2 Tessalonicenses 3

marc (MARC) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 आता इतर गोष्टीसंबंधाने, बंधू आणि भगिनींनो, आमच्यासाठी प्रार्थना करा यासाठी की जसा तुमच्यामध्ये झाला तसा प्रभूचा संदेश वेगाने पसरावा व त्यास सन्मान मिळावा.
1 Por fim, irmãos, orai por nós, para que a palavra do Senhor se propague e seja estimada, tal como acontece entre vós,
2 दुष्ट व वाईट माणसांकडून आमची सुटका व्हावी म्हणूनही प्रार्थना करा, कारण प्रत्येकजण प्रभूवर विश्वास करणारा असतोच असे नाही.
2 e para que sejamos livres dos homens perversos e maus; porque nem todos possuem a fé.
3 परंतु प्रभू विश्वासू आहेत, ते तुम्हाला सामर्थ्यवान करतील आणि दुष्टापासून तुमचे रक्षण करतील,
3 Mas o Senhor é fiel, e ele há de vos dar forças e vos preservar do mal.
4 आणि आम्हाला प्रभूमध्ये भरवसा आहे की आम्ही आज्ञापिलेल्या गोष्टी तुम्ही करता आणि करीतच राहाल.
4 Quanto a vós, temos plena certeza no Senhor de que estareis cumprindo e continuareis a cumprir o que vos prescrevemos.
5 प्रभू तुमची अंतःकरणे परमेश्वराच्या प्रीतिकडे आणि ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावो.
5 Que o Senhor dirija os vossos corações para o amor de Deus e a paciência de Cristo.
6 प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा करतो की, जो प्रत्येक विश्वासणारा बंधू आळशी आणि फूट पाडणारा आणि आमच्याद्वारे जे शिक्षण मिळाले त्याप्रमाणे जीवन न जगणारा असल्यास त्यापासून दूर राहा.
6 Intimamo-vos, irmãos, em nome de nosso Senhor Jesus Cristo, que eviteis a convivência de todo irmão que leve vida ociosa e contrária à tradição que de nós tendes recebido.
7 कारण तुम्हाला आमचे अनुकरण कसे करावयाचे हे चांगले माहीत आहे. आम्ही तुम्हामध्ये राहत असताना आळशी नव्हतो.
7 Sabeis perfeitamente o que deveis fazer para nos imitar. Não temos vivido entre vós desregradamente,
8 आम्ही कोणाचेही अन्न विकत घेतल्याशिवाय खाल्ले नाही; याउलट, तुमच्यातील कोणावरही ओझे होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस परिश्रम आणि कष्ट केले.
8 nem temos comido de graça o pão de ninguém. Mas, com trabalho e fadiga, labutamos noite e dia, para não sermos pesados a nenhum de vós.
9 याचा अर्थ तुमच्यापासून मदत मिळण्याचा अधिकार आम्हाला नाही असे नाही, परंतु आम्ही हे यासाठी केले की तुम्ही आमचे अनुकरण करावे म्हणून तुम्हाला आदर्श झालो.
9 Não porque não tivéssemos direito para isso, mas foi para vos oferecer em nós mesmos um exemplo a imitar.
10 आम्ही तुम्हाजवळ होतो, तेव्हाही तुम्हाला हाच नियम दिला होता: “जो कोणी काम करू इच्छित नाही, त्याने खाऊ नये.”
10 Aliás, quando estávamos convosco, nós vos dizíamos formalmente: Quem não quiser trabalhar, não tem o direito de comer.
11 तुमच्यापैकी काहींची जीवनशैली आळशी आहे आणि काही लोक व्यत्यय आणणारे व इतरांच्या कामात लुडबुड करतात असे आम्ही ऐकतो.
11 Entretanto, soubemos que entre vós há alguns desordeiros, vadios, que só se preocupam em intrometer-se em assuntos alheios.
12 अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने विनंती नव्हे, आज्ञा करतो की त्यांनी शांत व्हावे आणि आपल्या अन्नासाठी श्रम करावे.
12 A esses indivíduos ordenamos e exortamos a que se dediquem tranqüilamente ao trabalho para merecerem ganhar o que comer.
13 बंधू आणि भगिनींनो, तुम्ही सत्कृत्य करीत असताना खचून जाऊ नका.
13 Vós, irmãos, não vos canseis de fazer o bem.
14 जो कोणी या पत्रात लिहिल्याप्रमाणे आमच्या बोधाचे पालन करणार नाही त्याची विशेष दखल घ्या व त्याला लाज वाटावी म्हणून त्याच्यापासून दूर राहा.
14 Se alguém não obedecer ao que ordenamos por esta carta, notai-o e, para que ele se envergonhe, deixai de ter familiaridade com ele.
15 त्याला शत्रूप्रमाणे लेखू नका, तर तुम्ही विश्वासणाऱ्या बंधूला द्याल त्याप्रमाणे त्याला ताकीद द्या.
15 Porém, não deveis considerá-lo como inimigo, mas repreendê-lo como irmão.
16 आता सर्व शांतीचे प्रभू स्वतः सर्ववेळी आणि सर्वप्रकारे आपली शांती तुम्हाला देवो. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो.
16 O Senhor da paz vos conceda a paz em todo o tempo e em todas as circunstâncias. O Senhor esteja com todos vós.
17 आता मी पौल, माझ्या स्वतःच्या हातांनी या शुभेच्छा लिहित आहे, माझ्या सर्व पत्रात हे चिन्ह आहे आणि मी अशाप्रकारे लिहित असतो.
17 A saudação vai de meu próprio punho: PAULO. É esta a minha assinatura em todas as minhas cartas. É assim que eu escrevo.
18 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांवर असो.
18 A graça de nosso Senhor Jesus Cristo esteja com todos vós!

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Tessalonicenses 3, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.