, निरनिराळ्या जातीच्या घारी,
13 o abutre, a pega e o milhano, segundo a sua espécie;
14 कोणत्याही जातीचे कावळे,
14 e todo o corvo, segundo a sua espécie;
15 शिंग असलेले घुबड, किंचाळणारे घुबड, समुद्रपक्षी, सर्व जातीचे बहिरी ससाणे,
15 o avestruz, o mocho, o cuco e o gavião, segundo a sua espécie;
16 लहान घुबड, पिंगळा, मोठे घुबड, पांढरे घुबड,
16 e o bufo, a coruja, a gralha,
17 वाळवंटी घुबड, कुरर, करढोक,
17 o cisne, o pelicano, o corvo-marinho,
18 करकोचा, कोणत्याही प्रकारचे बगळे, टिटवी आणि वटवाघूळ.
18 a cegonha, a garça, segundo a sua espécie, a poupa, e o morcego.
19 सर्वप्रकारचे उडणारे कीटक तुमच्यासाठी अशुद्ध आहेत; ते तुम्ही खाऊ नये.
19 Também todo réptil que voa vos será imundo; não se comerá.
20 पण पंख असलेले कोणतेही पक्षी जे शुद्ध आहेत ते तुम्ही खाऊ शकता.
20 Toda ave limpa comereis.
21 आधीच मृत्यू पावलेले असे काहीही तुम्ही खाऊ नये. तुमच्या नगरात राहणार्‍या एखाद्या परकियाने ते खाण्यास हरकत नाही. किंवा परकियाला विकत द्यावा, परंतु तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे पवित्रजन आहात.
21 Não comereis nenhum animal morto; ao estrangeiro, que está dentro das tuas portas, o darás a comer ou o venderás ao estranho, porquanto és povo santo ao Senhor , teu Deus. Não cozerás o cabrito com o leite da sua mãe.
22 तुमच्या शेतात प्रत्येक वर्षी होणार्‍या उत्पन्नाचा दशांश भाग वेगळा ठेवण्याची खात्री करा.
22 Certamente darás os dízimos de toda a novidade da tua semente, que cada ano se recolher do campo.
23 धान्याचा, नवीन द्राक्षारसाचा व जैतुनाच्या तेलाचा दशांश आणि तुमच्या गुरांच्या व शेरडामेंढरांच्या प्रथम वत्सांनाही याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर त्यांच्या नावाप्रित्यर्थ खाण्यासाठी, ते जे पवित्रस्थान निवडतील त्या ठिकाणी खा, म्हणजे तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे नेहमीच आदर करण्याचे शिकाल.
23 E, perante o Senhor , teu Deus, no lugar que escolher para ali fazer habitar o seu nome, comerás os dízimos do teu cereal, do teu mosto, do teu azeite e os primogênitos das tuas vacas e das tuas ovelhas; para que aprendas a temer ao Senhor , teu Deus, todos os dias.
24 परंतु जर ते ठिकाण खूप दूर असेल आणि तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराद्वारे आशीर्वादित झाला असाल आणि तुमचा दशांश घेऊन जाणे गैरसोईचे असेल (कारण जे ठिकाण याहवेह त्यांच्या नावाच्या स्थापनेसाठी निवडतील ते खूप दूर आहे),
24 E, quando o caminho te for tão comprido, que os não possas levar, por estar longe de ti o lugar que escolher o Senhor , teu Deus, para ali pôr o seu nome, quando o Senhor , teu Deus, te tiver abençoado,
25 तर मग तुमचे दशांश चांदीच्या मोबदल्यात घ्या, ही चांदी तुमच्याबरोबर घ्या आणि याहवेह तुमचे परमेश्वर निवडतील त्या ठिकाणी जा.
25 então, vende-os, e ata o dinheiro na tua mão, e vai ao lugar que escolher o Senhor , teu Deus.
26 त्या चांदीने तुम्हाला आवडेल ते विकत घ्या: गाई, बैल, मेंढी, थोडा द्राक्षारस अथवा आंबलेले पेय आणि तुम्हाला हवे असलेले काहीही. त्या ठिकाणी याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर तुम्ही आणि तुमच्या कुटुंबासह खाऊन पिऊन आनंद करावा.
26 E aquele dinheiro darás por tudo o que deseja a tua alma, por vacas, e por ovelhas, e por vinho, e por bebida forte, e por tudo o que te pedir a tua alma; come-o ali perante o Senhor , teu Deus, e alegra-te, tu e a tua casa;
27 आणि तुमच्या नगरात राहत असलेल्या लेवी वंशजांकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करू नये; कारण त्यांना तुमच्यासारखा वाटा अथवा वतन नाही.
27 porém não desampararás o levita que está dentro das tuas portas; pois não tem parte nem herança contigo.
28 प्रत्येक तिसर्‍या वर्षाच्या शेवटी संपूर्ण उत्पन्नाचा दशांश आणावा आणि तुमच्या नगरात एकत्र साठवून ठेवावा,
28 Ao fim de três anos, tirarás todos os dízimos da tua novidade no mesmo ano e os recolherás nas tuas portas.
29 म्हणजे लेवी वंशजांना (ज्यांना स्वतःचा वाटा अथवा वतन नाही) तो दशांश द्यावा किंवा परकियांना द्यावा अथवा तुमच्या नगरात असणार्‍या विधवांना आणि अनाथांना द्यावा. म्हणजे ते खाऊन तृप्त होतील आणि मग याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या हाताच्या कार्याला आशीर्वादित करतील.
29 Então, virá o levita ( pois nem parte nem herança tem contigo), e o estrangeiro, e o órfão, e a viúva, que estão dentro das tuas portas, e comerão, e fartar-se-ão, para que o Senhor , teu Deus, te abençoe em toda a obra das tuas mãos, que fizeres.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Deuteronômio 14, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.