Atos 6
marc (MARC) vs NVI
1 त्या दिवसांमध्ये शिष्यांची संख्या वाढत असताना, त्यांच्यापैकी काही ग्रीक भाषिक यहूदी लोकांनी इब्री भाषिक यहूदी लोकांविरुद्ध तक्रार केली की दररोजच्या भोजनाचे वाटप होत असताना त्यांच्या विधवांकडे दुर्लक्ष होत आहे.
1 Naqueles dias, crescendo o número de discípulos, os judeus de fala grega entre eles queixaram-se dos judeus de fala hebraica, porque suas viúvas estavam sendo esquecidas na distribuição diária de alimento.
2 तेव्हा बारा प्रेषितांनी सर्व शिष्यांना एकत्रित बोलावून सांगितले, “आम्हास हे योग्य वाटत नाही की आम्ही परमेश्वराच्या वचनाच्या सेवेकडे दुर्लक्ष करून अन्न वाटपाची सेवा करावी.
2 Por isso os Doze reuniram todos os discípulos e disseram: "Não é certo negligenciarmos o ministério da palavra de Deus, a fim de servir às mesas.
3 तर बंधूंनो आणि भगिनींनो, तुमच्यामधून जे आत्म्याने परिपूर्ण आणि सुज्ञ आहेत अशा सात माणसांची निवड करा म्हणजे आम्ही त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवून देऊ.
3 Irmãos, escolham entre vocês sete homens de bom testemunho, cheios do Espírito e de sabedoria. Passaremos a eles essa tarefa
4 आणि मग प्रार्थनेकडे व वचनाची सेवा करण्याकडे आम्हाला आमचे लक्ष लावता येईल.”
4 e nos dedicaremos à oração e ao ministério da palavra".
5 गटातील सर्वांस हा प्रस्ताव योग्य वाटला. त्यांनी स्तेफनाची निवड केली, जो विश्वासाने आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता; फिलिप्प, प्रखर, नीकानुर, तीमोन, पर्मिना व नीकलाव हा अंत्युखियाचा असून यहूदी मतानुसार त्याचे परिवर्तन झालेले होते
5 Tal proposta agradou a todos. Então escolheram Estêvão, homem cheio de fé e do Espírito Santo, além de Filipe, Prócoro, Nicanor, Timom, Pármenas e Nicolau, um convertido ao judaísmo, proveniente de Antioquia.
6 या पुरुषांना प्रेषितांपुढे सादर करण्यात आले. त्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करून त्यांच्यावर आपले हात ठेवले.
6 Apresentaram esses homens aos apóstolos, os quais oraram e lhes impuseram as mãos.
7 मग परमेश्वराच्या वचनाचा प्रसार झाला. यरुशलेममध्ये शिष्यांची संख्या मोठ्या वेगाने वाढली आणि अनेक याजकांनी देखील मोठ्या संख्येने विश्वासाचे आज्ञापालन केले.
7 Assim, a palavra de Deus se espalhava. Crescia rapidamente o número de discípulos em Jerusalém; também um grande número de sacerdotes obedecia à fé.
8 आता स्तेफन परमेश्वराच्या कृपेने आणि सामर्थ्याने परिपूर्ण असा मनुष्य होता आणि त्याने लोकांमध्ये मोठी आश्चर्यकृत्ये व चिन्हे केली होती.
8 Estêvão, homem cheio da graça e do poder de Deus, realizava grandes maravilhas e sinais entre o povo.
9 परंतु लिबेर्तिन (असे ज्यास म्हणत होते त्या) सभागृहातील काही सभासद, कुरेनेकर, आलेक्सांद्रेयकर आणि किलिकिया व आशिया प्रदेशातील यहूदी लोक स्तेफनाबरोबर वादविवाद करू लागले.
9 Contudo, levantou-se oposição dos membros da chamada Sinagoga dos Libertos, dos judeus de Cirene e de Alexandria, bem como das províncias da Cilícia e da Ásia. Esses homens começaram a discutir com Estêvão,
10 परंतु स्तेफन जे आत्म्याच्या ज्ञानाद्वारे बोलला त्याला विरोध करण्यास ते समर्थ ठरले नाहीत.
10 mas não podiam resistir à sabedoria e ao Espírito com que ele falava.
11 मग त्यांनी गुप्तपणे काही माणसांना फूस लावली व बोलण्यास भाग पाडले, “स्तेफनाला मोशे आणि परमेश्वर यांची निंदा करताना आम्ही ऐकले आहे.”
11 Então subornaram alguns homens para dizerem: "Ouvimos Estêvão falar palavras blasfemas contra Moisés e contra Deus".
12 अशा रीतीने त्यांनी लोकांना व तसेच वडिलांना आणि नियमशास्त्र शिक्षकांना चिथविले. त्यांनी स्तेफनाला जबरदस्तीने धरले व न्यायसभेपुढे आणले.
12 Com isso agitaram o povo, os líderes religiosos e os mestres da lei. E, prendendo Estêvão, levaram-no ao Sinédrio.
13 त्यांनी खोट्या साक्षीदारांना प्रस्तुत केले व त्यांनी अशी साक्ष दिली, “तो सतत पवित्र ठिकाणाविरुद्ध व नियमांविरुद्ध बोलतो.
13 Ali apresentaram falsas testemunhas que diziam: "Este homem não pára de falar contra este lugar santo e contra a lei.
14 ते आणखी म्हणाले, आम्ही याला असे म्हणताना ऐकले आहे की नासरेथकर येशू हे ठिकाण उद्ध्वस्त करतील आणि मोशेने आपल्याला लावून दिलेले नियमशास्त्र बदलून टाकतील.”
14 Pois o ouvimos dizer que esse Jesus, o Nazareno, destruirá este lugar e mudará os costumes que Moisés nos legou".
15 आणि न्यायसभेत बसलेले सर्वजण त्याच्याकडे एकाग्रतेने पाहत असताना त्यांना स्तेफनाचा चेहरा देवदूताच्या चेहर्यासारखा दिसला.
15 Olhando para ele, todos os que estavam sentados no Sinédrio viram que o seu rosto parecia o rosto de um anjo.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Atos 6, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.