2 Samuel 7
marc (MARC) vs ARA
1 राजा आपल्या राजवाड्यात राहत असताना व याहवेहने त्याला त्याच्या चहूकडील सर्व शत्रूंपासून विसावा दिल्यानंतर,
1 Sucedeu que, habitando o rei Davi em sua própria casa, tendo-lhe o Senhor dado descanso de todos os seus inimigos em redor,
2 राजाने नाथान संदेष्ट्याला म्हटले, “पाहा, मी येथे गंधसरूच्या भवनात राहतो आणि परमेश्वराचा कोश एका तंबूत आहे!”
2 disse o rei ao profeta Natã: Olha, eu moro em casa de cedros, e a arca de Deus se acha numa tenda.
3 नाथानाने राजाला उत्तर दिले, “तुमच्या मनात जे काही आहे, त्यानुसार करा, कारण याहवेह तुम्हाबरोबर आहेत.”
3 Disse Natã ao rei: Vai, faze tudo quanto está no teu coração, porque o Senhor é contigo.
4 परंतु त्याच रात्री याहवेहचे वचन नाथानाकडे आले, ते असे:
4 Porém, naquela mesma noite, veio a palavra do Senhor a Natã, dizendo:
5 “जा आणि माझा सेवक दावीदाला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी निवास करावा म्हणून माझ्यासाठी तू घर बांधणार काय?
5 Vai e dize a meu servo Davi: Assim diz o Senhor : Edificar-me-ás tu casa para minha habitação?
6 इस्राएली लोकांना इजिप्त देशातून मी बाहेर आणले तेव्हापासून आजपर्यंत मी घरात राहिलो नाही. मी एका ठिकाणाहून दुसरीकडे, माझे निवासस्थान म्हणून डेर्यातूनच फिरत आलो आहे.
6 Porque em casa nenhuma habitei desde o dia em que fiz subir os filhos de Israel do Egito até ao dia de hoje; mas tenho andado em tenda, em tabernáculo.
7 जिथे कुठे मी इस्राएली लोकांबरोबर फिरत आलो, तेव्हा त्यांच्यातील ज्यांना मी माझ्या इस्राएली लोकांची मेंढपाळाप्रमाणे काळजी घेण्यास आज्ञा दिली त्यातील कोणत्याही अधिकार्यांना, “तुम्ही माझ्यासाठी गंधसरूचे घर का बांधले नाही” असे कधी म्हटले काय?’
7 Em todo lugar em que andei com todos os filhos de Israel, falei, acaso, alguma palavra com qualquer das suas tribos, a quem mandei apascentar o meu povo de Israel, dizendo: Por que não me edificais uma casa de cedro?
8 “तर आता माझा सेवक दावीदाला सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: मी तुला कुरणातून, कळप राखीत असताना आणले आणि माझ्या इस्राएली लोकांवर अधिपती म्हणून नेमले.
8 Agora, pois, assim dirás ao meu servo Davi: Assim diz o Senhor dos Exércitos: Tomei-te da malhada, de detrás das ovelhas, para que fosses príncipe sobre o meu povo, sobre Israel.
9 जिथे कुठे तू गेलास तिथे मी तुझ्याबरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुझ्यापुढून छेदून टाकले. आता मी पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ पुरुषांच्या नावांप्रमाणे तुझे नाव महान करेन.
9 E fui contigo, por onde quer que andaste, eliminei os teus inimigos diante de ti e fiz grande o teu nome, como só os grandes têm na terra.
10 आणि मी माझ्या इस्राएली लोकांसाठी एक ठिकाण नेमून देईन आणि त्यांना त्या ठिकाणी स्थापित करेन, यासाठी की त्यांना स्वतःचे घर असावे आणि त्यांना पुन्हा त्रास होऊ नये. आणि पूर्वीप्रमाणे दुष्ट लोकांनी त्यांचा छळ करू नये.
10 Prepararei lugar para o meu povo, para Israel, e o plantarei, para que habite no seu lugar e não mais seja perturbado, e jamais os filhos da perversidade o aflijam, como dantes,
11 मी माझ्या इस्राएली लोकांवर पुढारी नेमले तेव्हापासून त्यांनी तसेच केले आहे. मी तुलासुद्धा तुझ्या सर्व शत्रूंपासून विसावा देईन.
11 desde o dia em que mandei houvesse juízes sobre o meu povo de Israel. Dar-te-ei, porém, descanso de todos os teus inimigos; também o Senhor te faz saber que ele, o Senhor , te fará casa.
12 जेव्हा तुझे दिवस भरतील आणि तू आपल्या पूर्वजांबरोबर निजशील, तेव्हा मी तुझे संतान म्हणजे तुझ्या पोटचा वंश उभा करून त्याला तुझा उत्तराधिकारी बनवीन, मी त्याचे राज्य प्रस्थापित करेन.
12 Quando teus dias se cumprirem e descansares com teus pais, então, farei levantar depois de ti o teu descendente, que procederá de ti, e estabelecerei o seu reino.
13 तोच माझ्या नावाकरिता घर बांधेल आणि मी त्याचे राजासन सर्वकाळासाठी स्थापित करेन.
13 Este edificará uma casa ao meu nome, e eu estabelecerei para sempre o trono do seu reino.
14 मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल. तो जेव्हा चूक करेल, तेव्हा मी त्याला मनुष्याच्या काठीने, मानवांच्या फटक्यांनी शिक्षा करेन.
14 Eu lhe serei por pai, e ele me será por filho; se vier a transgredir, castigá-lo-ei com varas de homens e com açoites de filhos de homens.
15 परंतु तुझ्यासमोरून काढून टाकलेल्या शौलावरची प्रीती मी जशी दूर केली, तशी तुझ्या संतानावरची माझी प्रीती काढून टाकली जाणार नाही.
15 Mas a minha misericórdia se não apartará dele, como a retirei de Saul, a quem tirei de diante de ti.
16 तुझे घराणे आणि तुझे राज्य माझ्यासमोर सर्वकाळ टिकून राहेल; तुझे राजासन सर्वकाळासाठी स्थापित केले जाईल.’ ”
16 Porém a tua casa e o teu reino serão firmados para sempre diante de ti; teu trono será estabelecido para sempre.
17 या संपूर्ण प्रकटीकरणातील प्रत्येक शब्द नाथानाने दावीदाला सांगितला.
17 Segundo todas estas palavras e conforme toda esta visão, assim falou Natã a Davi.
18 नंतर दावीद राजा आत जाऊन याहवेहसमोर बसला आणि म्हणाले:
18 Então, entrou o rei Davi na Casa do Senhor , ficou perante ele e disse: Quem sou eu, Senhor Deus, e qual é a minha casa, para que me tenhas trazido até aqui?
19 आणि हे सार्वभौम याहवेह, जणू हे आपल्या दृष्टीने पुरेसे नव्हते म्हणून आपण आपल्या सेवकाच्या घराण्याच्या भविष्याबद्दलही अभिवचन दिले आहे आणि हे याहवेह परमेश्वरा हा करार केवळ एका मनुष्यासाठी आहे!
19 Foi isso ainda pouco aos teus olhos, Senhor Deus, de maneira que também falaste a respeito da casa de teu servo para tempos distantes; e isto é instrução para todos os homens, ó Senhor Deus.
20 “दावीद तुमच्यापुढे आणखी काय बोलू शकतो? कारण हे सार्वभौम याहवेह, आपल्या सेवकाला तुम्ही ओळखता.
20 Que mais ainda te poderá dizer Davi? Pois tu conheces bem a teu servo, ó Senhor Deus.
21 आपल्या वचनासाठी आणि तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही हे महान कार्य केले आहे व आपल्या सेवकाला ते कळविले आहे.
21 Por causa da tua palavra e segundo o teu coração, fizeste toda esta grandeza, dando-a a conhecer a teu servo.
22 “हे सार्वभौम याहवेह, तुम्ही किती थोर आहात! तुमच्यासारखा कोणीही नाही, जे आम्ही आमच्या कानांनी ऐकले आहे त्यानुसार, तुमच्याशिवाय दुसरे कोणी परमेश्वर नाही.
22 Portanto, grandíssimo és, ó Senhor Deus, porque não há semelhante a ti, e não há outro Deus além de ti, segundo tudo o que nós mesmos temos ouvido.
23 आपल्या इस्राएली लोकांसारखे कोण आहेत—पृथ्वीवरील असे एक राष्ट्र ज्यांनी आपले लोक व्हावे म्हणून परमेश्वर त्यांना खंडून घेण्यास व आपले नाव प्रसिद्ध करण्यासाठी गेले; आणि ज्या तुमच्या लोकांना तुम्ही इजिप्त देशातून, म्हणजे राष्ट्रे व त्यांची दैवते यांच्यामधून सोडविले व त्यांच्यादेखत आपल्या लोकांसाठी महान व अद्भुत कार्य केले?
23 Quem há como o teu povo, como Israel, gente única na terra, a quem tu, ó Deus, foste resgatar para ser teu povo? E para fazer a ti mesmo um nome e fazer a teu povo estas grandes e tremendas coisas, para a tua terra, diante do teu povo, que tu resgataste do Egito, desterrando as nações e seus deuses?
24 तुम्ही आपल्या इस्राएली लोकांना स्वतःचे खास लोक म्हणून सर्वकाळासाठी स्थापित केले आहे आणि हे याहवेह, तुम्ही त्यांचे परमेश्वर झाला आहात.
24 Estabeleceste teu povo Israel por teu povo para sempre e tu, ó Senhor , te fizeste o seu Deus.
25 “तर आता, हे याहवेह परमेश्वरा, आपला सेवक व त्याच्या घराण्याविषयी जे अभिवचन तुम्ही दिले आहे, ते आपण सर्वकाळपर्यंत पूर्ण करावे, आपण म्हटल्याप्रमाणे आपण करावे,
25 Agora, pois, ó Senhor Deus, quanto a esta palavra que disseste acerca de teu servo e acerca da sua casa, confirma-a para sempre e faze como falaste.
26 यासाठी की तुमचे नाव सर्वकाळ महान होईल. तेव्हा लोक म्हणतील, ‘सर्वसमर्थ याहवेह हे इस्राएलचे परमेश्वर आहेत!’ आणि आपला सेवक दावीदाचे घराणे तुमच्या दृष्टीत स्थापित व्हावे.
26 Seja para sempre engrandecido o teu nome, e diga-se: O Senhor dos Exércitos é Deus sobre Israel; e a casa de Davi, teu servo, será estabelecida diante de ti.
27 “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, तुम्ही आपल्या सेवकाला हे प्रकट केले आहे की, ‘मी तुझे घर बांधीन.’ त्यामुळे आपल्या सेवकाला तुमच्याकडे ही प्रार्थना करण्याचे धैर्य आले आहे.
27 Pois tu, ó Senhor dos Exércitos, Deus de Israel, fizeste ao teu servo esta revelação, dizendo: Edificar-te-ei casa. Por isso, o teu servo se animou para fazer-te esta oração.
28 सार्वभौम याहवेह, तुम्ही परमेश्वर आहात! तुमचा करार विश्वासयोग्य आहे आणि तुम्ही आपल्या सेवकासाठी उत्तम गोष्टींचे अभिवचन दिले आहे.
28 Agora, pois, ó Senhor Deus, tu mesmo és Deus, e as tuas palavras são verdade, e tens prometido a teu servo este bem.
29 तर आता प्रसन्न होऊन आपल्या सेवकाच्या घराण्याला आशीर्वाद द्या, म्हणजे त्यांनी तुमच्या दृष्टीपुढे सदैव राहावे; कारण, सार्वभौम याहवेह, तुम्ही हे बोलला आहात आणि आपल्या आशीर्वादाने तुमच्या सेवकाचे घराणे सदैव आशीर्वादित व्हावे.”
29 Sê, pois, agora, servido de abençoar a casa do teu servo, a fim de permanecer para sempre diante de ti, pois tu, ó Senhor Deus, o disseste; e, com a tua bênção, será, para sempre, bendita a casa do teu servo.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Samuel 7, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.