Daniel 2

marc (MARC) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 आपल्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरला स्वप्न पडले; त्याचे मन व्याकूळ झाले आणि त्याला झोप येत नव्हती.
1 No segundo ano de seu reinado, Nabucodonosor teve sonhos; sua mente ficou tão perturbada que ele não conseguia dormir.
2 म्हणून राजाने आदेश दिला की जादूगार, मांत्रिक, तांत्रिक आणि ज्योतिषी यांना बोलवावे आणि त्याला जे स्वप्न पडले ते सांगावे, जेव्हा ते आत आले आणि राजासमोर उभे राहिले,
2 Por isso o rei convocou os magos, os encantadores, os feiticeiros e os astrólogos para que lhe dissessem o que ele havia sonhado. Quando eles vieram e se apresentaram ao rei,
3 तो राजा त्यांना म्हणाला, “मला एक स्वप्न पडले आहे, ज्यामुळे मी व्याकूळ झालो आणि त्याचा अर्थ मला जाणून घ्यायचा आहे.”
3 ele lhes disse: "Tive um sonho que me perturba e quero saber o que significa".
4 त्या ज्योतिषांनी राजाला उत्तर दिले, “महाराज, चिरायू असा! आपले स्वप्न काय होते ते आपल्या सेवकांना सांगावे, म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.”
4 Então os astrólogos responderam em aramaico ao rei: "Ó rei, vive para sempre! Conta o sonho aos teus servos, e nós o interpretaremos".
5 त्यावर राजाने ज्योतिषांना उत्तर दिले, “मी हा दृढ निश्चय केले आहे: जर मला ते स्वप्न कोणते आणि त्याचा अर्थ काय हे तुम्ही सांगितले नाहीतर मी तुमचे तुकडे करेन आणि तुमच्या घरादारांचे उकिरडे केले जातील.
5 O rei respondeu aos astrólogos: "Esta é a minha decisão: Se vocês não me disserem qual foi o meu sonho e não o interpretarem, farei que vocês sejam cortados em pedaços e que as suas casas se tornem montes de entulho.
6 पण माझे स्वप्न काय होते, त्याचा अर्थ काय आहे, हे तुम्ही मला सांगितले, तर तुम्ही माझ्याकडून भेट व इनामे आणि मोठा सन्मान प्राप्त कराल. म्हणून मला माझे स्वप्न सांगा आणि त्या स्वप्नांचा अर्थ सांगा.”
6 Mas, se me revelarem o sonho e o interpretarem, eu lhes darei presentes e recompensas e grandes honrarias. Por isso, revelem-me o sonho e a sua interpretação".
7 त्यांनी पुन्हा उत्तर दिले, “महाराजांनी, स्वप्न आपल्या सेवकांना सांगावे आणि आम्ही त्याचा अर्थ सांगू.”
7 Mas eles tornaram a dizer: "Conte o rei o sonho a seus servos, e nós o interpretaremos".
8 तेव्हा राजाने उत्तर दिले, मला आता खात्री झाली आहे की तुम्ही वेळ काढण्याचा प्रयत्न करीत आहात, कारण मी हा दृढ निश्चय केला आहे, हे तुम्हाला कळले आहे:
8 Então o rei respondeu: "Já descobri que vocês estão tentando ganhar tempo, pois sabem da minha decisão.
9 जर तुम्ही मला माझे स्वप्न सांगणार नाही, तर तुम्हासाठी फक्त एकच शिक्षा आहे. परिस्थिती बदलेल या आशेने तुम्ही मला भ्रामक आणि दुष्ट गोष्टी सांगण्याचा कट रचला आहे. म्हणून तुम्ही मला स्वप्न सांगा आणि मला कळेल की तुम्ही मला त्याचा परिणाम सांगू शकता.
9 Se não me contarem o sonho, todos vocês receberão a mesma sentença; pois vocês combinaram enganar-me com mentiras, esperando que a situação mudasse. Contem-me o sonho, e saberei que vocês são capazes de interpretá-lo para mim".
10 ज्योतिषी लोकांनी राजाला उत्तर दिले, “पृथ्वीवर असा कोणताही व्यक्ती नाही, जे राजाने सांगितले आहे ते करू शकेल! कोणत्याही राजाने मग तो कितीही महान आणि पराक्रमी असला तरी जादूगार किंवा तांत्रिक किंवा ज्योतिषी यांना असे विचारले नाही.
10 Os astrólogos responderam ao rei: "Não há homem na terra que possa fazer o que o rei está pedindo! Nenhum rei, por maior e mais poderoso que tenha sido, chegou a pedir uma coisa dessas a nenhum mago, encantador ou astrólogo.
11 महाराजाने जे विचारत आहेत ते अशक्य आहे. ज्या दैवतांचे राहणे मनुष्यात नाही, त्यांच्या खेरीज हे महाराजांना कोणीही प्रकट करू शकणार नाही.”
11 O que o rei está pedindo é difícil demais; ninguém pode revelar isso ao rei, senão os deuses, e eles não vivem entre os mortais".
12 हे ऐकून राजाला क्रोध आला आणि तो संतप्त झाला आणि त्याने फर्मान काढले की बाबेलमधील सर्व ज्ञानी लोकांचा शिरच्छेद करा.
12 Isso deixou o rei tão irritado e furioso que ele ordenou a execução de todos os sábios da Babilônia.
13 ज्ञानी लोकांना मारण्याचे फर्मान काढण्यात आले आणि दानीएल व त्याच्या मित्रांचा वध करण्यासाठी लोकांना पाठविण्यात आले.
13 E assim foi emitido o decreto para que fossem mortos os sábios; os encarregados saíram à procura de Daniel e dos seus amigos, para que também fossem mortos.
14 जेव्हा अर्योक हा राजाच्या संरक्षकांचा प्रमुख बाबेलमधील ज्ञानी पुरुषांचा वध करण्यासाठी गेला तेव्हा दानीएल शहाणपणाने व सुज्ञपणे त्याच्याशी बोलला.
14 Arioque, o comandante da guarda do rei, já se preparava para matar os sábios da Babilônia, quando Daniel dirigiu-se a ele com sabedoria e bom senso.
15 त्याने राजाच्या अधिकार्‍याला विचारले, “राजाने असा कठोर निर्णय का घेतला?” अर्योकने मग दानीएलला सर्व हकिकत सांगितली.
15 Ele perguntou ao oficial do rei: "Por que o rei emitiu um decreto tão severo? " Arioque explicou o motivo a Daniel.
16 ते ऐकून दानीएलने राजाची भेट घेतली व त्याला म्हणाला मला थोडा वेळ देण्याची मागणी केली, म्हणजे तो स्वप्न व त्याचा अर्थ सांगू शकेल.
16 Diante disso, Daniel foi pedir ao rei que lhe desse um prazo, e ele daria a interpretação.
17 मग दानीएल आपल्या घरी परत आला व सर्व घटना त्याने आपल्या सोबत्यांना हनन्याह, मिशाएल व अजर्‍याह यांना सांगितली.
17 Daniel voltou para casa, contou o problema aos seus amigos Hananias, Misael e Azarias,
18 दानीएलाने त्यांना या रहस्याबद्दल स्वर्गाच्या परमेश्वराची दया मागण्याची विनंती केली, जेणेकरून बाबेलमधील इतर ज्ञानी माणसांसह त्याचा आणि त्याच्या मित्रांचा नाश होऊ नये.
18 e lhes pediu que rogassem ao Deus dos céus que tivesse misericórdia acerca desse mistério, para que ele e seus amigos não fossem executados com os outros sábios da Babilônia.
19 त्या रात्री याहवेहने दानीएलला दृष्टान्तात ते रहस्य प्रकट केले. तेव्हा दानीएलने स्वर्गाच्या परमेश्वराला धन्यवाद दिला.
19 Então o mistério foi revelado a Daniel de noite, numa visão. Daniel louvou o Deus dos céus
20 आणि दानीएल म्हणाला:
20 e disse: "Louvado seja o nome de Deus para todo o sempre; a sabedoria e o poder a ele pertencem.
21 ते समय व ॠतू बदलतात;
21 Ele muda as épocas e as estações; destrona reis e os estabelece. Dá sabedoria aos sábios e conhecimento aos que sabem discernir.
22 गहन आणि गूढ रहस्य तेच प्रकट करतात;
22 Revela coisas profundas e ocultas; conhece o que jaz nas trevas, e a luz habita com ele.
23 हे आमच्या पूर्वजांच्या परमेश्वरा,
23 Eu te agradeço e te louvo, ó Deus dos meus antepassados; tu me deste sabedoria e poder, e me revelaste o que te pedimos, revelaste-nos o sonho do rei".
24 बाबेलमधील ज्ञानी लोकांचा वध करण्याचे काम अर्योकवर सोपविले होते. दानीएल त्याला जाऊन भेटला व म्हणाला, “बाबेलमधील ज्ञानी लोकांचा वध करू नका. मला राजाकडे घेऊन चला आणि मी राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगेन.”
24 Então Daniel foi falar com Arioque, a quem o rei tinha nomeado para executar os sábios da Babilônia, e lhe disse: "Não execute os sábios. Leve-me ao rei, e eu interpretarei para ele o sonho que teve".
25 अर्योकने लगबगीने दानीएलला राजाकडे घेऊन गेला आणि म्हणाला, “यहूदी कैद्यांपैकी मला एक पुरुष सापडला आहे जो राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकेल.”
25 Imediatamente Arioque levou Daniel ao rei e disse: "Encontrei um homem entre os exilados de Judá que pode dizer ao rei o significado do sonho".
26 राजाने दानीएलला (ज्याला बेलटशास्सर असेही म्हटले जाते) विचारले, “मी जे स्वप्न पाहिले ते आणि त्याचा अर्थ तू सांगण्यास सक्षम आहेस काय?”
26 O rei perguntou a Daniel, também chamado Beltessazar: "Você é capaz de contar-me o que vi no meu sonho e interpretá-lo? "
27 दानीएलने उत्तर दिले, “महाराजांनी ज्या रहस्याबद्दल विचारले, त्याबद्दल कोणीही ज्ञानी मनुष्य, ज्योतिषी, जादूगार किंवा दैवप्रश्न करणारे राजाला या गोष्टी सांगू शकणार नाही,
27 Daniel respondeu: "Nenhum sábio, encantador, mago ou adivinho é capaz de revelar ao rei o mistério sobre o qual ele perguntou,
28 परंतु स्वर्गामधील परमेश्वर गूढ रहस्ये प्रकट करतात. येणार्‍या दिवसात काय घडणार ते त्यांनीच नबुखद्नेस्सर राजाला दाखविले आहे. तुम्ही आपल्या बिछान्यावर पडले असता तुमचे स्वप्न आणि दृष्टान्त जे तुमच्या मनातून पार झाले ते हे आहेत:
28 mas existe um Deus nos céus que revela os mistérios. Ele mostrou ao rei Nabucodonosor o que acontecerá nos últimos dias. O sonho e as visões que passaram por tua mente quando estavas deitado foram os seguintes:
29 “महाराज जेव्हा तुम्ही आपल्या बिछान्यावर पडले असता, तुमचे मन होणार्‍या भावी घटनेकडे लागले आणि रहस्ये प्रकट करणार्‍यांनी तुम्हाला भविष्यात काय होणार आहे हे दाखविले आहे.
29 "Quando estavas deitado, ó rei, tua mente se voltou para as coisas futuras, e aquele que revela os mistérios te mostrou o que vai acontecer.
30 माझ्यासाठी, हे रहस्य मला उघड केले गेले कारण माझ्याकडे इतर जिवंत माणसापेक्षा जास्त बुद्धी आहे म्हणून नाही, परंतु महाराजांना रहस्याचा अर्थ कळावा आणि तुमच्या मनात काय चालले आहे ते समजावे.
30 Quanto a mim, esse mistério não me foi revelado porque eu tenha mais sabedoria do que os outros homens, mas para que tu ó rei, saibas a interpretação e entendas o que passou pela tua mente.
31 “महाराज, तुम्ही पाहिले की तुमच्यापुढे एक प्रचंड पुतळा उभा आहे—एक प्रचंड, चकाकदार पुतळा, दिसण्यात अद्भुत.
31 "Tu olhaste, ó rei, e diante de ti estava uma grande estátua: uma estátua enorme, impressionante, e sua aparência era terrível.
32 त्या पुतळ्याचे डोके शुद्ध सोन्याचे होते, त्याची छाती व दंड चांदीचे होते, त्याचे पोट व मांड्या कास्याच्या होत्या,
32 A cabeça da estátua era feita de ouro puro, o peito e o braço eram de prata, o ventre e os quadris eram de bronze,
33 त्याचे पाय लोखंडाचे होते आणि पावले लोखंडाची व त्यात काही अंश मातीचा होता.
33 as pernas eram de ferro, e os pés eram em parte de ferro e em parte de barro.
34 तुम्ही पहात असताना, एका खडकाने कोणताही मानवी स्पर्श न होता स्वतःला छेदले आणि त्या मूर्तीच्या लोखंडी आणि मातीच्या पायावर अशा प्रकारे आदळले की त्याचा चुराडा झाला.
34 Enquanto estavas observando, uma pedra soltou-se, sem auxílio de mãos, atingiu a estátua nos pés de ferro e de barro e os esmigalhou.
35 मग लोखंड, माती, कास्य, चांदी आणि सोने यांचे तुकडे तुकडे झाले आणि ते उन्हाळ्यात खळ्यातील भुशाप्रमाणे झाले. वाऱ्याने त्यांना अशा प्रकारे उडवून दिले की त्यांचा एक छोटासा तुकडाही शिल्लक राहिला नाही. पण ज्या दगडाने पुतळा उलथून टाकला, त्या दगडाचा एक प्रचंड डोंगर झाला व त्याने सर्व पृथ्वी झाकून टाकली.
35 Então o ferro, o barro, o bronze, a prata e o ouro foram despedaçados, viraram pó, como o pó da debulha do trigo na eira durante o verão. O vento os levou sem deixar vestígio. Mas a pedra que atingiu a estátua tornou-se uma montanha e encheu a terra toda.
36 “हे आपले स्वप्न आणि आता त्याचा अर्थ महाराजासाठी सांगतो.
36 "Foi esse o sonho, e nós o interpretaremos para o rei.
37 महाराज, आपण राजाधिराज आहात. स्वर्गाच्या परमेश्वरानेच आपणाला हे राज्य, सत्ता, सामर्थ्य आणि वैभव दिले आहे;
37 Tu, ó rei, és rei de reis. O Deus dos céus te tem dado domínio, poder, força e glória;
38 आपल्या हाताखाली त्यांनी सर्व मनुष्यप्राणी, भूमीवरील प्राणी आणि आकाशातील पक्षी निर्माण केले आहेत. ते जिथे कुठेही राहतात, त्यांनी तुम्हाला त्यांचा अधिपती म्हणून नियुक्त केले आहे. ते सोन्याचे मस्तक म्हणजे आपण स्वतःच आहात.
38 nas tuas mãos ele colocou a humanidade, os animais selvagens e as aves do céu. Onde quer que vivam, ele fez de ti o governante deles todos. Tu és a cabeça de ouro.
39 “तुमच्यानंतर आणखी एक राज्य उदयास येईल जे तुमच्या राज्यापेक्षा कमी दर्जाचे असेल. त्यानंतर, तिसरे राज्य उदयास येईल, एक कास्याची प्रतिमा, जी संपूर्ण पृथ्वीवर राज्य करेल.
39 "Depois de ti surgirá um outro reino, inferior ao teu. Em seguida surgirá um terceiro reino, reino de bronze, que governará sobre toda a terra.
40 शेवटी, एक चौथे राज्य असेल जे लोखंडासारखे मजबूत असेल—कारण लोखंड सर्व गोष्टींचे तुकडे करतो आणि चुराडा करतो—आणि लोखंड ज्याप्रमाणे गोष्टींचे तुकडे करेल, त्याचप्रमाणे हे राज्य त्याचे तुकडे करून चुराडा करेल.
40 Finalmente, haverá um quarto reino, forte como o ferro, pois o ferro quebra e destrói tudo; e assim como o ferro a tudo despedaça, também ele destruirá e quebrará todos os outros.
41 जसे तुम्ही पाहिले की पाय आणि बोटे काही प्रमाणात भाजलेल्या मातीची होती आणि काही प्रमाणात लोखंडाची होती, म्हणून ते एक विभाजित राज्य असेल; तरीही त्यात काही लोखंडी ताकद असेल, जसे तुम्ही लोखंड मातीत मिसळलेले पाहिले.
41 Como viste, os pés e os dedos eram em parte de barro e em parte de ferro. Isso quer dizer que esse será um reino dividido, mas ainda assim terá um pouco da força do ferro, embora tenhas visto ferro misturado com barro.
42 काही लोखंड व काही माती यांनी बनलेली पावले आणि बोटे आपल्याला दिसली म्हणजेच हे साम्राज्य काही मजबूत व काही दुबळी असतील.
42 Assim como os dedos eram em parte de ferro e em parte de barro, também esse reino será em parte forte e em parte frágil.
43 आणि जसे तुम्ही लोखंडाला भाजलेल्या मातीत मिसळलेले पाहिले, तसे लोक मिसळले जातील, पण एकरूप होणार नाहीत, कारण लोखंड मातीत मिसळत नाही.
43 E, como viste, o ferro estava misturado com o barro. Isso quer dizer que se procurará fazer alianças políticas por meio de casamentos, mas essa união não se firmará, assim como o ferro não se mistura com o barro.
44 “त्या राजांच्या काळात, स्वर्गातील परमेश्वर एक राज्य स्थापन करतील, ज्याचा नाश होणार नाही किंवा इतर कोणीही त्याच्यावर राज्य करू शकणार नाही. हे त्या सर्व राज्यांना चिरडून टाकेल आणि त्यांचा नाश करेल, परंतु ते स्वतःच कायम टिकून राहील.
44 "Na época desses reis, o Deus dos céus estabelecerá um reino que jamais será destruído e que nunca será dominado por nenhum outro povo. Destruirá todos esses reinos e os exterminará, mas esse reino durará para sempre.
45 हा त्या खडकाच्या दृष्टान्ताचा अर्थ आहे, जो मनुष्याच्या हातून नव्हता, परंतु स्वतः एका पर्वतापासून तो खडका वेगळा झाला होता—ज्याने लोखंड, कास्य, माती, चांदी आणि सोने यांचा सर्वांचा चुराडा केला होता.
45 Esse é o significado da visão da pedra que se soltou de uma montanha, sem auxílio de mãos, pedra que esmigalhou o ferro, o bronze, o barro, a prata e o ouro. "O Deus poderoso mostrou ao rei o que acontecerá no futuro. O sonho é verdadeiro, e a interpretação é fiel".
46 मग नबुखद्नेस्सर राजाने दानीएलसमोर साष्टांग दंडवत घालत तो पालथा पडला आणि आज्ञा केली की त्याला अर्पणे व सुगंधी द्रव्ये सादर करावी.
46 Então o rei Nabucodonosor caiu prostrado diante de Daniel, prestou-lhe honra e ordenou que lhe fosse apresentada uma oferta de cereal e incenso.
47 राजा दानीएलला म्हणाला, “निश्चितच तुझा परमेश्वर देवांचा देव आणि राजांचा प्रभू आणि रहस्ये उघड करणारा आहे, कारण तू या रहस्याचा अर्थ समजावून सांगण्यास योग्य ठरला आहे.”
47 O rei disse a Daniel: "Não há dúvida de que o seu Deus é o Deus dos deuses, o Senhor dos reis e aquele que revela os mistérios, pois você conseguiu revelar esse mistério".
48 मग राजाने दानीएलला उच्चपदास चढविले, त्याला अनेक मौल्यवान देणग्या दिल्या. त्याने संपूर्ण बाबेलप्रांतावर त्याला प्रमुख अधिपती नेमले आणि सर्व ज्ञानी लोकांवर प्रमुख अधिकारी म्हणून त्याची नेमणूक केली.
48 Então o rei colocou Daniel num alto cargo e o cobriu de presentes. Ele o designou governante de toda a província da Babilônia e o encarregou de todos os sábios da província.
49 मग दानीएलच्या विनंतीवरून राजाने शद्रख, मेशख व अबेदनगो यांना बाबेल प्रांताचा प्रशासक सहायक म्हणून नेमले, परंतु की दानीएल राजाच्या दरबारातच राहिला.
49 Além disso, a pedido de Daniel, o rei nomeou Sadraque, Mesaque e Abede-Nego administradores da província da Babilônia, enquanto o próprio Daniel permanecia na corte do rei.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Daniel 2, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.