Apocalipse 17

marc (MARC) vs ARC

Sair da comparação
ARC Almeida Revista e Corrigida 2009
1 पीडांची वाटी ओतणार्‍या त्या सात देवदूतांपैकी एक देवदूत माझ्याकडे आला व मला म्हणाला, “माझ्याबरोबर ये, म्हणजे मी तुला अनेक जलप्रवाहांवर बसलेल्या त्या मोठ्या वेश्येचा न्याय कसा होणार आहे ते दाखवेन.
1 E veio um dos sete anjos que tinham as sete taças e falou comigo, dizendo-me: Vem, mostrar-te-ei a condenação da grande prostituta que está assentada sobre muitas águas,
2 पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी व्यभिचार केला आणि पृथ्वीवरील लोक त्यांच्या जारकर्माचे मद्य पिऊन झिंगले.”
2 com a qual se prostituíram os reis da terra; e os que habitam na terra se embebedaram com o vinho da sua prostituição.
3 नंतर मी आत्म्याने संचरित असताना देवदूताने मला रानात नेले. तिथे किरमिजी रंगाचे श्वापद व त्यावर परमेश्वर निंदात्मक नावे असून त्याला सात डोकी व दहा शिंगे होती व एक स्त्री त्यावर बसलेली मला दिसली.
3 E levou-me em espírito a um deserto, e vi uma mulher assentada sobre uma besta de cor escarlate, que estava cheia de nomes de blasfêmia e tinha sete cabeças e dez chifres.
4 त्या स्त्रीने जांभळी व किरमिजी वस्त्रे घातली होती आणि सोने, मौल्यवान रत्ने व मोती यांनी ती शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी आणि तिच्या जारकर्मांच्या अशुद्धतेने भरलेला सोन्याचा प्याला होता.
4 E a mulher estava vestida de púrpura e de escarlata, adornada com ouro, e pedras preciosas, e pérolas, e tinha na mão um cálice de ouro cheio das abominações e da imundícia da sua prostituição.
5 तिच्या कपाळावर लिहिलेले नाव एक गूढ अर्थाचे होते:
5 E, na sua testa, estava escrito o nome: Mistério , a Grande Babilônia, a Mãe das Prostituições e Abominações da Terra .
6 मी बघितले की येशूंसाठी हुतात्मे झालेल्या पवित्र लोकांचे रक्त पिऊन ती झिंगली होती.
6 E vi que a mulher estava embriagada do sangue dos santos e do sangue das testemunhas de Jesus. E, vendo-a eu, maravilhei-me com grande admiração.
7 तेव्हा देवदूत मला म्हणाले: “तू एवढा आश्चर्यचकित का झालास? ती स्त्री कोण आहे आणि ज्या सात डोक्यांच्या आणि दहा शिंगांच्या पशूवर ती स्वार झाली आहे, तो पशू कोण आहे, याचे रहस्य मी तुला सांगतो.
7 E o anjo me disse: Por que te admiras? Eu te direi o mistério da mulher e da besta que a traz, a qual tem sete cabeças e dez chifres.
8 तो पशू जो तुम्ही पाहिला होता, जो होता, पण आता नाही. तरी लवकरच तो अथांग कूपातून वर येईल आणि सार्वकालिक विनाशाकडे जाईल. पृथ्वीवरील लोकांपैकी ज्यांची नावे जगाच्या उत्पत्तीपासून जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत, ते सर्व लोक पशूला पाहून थक्क होतील. जो पूर्वी होता, आता नाही, पण पुन्हा परत येणार.
8 A besta que viste foi e já não é, e há de subir do abismo, e irá à perdição. E os que habitam na terra (cujos nomes não estão escritos no livro da vida, desde a fundação do mundo) se admirarão vendo a besta que era e já não é, mas que virá.
9 “हे समजण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. ती सात डोकी म्हणजे सात टेकड्या आहेत त्यावर ती स्त्री बसते.
9 Aqui há sentido, que tem sabedoria. As sete cabeças são sete montes, sobre os quais a mulher está assentada.
10 त्याचप्रमाणे ती सात डोकी, सात राजांची प्रतिके आहेत. त्यापैकी पाच राजे आधी पतन पावले आहेत. सध्या सहावा राजा राज्य करीत आहे आणि सातवा अजून यावयाचा आहे; पण त्याची कारकीर्द अल्पकाळच टिकेल.
10 E são também sete reis: cinco já caíram, e um existe; outro ainda não é vindo; e, quando vier, convém que dure um pouco de tempo.
11 जो पशू आधी होता, पण आता नाही, तो आठवा राजा असून, सातापैकी एक आहे, नंतर त्याचाही नाश होईल.
11 E a besta, que era e já não é, é ela também o oitavo, e é dos sete, e vai à perdição.
12 “त्या पशूची दहा शिंगे म्हणजे दहा राजे असून, ते अजून सत्तेवर आलेले नाहीत. त्यांनीही या पशूबरोबर राज्य करावे, म्हणून त्यांना एका तासापुरती सत्ता देण्यात येईल.
12 E os dez chifres que viste são dez reis, que ainda não receberam o reino, mas receberão o poder como reis por uma hora, juntamente com a besta.
13 त्या सर्वांचा एकच उद्देश आहे, ते पशूला आपले सामर्थ्य व अधिकार बहाल करतील.
13 Estes têm um mesmo intento e entregarão o seu poder e autoridade à besta.
14 ते सर्वजण मिळून कोकर्‍या विरुद्ध युद्ध पुकारतील. परंतु कोकरा त्यांच्यावर विजय मिळवेल, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे आणि त्यांनी पाचारण केलेले, निवडलेले आणि विश्वासू अनुयायी त्यांच्याबरोबर असतील.”
14 Estes combaterão contra o Cordeiro, e o Cordeiro os vencerá, porque é o Senhor dos senhores e o Rei dos reis; vencerão os que estão com ele, chamados, eleitos e fiéis.
15 तेव्हा देवदूत मला म्हणाला, “ती वेश्या ज्यांच्यावर बसली आहे, ते जलप्रवाह म्हणजे प्रत्येक लोक, समुदाय, राष्ट्र व भाषा आहेत.
15 E disse-me: As águas que viste, onde se assenta a prostituta, são povos, e multidões, e nações, e línguas.
16 तो पशू व जी दहा शिंगे तू पाहिली, ते वेश्येचा द्वेष करतात; ते तिच्यावर हल्ला करतील आणि तिला नग्न करून तिचे मांस खातील व तिला अग्नीने जाळून टाकतील.
16 E os dez chifres que viste na besta são os que aborrecerão a prostituta, e a porão desolada e nua, e comerão a sua carne, e a queimarão no fogo.
17 कारण परमेश्वर आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मनात एक योजना घालेल. आपले सर्व अधिकार परमेश्वराचे वचन पूर्ण होईपर्यंत त्या शेंदरी पशूला देण्याचे ते एकमताने आपसात ठरवतील.
17 Porque Deus tem posto em seu coração que cumpram o seu intento, e tenham uma mesma ideia, e que deem à besta o seu reino, até que se cumpram as palavras de Deus.
18 तुझ्या दृष्टान्तात तू पाहिलेली स्त्री, पृथ्वीच्या राजांवर सत्ता गाजवणार्‍या महानगरीचे दर्शक आहे.”
18 E a mulher que viste é a grande cidade que reina sobre os reis da terra.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Apocalipse 17, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.