Atos 18

marc (MARC) vs NAA

Sair da comparação
NAA Nova Almeida Atualizada 2017
1 यानंतर, पौलाने ॲथेन्स सोडले व तो करिंथ येथे गेला.
1 Depois disso, deixando Atenas, Paulo foi a Corinto.
2 तिथे त्याला पोनतस गावाचा अक्विला नावाचा एक यहूदी भेटला, तो त्याची पत्नी प्रिस्किल्लाला घेऊन इटली देशातून काही दिवसांपूर्वीच तिथे आलेला होता. कारण रोममधून सर्व यहूदी लोकांनी निघून जावे, अशी क्लौडियस सीझरने आज्ञा केली होती. पौल त्यांच्या भेटीला गेला,
2 Lá, encontrou um judeu chamado Áquila, natural do Ponto, recentemente chegado da Itália, com Priscila, sua mulher, porque o imperador Cláudio havia decretado que todos os judeus deviam sair de Roma. Paulo aproximou-se deles.
3 जसे ते तंबू तयार करणारे होते तसेच तो देखील होता, मग त्यांच्याबरोबर राहून त्याने काम केले.
3 E, como tinham o mesmo ofício, passou a morar com eles e ali trabalhava. O ofício deles era fazer tendas.
4 प्रत्येक शब्बाथ दिवशी सभागृहात यहूदी आणि ग्रीक यांची खात्री करून देण्यासाठी तो प्रयत्न करीत असे.
4 E todos os sábados Paulo falava na sinagoga, persuadindo tanto judeus como gregos.
5 जेव्हा मासेदोनियाहून सीला व तीमथ्य आले, तेव्हा येशू हेच ख्रिस्त आहेत असा प्रचार आणि साक्ष केवळ यहूदीयांनाच सांगण्यासाठी पौलाने स्वतःचे समर्पण केले होते.
5 Quando Silas e Timóteo chegaram da Macedônia, Paulo se entregou totalmente à palavra, testemunhando aos judeus que Jesus é o Cristo.
6 परंतु जेव्हा ते पौलाला विरोध करून शिवीगाळ करू लागले, तेव्हा पौलाने याच्या निषेधार्थ त्याचे वस्त्र झटकून टाकले आणि म्हणाला, “तुमच्या विनाशासाठी तुम्हीच जबाबदार आहात! मी निर्दोष आहे. येथून पुढे मी गैरयहूदीयांकडे जाईन.”
6 Como eles se opuseram e blasfemaram, Paulo sacudiu as roupas e disse-lhes: — Que o sangue de vocês caia sobre a cabeça de vocês! Eu estou limpo dele e, a partir de agora, vou para os gentios.
7 नंतर पौल सभागृह सोडून तीतुस यूस्त नावाच्या माणसाच्या घरी गेला. तो परमेश्वराचा उपासक होता आणि सभागृहा शेजारीच राहत असे.
7 Saindo dali, entrou na casa de um homem chamado Tício Justo, que era temente a Deus; a casa dele ficava ao lado da sinagoga.
8 त्या सभागृहाचा प्रमुख क्रिस्प आणि त्याच्या कुटुंबातील सर्व लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला आणि करिंथमधील अनेकांनी पौलाचे ऐकून विश्वास ठेवला आणि त्यांचा बाप्तिस्मा झाला.
8 Crispo, o chefe da sinagoga, creu no Senhor, com toda a sua casa; também muitos dos coríntios, ouvindo, creram e foram batizados.
9 एके रात्री प्रभू पौलाशी दृष्टान्तात बोलला: “भिऊ नकोस; बोलत राहा, गप्प राहू नकोस.
9 Certa noite Paulo teve uma visão em que o Senhor lhe disse:
10 मी तुझ्याबरोबर आहे आणि कोणीही तुझ्यावर हल्ला वा तुला इजा करणार नाही, कारण या शहरात माझे अनेक लोक आहेत.”
10 porque eu estou com você, e ninguém ousará lhe fazer mal, pois tenho muito povo nesta cidade.
11 तेव्हा पौल त्यांना करिंथ येथे दीड वर्ष परमेश्वराचे वचन शिकवीत राहिला.
11 Assim, Paulo permaneceu em Corinto um ano e seis meses, ensinando entre eles a palavra de Deus.
12 गल्लियो अखया प्रांताचा राज्यपाल झाला, तेव्हा पौलाला तिथून घालवून द्यावे म्हणून करिंथ येथील यहूद्यांनी एकजूट होऊन त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला न्यायालयात आणले.
12 Quando Gálio era procônsul da Acaia, os judeus, de comum acordo, se levantaram contra Paulo e o levaram ao tribunal,
13 त्यांनी पौलावर असा आरोप केला, “हा मनुष्य, आमच्या नियमशास्त्राविरुद्ध परमेश्वराची उपासना करण्यासाठी लोकांची मने वळवित आहे.”
13 dizendo: — Este homem quer persuadir as pessoas a adorar a Deus de um modo contrário à lei.
14 पौल आता बोलणार होता इतक्यातच, गल्लियो त्यांना म्हणाला, “जर तुम्ही यहूदी गंभीर गुन्हा किंवा दुराचाराची तक्रार करीत असाल, तर तुमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी काहीतरी कारण असते.
14 Quando Paulo ia falar, Gálio disse aos judeus: — Se fosse, de fato, alguma injustiça ou crime de maior gravidade, ó judeus, eu teria motivo para acolher a queixa que vocês estão trazendo.
15 परंतु ज्याअर्थी हा वाद निव्वळ शब्दांचा आणि नावांचा आणि तुमच्या नियमशास्त्राबद्दलचा आहे, त्याअर्थी तुम्हीच हे प्रकरण मिटवा. अशा प्रकारच्या वादांचा न्यायनिवाडा करण्याचे मी साफ नाकारतो.”
15 Mas como é uma questão de palavras, de nomes e da própria lei de vocês, resolvam isso vocês mesmos; eu não quero ser juiz dessas coisas!
16 असे म्हणून त्याने त्यांना न्यायालयासमोरून घालवून दिले.
16 E os expulsou do tribunal.
17 त्यानंतर जमावाने सोस्थनेस या सभागृहाच्या पुढार्‍यास पकडले आणि न्यायालयासमोरच त्याला मार दिला; परंतु गल्लियोने तिकडे अजिबात लक्ष दिले नाही.
17 Então todos agarraram Sóstenes, o chefe da sinagoga, e começaram a espancá-lo diante do tribunal; Gálio, todavia, não se incomodava com estas coisas.
18 पौल करिंथ येथे काही काळ राहिला. नंतर त्याने तेथील विश्वासणार्‍या बंधू व भगिनींचा निरोप घेतला आणि प्रिस्किल्ला व अक्विलाला बरोबर घेऊन तो सीरियाला जाण्यासाठी जलप्रवासास निघाला. परंतु या प्रवासाला निघण्याआधी, किंख्रिया या ठिकाणी पौलाने आपल्या डोक्याचे मुंडण करून घेतले, कारण त्याने नवस केलेला होता.
18 Paulo ficou ainda muitos dias em Corinto. Por fim, despedindo-se dos irmãos, navegou para a Síria, levando em sua companhia Priscila e Áquila. Antes de embarcar, rapou a cabeça em Cencreia, porque tinha feito um voto.
19 इफिसमध्ये पोहोचल्यावर, पौलाने प्रिस्किल्ला व अक्विलाला तिथेच सोडले. तो स्वतः तेथील सभागृहामध्ये गेला आणि त्याने तेथील यहूदी लोकांबरोबर युक्तिवाद गेला.
19 Quando chegaram a Éfeso, Paulo deixou ali Priscila e Áquila. Ele, porém, entrando na sinagoga, pregava aos judeus.
20 जेव्हा त्यांनी पौलाला विनंती केली की, त्याने त्यांच्याबरोबर अधिक वेळ घालवावा, परंतु पौलाने ते नाकारले.
20 Pediram-lhe que ficasse mais algum tempo, mas Paulo não quis.
21 परंतु निघताना मात्र त्याने त्यांना वचन दिले, “परमेश्वराची इच्छा असेल, तर मी पुन्हा येईन.” मग इफिस सोडून जलमार्गाने तो निघाला.
21 Ao se despedir, disse: — Se Deus quiser, virei visitá-los outra vez. E, embarcando, partiu de Éfeso.
22 जेव्हा तो कैसरीया येथे पोहोचला, तेव्हा तिथून तो वर यरुशलेमकडे आला आणि तेथील मंडळीला अभिवादन करून तो अंत्युखियास गेला.
22 Chegando a Cesareia, foi logo para Jerusalém. E, tendo saudado a igreja, seguiu para Antioquia.
23 अंत्युखियामध्ये थोडा काळ घालविल्यानंतर, तिथून पौल बाहेर पडला आणि गलातीया व फ्रुगिया या प्रांतामधून ठिकठिकाणी प्रवास करीत तेथील सर्व शिष्यांना त्याने प्रोत्साहित केले.
23 Havendo passado ali algum tempo, saiu, atravessando sucessivamente a região da Galácia e Frígia, fortalecendo todos os discípulos.
24 त्याचवेळी आलेक्सांद्रियाचा रहिवासी, अपुल्लोस नावाचा यहूदी इफिस येथे आला होता. तो एक विद्वान मनुष्य होता आणि त्याला शास्त्रलेखाचे सखोल ज्ञान होते.
24 Nesse meio-tempo, chegou a Éfeso um judeu, natural de Alexandria, chamado Apolo, homem eloquente e poderoso nas Escrituras.
25 प्रभूच्या मार्गाचे शिक्षण त्याला देण्यात आलेले होते आणि तो आवेशाने बोलत होता, जरी त्याला फक्त योहानाच्या बाप्तिस्म्याबद्दल माहिती होती, तरी येशूंबद्दल अचूक शिक्षण देत होता.
25 Ele era instruído no caminho do Senhor; e, sendo fervoroso de espírito, falava e ensinava com precisão a respeito de Jesus, conhecendo apenas o batismo de João.
26 तो धैर्याने सभागृहामध्ये बोलू लागला. जेव्हा प्रिस्किल्ला आणि अक्विला यांनी त्याचा संदेश ऐकला, तेव्हा त्यांनी त्याला त्यांच्या घरी आमंत्रित केले आणि परमेश्वराचा मार्ग त्याला अधिक स्पष्टपणे समजावून सांगितला.
26 Apolo começou a falar ousadamente na sinagoga. Quando Priscila e Áquila o ouviram falar, levaram-no consigo e, com mais exatidão, lhe expuseram o caminho de Deus.
27 जेव्हा अपुल्लोसला अखया येथे जायचे होते, तेव्हा बंधू व भगिनींनी त्याला उत्तेजन दिले व अखया येथील शिष्यांनी त्याचे स्वागत करावे असे विनंती पत्र त्याच्या हाती देऊन त्याचा निरोप घेतला. जेव्हा तो तिथे आला, तेव्हा कृपेद्वारे ज्यांनी विश्वास ठेवला होता त्यांना त्याची फार मोठी मदत झाली.
27 Quando ele resolveu percorrer a Acaia, os irmãos o animaram e escreveram aos discípulos para que o recebessem bem. Tendo chegado, Apolo auxiliou muito aqueles que, mediante a graça, haviam crido;
28 कारण सार्वजनिक वाद करून त्याने अतिशय सशक्तपणे यहूदीयांच्या सर्व वादांचे खंडन केले आणि शास्त्राच्या आधाराने त्यांच्या निदर्शनास आणून दिले की, येशू हेच ख्रिस्त आहेत.
28 porque, com grande poder, convencia publicamente os judeus, provando, por meio das Escrituras, que Jesus é o Cristo.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Atos 18, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.