Atos 25
marc (MARC) vs ARIB
1 तीन दिवसानंतर प्रांतात आल्यानंतर, फेस्त कैसरीयाहून यरुशलेम येथे वर गेला,
1 Tendo, pois, entrado Festo na província, depois de três dias subiu de Cesaréia a Jerusalém.
2 तेव्हा प्रमुख याजकांनी आणि यहूदी पुढार्यांनी त्याच्यासमोर पौलाविरुद्ध दोषपत्रे सादर केली.
2 E os principais sacerdotes e os mais eminentes judeus fizeram-lhe queixa contra Paulo e, em detrimento deste,
3 त्यांनी फेस्ताला विनंती केली की, पौलाची बदली यरुशलेमकडे करावी आणि आम्हावर कृपादृष्टी दाखवावी, कारण पौलाला घेऊन जाताना वाटेत अचानक त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारण्याची योजना ते करीत होते.
3 lhe rogavam o favor de o mandar a Jerusalém, armando ciladas para o matarem no caminho.
4 परंतु फेस्ताने त्यांना उत्तर दिले, “पौल कैसरीया येथे कैदेत आहे व मी लवकरच स्वतः तिथे जाणार आहे.
4 Mas Festo respondeu que Paulo estava detido em Cesaréia, e que ele mesmo brevemente partiria para lá.
5 तुमच्या काही पुढार्यांनी माझ्याबरोबर यावे आणि या मनुष्याने काही गुन्हा केला असेल तर त्यांनी त्याच्याविरुद्ध तसे आरोप तिथे सादर करावेत.”
5 Portanto, disse ele às autoridades dentre vós desçam comigo e, se há nesse homem algum crime, acusem-no.
6 त्यानंतर आठ किंवा दहा दिवस त्यांच्याबरोबर घालविल्यानंतर, फेस्त कैसरीयास खाली गेला. दुसर्याच दिवशी न्यायालय भरवून पौलाला आपल्यासमोर आणावे असा त्याने हुकूम दिला.
6 Tendo-se demorado entre eles não mais de oito ou dez dias, desceu a Cesaréia; e no dia seguinte, sentando-se no tribunal, mandou trazer Paulo.
7 पौल आत आल्यावर, यरुशलेमहून आलेले यहूदी लोक त्याच्याभोवती उभे राहिले. त्यांनी त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर असे आरोप लावले, परंतु ते आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत.
7 Tendo ele comparecido, rodearam-no os judeus que haviam descido de Jerusalém, trazendo contra ele muitas e graves acusações, que não podiam provar.
8 पौलाने त्याच्या बचावासाठी उत्तर दिले, “मी यहूदी लोकांच्या नियमशास्त्राविरुद्ध, मंदिराविरुद्ध किंवा कैसराविरुद्ध चुकीचे असे काहीही केलेले नाही.”
8 Paulo, porém, respondeu em sua defesa: Nem contra a lei dos judeus, nem contra o templo, nem contra César, tenho pecado em coisa alguma.
9 तेव्हा यहूदी लोकांना प्रसन्न करण्यास आतुर असलेल्या फेस्ताने पौलाला विचारले, “यरुशलेमला जाऊन तिथे माझ्यापुढे तुझी चौकशी व्हावी, यासाठी तू तयार आहेस काय?”
9 Todavia Festo, querendo agradar aos judeus, respondendo a Paulo, disse: Queres subir a Jerusalém e ali ser julgado perante mim acerca destas coisas?
10 परंतु पौलाने त्याला उत्तर दिले: “मी कैसराच्या न्यायालयापुढे उभा आहे म्हणून इथेच माझा न्याय होईल. तुम्हाला चांगले ठाऊक आहे की, मी यहूदीयांच्या विरुद्ध काहीही उपद्रव केले नाही.
10 Mas Paulo disse: Estou perante o tribunal de César, onde devo ser julgado; nenhum mal fiz aos judeus, como muito bem sabes.
11 जर मी मृत्यूस पात्र असे काही केले असेल, तर मी मरण्यास नकार देत नाही परंतु यहूदी माझ्यावर जे आरोप करतात, ते जर खरे नाहीत, तर कोणालाही मला यांच्या स्वाधीन करण्याचा अधिकार नाही. मी कैसराजवळ न्याय मागतो!”
11 Se, pois, sou malfeitor e tenho cometido alguma coisa digna de morte, não recuso morrer; mas se nada há daquilo de que estes me acusam, ninguém me pode entregar a eles; apelo para César.
12 त्यावर फेस्ताने आपल्या सल्लागारांची मसलत घेऊन जाहीर केले, “ठीक आहे. तू कैसराजवळ न्यायाची याचना केली आहेस, तर तू कैसरापुढेच जाशील!”
12 Então Festo, tendo falado com o conselho, respondeu: Apelaste para César; para César irás.
13 पुढे थोड्याच दिवसांनी राजा अग्रिप्पा आणि बर्णीका कैसरीयास फेस्तास आदर देण्यासाठी आले.
13 Passados alguns dias, o rei Agripa e Berenice vieram a Cesaréia em visita de saudação a Festo.
14 ते तिथे अनेक दिवस वास्तव्य करीत असल्यामुळे, फेस्ताला राजाबरोबर पौलाच्या प्रकरणाची चर्चा करण्यास वेळ मिळाला. तो म्हणाला: “फेलिक्साने ज्याला कैदेत तसेच ठेवले होते असा एक मनुष्य येथे आहे.
14 E, como se demorassem ali muitos dias, Festo expôs ao rei o caso de Paulo, dizendo: Há aqui certo homem que foi deixado preso por Félix,
15 मी यरुशलेम येथे गेलो होतो, तेव्हा तेथील प्रमुख याजकांनी व इतर यहूदी पुढार्यांनी त्याच्यावर दोषारोप करून त्याला शिक्षा द्यावी अशी मला विनंती केली.
15 a respeito do qual, quando estive em Jerusalém, os principais sacerdotes e os anciãos dos judeus me fizeram queixas, pedindo sentença contra ele;
16 “मी त्यांना सांगितले की, रोमी प्रथेनुसार आरोपी व वादी समोरासमोर येणे व आरोपीला स्वतः आरोपाचे खंडन करण्याची संधी मिळाल्याशिवाय कोणालाही दंड देणे योग्य नाही.
16 aos quais respondi que não é costume dos romanos condenar homem algum sem que o acusado tenha presentes os seus acusadores e possa defender-se da acusação.
17 ते ज्यावेळी येथे चौकशीसाठी आले, त्यावेळी मी दुसर्याच दिवशी न्यायासनावर बसून तो वाद सुनावणीसाठी उशीर न करता घेतला व त्याला न्यायालयात आणण्याचा हुकूम केला.
17 Quando então eles se haviam reunido aqui, sem me demorar, no dia seguinte sentei-me no tribunal e mandei trazer o homem;
18 परंतु त्याच्याविरुद्ध केलेले आरोप माझ्या कल्पनेप्रमाणे मुळीच नव्हते.
18 contra o qual os acusadores, levantando-se, não apresentaram acusação alguma das coisas perversas que eu suspeitava;
19 ते आरोप त्यांच्या धर्मासंबंधी आणि मरण पावलेल्या कोणा येशूंसंबंधी होते. पौल खात्रीने सांगतो की तो जिवंत आहे.
19 tinham, porém, contra ele algumas questões acerca da sua religião e de um tal Jesus defunto, que Paulo afirmava estar vivo.
20 अशा प्रकारच्या प्रकरणात कसा काय निर्णय द्यावा याविषयी मी गोंधळात पडलो. तेव्हा मी पौलाला या आरोपांची चौकशी यरुशलेममध्ये व्हावी यास त्याची मान्यता आहे का, असे विचारले.
20 E, estando eu perplexo quanto ao modo de investigar estas coisas, perguntei se não queria ir a Jerusalém e ali ser julgado no tocante às mesmas.
21 परंतु पौलाने कैसराकडे न्याय मागितला, तेव्हा मी त्याला बादशहाकडे नेण्याची व्यवस्था होईपर्यंत तुरुंगात ठेवण्याचा हुकूम दिला.”
21 Mas apelando Paulo para que fosse reservado ao julgamento do imperador, mandei que fosse detido até que o enviasse a César.
22 त्यावर अग्रिप्पा फेस्तास म्हणाला, “मला स्वतः या माणसाचे म्हणणे ऐकायला आवडेल.”
22 Então Agripa disse a Festo: Eu bem quisera ouvir esse homem. Respondeu-lhe ele: Amanhã o ouvirás.
23 तेव्हा दुसर्या दिवशी, अग्रिप्पा व बर्णीका ही न्यायालयात मोठ्या रुबाबाने लष्करी अधिकार्यांच्या समवेत व शहरातील प्रमुख पुरुषांसह आले. फेस्ताच्या आदेशानुसार पौलाला न्यायालयात आणण्यात आले.
23 No dia seguinte vindo Agripa e Berenice, com muito aparato, entraram no auditório com os chefes militares e homens principais da cidade; então, por ordem de Festo, Paulo foi trazido.
24 मग फेस्त म्हणाले: “अग्रिप्पा महाराज आणि सर्व उपस्थिती लोकहो, या मनुष्याला पाहा! याच्याविरुद्ध सर्व यहूदी समाजाने यरुशलेम व कैसरीया, यांनी माझ्याकडे विनंती केली आहे आणि अशी ओरड करीत आहेत की त्याने अधिक काळ जिवंत राहू नये.
24 Disse Festo: Rei Agripa e vós todos que estais presentes conosco, vedes este homem por causa de quem toda a multidão dos judeus, tanto em Jerusalém como aqui, recorreu a mim, clamando que não convinha que ele vivesse mais.
25 माझ्या मते त्याने मृत्युदंडास योग्य असे काहीही केलेले नाही, परंतु त्याने बादशहाजवळ न्याय मागितला म्हणून त्याला रोम या ठिकाणी पाठविण्याचे मी ठरविले आहे.
25 Eu, porém, achei que ele não havia praticado coisa alguma digna de morte; mas havendo ele apelado para o imperador, resolvi remeter-lho.
26 परंतु मी महाराजांना निश्चित काय लिहून कळवावे हे मला समजत नाही आणि म्हणूनच मी त्याला तुम्हासर्वांपुढे व विशेषकरून अग्रिप्पा राजांपुढे चौकशी साठी आणले आहे, यासाठी की मला जे योग्य ते लिहिता येईल.
26 Do qual não tenho coisa certa que escreva a meu senhor, e por isso perante vós o trouxe, principalmente perante ti, ó rei Agripa, para que, depois de feito o interrogatório, tenha eu alguma coisa que escrever.
27 कारण एखाद्या कैद्यावर असलेल्या कोणत्याही आरोपाचे स्पष्ट वर्णन केल्याशिवाय त्याला रोमला पाठविणे योग्य होणार नाही.”
27 Porque não me parece razoável enviar um preso, e não notificar as acusações que há contra ele.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Atos 25, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.