Amós 7

marc (MARC)

1 सार्वभौम याहवेहने मला जे दाखविले, ते हे आहे: जेव्हा राजाच्या पिकांची कापणी झाली आणि पुढचे पीक येणार होते, तेव्हा याहवेह टोळांची एक प्रचंड झुंड तयार करीत होते.

2 जेव्हा त्यांनी जमीन साफ केली, तेव्हा मी मोठ्याने ओरडलो, “सार्वभौम याहवेह, क्षमा करा! याकोब कसा टिकू शकेल? तो फार लहान आहे!”

3 तेव्हा याहवेहचे मन द्रवले,

4 सार्वभौम याहवेहने हे मला दाखविले: सार्वभौम याहवेहने अग्नीला न्याय करण्यास बोलाविले; त्यांनी खोल समुद्र कोरडा केला आहे आणि त्यांनी भूमी गिळंकृत केली आहे.

5 तेव्हा मी म्हणालो, “अहो सार्वभौम याहवेह, मी तुम्हाला विनंती करतो, थांबा! याकोब कसा वाचेल? तो फार लहान आहे!”

6 मग याहवेहचे मन द्रवले.

7 त्यांनी मला हे दाखविले: ओळंबा लावून बांधलेल्या एका भिंतीच्या जवळ, प्रभू हातात ओळंबा घेऊन उभे होते.

8 आणि याहवेहने मला विचारले, “आमोस, तुला काय दिसते?”

9 “इसहाकाचे उच्च पूजास्थाने नाश करण्यात येतील

10 तेव्हा बेथेलचा याजक, अमस्याहने इस्राएलचा राजा यरोबोअमाला हा निरोप पाठविला: आमोस इस्राएलच्या हृदयात तुमच्याविरुद्ध कट रचीत आहे. त्याचेही सर्व शब्द देशासाठी असह्य आहेत.

11 कारण आमोस असे म्हणत आहे:

12 नंतर अमस्याह आमोसला म्हणाला, “हे संदेष्ट्या, येथून यहूदीया प्रांतात परत जा आणि तिथे जाऊन आपली भाकर कमव आणि तुझे संदेश तिथे सांगत राहा!

13 याच्यापुढे बेथेल येथे संदेश देऊ नकोस, कारण हे राजकीय भवन आहे आणि राज्याचे मंदिर आहे.”

14 आमोसने अमस्याहला उत्तर दिले, “मी तर संदेष्टा नाही आणि मी संदेष्ट्याचा पुत्रही नाही, मी तर मेंढपाळ आणि उंबरांच्या झाडांची निगा राखणारा होतो.

15 परंतु मी गुरांची राखण करीत असताना याहवेहने मला दूर नेले आणि मला म्हणाले, ‘जा, आणि माझ्या इस्राएली लोकांना संदेश सांग.’

16 म्हणून आता तुम्ही याहवेहचे वचन ऐका, व तुम्ही म्हणतात,

17 “म्हणून याहवेह असे म्हणतात:

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Amós 7, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.