Colossenses 2
marc (MARC) vs ARA
1 तुमच्यासाठी आणि लावदिकीया रहिवाशांसाठी, आणि ज्या सर्वांशी माझी वैयक्तिक भेट झाली नाही अशांसाठी, मी किती झटून श्रम करीत आहे हे तुम्हाला समजावे.
1 Gostaria, pois, que soubésseis quão grande luta venho mantendo por vós, pelos laodicenses e por quantos não me viram face a face;
2 माझा उद्देश हाच आहे की त्यांच्या अंतःकरणास उत्तेजन मिळून ते प्रेमाने बांधले जावे, आणि त्यांना विपुलतेने पूर्ण ज्ञान प्राप्त व्हावे, यासाठी की परमेश्वराची गुप्त योजना ख्रिस्त हे त्यांना समजावे,
2 para que o coração deles seja confortado e vinculado juntamente em amor, e eles tenham toda a riqueza da forte convicção do entendimento, para compreenderem plenamente o mistério de Deus, Cristo,
3 आणि त्यांच्यामधेच सर्व बुद्धीची व ज्ञानाची भांडारे गुप्त ठेवलेली आहेत.
3 em quem todos os tesouros da sabedoria e do conhecimento estão ocultos.
4 हे मी तुम्हाला यासाठी सांगत आहे की प्रलोभन देणार्या भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये.
4 Assim digo para que ninguém vos engane com raciocínios falazes.
5 कारण जरी मी शरीराने दूर असलो, तरी आत्म्याने तुम्हाजवळ हजर आहे. तुम्ही शिस्तबद्ध आहात व ख्रिस्तावर तुमचा दृढविश्वास आहे, यात मी आनंद मानतो.
5 Pois, embora ausente quanto ao corpo, contudo, em espírito, estou convosco, alegrando-me e verificando a vossa boa ordem e a firmeza da vossa fé em Cristo.
6 तर जसे, तुम्ही ख्रिस्त येशूंना प्रभू म्हणून स्वीकारले तसेच त्यांच्यामध्ये आपले जीवन जगत राहा.
6 Ora, como recebestes Cristo Jesus, o Senhor, assim andai nele,
7 त्यांच्यामध्ये मुळावलेले, बांधलेले, तुम्हाला शिकविलेल्या विश्वासात मजबूत असलेले आणि उपकारस्तुतीने भरून वाहणारे असा.
7 nele radicados, e edificados, e confirmados na fé, tal como fostes instruídos, crescendo em ações de graças.
8 हे लक्षात असू द्या की पोकळ व फसवे तत्वज्ञान जे ख्रिस्तावर नव्हे तर मानवी परंपरा आणि ऐहिक तत्वांवर आधारित आहे, याद्वारे कोणी तुम्हाला बंधनात पाडू नये म्हणून जपा.
8 Cuidado que ninguém vos venha a enredar com sua filosofia e vãs sutilezas, conforme a tradição dos homens, conforme os rudimentos do mundo e não segundo Cristo;
9 कारण ख्रिस्ताच्या ठायी दैवत्वाची सर्व परिपूर्णता शरीररूपाने राहते;
9 porquanto, nele, habita, corporalmente, toda a plenitude da Divindade.
10 आणि ख्रिस्तामध्ये तुम्ही परिपूर्ण केलेले आहात. ते सर्व सामर्थ्य आणि अधिकार यांचे मस्तक आहेत.
10 Também, nele, estais aperfeiçoados. Ele é o cabeça de todo principado e potestade.
11 त्यांच्यामध्ये तुमची सुंता झाली आहे, मानवी हाताने केलेली नव्हे तर, ख्रिस्ताद्वारे तुमची जी सुंता झाली आहे त्याद्वारे तुमचा दैहिक पापी मूळस्वभाव काढून टाकण्यात आला आहे.
11 Nele, também fostes circuncidados, não por intermédio de mãos, mas no despojamento do corpo da carne, que é a circuncisão de Cristo,
12 कारण तुम्ही बाप्तिस्म्यामध्ये त्यांच्यासह पुरला गेलात व ज्यांना त्यांनी मरणातून उठविले यांच्याबरोबर तुम्हीही परमेश्वराच्या कृतीवरील विश्वासाद्वारे उठविण्यात आले आहात.
12 tendo sido sepultados, juntamente com ele, no batismo, no qual igualmente fostes ressuscitados mediante a fé no poder de Deus que o ressuscitou dentre os mortos.
13 जेव्हा तुम्ही स्वतःच्या पातकांमध्ये व शारीरिक असुंतेमध्ये मृत होता, त्यावेळी परमेश्वराने ख्रिस्तामध्ये तुम्हाला जिवंत केले आणि आपल्या सर्व पातकांची क्षमा केली.
13 E a vós outros, que estáveis mortos pelas vossas transgressões e pela incircuncisão da vossa carne, vos deu vida juntamente com ele, perdoando todos os nossos delitos;
14 आपल्याविरुद्ध असलेले व आपल्याला आरोपी ठरविणारे विधिलेख, त्यांनी आम्हापासून दूर करून क्रूसावर खिळ्यांनी ठोकून कायमचे रद्द केले,
14 tendo cancelado o escrito de dívida, que era contra nós e que constava de ordenanças, o qual nos era prejudicial, removeu-o inteiramente, encravando-o na cruz;
15 आणि सत्तांना आणि अधिकारांना हाणून पाडले व त्यांचे उघड प्रदर्शन करून क्रूसाद्वारे त्यांच्यावर विजय संपादन केला.
15 e, despojando os principados e as potestades, publicamente os expôs ao desprezo, triunfando deles na cruz.
16 तेव्हा खाणेपिणे, किंवा धार्मिक सण, किंवा नवा चंद्रोत्सव किंवा शब्बाथ, याविषयी कोणालाही तुमचा न्याय करू देऊ नका.
16 Ninguém, pois, vos julgue por causa de comida e bebida, ou dia de festa, ou lua nova, ou sábados,
17 हे सर्व केवळ येणार्या गोष्टींची छाया असे आहेत, पण खरी वास्तविकता ख्रिस्तामध्ये सापडते.
17 porque tudo isso tem sido sombra das coisas que haviam de vir; porém o corpo é de Cristo.
18 जो कोणी व्यर्थ नम्रतेचा देखावा करण्यात संतोष पावतो आणि देवदूतांची उपासना करतो, त्यांनी तुम्हाला अपात्र ठरवू नये. असा मनुष्य पाहिलेल्या गोष्टींचे विस्तारपूर्वक वर्णन करतो आणि दैहिक विचारांनी, आत्मिक नसलेल्या हृदयाने उगीचच फुगून जातो.
18 Ninguém se faça árbitro contra vós outros, pretextando humildade e culto dos anjos, baseando-se em visões, enfatuado, sem motivo algum, na sua mente carnal,
19 त्या लोकांचा त्यांच्या मस्तकाशी संबंध तुटला आहे, ज्या मस्तकाला संपूर्ण शरीर बळकटपणे एकत्रित जोडले जाते, सांधे व बंधने त्यांच्यापासून पुरवठा पावते व त्याची परमेश्वरामध्ये वाढ होते.
19 e não retendo a cabeça, da qual todo o corpo, suprido e bem-vinculado por suas juntas e ligamentos, cresce o crescimento que procede de Deus.
20 तुम्ही ख्रिस्ताबरोबर जगाच्या प्राथमिक तत्वज्ञानास मरण पावलेले आहात, तरी देखील तुम्ही जणू काय जगाशी जोडलेले आहात व त्याच्या नियमांच्या अधीन आहात.
20 Se morrestes com Cristo para os rudimentos do mundo, por que, como se vivêsseis no mundo, vos sujeitais a ordenanças:
21 “हात लावू नको! चव घेऊ नको! स्पर्श करू नको!”
21 não manuseies isto, não proves aquilo, não toques aquiloutro,
22 हे नियम मानवी शिकवण व आज्ञा यावर आधारित आहेत, ते वारंवार उपयोगात आणल्यामुळे नष्ट होणे स्वाभाविक आहे.
22 segundo os preceitos e doutrinas dos homens? Pois que todas estas coisas, com o uso, se destroem.
23 खरोखर या नियमांना ज्ञानाचा देखावा आहे, स्वनियमाने नेमलेली उपासना, खोटी नम्रता आणि देहाला कठोर कष्ट देणे या गोष्टी आहेत. परंतु दैहिक वासना नियंत्रणात ठेवण्यासाठी या नियमांचा काडी इतकाही उपयोग होत नाही.
23 Tais coisas, com efeito, têm aparência de sabedoria, como culto de si mesmo, e de falsa humildade, e de rigor ascético; todavia, não têm valor algum contra a sensualidade.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Colossenses 2, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.