Daniel 8
marc (MARC) vs NVI
1 बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या तिसर्या वर्षी, मी जो दानीएलने पहिल्यासारखाच आणखी एक दृष्टान्त पाहिला.
1 No terceiro ano do reinado do rei Belsazar, eu, Daniel, tive outra visão, depois da primeira.
2 माझ्या दृष्टान्तात मी असे पाहिले की, मी एलाम प्रांतातील शूशनच्या किल्ल्यात आहे; मी दृष्टान्तात उलई नदीकाठी उभा होतो.
2 Na minha visão eu me vi na cidadela de Susã, na província de Elão; na visão eu estava junto do canal de Ulai.
3 मी आपले डोळे वर करून पाहिले की नदीच्या काठावर उभा असलेला एक मेंढा दिसला, त्याला दोन शिंगे होती आणि ती शिंगे लांब होती. एक शिंग दुसर्यापेक्षा अधिक लांब होते परंतु नंतर ते वाढले.
3 Olhei para cima, e diante de mim, junto ao canal, estava um carneiro, seus dois chifres eram compridos, um mais que o outro, mas o mais comprido cresceu depois do outro.
4 मी पाहिले की तो मेंढा पश्चिमेकडे, उत्तरेकडे, आणि दक्षिणेकडे धडक मारीत होता. दुसर्या कोणताही प्राणी त्याच्यासमोर उभा राहू शकला नाही आणि त्याच्या सामर्थ्यापासून वाचू शकला नाही. त्याला ज्यात संतोष वाटला, ते त्याने केले आणि तो महान झाला.
4 Observei o carneiro enquanto ele avançava para o oeste, para o norte e para o sul. Nenhum animal conseguia resistir-lhe, e ninguém podia livrar-se do seu poder. Ele fazia o que bem queria e foi ficando cada vez maior.
5 जेव्हा मी याचा विचार करीत होतो, तेव्हा मी पाहिले की एक बोकड त्याचे पाय जमिनीवर ठरत नव्हते, जो सर्व पृथ्वीला पार करून आला. या बोकडाला डोळ्यांच्या मधोमध एक ठळक शिंग होते.
5 Enquanto eu estava considerando isso, de repente um bode, com um chifre enorme entre os olhos, veio do oeste, percorrendo toda a extensão da terra sem encostar no chão.
6 तो दोन शिंगे असलेल्या मेंढ्याजवळ आला जो नदीसमोर उभा होता आणि पूर्णशक्तीने त्याने त्यावर हल्ला केला.
6 Ele veio na direção do carneiro de dois chifres que eu tinha visto ao lado do canal, e avançou contra ele com grande fúria.
7 मी पाहिले की त्याने फार क्रोधित होऊन मेंढ्यावर हल्ला केला आणि धडक देत त्याचा दोन्ही शिंगांना मोडून टाकले. मेंढा त्याच्या विरोधात उभा राहण्यास शक्तिहीन होता; बोकडाने त्याला जमिनीवर आपटले आणि पायाखाली तुडविले आणि त्याच्या शक्तीपासून मेंढ्याला कोणालाही सोडविता आले नाही.
7 Eu o vi atacar furiosamente o carneiro, atingi-lo e quebrar os seus dois chifres. O carneiro não teve forças para resistir-lhe; o bode o derrubou no chão e o pisoteou, e ninguém foi capaz de livrar o carneiro do seu poder.
8 तो बोकड फार महान झाला, परंतु तो बलिष्ठ झाल्यामुळे त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्या शिंगाच्या जागी चार ठळक शिंगे फुटली. त्यांची टोके चारही दिशांनी वाढली.
8 O bode tornou-se muito grande, mas no auge da sua força o seu grande chifre foi quebrado, e em seu lugar cresceram quatro chifres enormes, na direção dos quatro ventos da terra.
9 त्यांच्यापैकी एकामधून दुसरे शिंग फुटले, लहान म्हणून त्याचा प्रारंभ झाला, परंतु दक्षिण, पूर्व आणि वैभवी देशाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाढले.
9 De um deles saiu um outro chifre, que começou pequeno, mas cresceu em poder na direção do sul, do leste e da Terra Magnífica.
10 तो आकाशाच्या सैन्यापर्यंत पोहोचेपर्यंत वाढला आणि त्याने काही ताऱ्यांचे सैन्य पृथ्वीवर फेकले आणि त्यांना तुडविले.
10 Cresceu até alcançar o exército dos céus, e atirou na terra alguns componentes do exército das estrelas e os pisoteou.
11 त्याने स्वतःला याहवेहच्या अधिपतीप्रमाणे उच्च केले; त्याने दररोज याहवेहला अर्पण केले जाणारे यज्ञ काढून घेतले आणि त्यांचे पवित्रस्थान पाडून टाकले.
11 Tanto cresceu que chegou a desafiar o príncipe do exército; suprimiu o sacrifício diário oferecido ao príncipe, e o local do santuário foi destruído.
12 दैनंदिन यज्ञ बंडखोरीमुळे याहवेहचे लोक त्याच्या हाती देण्यात आले. त्याने जे काही केले त्यात उन्नती केली आणि सत्य मातीला मिळविले.
12 Por causa da rebelião, o exército dos santos e o sacrifício diário foram dados ao chifre. Ele tinha êxito em tudo o que fazia, e a verdade foi lançada por terra.
13 नंतर एका पवित्रजनाला बोलताना मी ऐकले आणि दुसरा पवित्रजन त्याला म्हणाला, “दृष्टान्त पूर्ण होण्यास किती काळ लागेल—त्या दृष्टान्तामध्ये रोजचे अर्पण, विध्वंसक पातक ज्यामुळे ओसाडी येते, पवित्रस्थानाचे समर्पण आणि याहवेहच्या लोकांना पायदळी तुडविले जाणे हे दाखविले आहे?”
13 Então ouvi dois anjos conversando, e um deles perguntou ao outro: "Quanto tempo durarão os acontecimentos anunciados por essa visão? Até quando será suprimido o sacrifício diário e a rebelião devastadora prevalecerá? Até quando o santuário e o exército ficarão entregues ao poder do chifre e serão pisoteados? "
14 तो मला म्हणाला, “यासाठी 2,300 संध्याकाळ आणि सकाळ लागतील; नंतर पवित्रस्थान शुद्ध करण्यात येईल.”
14 Ele me disse: "Isso tudo levará duas mil e trezentas tardes e manhãs; então o santuário será reconsagrado".
15 मग मी दानीएल, या दृष्टान्ताचा अर्थ काय असावा ते जाणून घेण्याच्या प्रयत्न करू लागलो, तेवढ्यात एकाएकी मानवासारखा दिसणारा कोणी एक पुरुष माझ्यासमोर उभा राहिला.
15 Enquanto eu, Daniel, observava a visão e tentava entendê-la, diante de mim apareceu um ser que parecia homem.
16 आणि मी उलईपलीकडून आलेली एक मनुष्यवाणी मी ऐकली “हे गब्रीएला, या मनुष्यास त्याच्या दृष्टान्ताचा अर्थ सांग.”
16 E ouvi a voz de um homem que vinha do Ulai: "Gabriel, dê a esse homem o significado da visão".
17 जिथे मी उभा होतो त्या जागेजवळ तो आला, तेव्हा मला धडकी भरली व मी जमिनीवर पालथा पडलो. तेव्हा तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, हे दृष्टान्त शेवटच्या काळाशी संबंधित आहे हे समजून घे.”
17 Quando ele se aproximou de mim, fiquei aterrorizado e caí prostrado. E ele me disse: "Filho do homem, saiba que a visão refere-se aos tempos do fim".
18 तो माझ्याशी बोलत असतानाच मी जमिनीकडे तोंड करून गाढ झोपी गेलो. तेव्हा त्याने स्पर्श करून मला जागे केले व मला माझ्या पायांवर उभे केले.
18 Enquanto ele falava comigo, caí prostrado, rosto em terra, e perdi os sentidos. Então ele tocou em mim e me pôs de pé.
19 तो म्हणाला: “क्रोधाच्या अखेरच्या समयात काय घडणार आहे हे मी तुला सांगणार आहे, कारण हा दृष्टान्त नेमलेल्या काळाच्या समाप्तीच्या संबंधी आहे.
19 E disse: "Vou contar-lhe o que acontecerá depois, no tempo da ira, pois a visão se refere ao tempo do fim.
20 जो मेंढ्याचा स्वामी आणि तू पाहिलेल्या मेंढ्याची दोन शिंगे म्हणजे मेदिया व पर्शियाचे राजे आहेत.
20 O carneiro de dois chifres que você viu representa os reis da Média e da Pérsia.
21 तो केसाळ बोकड म्हणजे ग्रीस राष्ट्र होय आणि त्याच्या डोळ्यांच्या मधोमध मोठे शिंग म्हणजे त्या देशाचा पहिला राजा होय.
21 O bode peludo é o rei da Grécia, e o grande chifre entre os seus olhos é o primeiro rei.
22 तुटलेल्या शिंगाच्या जागी बाहेर आलेली चार शिंगे एकाच देशातून उदयास येणार्या चार राज्यांचे प्रतिनिधित्व करतात, परंतु त्यांची शक्ती पूर्वीच्या राज्यासारखी नसेल.
22 Os quatro chifres que tomaram o lugar do chifre que foi quebrado são quatro reinos que surgirão da nação daquele rei, mas não terão o mesmo poder.
23 “त्याच्या कारकिर्दी नंतरच्या काळात, जेव्हा बंडखोर पूर्ण दुष्टाईत येतील, तेव्हा एक भयानक रूपाचा राजा उदयास येईल, जो कूटप्रश्न समजणारा तज्ञ असेल.
23 "No final do reinado deles, quando a rebelião dos ímpios tiver chegado ao máximo, surgirá um rei de duro semblante, mestre em astúcias.
24 त्याचे सामर्थ्य मोठे असेल, पण ते त्याचे स्वतःचे नसेल. तो भयंकर नाश करणार आणि जे काही तो करेल, त्यामध्ये त्याला यश मिळेल. जे बलवान आणि पवित्र आहेत अशा लोकांचा तो नाश करेल.
24 Ele se tornará muito forte, mas não pelo seu próprio poder. Provocará devastações terríveis e será bem sucedido em tudo o que fizer. Destruirá os homens poderosos e o povo santo.
25 तो कपटाचा उपयोग समृद्ध होण्यास करेल आणि तो स्वतःला श्रेष्ठ समजेल. जेव्हा त्यांना सुरक्षित वाटेल तेव्हा तो अनेकांचा नाश करेल आणि राजपुत्रांच्या राजपुत्राच्या विरोधात उभा राहील. तरीही तो नष्ट होईल, परंतु मनुष्याच्या सामर्थ्याने नाही.
25 Com o intuito de prosperar, ele enganará a muitos, e se considerará superior aos outros. Destruirá muitos que nele confiam e se insurgirá contra o Príncipe dos príncipes. Apesar disso, ele será destruído, mas não pelo poder dos homens.
26 “संध्याकाळ आणि सकाळचा दृष्टान्त जो तुला देण्यात आला आहे तो खरा आहे, पण हा दृष्टान्त तू गुप्त ठेव. कारण तो येणार्या भविष्यकाळाशी संबंधित आहे.”
26 "A visão das tardes e das manhãs que você recebeu é verdadeira; sela porém a visão, pois refere-se ao futuro distante".
27 मग मी दानीएल, बेशुद्ध झालो आणि पुढेही कित्येक दिवस आजारी होतो. पुढे मी उभा झालो आणि राजाचा कारभार पाहू लागलो. परंतु या दृष्टान्तामुळे मी विस्मित झालो, माझे अंतःकरण फार अस्वस्थ झाले; ते समजण्यापलीकडे होते.
27 Eu, Daniel, fiquei exausto e doente por vários dias. Depois levantei-me e voltei a cuidar dos negócios do rei. Fiquei assustado com a visão; estava além da compreensão.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Daniel 8, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.